कोडं-गंमतजंमत वगैरे

खालील व्हिडीओतील प्रकाराचे स्पष्टीकरण द्या.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काआआआअही दिसलं नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हा दुवा: https://youtu.be/C0Kj4tMUP9o

का बाष्पीभवन दिसले नाही? तसे असल्यास 'फूल स्क्रीन' करून पहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बाष्पीभवन ? हा तर फ्रीज उघडल्यावर नेहमी दिसणारा व्हिज्युअल इफेक्ट.

बाष्प ऊर्फ वाफ ही नुसत्या डोळ्यांनी दिसते असं वाटत नाही. हवेत असलेल्या वाफेचं उलट फ्रीजच्या / ग्लासच्या थंडपणामुळे अत्यंत बारीक ड्रॉपलेट्समधे द्रवीकरण होतं तेव्हा तो पांढरा धुरकट इफेक्ट दिसतो आणि त्याला आपण "वाफ" असं म्हणतो. पाणी उकळतानाही वर आलेल्या अ‍ॅक्चुअल वाफेचं आजुबाजूच्या तुलनेत थंड हवेच्या संपर्कात येतायेता सूक्ष्म पाण्याच्या कणांत रुपांतर होतं आणि तेच आपल्याला "दिसतं".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पूर्ण अवांतर पण विनोदी नाही.

एखाद्या पूर्ण बंद खोलीत किंवा पेटीत जर ओले कपडे वाळवायचे असतीत तर त्या खोलीतली हवा गरम करुन काही उपयोग नाही. अश्या वेळेस ओले कपडे वाळवायचा एकमेव मार्ग म्हणजे त्या खोलीतली हवा थंड करणे. हवा जितकी थंड करु तितके लवकर कपडे वाळतील.

जर पावसाळ्यात कपडे वाळत नसतील तर खोली बंद करुन एसी कमीत कमी तापमानाला सेट करावा. मस्त कपडे वाळतील.

असहमत. काही शास्त्रीय स्पष्टीकरण असल्यास द्यावे. पूर्ण बंद खोली, थंड म्हणजे किमान किती थंड? वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एसीमध्ये इन-बिल्ट डीह्युमिडिफायर असतात का? तसं असेल तर अनुराव म्हणतात तो परिणाम शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पण एसीमुळे आर्द्रता कमी होते हे मात्र खरे आहे. पण आद्रता कमी करणे आणि अनुरावांचे म्हणणे "संपूर्ण बंद खोलीत तापमान कमी करणे" हे वेगळे आहे. इन थेअरी, समान तापमानाची हवा जरी खेळती ठेवली तरी कपडा वाळतो, कारण वेपर प्रेशर. याच लॉजिकने तापमान वाढवले असता वेपर प्रेशर एव्हॅपरेशन रेट वाढतो -> कपडा लवकर वाळेल. तापमान कमी केले असता वाळायला जास्त वेळ लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अनु राव म्हणतात ते बरोबर आहे. (छ्या !! दिवस फारच वाईट आलेत).
फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ कालांतराने सुकलेले दिसतात (डीहायड्रेटेड).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अनु राव म्हणतात ते बरोबर आहे. (छ्या !! दिवस फारच वाईट आलेत).
फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ कालांतराने सुकलेले दिसतात (डीहायड्रेटेड).

१. अनु राव म्हणतात थंड जागेत कपडे लवकर वाळतील.
२. फर्नेस मध्ये मलाही सगळे पदार्थ बाष्पविरहीत दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अनुराव म्हणतायत पावसाळ्यात (ते सुद्धा खूप पाऊस पडतोय अशा दिवसात) म्हणजे खोलीतली सापेअ आर्द्रता १००%च्या जवळपास आहे. अशा वेळी कपडे वाळवण्यासाठी खोली गरम करून उपयोग नाही. त्या ऐवजी ती थंड करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्या पेक्षा कपडे फ्रिजमधे ठेवले तर लवकर वाळतील का? किंवा फ्रिजरमधे ठेवले तर अजून लवकर वाळतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

जर फ्रीज पूर्ण रिकामा केला, अगदी फ्रीझर मधला बर्फ पण काढुन टाकला. तर कपडे मस्त वाळतील ( कोरडे होतील ).
पण त्याच बरोबरीने ते गार पण पडतील.

असे गार कपडे जर हवेत आले तर हवेतले बाष्प थोडे कंडेंस होउन कपड्यांना थोडा दमट पणा येइल.

फ्रीज रिकामा नाही केला आणी फ्रीझर मधे बर्फ पण तसाच राहू दिला तरी कपडे वाळतील, पण वेळ जास्त लागेल. कारण फ्रीज मधल्या हवेला बाष्प पुरवणार्‍या बाकी पण गोष्टी असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी फ्रीझर मधला बर्फ पण काढुन टाकला.

स्त्रियांना पुरुषांच्या गरजा कधी कळणारच नाहीत. हो की नाही रे गब्बर..??

( किंवा, स्त्रिया किती कठोर होऊ शकतात याचा हा ज्वलंत नमुना..तेही एका वैज्ञानिक सिद्धतेसाठी ?! Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलट बर्फ एनिवे काढलाच आहे तर काही तरी उपयोग करु असे ही तुम्हाला कारण देता येइल.
--------

स्त्रियांना पुरुषांच्या गरजा कधी कळणारच नाहीत. हो की नाही रे गब्बर..??

पुरुषांना बायकांच्या बेसिक गरजा समजत नाहीत, त्या आधी समजुन घेण्याचे कष्ट घ्यावेत आणि मग फाल्तु अपेक्षा ठेवाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो पण बर्फच नाही म्हणजे काय ? Wink बर्फ ठेवला की पुरुष अत्यंत समजूतदार बनतील..!!

बादवे ही चंमतग चललेलीचा चहेआ चहे चगळंवे चंगायलासा चकोयन चना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि - तुम्हाला मी "बेसिक" गरजा म्हणले त्यातली चंमतग कळली नाही. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

BMR = बेसिक मे राडा. Not basal metabolic rate.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एसीमध्ये इन-बिल्ट डीह्युमिडिफायर असतात का? तसं असेल तर अनुराव म्हणतात तो परिणाम शक्य आहे.

एसी मधे वेगळे डीह्युमिडिफायर नसतात, एसी हाच डीह्युमिडिफायर चे काम करतो.
तुमच्या घरच्या एसीच्या जवळुन एक पाईप घरा बाहेर सोडलेला असतो. जेंव्हा प्रचंड दमट हवा असेल ( किंवा बाँबे सारखी ), तेंव्हा त्या पाईप च्या खाली बादली ठेउन बघा. कधी कधी ५-१० लिटर पाणी सुद्धा जमलेले दिसेल एका रात्रीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही शास्त्रीय स्पष्टीकरण असल्यास द्यावे. पूर्ण बंद खोली, थंड म्हणजे किमान किती थंड? वगैरे

कपड्यांमधले पाणी हवेत जायला एकमेव कारण लागते ते म्हणजे हवा पाण्याच्या वाफेनी सॅच्युअर झालेली नसणे. हवेची आद्रता जितकी कमी तितके कपड्यातले पाणी लवकर हवेत जाइल.
जर हवेची आद्रता ९०-१००% असेल तर, हवा हलवून काहीही फरक पडणार नाही.

आता हवा गार करण्याचे बघु.

हवा गार करायला एक चिलिंग प्लॅंट पाहीजे आणि एक थंड पाण्याचा रेडीएअटर पण. खोलीतली जी हवा त्या रेडीएटरच्या संपर्कात येते त्या हवेतले बाष्प कंडेस होउन त्याचे पाणी बनते. ते पाणी जर खोलीतुन बाहेर गेले, तर खोलीतल्या हवेची आद्रता कमी होते आणि त्यामुळे कपड्यातले पाणी हवेत येते. अश्या पद्धतीने कपडे वाळतात.

ह्याच कारणामुळे AC खोलीतली आद्रता कायम ४५-५५ % असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या पूर्ण बंद खोलीत किंवा पेटीत जर ओले कपडे वाळवायचे असतीत तर त्या खोलीतली हवा गरम करुन काही उपयोग नाही. अश्या वेळेस ओले कपडे वाळवायचा एकमेव मार्ग म्हणजे त्या खोलीतली हवा थंड करणे. हवा जितकी थंड करु तितके लवकर कपडे वाळतील.

१. पहिल्या प्रतिसादात तुम्ही आर्द्रतेचा उल्लेख केलेला नाही.

जर हवेची आद्रता ९०-१००% असेल तर, हवा हलवून काहीही फरक पडणार नाही.

तुमचे म्हणणे फक्त ९०-१००% आर्द्रता असलेल्या वेळी आहे असे समजायचे का? म्हणजे पूर्ण बंद खोलीत कपडे वाळवाचा एकमेव मार्ग म्हणजे खोलीतली हवा थंड करणे हे तुमचे वरचे वाक्य मागे का?

कपड्यांमधले पाणी हवेत जायला एकमेव कारण लागते ते म्हणजे हवा पाण्याच्या वाफेनी सॅच्युअर झालेली नसणे.

असहमत, पण हा तसा किरकोळ मुद्दा आहे. कपड्यांमधले पाणी हवेत जायला हे एकमेव 'कारण' लागत नाही. इथे तुमची कारण आणि परिस्थिती यात जरा गल्लत झाली आहे. पण ते एकवेळ ठीक.

हवा गार करायला एक चिलिंग प्लॅंट पाहीजे आणि एक थंड पाण्याचा रेडीएअटर पण. खोलीतली जी हवा त्या रेडीएटरच्या संपर्कात येते त्या हवेतले बाष्प कंडेस होउन त्याचे पाणी बनते. ते पाणी जर खोलीतुन बाहेर गेले, तर खोलीतल्या हवेची आद्रता कमी होते आणि त्यामुळे कपड्यातले पाणी हवेत येते. अश्या पद्धतीने कपडे वाळतात.

इन थेअरी चिलींग प्लँट आणि रेडिएटर एकच. दोन्हीचा उपयोग 'थंड' करण्याकरता असतो. शास्त्रीय भाषेत याला हीट एक्स्चेंजर म्हणतात. पण ते एक असो.

ह्याच कारणामुळे AC खोलीतली आद्रता कायम ४५-५५ % असते.

पटत नाही. जिथे मुळात आद्रता ५५% पेक्षा जास्त असेल तिथे बहुतेक हे खरे असण्याचे शक्यता आहे. आमच्या इथे आद्रता २०-२५%पेक्षा कमी असते असे असता एसी लावल्यावर आर्द्रता ४५-५५ टक्के होणे शक्य नाही. (पाणी येणार कुठून?) असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हा तर फ्रीज उघडल्यावर नेहमी दिसणारा व्हिज्युअल इफेक्ट.

नाही. ग्लासवरती दव साचलेले दिसत आहे, त्यामुळे ह्या कणांचे एकतर बाष्पीभवन किंवा कंडेन्सेशन एव्हाना व्हायला हवे. (व्हिडीओतील 'मोमेंट्स आफ्टर' या वाकप्रचाराने गोंधळ झाला असण्याची शक्यता आहे. पण म्हणजे व्हिडीओ ग्लास फ्रिझर मध्ये काढल्याच्या दुसर्‍या क्षणाला घेतलेला नाही.)

त्याशिवाय, तुम्ही सांगलेला व्हिजुअल इफेक्ट रँडम असतो. माझ्या व्हिडीओतील धूर बराचसा लॅमिनर (सिगरेट हातात स्थीर धरल्यावर जसा धूर लॅमिनर होतो तसा) वाटतो आहे.

हवेत असलेल्या वाफेचं उलट फ्रीजच्या / ग्लासच्या थंडपणामुळे अत्यंत बारीक ड्रॉपलेट्समधे द्रवीकरण होतं तेव्हा तो पांढरा धुरकट इफेक्ट दिसतो आणि त्याला आपण "वाफ" असं म्हणतो.

हा इफेक्ट मला ग्लासवर एकाच ठिकाणी दिसला. अजून प्रयोग करून पहायला पाहीजे. पण तुम्ही म्हणता तसे होत असते तर इफेक्ट ग्लासच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी दिसला असता. तो दिसलेला नाही. एकूण व्हिडीओचा काळ ~४० सेकंद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

या फोटोमध्ये पाण्यावर जे किंचित धुके दिसते आहे ती सेम फेनोमेना आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फोटो दिसत नाही.

फोटो दिसला. पण ते आणि हे एकच कसं हे कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ओव्हरऑल थंडी आहे. परंतु पाण्याच्या वरच्या हवेत जास्त आर्द्रता आहे त्यामुळे तिथे त्या बाष्पाचे कंडेन्सेशन झाल्याने धुके दिसत आहे. जे धुके आहे ते हवेतले बाष्प कन्डेन्स झाल्यामुळे आहे. तळ्यातल्या पाण्याचे बाष्पीभवन (आत्ता) झाल्याने नाही.
अर्थात पाण्यावरची आर्द्रता जास्त आहे ती पाण्याच्या बाष्पीभवनानेच झालेली आहे.

तुम्ही जी ग्लासाबाहेरच्या वाफेची फिनोमेना सांगता आहात ती (मुंबईसारख्या) पावसाळ्यात अधिक प्रकर्षाने दिसेल.