खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..

हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्‍यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक.

तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात.. तीच तर त्यांची खुमारी. तेव्हा इतरांना काही वेगळा फ्लेवर सापडला तर मोअर द मेरियर..

...

खूब-रुयोंसे यारियाँ न गई
दिलकी बेइख्तियारियाँ न गई

खूबसूरत चेहर्‍यांशी, त्या सुंदर मुखड्यांशी जीव लावणं सुटलं नाही..
हृदयाचं, दिलाचं ओढाळपण सुटलं नाही..

अक्ल ए सब्र ए आश्नासे कुछ न हुआ
शौक की बेकरारियाँ न गई

संयम, धीर वगैरे सगळ्या सगळ्याची अक्कल असूनही काही उपयोग नाही झाला..
आस लागण्यातली, त्या आसुसलेपणातली बेचैनी सुटलीच नाही..

दिनकी सहरानवर्दियाँ न छुटी
शब की अख्तर शुमारियाँ न गई

दिवसाची माझी वाळवंटात तापत रखडत सरकणारी ती सफर चालूच राहिली, ती सफर सुटली नाही
आणि तरीही रात्रीचं माझं ते आसमानातले तारे मोजणं.. तेही सुटलं नाही.

थे जो हमरंग ए नाज उनके सितम
दिलकी उम्मीदवारियाँ न गई

तिचे अन्याय अन अत्याचार तिच्याच रंगरुपाचे होते..तिच्याच चेहर्‍याचे होते... तिच्यासारखेच..
पण.. हृदयाची, दिलाची त्या स्पर्धेतली उमेदवारी, आशा संपली नाही..

तर्ज ए मोमिनमें मरहबा हसरत
तेरी रंगीं निगारियाँ न गई

वा रे हसरत*.. देवाधर्माला कडक पाळून चालण्याच्या तुझ्या या नादात, तुझ्या या मार्गात..
तुझा रंगीबेरंगी नजरिया, हा रंगीलेपणा, ही तुझी रंगीबेरंगी शायरी मात्र सुटली नाही..

* खुद्द शायर

इथे ही "खूब-रूयोंसे" अवश्य ऐका.. दिल के पास जाऊन बसेल. गुलाम अलीसाहेबांची गायकी तर काय बोलावी. चार चांद.

चुपके चुपके रात दिन, आंसू बहाना याद है.. ही आणखी एक गजल. फारच जास्त प्रसिद्ध गझल आहे. किमान गजल ऐकणार्‍यांनीही ती एकदा ऐकलेली असते. तीदेखील हसरतसाहेबांनीच रचलेली आहे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त गजलेची ओळख करुन दिल्या बद्दल धन्यवाद गवि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिनकी सहरानवर्दियाँ न छुटी
शब की अख्तर शुमारियाँ न गई
दिवसाची माझी वाळवंटात तापत रखडत सरकणारी ती सफर चालूच राहिली, ती सफर सुटली नाही
आणि तरीही रात्रीचं माझं ते आसमानातले तारे मोजणं.. तेही सुटलं नाही.

क्या बात!!! क्या बात!

______

दिलकी बेइख्तियारियाँ या शब्दाचे भाषांतर - दिलाचं ओढाळपण
एकदम सुंदर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढच्या वेळी "चेरी" मधे पार्टीला बसू तेव्हा हे लावायचे व एकत्रच "जाम" प्यायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिचे अन्याय अन अत्याचार तिच्याच रंगरुपाचे होते..तिच्याच चेहर्‍याचे होते... तिच्यासारखेच.. = कातिल, जीवघेणे Smile
आहाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0