भुलभुलैय्या

आशुतोष रामाणीला मी ऑफिसमध्ये पहील्यांदा भेटले. त्याचे झाले असे - मला एका MNC मध्ये Computer Programmer ची पहीलीवहीली नोकरी मिळाली. अन join होण्याच्या दिवशी एक तास आधीच म्हणजे ८ वाजता, मी किंचीत बिचकत आमच्या ऑफिसच्या भव्य इमारतीत प्रवेश केला. इमारत जितकी impressive होती तितकीच जंतर्मंतर भुलभुलैय्याही होती. (स्माईल) पहीलं प्रेमही तसच असतं नाही?
.
माझा डेस्क शोधण्यातच अर्धा तास गेली. साधारण ८:३०/ ८:४० मला माझी पाटी लावलेला डेस्क सापडला अन मी त्या जागेवरती स्थानापन्न झाले. हुश्श्य! माझी नजर माझ्याआधीच येऊन बसलेल्या शेजारच्या तरुण व्यक्तीवर पडली. अगदी नवतरुण नाही तर ३५ शीचा होता. ती व्यक्ती कामात मग्न असल्याने अन मी देखील नवखी असल्याने मी त्याला डिस्टर्ब केले नाही. मात्र १५-२० मिनिटात तोच काम आटोपून माझ्याकडे आला व त्याने स्वतःला इन्ट्रोड्युस केलेच अन मला कॅफेटेरिआ, रिक्रिएशन हॉल कुठे आहे तेही दाखविले. माझ्यात इन्टरेस्ट घेऊन अन सहजतेने बोलल्यामुळे मीही टेन्शन फ्री झाले. अन मी आशुतोषचे आभार मानून कामाला लागले. DBA म्हणजे उत्तम टेक्निकल पोस्टवर होता तो अन आम्ही एकत्र काम करणार याची ती नांदीही होती.
.
जसजसे दिवस गेले तशी आशुतोषशी ओळख वाढतच गेली. त्याचा सर्वोत्तम गुण होता- Giving undivided, flattering attention. त्यामुळेच की काय त्याच्या डेस्कवर लोकांचा राबता असे. त्याचे ३/४ मित्र, ऑफिसातल्या २/३ मुली , एक वृद्ध गृहस्थ अधुनमधुन चक्कर टाकतच. मला ते काय बोलतात याची उत्सुकता असे पण अगदी हळू आवाजात त्यांचे परस्परात विनोद होत, पाठीवर थापा मारल्या जात क्वचित तो कॅफेतही त्यांना घेऊन जाइ. कामात तो चोख होता, त्याच्या विषयात पारंगत होता. मी काही टेक्निकल इश्यु घेऊन गेले की तो चुटकीसरशी सोडवे तरी नाहीतर पाठपुरावा करुन तडीस तरी नेई. पण काम १००% मार्गी लागतच असे. किती हुषार आहे ना तो असे मला नेहमी वाटे. आमच्या गप्पांमध्ये आम्हाला काही कॉमन इन्टरेस्टशी सापडले जसे - पुस्तक वाचन, गाण्यांचा शौक, खाणेपीणे हा तर वीक पॉइन्ट निघाला. मी कधी त्याच्याशी connect झाले हे मला नक्की आठवत नाही. त्याचे लग्न तर झालेले होते अन त्या शहरात त्याला काही नातेवाइक व विखुरलेले अनेक मित्र होते - एवढेच मला ज्ञात होते.
.
पहा आशुचच सांगत बसले. माझं राहीलं बाजूलाच. अशी वहावत जाते ना मी. उगीच नाही आईला काळजी वाटायची. हां तर मी सहसा कोणाच्याही अध्यात मध्यात न पडणारी, स्वतःच्या कोशात रहाणारी सालस मुलगी आहे. माझा एक अनुभव आहे- कानाला फोन लावायचे अन कामावर तुटुन पडाअयचं की काम फत्ते झालच म्हणून समजा. ऑफिस-घर व पुस्तके यांखेरीज मला विश्व नाही कारण मैत्रिणी अशा जवळजवळ नाहीतच. क्वचित आशु IM अर्थात इन्टरनेट मेसेन्जर करुन बोलवुन घेइ. त्याने कधीही हाक मारली तरी मी हातातले काम टाकून तत्परतेने जाई, धावच घेई म्हणा ना.
.
त्या काळात , दुसर्‍या एका डिपार्टमेन्टमधल्या एका तरुण मुलाचा मला त्रास होऊ लागला होता. म्हणजे वारंवार फोन/ऑफिस इमेल्स करणे, वाटेत अडवून गप्पा मारणे, भेटण्याचा प्रयत्न करणे वगैरे. त्यामुळे मी सचिंत झाले होते अन आशुला हे सांगायचे मी ठरविले. नेहमीप्रमाणे नीट ऐकून घेतल्यावर त्याचे म्हणणे पडले की मी त्याला म्हणजे आशुला त्या तरुणाचे नाव सांगू नये पण ऑफीसच्या Policy compliance साइटवर जाऊन निनावी तक्रार जरुन नोंदवावी. आशुला त्या तरुणाचे नाव ऐकण्यात अज्जिबात रस नव्हता कारण त्याच्या मते तो माझा अन त्या तरुणाचाही वैयक्तिक मामला होता. मला त्याच्या या स्टँडचे फार फार कौतुक वाटले. जिथे ऑफिसमधील लोक, गॉसिप करता टपून बसलेली असतात तिथे Firm, well defined personal boundaries राखण्यात तो यशस्वी झाला होता. किती कौतुकास्पद होते ते. आश्वासक अन कौतुकास्पद. माझ्यात हा गुण नव्हता. खरं तर त्याच्या कुटुंबियांबद्दल मीच खोदुन विचारले होते, त्याने कधीच माझ्या वैयक्तिक बाबीत अवाजवी रस दाखविला नव्हता.
.
माझ्या मनामध्ये आशुची पाऊले उमटत होती... आपले काही एथिक्स असलेच पाहीजेत अन त्या एथिक्स च्या खाली घसरु नये म्हणून माणसाने डोळ्यात तेल घालून जागरुक रहायला पाहीजे. पण कसं ना मोहाचा आवाज प्रबल होऊ लागतो तसतसा एथिक्स चा आवाज क्षीण होतो...अगदी सोइस्करपणे. माझा भारावून जायचा अन वहावत जायचा स्वभाव मला माहीत नव्हता असे म्हणणे म्हणजे माझी माझ्याशीच केलेली प्रतारणा ठरेल. अन हेदेखील एक एथिक आहेच की स्वप्रतारणा कधीही करायची नाही. असो.
.
त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता अन तोही माझ्या नाक खुपसण्याच्या सवयीमुळे मला माहीत पडला होता. पण मी आशुकरता घरुन केक करुन नेण्याचे काहीही कारण नव्हते. पण मी श्रम घेऊन केक केलाच अन त्याला दिलाच. त्याच्या चेहर्‍यावर ना आनंद ना आश्चर्य काहीच दिसले नाहे अन मी खट्टु झाले. बहुतेक तो थँक्स देखील म्हणाला नाही. नंतर मात्र मी खूप खुशीत होते. वाढदिवस त्याचा अन खुशीत मी....ये कुछ जम्या नही बरोबर? अगदी बरोबर. हा धोक्याचा कंदील होता.
.
आशु आता फक्त सहकारी राहीला नाही तर माझ्या कल्पनेची रॅम तो खाऊ लागला. माझ्या दिवसातला बराच वेळ - त्याचे बोलणे, हसणे, काम करणे,दिसणे, गप्पा मारणे - हे आठवण्यात व्यतित होऊ लागला. माझ्या मनात तो मुरु लागला अन तशीतशी मला प्रेमाची धुंदी चढू लागली. He loves me/ he loves me not - आठवतो का हा टीन एजी खेळ? ह्म्म्म तस्साच नाही पण त्यासारखा खेळ मी मनात खेळू लागले - ह्म्म हे गाणं म्हणजे आशुला माझ्याबद्दल काय वाटतं ते. delusional खेळ. प्रेम खरच आयुष्याचे शॉक अ‍ॅब्सॉर्बर्स असतात नाही? माझी रात्रीची झोप कमी होऊ लागली, मला एक नशा चढली, उन्मादक वाटायचे. बहुतेक प्रेम हे ५०% आकर्षण अन ५०% स्वप्रेम असावे. स्वप्रेम कारण आपण त्याच्या डोळ्यात कसे दिसतो हे जाणून घ्यायची तहान. I am sure higher octave of love is spiritual/Godlike love. चांगला पोशाख केला की आशु क्वचित मला कॉम्प्लिमेन्ट देई त्या दिवशी जग फार गोड भासे, मूड चीअर अप होत असे. पण रोझी कलर्ड चष्मा घातलेल्या मला हे कसे कळावे की आशु अनेकांना कॉम्प्लिमेन्टस देतो, सभ्यपणे, कर्टसी म्हणून.
.
निव्वळ Ridiculous! काय हक्क होता माझा त्याच्यावर - legally/emotionally/materialistically!!! मीच नव्हते का अतिक्रमण करत त्यांच्या हक्कांवर, भावनांवर, वेळेवर. Fools rush in where wise tread carefully अशीच म्हण आहे बरोबर? माझ्या कलपनेचं वारा भरलेलं शिडाचं तारु पार भरकटलं होतं इतकं की काही लोकांच्या ते लक्षात आलं होतं.
.
नंतर एके दिवशी अचानक ती dreadful e-mail आली की Mr. Ramani has been asset to our company & he will be missed but wish him good luck on next.... वगैरे वगैरे. म्हणजे आशुनी २-३ आठवड्यापूर्वीच राजीनामा दिला होता .... अन मला सांगीतलही नव्हतं. माझ्या पोटात एकदम खड्डा पडला होता. मी त्याला कॅफेत नेऊन कन्फ्रन्ट केलं की मला का सांगीतलं नाहीस? किती चाइल्डिशपणा होता तो. काय हक्क होता माझा त्याच्यावर? नक्की कोणत्या आधारावर अन काय अपेक्षा मी ठेवायला हव्या होत्या? माझ्या मनाच्या रेतीवर तुझी पावले उमटलीत ... तू माझ्यावर प्रेम केलच पाहीजे ... अन समजा केलं तर पुढे काय? शून्य भविष्य होतं या प्रेमाला अन तरीही माझा अट्टाहास हा की त्याने माझ्यावर प्रेम करावं.
.
त्याने नेहमीप्रमाणे शांतपणे की थंडापणे माझे म्हणणे ऐकून घेतले अन तो म्हणाला- "तुझ्या मनाचा एक कोपरा माझा असणारे. ती स्पेस कधीच फ्री होऊ शकणार नाही. तुझ्या मनात उमटलेली माझी पावलेदेखील तू लाख सॉफ्ट डिलीट करशील पण ती हार्ड डिलीट होणार नाहीत." काय ही DBA ची भाषा! कसं काय कोणी इतकं शुष्क बोलू शकतं! hey wait a minute - माझ्या मनाने मला दटावले- स्वतःला हे विचार की तुझ्यासारखे कोणी विवाहीत पुरुषाच्या मागे लागून कसे एथिक्स गमावून बसतं? तुझं पहीलं प्रेम आहे ही सबब अन्य कोणावर अन्याय करण्यास पुरेशी आहेच का मुळी?
.
अगदी खरं आहे. सध्या मी इथेच काम करते. हां ही इमारत मला भुलभुलैय्या अजिबातच वाटत नाही. अजुन दुसर्‍या ऑफीसातही काय कोणतीच इमारत इतकी जंतर-मंतर मला वाटणार नाही. सरावलेय मी.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

मस्तच !!!!!!! ५/५ तुला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कडक!! आवडलंनीत!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलय! आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

यहीच बोलरा, मस्त आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅनशी सहमत व्हायचे दिवस आलेत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर स्फुट तितकंसं थोर नाही. पण अनेकदा प्रेमात पडण्याचा अनुभव असल्यामुळे अगदी जवळचं वाटलं नि आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अनेकदा प्रेमात पडण्याचा अनुभव

+१ (सेम पिंच)
____________
मला एक गाणं/कविता खूप आवडते -
त्यात नायिका म्हणते एप्रिलमध्ये माझा प्रेमभंग झाला, अन मी फार दु:खी, विमनस्क अन सैरभैर झाले.
काही जुन्या-जाणत्या बायका म्हणाल्या अगं वेडे ही पासिंग फेझ आहे. तू मे मध्ये बघ टुणटुणीत होशील अन परत प्रेमात पडशील.
किती खोटं बोलल्या त्या असं कधी असतं का..
.
.
.
.
.
मे उलटून जून लागला मला परत प्रेमात पडायला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मनामध्ये आशुची पाऊले उमटत होती... आपले काही एथिक्स असलेच पाहीजेत अन त्या एथिक्स च्या खाली घसरु नये म्हणून माणसाने डोळ्यात तेल घालून जागरुक रहायला पाहीजे. पण कसं ना मोहाचा आवाज प्रबल होऊ लागतो तसतसा एथिक्स चा आवाज क्षीण होतो...अगदी सोइस्करपणे. माझा भारावून जायचा अन वहावत जायचा स्वभाव मला माहीत नव्हता असे म्हणणे म्हणजे माझी माझ्याशीच केलेली प्रतारणा ठरेल. अन हेदेखील एक एथिक आहेच की स्वप्रतारणा कधीही करायची नाही. असो.

ही नागमोडी वळणे;
आणि

माझ्या कल्पनेची रॅम तो खाऊ लागला

हे- भन्नाटच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

अनु, भट. अनुप, बॅट्या, मेघना व प्रसन्ना सर्वांचे आभार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली .
हे असं वेड्यासारखं प्रेमात पडायचा अनुभव कधी आलाच नाही त्यामुळे फारसं रिलेट करू शकले नाही. पण माझ्या एका मैत्रिणीची गोष्ट बर्यापैकी अशीच होती ते आठवलं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

Smile धन्यवाद सिद्धी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगलं लिहिलंय!
तरुणपणी असं अनेक जणींबद्दल आकर्षण वाटायचं, पण व्यक्त करण्याची हिंमत ९९टक्के वेळा झाली नाही. आणि एकदाच हिंमत केली तर पदरी निराशा आली. तोपर्यंत वय वाढलं,अक्कल आली(?) आणि त्यामुळे प्रेमात पडण्याची शक्यताच नाहीशी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तोपर्यंत वय वाढलं,अक्कल आली(?) आणि त्यामुळे प्रेमात पडण्याची शक्यताच नाहीशी झाली.

हे पार डोक्यावरुन गेले.
म्हणजे तुमचे असे मत आहे की,

१ वय वाढले तर माणुस प्रेमात पडत नाही.
२.आणि अक्कल असलेला माणुस प्रेमात पडत नाही

हे पचायला जड जातय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, पण ते फक्त माझ्या बाबतीत खरं ठरलाय. त्याचे जनरलायझेशन करता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुप छान, प्रांजळपणे लिहीलयस. अगदी समर्पक शिर्षकासकट आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन आवडले. सत्याचा जवळ वाटले. बाकी इंस्टेन्ट प्रेमाचा जमाना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेमात कोणाच्याही (प्राणी सुद्धा नाही हो)पडण्याचा अनुभव नाही त्यामुळे अव्यक्त.परंतू ललित आणि प्रथम स्त्री एकवचनी लेखन पटतंय.आशुपण कुठल्या भुलभुलैयात अगोदर भरकटला असेल तर-? हे आपलं उगाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकपॉइंट असणं, संभ्रम असणं माणूस सामान्य असल्याचं लक्षण आहे. त्याची अभिव्यक्ति छान झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.