बॉटबॉय यांची ऐसी विशेषांक संपादकपदी नेमणूकीनिमित्त मुलाखत

'ऐसी अक्षरे'च्या आगामी विशेषांकाच्या संपादकपदासाठी कोणाची नेमणूक होते यावर जालीय जगताचं लक्ष केंद्रित होऊन राहिलेले होतं. या महत्त्वाच्या पदावर व्यवस्थापकांनी बॉटबॉय यांची नेमणूक केल्याचं जाहीर केल्यावर एकच कल्लोळ झाला. हे पद भूषवण्यासाठी अनेक लायक उमेदवार असताना, निव्वळ व्यवस्थापकांच्या उजव्या प्रतिगामी विचारसरणीची री ओढणे आणि जमेल तेव्हा विरुद्ध विचारसरणीवर हल्ला चढवणे एवढ्याच पात्रतेवर त्यांना हे पद देण्यात आले आहे अशी चर्चा ताबडतोब खरडवह्यांतून आणि नुकत्याच जन्मलेल्या खरडफळ्यावर सुरू झाली. अनेकांनी या विषयावर व्यनिमनीच्या गुजगोष्टी सुरू केल्या तर काहींनी स्काइप, गूगल हॅंगाउट, इमेल, फोन, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर वापरून हा विषय भूमिगतरीत्या जिवंत ठेवला. याला 'ऐसी अक्षरे'वरच्या कर्कशपणाचं टोक मानलं जात आहे. या जालीय उद्रेकाची परिणती ऐसीवरच्या सदस्यांनी संप पुकारण्यात झाली. आज आपल्याकडे आले आहेत, बॉटबॉय - नवीन विशेषांक व्यवस्थापक आणि जनोबा - 'ऐसी'वरच्या संपकऱ्यांचे प्रतिनिधी.

प्रश्न - तुमच्याकडे हे पद सांभाळण्यासाठी लागणारी पात्रता नाही, असा तुमच्यावर सदस्यांचा आरोप आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे?
उत्तर - सर्वप्रथम, वैयक्तिक आयुष्य आणि जालीय आयुष्य यात तुम्ही गल्लत करत आहात. वैयक्तिक आयुष्यात मी व्यवस्थापकांचा मित्र असेनही. पण आधी मी लेखक आहे, मग व्यवस्थापकांचा मित्र आहे. गेले एक वर्ष आणि सतरा आठवडे मी दोन लेख आणि काही प्रतिसाद दिलेले आहेत. तुम्ही हवे तितके आरोप करा, पण एक सांगा, आता काहीतरी निकष लावूनच व्यवस्थापनाने माझी निवड केली ना? काहींना जालीय आयुष्यात संधी मिळते, काहींना मिळत नाही. मला जालावर लिहिण्याची संधी मिळाली. मी जे काही लेखन केलं आहे ते माझ्या कुवतीचा पूर्ण वापर करूनच केलेलं आहे. माझे दोन धागे आहे, मी प्रतिसाद लिहिलेले आहेत, माझ्या प्रतिसादांखाली स्वाक्षरीही असते, माझी लेखनाची एक शैली आहे. इथे व्यवस्थापक बनण्यापूर्वी एक वर्ष सतरा आठवडे मी सतत लिखाण आणि प्रतिसाद दिलेले आहेत. मी काही हवेतून आलेलो नाही. माझा 'ऐसी'वरचा सदस्यकाळच बघा किती प्रदीर्घ आहे. याशिवाय मी व्यक्तिगत आयुष्यात उच्चशिक्षित आहे, मला प्रोग्रॅमिंग करता येतं, मला मराठी शुद्धलेखनाची जाण आहे, माझ्याकडे शुद्धलेखन तपासण्यासाठी शुद्धलेखनकोषही आहे. हे सगळं त्यांनी बघितलेलं असणार. हे सगळं काही एका दिवसात घडलेलं नाही. 'ऐसी अक्षरे'चे व्यवस्थापक संपूर्ण संस्थळ चालवतात, ते काही फक्त एकच विशेषांक किंवा धागा चालवत नाहीत. त्यांना माझ्या क्षमता समजलेल्याच असणार ना! माझ्यात पात्रता नसती तर व्यवस्थापकांनी इतका विचार करून माझी निवड का केली असती? यावरूनच माझी निवड होण्याची लायकी आहे हे सिद्ध होतं. आणि मला एक सांगा मी नवीन विशेषांक काढण्याआधीच तुम्ही माझी लायकी कशी विचारू शकता? हे म्हणजे परीक्षेला बसण्याआधीच नापास करण्यासारखं आहे.

प्रश्न - तुम्ही या तथाकथित पीडीताच्या भूमिकेत का शिरताय? तुम्ही एक वर्ष सतरा आठवडे सदस्य आहात ही गोष्ट निराळी आणि व्यवस्थापक बनून संस्थळाला दिशा देण्याची गोष्ट निराळी आहे. वेगळ्या शब्दांत मांडते, संस्थळावर व्यवस्थापक बनणं लांबचीच गोष्ट, श्रेणीदाते बनण्यासाठीही कठीण परीक्षेत पास व्हावं लागतं. संपकऱ्यांचे प्रतिनिधी, जनोबा त्याबद्दल तुम्हाला सांगतीलच. तर मग ज्या माणसाने संस्थळ आणि सदस्यांना दिशा देण्याची अपेक्षा आहे त्यांना कठोर नियमचाळणी का लावू नये? तुमच्या लेखनाची प्रतही फार उच्च नाही.
उत्तर - हे पहा, मी इथे एक वर्ष सतरा आठवडे सदस्य आहे. त्याशिवाय मी दोन लेखही लिहिलेले आहेत. आणि असं पहा, तुमचा इथे कंपू नसतो, तुम्हाला चांगल्या श्रेणी देणारे लोक नसतात तेव्हा त्या पाठिंब्याशिवाय एकट्याने इथे एवढा काळ टिकून राहणं आणि लेख, प्रतिसाद लिहिणं फार सोपी गोष्ट नाही. सुरुवातीला कंपू जमेस्तोवर सगळ्यांनाच त्रास आणि अवहेलनेला तोंड द्यावं लागतं. तुम्ही माझ्या लेखनाची प्रत खालची आहे असं म्हणता, पण मी किती वेळा माझ्या स्वाक्षऱ्या बदलल्या हे बघत नाही. मी किती प्रतिसाद, कंपूच्या पाठिंब्याशिवाय लिहिले ते बघत नाही. माझ्या भूतपूर्व लेखनाकडे बघून तुम्ही माझ्याबद्दल मतं का बनवता?

प्रश्न - गेल्या ऐसीच्या विशेषांकांवर काम करणारांची नावं पाहा - मेघना भुस्कुटे, अमुक.... त्यांच्या लेखनाची, चित्रांची यादी प्रचंड प्रभावी आहे. सर्व सदस्यांमध्ये त्यांना मान आहे. या थोरामोठ्यांच्या पंक्तीत तुम्ही बसू शकाल असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही आत्तापर्यंत लिहिलेले दोन लेख तुमचं विशेषांकाचं व्यवस्थापक हे पद मिळवण्यासाठी पुरेसे नाहीत.
उत्तर - कोण ठरवणार माझ्या लेखनाची प्रत? चांगलं काय हे कोण ठरवणार नक्की? विद्यार्थी?

हा शुद्ध शुद्ध राजकीय अपप्रचार आहे. मी आत्तापर्यंत कधीच म्हटलेलं नाही की मी त्यांच्या बरोबरीचा आहे. मी केवळ व्यवस्थापनाचा मित्र असल्यामुळे माझी आधीच्या संपादकांशी तुलना केली जाते आहे. माझ्या भूतकालीन लेखनावरून तुम्ही मला का जोखता? मीच तुम्हाला विचारतो - मला सांगा, की संपादक होण्यासाठी स्वतः चांगलं लेखन करणं आवश्यक आहे असं कोणी सांगितलं? किंबहुना लिखाणातलं काही कळण्याची काय गरज आहे? उद्या तुम्ही म्हणाल की साक्षरता प्रसार मंडळाच्या अध्यक्षाला स्वतःला लिहिता वाचता यायला हवं! किंवा मंदिराचा पुजारी होण्यासाठी कधीतरी आरत्या म्हटलेल्या असणं आवश्यक आहे असं म्हणाल! असले प्रश्न विचारण्याआधी मला काम करू द्या, आणि मग विचारा काम येतं की नाही ते. हा शुद्ध राजकीय अपप्रचार आहे, त्यामुळे मी याच्याशी बिलकुल सहमत नाही.
कदाचित श्रेणीदाते होण्यासाठी जी पात्रता लागते तीही माझ्याकडे नसेल. पण त्यामुळे काहीच फरक पडत नाही. कारण माझ्या हाताखाली अनेक चांगले लोक काम करणार आहेत. त्यामुळे मी अकार्यक्षम असलो तर काय फरक पडतो!?? मी प्रचंड पॅशनने काम करणार आहे. पण तुम्ही ते काम सुरू करण्याआतच कसं ठरवून टाकता की मी ती परीक्षा पास होऊ शकणार नाही!!!???

प्रश्न - तुमच्यात क्षमता नसताना निव्वळ संस्थापकांच्या मैत्रीपोटी तुम्हाला हे पद मिळालं आहे, या आरोपाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
उत्तर - कोण म्हणतं क्षमता नाही? आणि मला एक सांगा आधीच्या संपादकांत तरी काय हो मोठी क्षमता लागून गेली आहे? मेघना भुस्कुटेंचं लिखाण भिकारच आहे…

प्रश्न - भिकार...? त्यांच्या लिखाणाचे अनेक चाहते आहेत!
उत्तर - ते खरं आहे. मी जेव्हा भिकार म्हणालो तेव्हा मला असं म्हणायचं होतं की भिकार म्हणजे ऐसीवरच्या चांगल्या लिखाणापैकी. तुम्ही माझ्या शब्दांचा वेडावाकडा अर्थ काढून मला जे बोलायचं नव्हतंच ते बोलल्याचा आभास निर्माण करताहात.

प्रश्न - पण तुम्हीच...
उत्तर - ते काही असो. आणि अमुक यांनी तरी काय दिवे लावले आहेत? कुठेतरी काहीतरी चित्रं काढली झालं. त्यांना कोणी विरोध केला नाही. कारण ते दोघेही डाव्या विचाराचे, पुरोगामी आहेत. त्यामुळे त्यांची निवड ही सदस्यांना मान्य झाली. मी उजव्या विचारसरणीचा आहे म्हणून लोकांना राग येतो. कारण मी जे लेख लिहिले आहेत त्यात स्त्रीवादावर आणि स्त्रीवादी मंडळींच्या देवतेवर म्हणजे सिमॉन बुव्वावर कोरडे ओढले आहेत. तेच डाव्या लोकांना झोंबले. त्यामुळे मेघना आणि अमुकसारख्या भिक्कारड्यांना पाठिंबा... आणि माझ्यासारख्या उजव्या व्यक्तीला परीक्षा देण्याअगोदरच नापास! हा अन्याय आहे.

प्रश्न - पुन्हा भिक्कारडे?
उत्तर - तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? भिक्कारडे म्हणजे ऐसीवर चांगलं लिखाण करणारे. तुम्ही उगाच तुमचे भलते अर्थ वापरू नका.

प्रश्न - असो, आता मी जरा सदस्यांचे प्रतिनिधी जनोबा यांना प्रश्न विचारायला विनंती करतो. बॉटबॉय यांचं म्हणणं आहे की त्यांना आत्तापर्यंत लेखनाचा आणि स्वतःच्या स्वाक्षऱ्या संपादित करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे ते विशेषांकाचे मुख्य व्यवस्थापक होण्यासाठी पात्र आहेत. तुमचं काय म्हणणं आहे?

जनोबा - रुचीताई, मला हे सगळं हास्यास्पद वाटतं. हे नक्की काय बोलतायत, एकदा कंपूबद्दल, एकदा श्रेणीव्यवस्थेबद्दल. त्यांना नवा विशेषांक म्हणजे खरडफळ्यावर नाव कमावण्याइतपत सोपं वाटतंय का? हे काय फेसबुकावरचं लाईक बटण दाबणं आहे का? व्यवस्थापकाची जबाबदारी काय याची या महोदयांना कल्पना नाही.
‘ऐसी अक्षरे’वरचे श्रेणीदातेही सातत्याने भरीव लेखन करत असतात. त्यांच्या प्रतिसादांना, लेखनाला वजन असावं म्हणून ते वाचन-चिंतन करतात. श्रेणीदाते बनण्यासाठीही त्यांना आपली पात्रता सिद्ध करावी लागते. अशा वाचकांसमोर वाचनासाठी हे नक्की काय देणार आहेत? गेल्या एक वर्ष सतरा आठवड्यांत त्यांनी नक्की काय लिहिलं आहे ते कोणालाही आठवतंय का? त्यांना स्वतःलाही? तसंही त्यांचं लेखन ‘ऐसी’वर उपलब्ध आहेच. लोक त्यांचे लेख एकमेकांना दाखवून त्यांची खिल्ली उडवत आहेत. त्यांनी कसलाही धड अभ्यास न करता फक्त तारे उधळले आहेत. ‘गुंडा’सारख्या चित्रपटांना ते विशेष भाव देतात. विशेषांकासाठी लेखन मिळवणारा मनुष्य असा असणार आहे का?

प्रश्न - जनोबांनी केलेली टीका तीव्र असली तरीही त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे. तुमचं काय म्हणणं?
उत्तर - ते माझ्यावर व्यक्तिगत स्वरूपाची टीका करत आहेत. मी ‘गुंडा’ बघितला याचा अर्थ मला तो आवडला असा होत नाही. लेखक म्हटल्यावर सगळ्या प्रकारच्या साहित्य, कलाकृतींचा आस्वाद घ्यावा लागतो. मी फक्त एकाच ‘गुंडा’चा आस्वाद घेतला होता, तो सुद्धा फक्त लेखापुरताच. तुम्ही तुमचे पूर्वग्रह मनात ठेवून माझ्याबद्दल मतं बनवून घेत आहात. माझं लेखन, माझं काम, इत्यादी अनेक गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. प्लीज, प्लीज, प्लीज, मी श्रेणीदाता आहे का नाही यावरून माझ्याबद्दल मत बनवून घेऊ नका. मी बऱ्याच स्वाक्षऱ्या बदलल्या आहेत हे लक्षात घ्या.

प्रश्न - हा निषेध कंपूबाजांमुळे होत आहे असं तुम्ही म्हणता. याचा नक्की अर्थ काय?
उत्तर - लेखनाशी संबंधित कोणीही व्यक्ती राजकीय मतं लिहीत नाहीत. गेले काही दिवस मी बघतोय, ठराविक कंपूकडून राजकीय हेतूंनी प्रेरित आरोप माझ्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यात कंपूचा स्वार्थी हेतू आहे आणि खेदाने हे म्हणावसं वाटतंय की ‘ऐसी’च्या सदस्यांना यातले स्वार्थी हेतू समजत नाहीयेत. माझ्याबद्दल फार माहिती करून न घेताच यात राजकीय हेतू का आणले जात आहेत, याचा तपास केला पाहिजे.

प्रश्न - तुमचं उत्तर मी वेगळ्या शब्दांत जनोबांना सांगते. तुम्ही कंपूच्या कच्छपी लागून बॉटबॉय यांना विरोध करत आहात, असा आरोप तुमच्यावर होत आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
जनोबा - ‘ऐसी’च्या सगळ्या सदस्यांना आपापली मतं असण्याचा आणि मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि तेवढी कुवत हे सगळे बाळगूनही आहेत. आम्ही त्याबद्दल चर्चा, वादविवाद घडवून आणतो. आम्ही कोणता मनुष्य चांगला-वाईट असा विचार न करता, कोणती विचारधारा, कोणता प्रतिसाद चांगला-वाईट असा विचार करतो. यात कंपूबाजी, राजकीय स्वार्थ वगैरे आलेच कुठे?

प्रश्न - वेगळी मतं मांडणाऱ्या गब्बर सिंग यांना विशेषांकाचे व्यवस्थापक बनवलं असतं तर तुम्ही निषेध केला असता का? व्यवस्थापनातल्या अनेकांशी त्यांच्या खरडचर्चा चालताना दिसतात.
जनोबा - जरूर. गब्बरसिंग व्यक्तिगत पातळीवर न उतरता, अभ्यास करून त्यांची जी काही मतं असतील ती मांडतात. ते आपल्या अधिकारांचा आणि श्रेणीदानातल्या गुप्ततेचा गैरवापर करत नाहीत. त्यांची आणि आमची आर्थिक धोरणांमधली मतं पडली नाही तरीही आम्ही त्यांच्या विरोधात संप पुकारला नसता.
बॉटबॉय यांच्यावर काय जबाबदारी आहे याची त्यांना कल्पना आहे का? भाराभागवत विशेषांक छापला जावा अशी कल्पना काही लोकांनी मांडली आहे. ‘ऐसी’वर नसणाऱ्या अनेकांनी फेसबुकवर अंकाची प्रशंसा केली आहे. आणि ह्यांची जमेची बाजू काय तर फक्त एक वर्ष आणि सतरा आठवड्यांचा सदस्यकालावधी? ‘ऐसी’च्या नियमित वाचकांपैकी किती लोकांना ह्यांचं नाव ठाऊक आहे?

प्रश्न - बॉटबॉय, तुमचं यावर काय म्हणणं आहे?
उत्तर - मी मोठ्या मोठ्या लोकांशी व्यनिमध्ये चर्चा केल्या आहेत. मी व्यवस्थापकांपैकी अनेकांना व्यनि लिहिले आहेत. मी सगळ्यांशी संपर्क ठेवून असतो. माझं नाव छापील माध्यमांत आलेलं नाही, मी परिसंवादांमध्ये भाग घेतला नाही हे इथे महत्त्वाचं नाही.

प्रश्न - तुमची व्यवस्थापकांशी मैत्री आहे. तुमच्या अंकात कोणी लेखकांनी जर व्यवस्थापनावर टीका करणारं, त्यांची खिल्ली उडवणारं लेखन पाठवलं तर तुम्ही ते छापणार का?
उत्तर - माझी विचारधारा, माझं लेखन निराळं. माझ्या विचारधारेचा अंकाच्या विचारांवर काहीही परिणाम होणार नाही. माझ्यासाठी विशेषांकच महत्त्वाचा असेल. पण लेखाकडे बघून मी शेवटी कोणता लेख छापायचा का नाही याचा निर्णय घेईन.
(जनोबांनी इथे एक भुवई उडवली आणि मोठं स्मित केलं.)
मला एवढंच म्हणायचंय की या अंकात फक्त चांगलं आणि चांगल्लच्च लेखन असेल. दिवाळी अंकात जसे ‘ऐसी’ व्यवस्थापन धार्जिणे लेखच असतात तसा बायस मी माझ्या अंकात येऊ देणार नाही.

जनोबा - (जोरात हसत) यावर काय बोलायचं! शब्दच खुंटले. यांना स्वतःच्या शब्दात स्वतःचं म्हणणं धड मांडता येत नाही. इतरांकडे बोटं दाखवून हे स्वतःची सुटका करू बघत आहेत. दुसऱ्याकडे बोट दाखवून आणि गोलमोल विधानं करून हे आपली कमतरता उघडी करत आहेत. श्रेणीदाता बनवावं एवढीही यांच्या तर्कटांची पात्रता नाही. यांना विशेषांकाचं व्यवस्थापक कसं बनवलं कोण जाणे! इतर बरीच मोठी नावं ‘ऐसी’वर आहेत, व्यवस्थापनाला त्यांच्यातलं कोणी सापडलं नाही यावर ‌विश्वास ठेवणं कठीण आहे.

प्रश्न - सदस्यांनीच असहकार पुकारला तर तुम्ही विशेषांकासाठी लेखन कसं मिळणार, बॉटबॉय? तुम्ही हा विशेषांक काढणारच का?
उत्तर - नाही, असं नाही. म्हणूनच मी रोज सदस्यांना खरडवहीतून विनंती करत आहे की आपण चर्चा करूया. कंपूबाजांच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यात तुमची लेखनकला कोमेजू देऊ नका.
माझ्यावर व्यवस्थापकांनी छोटीशी जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी माझ्याकडून हे काम काढून घेईस्तोवर मी विशेषांकाचा व्यवस्थापक म्हणून काम करतच राहणार.

प्रश्न - फक्त रेकॉर्डसाठी. तुमचा आवडता जालीय लेख कोणता? आणि छापील माध्यमांतला?
उत्तर - मला जालावर प्रसिद्ध होणाऱ्या कविता फार आवडतात. आता पावसाळा सुरू झालाय तर फारच सुंदर कविता जालावर वाचायला मिळत आहेत.
छापील माध्यमाबद्दल मी काही बोलणार नाही. माझा संबंध फक्त आंतरजालीय लेखनाशीच येतो.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

(मौज)मजा नाय आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ROFL हाहाहा
प्रश्नकर्ते - "जनोबा" इथेच फुटले.
___
एक आरोप तर झालेला नसताना उगाच बोलून ओढून घेतलाय., धृपद छान जमलय.
____

मला जालावर प्रसिद्ध होणाऱ्या कविता फार आवडतात. आता पावसाळा सुरू झालाय तर फारच सुंदर कविता जालावर वाचायला मिळत आहेत.

ROFL मेले!!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

? ? ?ललित / विडंबन / स्पष्टीकरण /समर्थन /वाचनमात्र फक्त ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म्म.... ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याला बॅटबॉयकडून एक उत्तर आलं तर बहार येईल, फाट्यावर मारलं तर वाईट वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
गजेंद्र चौहान-FTII ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. ते अगदीच उघड होतं. म्हणून मजा नाही आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ठीक!

बॉटबॉय वगैरे अप्रसिद्ध आयडीपेक्षा 'अनु राव' वगैरेंसारख्यांना (- ज्यांनी होय मी मुद्दाम उचकवण्यासाठी लिहिते, अर्थात ट्रोलिंग करते - असा जाहिर कबुली जबाब दिलाय ) बॉटबॉय यांची जागा दिली असती तर अधिक मजा आली असती! Smile Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ - कधी भेटलो तर मी स्वता केलेला चहा तुला. :party:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> बॉटबॉय वगैरे अप्रसिद्ध आयडीपेक्षा 'अनु राव' वगैरेंसारख्यांना <<

म्हणजे गजेंद्र चौहानची ख्याती तुला आधीपासून माहीत होती? 'खुली खिडकी' वगैरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आई ग्ग!!! काय मस्त टोमणा आहे. खुली खिडकी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता आमाल काय येतं/मायतीये ही आमची परायवेट बाब आहे काय?

--आर्डर्ली ऋ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणीही कितीही आरोप केले तरीही सदस्यांशी चर्चा करून आम्ही ऐसीचा 'ट्रोलिंग विशेषांक' काढणार म्हणजे काढणारच. प्रस्थापित व्यवस्थापकांनी माझे खच्चीकरण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही आम्ही काम करून दाखवणारच. श्रेणीदाता असण्याचं पालखीपदस्थपण माझ्याकडे नसले तरीही आम्ही विशेषांक विशेषांक काढणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक बॉट. शाब्दिक कचरा तयार करणं हे माझं काम. Write first, think never.

ऐसी वर वावरायचे तर गालिब चा हा शेर लक्षात ठेवायला लागतो

वहां बात करने पर जबान कटती है
वो ( संपादक कंपु ) कहा करे, और सुना करे कोई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0