ताटातूट /शब-ए-हिज्र(विरहरात्र)

हिंदी चित्रपटात विरहारात्रीपूर्वीच्या ताटातूटीवरती अनेक गाणी चित्रित झालेली आहेत.पैकी मला आठवतात -
"दिन सारा गुजारा तोरे अंगना" (लता-रफी) - https://www.youtube.com/watch?v=ztJjOsD4k0o
आणि
"अभी ना जाओ छोडकर" (आशा-रफी) - https://www.youtube.com/watch?v=6HEokETR9qw

दोन्ही गाण्यांचा मूड एकच असला, दोन्ही गाण्यांच्या गोडव्यामध्ये अधिक-उणे नसले तरी, मनधरणीच्या छ्टेमध्ये किंचित फरक आहे.
.
दोन्ही गाण्यांमध्ये नायिकांची मोहक अदाकारी आहे, प्रियकराला समजावणे आहे. नायिकांच्या संयमाचा लागलेला कस आहे.
"दिन सारा गुजारा" गाण्यात, नायिका खरं तर नायकाची मनधरणी करते आहे. की सारा दिवस तुझ्याबरोबर व्यतीत केला ना राजा, आता ताटातूटीचा कडू क्षण आला आहे. आता तरी मला निरोप दे, जाऊ दे मला,"शब्बाखैर - शुभरात्री.

दिन सारा गुजारा तेरे अंगना,
अब जाने दे मुझे मोरे सजना,
मेरे यार शब्बाखैर

या गाण्यात नायक बराच समजूतदार दाखवला आहे. ती जातेय पण अन त्याचं हृदय तुटतय, त्याला बेचैन वाटतय, पण आपल्या हृदयातून ती जाणार नाही, तिच्या आठवणीवर ही रात्र कटून जाईल, ती परत भेटणारच आहे या आशेवरच तो समाधान मानतो आहे. स्वतःचीच समजूत काढतो आहे.

आसान है जाना मेहेफिलसे,
कैसे जाओगे निकलकर दिलसे"

या त्याच्या समजूतदारपणामुळे नायिकाही आश्वस्त झालेली आहे, ती जाताजाता स्तुती करुन त्याचे लाडही, त्याला आश्वस्त करुन करुन जाते आह. कारण ताटातूट दोघांनाही व्याकुळ करणार आहे हे माहीत आहे.

मै धरती तू आसमां,मेरी हस्तीपे छा गया तू,
सीनेके सुर्ख बागमे,दिल बनके आ गया तू"

नायकाला परिस्थितीसमोर काही चालणार नाही हे कळतय. परिस्थिती तर बदलता येत नाही, पण ती बदलावी असे वाटते आहे

ये चंचल ये ह्सीन रात,हाय! काश आज ना आती
हर दिन के बाद रात है,एक दिन तो ठहर जाती

आपल्याला माहीत आहेच की समजा एक दिवस जरी रात्र थांबली असती, लांबणीवर पडली असती तरी निरोप घेताना व्याकुळता काही कमी होणार होती का? परत तितकाच त्रास होणार होता. पण त्या दोघांकरता मात्र एकमेकांबरोबर घालविलेला प्रत्येक क्षण मोलाचा आहे अन असे थोडे च का होईना पण अजुन क्षण मिळावे असे वाटते आहे.
.
याउलट "अभी ना जाओ" गाण्याची सुरुवातच देवाआनंदने, साधनाच्या साडीचा पकडून धरलाय अन ती सोडवण्याचा प्रयत्न करते आहे असा आहे. पुढे पुढे तर नायक इतका हट्टी दाखविला आहे. याचे कारण तो विविध कारणे देउन चक्क तिला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतोय. की आता आलीस अन लगेच कुठे चाललीस, थांब तरी मला जरा भानावर तर येऊ देत. थोडा अजुन थोडा वेळ थांब. नको ना जाऊस. कुठे आपलं बोलणं तरी झालं का काही - आणि खरअसण्याचीच शक्यता आहे. एकमेकांना भेटल्यावर प्रेमी थोडीच हवापाण्याच्या गप्पांवर गप्पा मारणार आहेत ; )

हवा ज़रा महक तो ले, नजर ज़रा बहक तो ले
ये शाम ढल तो ले ज़रा, ये दिल संभल तो ले ज़रा
मैं थोड़ी देर जी तो लूँ, नशे के घूँट पी तो लूँ
अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सूना नहीं ..

नायिका त्याची समजूत घालते आहे. यात साधनाचा जो अभिनय आहे तो निव्वळ लाजवाब आहे. ती काकुळतीला येउन विनंतीही करतेय कधी लटका रागही दाखवतेय, स्वतः मोहामुळे डळमळीत होतेय अन स्वतःवरही चिडतेय. अगदी द्विधा मनस्थिती आहे. म्हणजे एक तर विरहाचं दु:ख आहेच अन त्यात याचा हट्ट! त्याचं मन न दुखावता कसं मॅनेज करायच? पार्श्वभूमीला खरच दिवेलागणी दिसते आहे - अन तिला माहीत आहे आता जर अधिक काळ ती थांबली तर परत जाउ नाही शकणार अर्थात "Point of no return " येणार आहे. तिच्यावर निर्धारावर सगळी मदार येउन ठेपालीये. अन तिला firm रहाणं अर्थात मोह टाळणं जरुरीचे आहे.

सितारे झिलमिला उठे, चराग जगमगा उठे
बस अब ना मुझ को टोकना, न बढ़ के राह रोकना
अगर मैं रुक गयी अभी, तो जा न पाऊँगी कभी
यही कहोगे तुम सदा के दिल अभी नहीं भरा
जो ख़त्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं ..

.
जिथे "दिन सारा गुजारा" गाण्यात सायरा शम्मीचे कौतुक देखील करते आहे तिथे साधना मात्र देवानंदचे कौतुक करताना अजिबात चित्रित केलेली नाही. कारण त्याचा हट्ट चाललेला असताना तिने कौतुक केलं तर झालच, भावनेच्या आहारी जाऊन तिचाच निर्धार डळमळीत व्हायचा.जिथे सायरा अवखळ अन खेळकर, बबली, नटखट आहे तिथे साधना एकदम समजूतदार, संयमी दाखवली आहे. शेवटी तर नायकाने चक्क ब्रह्मास्त्र काढलं आहे - की मला तहानेला सोडून अशीच जर हट्टाने जात राहिलीस तर आयुष्यात काय साथ निभावणार तू? काय दिवे लावणार?
ही लबाडी बरीये - खरं तर रात्री दिवेलागणॆनंतर नायिकेने परत जाणे अन पुढे आयुष्यात साथ न देणे काहीही ताळमेळ नाही. पण तरी आपलं प्रयत्न करून बघायचं, चापलुसी करायची, हट्ट करायचा : )

अधूरी आस छोड़ के, अधूरी प्यास छोड़ के
जो रोज़ यूँ ही जाओगी, तो किस तरह निभाओगी
के ज़िन्दगी की राह में, जवाँ दिलों की चाह में
कई मकाम आयेंगे, जो हम को आजमाएंगे
बुरा ना मानो बात का, ये प्यार है गिला नहीं
यही कहोगे तुम सदा के दिल अभी भरा नहीं

.
मला "अभी ना जाओ" अधिक आवडतं याचे कारण एकतरगाणे कृष्ण-धवल रंगात आहे, अन दुसरे साधनाचे कानातले, साडी छान आहेतच पण तिच्या चेहर्‍यावरचे भाव इतके मोहक आहेत. केवळ लाजवाब! अर्थात देवानंदचे हट्टी भाव, उतू चाललेला मिष्किलपणा यांनी एकदम बहार आणली आहे. देवानंदच्या चार्मबद्दल तर विचारायलाच नको - एकदम आय-कँडी , चॉकलेट हिरो ; ) परत त्याचा चालूपणा, मॅनिप्युलेशन एकदम जीवघेणं आहे.
.
दोन्ही गाण्यांचा मूड मात्र एकच आहे अन तो आहे-

गले मिलकर वोह रुख्सत हो रहे है,
ये हालात है कि बिस्मिल* जिस तरह बिस्मिल से मिलता है| - जलील मानिकपुरी
* घायाळ

दोघांची व्याकुळता अन ताटातुटीची बेचैनी.
.
आशा करते लेख आवडला असेल. गविंनी केलेल्या रसग्रहणामुळे तशीच कल्पना सुचली. आणि सकाळपासून ओ पी नय्यर गाणी ऐकून एकदम रोमँटीक मूड झाला आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

मला "अभी ना जाओ" अधिक आवडतं याचे कारण एकतरगाणे कृष्ण-धवल रंगात आहे, अन दुसरे साधनाचे कानातले, साडी छान आहेतच

______/\_______

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन गेलं लक्ष डूलांकडे आता काय करणार? ROFL
तुम्ही इतका एपिक प्रपोर्शनमध्ये कचरा केलायत ना माझ्या इमेजचा आता मला खरच जालसन्यास घ्यावा लागणारे नाहीतर ओंजळभर पाण्यात बुडून मरावं लागणारे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता मला खरच जालसन्यास घ्यावा लागणारे

हे पूर्वी कोठे बरे वाचले होते?

नाहीतर ओंजळभर पाण्यात बुडून मरावं लागणारे

हं! हा पर्याय अगदीच वाईट नाही, विचारार्ह आहे. फक्त, तेवढे ते आर्किमिडीज़चे तत्त्व आड येणार नाही, एवढे पाहा, म्हणजे झाले.

नाही म्हणजे, ओंजळभरच पाण्याबद्दल बोललात, म्हणून म्हटले, इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा तुम्ही जखमेवर मीठ चोळू नका हां.
आधीच या गविंनी अर्धसत्य तेवढं लिहून प्रतिसाद ऑफ द इयर दिला आहे.
आता वाचकांनी निदान लेख पूर्ण वाचावा एवढीच क्षुद्र अपेक्षा मी ठेवतेय ;).
शेवटचा ठीक आहे कारण तमन्ना , सराब ह्म्म्म! मला ओके वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साडी व डूले आवडण्यात, त्यांचेकडे आवर्जून लक्ष जाण्यात आणि त्याची इथे नोंद करण्यात तुमच्या व्यक्तित्वाचा एक पैलू पुढे येतो. बर्‍याच जागरूक, सतर्क, प्रतिमाजपू बायकांचे नवरे, सहकारी, इ इ हा पैलू मिस करत असणार असा प्राथमिक अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला रफी-आशा दोघांच्या आवाजातला लाडिकपणा, नखरा; ह्यासाठी आवडतं हे गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile कुल!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं लक्ष नेहेमीप्रमाणे भलतीकडेच असतं - उदा. लक्ष आयड्यातनं जाउन तुला आता पुन्हा 'शुचि'चा जन्म मिळाला वाटतं? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

खरय ८४ लक्ष आय ड्या तून फिरुन शुचिचा जन्म मिळाल्यावर, जाम आत्मविश्वास आला आहे आता नव्याने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुक्रवार आहे - क्यों करे शब-ए-हिज्रा की बात? क्यो ना की जाये शब-ए-वस्ल की बात?
___
शब-ए-वस्ल (मीलनरात्र) ऐसी चांदनी खिली,
वोह घबरा के बोले सहर हो गई - दाग देहेलवी
_____
ये शब-ए-वस्ल खैर से गुजरे
तो मेरी जान में जान आवे - गमगीन देहलवी

Is this called performance anxiety?;)
Just kidding - शुक्रवार चढलाय जरासा.
_____
आईना सुबह-ए-शब-ए-वस्ल जो देखा तो कहा
देख जालीम ये थी शाम को सूरत मेरी - अमीर मीनाई
____
शब-ए-वस्ल क्या मुख्तसर (लहान) हो गई,
जरा आंख झपकी सहर हो गई - जिगर मुरादाबादी
___
हा प्रसिद्ध आहे-

दी शब-ए-वस्ल मोहज्जिन ने अजाँ पिछले रात
हाय कम्बख्त को किस वक्त खुदा याद आया - दाग देहेलवी
Biggrin
_____
एका स्त्रीचा मीलनरात्रीचा पॉइंट ऑफ व्ह्यु हवा होता. परवीन शाकीर यांचा वाचनात आला-

जुल्फ-ए-शब-ए-वस्ल खुल रही थी
खुशबू सांसो मे घुल रही थी

पण ती पूर्ण गझलच वाचण्यासारखी आहे. शृंगाराचे (काजळ, गजरा, मोत्याची लड) वगैरे वर्णन आहे. अन मग समर्पणाची भावना आहे. अन शेवट असा आहे की मी पूर्ण जीवन त्याच्यावर कुर्बान केलं असतं. माझ्या प्रियकराने मागीतली तर एक मीलनरात्र मागीतली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढल गया दिन, हो गयी शाम
आणि
अच्छा तो हम चलते हैं

यावर पण लिहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Smile प्रयत्न करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला आणि गाणे ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाणी आवडावीत तर शुचितैला.

बाय द वे, देव आनंदच्या अभी ना जाओ च्या लगेच नंतर साधनाचे सुख और दुख के रास्ते हे गाणं सौ सोनार कि और एक लोहार कि यातला प्रकार आहे. मला तो भाग खूप आवडतो. टिपिकल भारतीय पुरुषी हट्ट आणि स्त्रीय समजूतदारपणा यांचं ते उच्च उदाहरण आहे. कोणत्याही पुरुषानं बायकोचा राग आल्यावर ते गाणं पाहावं, राग तत्क्षणी विरघळेल याची ग्यारंटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

टिपिकल भारतीय पुरुषी हट्ट आणि स्त्रीय समजूतदारपणा

चानचान क्लिशेदार.

तदुपरि अशाच क्लिशेमध्ये बसणारं अजूनेक म्ह. "अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना". मधुबालेसारखी अप्सरा विनवतेय आणि देवानंद तरीही ना़ मुरडतोय...स्क्रिप्टसाठी काय काय म्हणून करावं लागतं ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना". मधुबालेसारखी अप्सरा विनवतेय आणि देवानंद तरीही ना़ मुरडतोय...

हेच्च टंकावयास जात होतो तेवढ्यात तुझा प्रतिसाद वाचला..!!

इतर सर्व कडव्यांतल्या "समझें?"ना लगेच उत्तरं येतात, पण "हम न रहें तो याद करोगे, समझे?" याला जेव्हा "समझे" उत्तर येतं त्यापूर्वी फार भारी पॉझ आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण "हम न रहें तो याद करोगे, समझे?" याला जेव्हा "समझे" उत्तर येतं त्यापूर्वी फार भारी पॉझ आहे..

इंडीड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

’अपनी भी सुरत बुरी तो नही है’ म्हणणार्‍या देवानंदलाच काय तो हक्क होता पण मधुबालेला नाक मुरडून दाखवायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन