Skip to main content

ना गंवाओ नावक ए नीमकश..

फैझ अहमद फैझ. फराझसोबत साधारण समकालीन असलेला हा आणखी एक पाकिस्तानातला शायर. शायरच नव्हे, तर तो आणखीही बरंच काही होता, या शायराचं नाव साहित्याच्या "नोबेल"साठी अनेकदा स्पर्धेत होतं. जागतिक शांततेसाठीही कायकाय मिळालं त्याला. पण अबोव्ह ऑल, आपल्यासाठी तो एक "दिल के पास" असलेला शायरच.

त्याची एक गझल इक्बाल बानूच्या हेलावून टाकणार्‍या आवाजात ऐकली आणि ती कायमची मनात वसतीला आली. तिचे शब्द एव्हाना मला समजले आहेत.. पण.. नेमकं कोणाला उद्देशून आणि कोणत्या परिस्थितीत हे शब्द इतके आर्तपणे म्हटले जाताहेत हे अजूनही कळत नाही. वेगवेगळे अर्थ लागल्यासारखे वाटतात पण वाळूसारखी सटकून जाणारी गजल आहे हेच खरं. मी आज फक्त शब्दार्थ देतोय आणि मैफिलीतल्या मित्रांना त्यातून काही सापडतंय का ते सांगायचा अर्ज करतोय.

ना गंवाओ नावक ए नीमकश दिल ए रेजा रेजा गंवा दिया
जो बचे है संग समेट लो तन ए दाग दाग लुटा दिया

तो जो माझ्यावर सोडण्यासाठी अर्धवट खेचलेला बाण आहे ना, तो वाया घालवू नका.. पुन्हा भात्यात ठेवा.. कारण माझं हृदय आधीच विदीर्ण झालेलं आहे. आणखी बाणांची आता गरज उरलेली नाही..चिंध्या आधीच उडल्याहेत.

जे दगड हाती उरलेत ना तुमच्या, तेही आता माझ्यावर फेकू नका.. सांभाळून ठेवा.. कारण ठेचलेलं, घाव खाल्लेलं, वळ उमटलेलं , रक्ताच्या डागांनी भरलेलं माझं शरीर आधीच गमावलंय..

मेरे चारागर को नवीद हो सफ ए दुश्मनांको खबर करो
वो जो कर्ज रखते थे जानपर वो हिसाब आज चुका दिया

मला जीवन देणारे, माझे हितचिंतक, पोशिंदे यांना ही आनंदाची बातमी द्या आणि त्याचवेळी त्या पूर्ण शत्रूंच्या फळीलासुद्धा हे कळवा..की जिवावर जे ओझं, देणं घेऊन जगत होतो त्याचा हिशोब मी आज पुरा केला..

इथे एकतर कसलीतरी अंतकालीन मोक्षावस्था भासते किंवा कोणासाठीतरी हे बलिदान दिलं.. विशेषतः कोणासाठीतरी झगडताना हे बलिदान दिलं, त्यामुळे माझी त्यांच्या बाबतीतली जबाबदारी किंवा ऋण यातून मी आज मुक्त झालो असा अर्थ असू शकेल. कदाचित काहीतरी "व्यक्त" केल्याने ही शिक्षा झाली, पण त्याला वाचा फोडल्याने ते ओझं उतरलं असंही असेल.

करो कजजबीं पे सर ए कफन मेरे कातिलोंको गुमां न हो
कि गुरुर ए इश्कका बाँकपन पस ए मर्ग हमने भुला दिया

माझा मृतदेह जेव्हा दफनासाठी तयार कराल तेव्हा डोक्यावर कफन तिरकं बांधा..

इथे एक संदर्भ घेतला पाहिजे की, डोक्यावरचं वस्त्र तिरकं बांधणे हे एक काहीसं बंडखोरीचं किंवा खास व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे. त्याचे इतरही अर्थ असू शकतील.

तर ..

माझा मृतदेह जेव्हा दफनासाठी तयार कराल तेव्हा डोक्यावर कफन तिरकं बांधा..
नाहीतर मला संपवणार्‍यांना असं वाटायला नको की तो माझा प्रेमाचा गर्व, तोरा मरणानंतर मी लगेच सोडून दिला..

उधर एक हर्फकी कुश्तनी यहां लाख उज्र था गुफ्तनी
जो कहा तो सुनके उडा दिया जो लिखा तो पढके मिटा दिया

इथे "कि" चा अर्थ इक्वल टू असा होतो. त्या बाजूला म्हणजे विरोधी पार्टीकडे एकच शब्द होता तो म्हणजे "मारा".. केवळ एकशब्दी थंड निष्ठुर सजा सुनावली गेली होती. आणि माझ्याकडे लाखो शब्द होते माझ्या समर्थनाचे.. माझ्या वकिलीसाठी लाखो व्हॅलिड कारणं मी देऊ शकत होतो, अन दिलीही..

पण.. जे जे काही मी बोललो ते तुम्ही, म्हणजे शासनकर्त्यांनी, ऐकून उडवून लावलं आणि त्याउपर जे जे मी लेखी दिलं तेही वाचून पुसून टाकलंत.

जो रुके तो कोह ए गिरां थे हम जो चले तो जां से गुजर गये
रह ए यार हमने कदम कदम तुझे यादगार बना दिया

या ओळी जरा गूढ आहेत. मुळात अनेकदा शेवटच्या शेरात शायर आपलं नाव गुंफतो. तसं इथे दिसत नाही.

शब्दार्थाने असं दिसेल की जेव्हा मी थांबलो, तेव्हा पर्वतासारखा स्थिर राहिलो.. सर्वार्थाने निश्चल, आणि (मला वाटतं) निर्विकार, संयमी राहिलो. आणि जेव्हा जायची वेळ झाली तेव्हा जिवानिशी गेलो.

इथे जिवानिशीऐवजी कदाचित जिवाच्याही पलीकडे निघून गेलो..जगण्याच्याही पलीकडे निघून गेलो.. किंवा अमर झालो असाही काहीतरी अर्थ निघू शकेल..

पण शेवटच्या ओळीत मात्र फैझ म्हणतो की अरे दोस्ताच्या रस्त्या, किंवा खुद्द मित्रच असलेल्या रस्त्या..तुझ्यावरचं प्रत्येक पावला पावलाला तुला कायमचं स्मरणीय बनवलं.. जणू हा पूर्ण रस्ताच एक स्मारक बनला.

इथे पुन्हा नेमकं कोणाला उद्देशून कवी बोलतोय हे कळत नाहीये.

या पूर्ण गझलेत मला क्लासिक प्रियकर प्रेयसी असं काही न दिसता प्रस्थापित समाजाविरुद्ध किंवा अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला आणि एकतर्फी लढ्यात शेवट झालेला बंडखोर दिसतो.

बर्‍याचदा पूर्ण चित्र दिसत नाही आणि अंधुक रेषा घुसमटवत राहतात तसं या गझलेबाबत माझं होतं.

......

ऐका.. मग बोलूच..

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

3 minutes

ऋषिकेश Wed, 01/07/2015 - 15:55

उत्तम गझल आहे. आधी ऐकली/वाचली नव्हती. आभार!

मेरे चारागर को नवीद हो सफ ए दुश्मनांको खबर करो
वो जो कर्ज रखते थे जानपर वो हिसाब आज चुका दिया

मला जीवन देणारे, माझे हितचिंतक, पोशिंदे यांना ही आनंदाची बातमी द्या आणि त्याचवेळी त्या पूर्ण शत्रूंच्या फळीलासुद्धा हे कळवा..की जिवावर जे ओझं, देणं घेऊन जगत होतो त्याचा हिशोब मी आज पुरा केला..

मलाही असाच अर्थ लागलाय. फक्त माझ्या शब्दांत मांडल्याशिवाय चैन पडत नव्हते म्हणून टंकतोय :)
माझ्या सुहृदांना (माझ्या जखमांवर फुंकर घालणार्‍यांना)ही सुवार्ता कळवा आणि हितशत्रुंना (की शत्रुच्या फळीला?) कळवा त्यांचे जे माझ्यावर आयुष्यावर कर्ज होते ते मी आज फेडले आहे - तो हिशोब चुकवला आहे

डोक्यावर कफन तिरकं बांधा..

हे जिंदादिली, आनंदी/समाधानी चित्ताचं लक्षण आहे. थोडक्यात jaunty असणे.
त्यामुळे तोरा वगैरेपेक्षा प्रेमातून मिळणारे समाधान असल्याने ती 'नजाकत' अजूनही दिसुदे असे काहिसे तो सांगतोय (नजाकत > तोरा असे मला वाटते. पण मतांतरे शक्य)

उधर एक हर्फकी कुश्तनी यहां लाख उज्र था गुफ्तनी
जो कहा तो सुनके उडा दिया जो लिखा तो पढके मिटा दिया

त्यांच्याकडे माझ्यासाठी एकच शब्द होता 'हत्या' आणि इथे मी लाखो कारणे देऊ शकत होतो देत बसलो होतो). (ती दिल्यावर) जे बोललो ते ऐकून न ऐकल्यासारखे केले तर जे वाचते ते वाचून बंद करून ठेवले. (थोडक्यात मला बाजु मांडु देणं हे केवळ नाटक होतं, त्याच्यासाठी मला मारायचे हे ठरलेलेच हो

जो रुके तो कोह-ए-गरां थे हम, जो चले तो जां से गुज़र गए,
रह-ए-यार हम ने क़दम क़दम, तुझे यादगार बना दिया

जिथे आम्ही थांबलो तिथे पर्वतासारखे निश्चल होतो, नि जेव्हा आम्ही मार्गक्रमण चालु केले तेव्हा दर पावलांसोबत एक आयुष्य मागे ठेवत चाललो. (अरे रस्त्या) आम्ही दर पावलांसह तुला च यादगार बनवलं आहे!

===

या पूर्ण गझलेत मला क्लासिक प्रियकर प्रेयसी असं काही न दिसता प्रस्थापित समाजाविरुद्ध किंवा अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला आणि एकतर्फी लढ्यात शेवट झालेला बंडखोर दिसतो.

माझं अगदी उलट मत आहे. वरवर गझल बंडखोराची आहे असे वाटते, पण मला ती एकतर्फी प्रेमवीराची वाटली. :)

गवि Wed, 01/07/2015 - 16:05

ऋ.. तुझा प्रतिसाद क्रमशः असल्याने उपप्रतिसाद देत नाहीये. तुझा नजरिया आवडला. वेगवेगळे अँगल हवेतच.

हो ते तिरक्या कफनाबद्दलः काहीतरी निव्वळ "तोर्‍या"ऐवजी अन्य जास्त योग्य हवं होतं.

ता.क. "तिरपागडे", "तिरछी टोपीवाले" वगैरे शब्द या अ‍ॅटिट्यूडशी संबंधित असतील का? "ऐट" शब्द कसा आहे? अपना "अंदाज" अशा अर्थाने?

राही Wed, 01/07/2015 - 17:25

In reply to by गवि

तिरछी टोपीवालेच आठवले होते. आपल्या अगदी जुन्या सिनेमांतही हीरोची टोपी रंगीन प्रसंगांत नेहमी तिरकी असे. (त्यावेळी हीरो लोक डोक्यावर टोपी घालत असत.)
कलंदर, आपल्याच धुंदीत जगणारा अशी थोडीशी छटा असावी.
आणि मग ह्याला मराठी सिनेमात रंगेल, इश्कबाज असा अर्थ चिकटला असावा.

अनु राव Wed, 01/07/2015 - 16:08

फैज ची एक पॉप्युलर गजल , सरळ साधी आहे( फैज चा विषय आहेच तर )

राज्-ए-उल्फत छुपा के देख लिया
दिल को बहोत जला के देख लिया

और क्या देखने को बाकी है
आप से दिल लगाकर देख लिया

आंस उस दर से छुटती ही नही है
जा के देख लिया, न जा के देख लिया ( हा फार आवडतो मला )

"फैज" तकमिल्-ए-गम भी ना हो सकी
इष्क को आजमाके देख लिया

गवि Wed, 01/07/2015 - 16:15

In reply to by अनु राव

वाह.. बहोत खूब..

आंस उस दर से छुटती ही नही है
जा के देख लिया, न जा के देख लिया

हीच भावना असलेला आणखी एक आठवला. रोया करेंगे आपभी (मोमिन) मधला..

ना जायें वाँ बनी है ना बिन जाये चैन है
क्या कीजिए हमें तो है मुश्किल सभी तरह

अनु राव Wed, 01/07/2015 - 16:12

हे एक अजुन फैज चे काहीतरी ( नक्की काय आहे ते माहीती नाही ), पण मला आवडलेले

वो लोग बहोत खुष किस्मत है, जो इष्क को काम समजते थे, या काम से आशिकी करते थे,
हम जितने भी मसरूफ रहे, कुछ इष्क कीया, कुछ काम किया.

काम इष्क के आडे आता रहा, और इष्क से काम उलझता रहा
आखीर तंग आकर हमने, दोनो को अधुरा छोड दिया.

गवि Wed, 01/07/2015 - 16:49

In reply to by गब्बर सिंग

उज्वल यश असाही अर्थ (पर्वताप्रमाणे) असेल तर मग आपलं नाव शेवटच्या शेरात गुंफण्याचा हा अंदाज खूपच अनोखा आहे..

अनु राव Wed, 01/07/2015 - 16:54

In reply to by गवि

आपलं नाव शेवटच्या शेरात गुंफण्याचा हा अंदाज खूपच अनोखा आहे..

हे कळले नाही. कुठे आहे ह्या शेरात फैज चे नाव.

उज्वल यश हे पण काही झेपले नाही.

गवि Wed, 01/07/2015 - 16:59

In reply to by अनु राव

अचल, स्थिर, घन पर्वतासारखे असणे म्हणजे उज्वल यश असं वाटत नाही प्रथमदर्शनी, तिथे फक्त स्टॅबिलिटी दाखवलेली असावी (निस्पृहता, निश्चय इ.) पण उज्वल यश असा अर्थ निघत असल्यास तो "फैझ" या शब्दाचा समानार्थी शब्द ठरत असल्याने जणू शायराचं नाव आलंच असं असेल अशी शक्यता वर्तवली.

गब्बर सिंग Thu, 02/07/2015 - 11:53

In reply to by गवि

आपलं नाव शेवटच्या शेरात गुंफण्याचा हा अंदाज खूपच अनोखा आहे..

फैज थी राह सरबसर मंझिल ... हम जहा पहुचें कामयाब आए.

एकाच ओळीत दोनदा आपले नाव वापरलेय ... असं नै वाटत ?

की मी कामयाब व कामयाबी या दोन शब्दांमधे घोळ करून नसलेला अर्थ ओढून ताणून घुसडायचा यत्न करतोय ??

बॅटमॅन Wed, 01/07/2015 - 16:55

In reply to by .शुचि.

अस्संय होय! गिरा-गिरणे इ. माहितीये पण त्या अनुस्वारामुळे लक्षात आलं नव्हतं. धन्यवाद.

मग इन द्याट केस, कोह-ए-गिरां चा अर्थ कैतरी वेगळाच होत नै का?

बॅटमॅन Wed, 01/07/2015 - 17:01

In reply to by गवि

अच्छा, धन्यवाद!

संस्कृतातल्या 'गुरु'त्वाशी याचे काय नाते असेल ते पडताळले पायजे. कारण उर्दू = फारसी + हिंदी/हिंदवी/खडीबोली आणि फारसी व संस्कृतचे नाते अतिशय जुने व जवळचे आहे.

ऋषिकेश Thu, 02/07/2015 - 19:37

In reply to by .शुचि.

ओह तुम्ही या विवक्षित शायरीबद्दल म्हणत होतात होय.
मला वाटले इन जनरल शायरी रोम्यांटिक नसल्याने वगैरे म्हंटाय की काय! :)

'थक्क'वा मागे! :)

रोचना Thu, 02/07/2015 - 15:31

ऑफिस मधे लेखातला विडियो दिसत नाहीय. घरी गेल्यावर पाहते. ही ग़ज़ल आधी वाचली/ऐकली नव्हती. इक्बाल बानो ने "हम देखेंगे" सुद्धा सुरेख गायलंय.
"मुझ से पहली सी मोहब्बत मेरे महबूब न माँग", "हम देखेंगे," "बोल के लब आज़ाद हैं तेरे".... त्यांच्या अनेक अनेक ग़ज़ल खूप आवडतात.
मेहदी हसन यांनी गायलेलं "गुलोंमें रंग भरे, बाद-ए-नौबहार चले" पण त्यांचंच आहे ना? "मक़ाम फैजे कोई, राह में जचा ही नहीं, जो कू-ए-यार से निकले तो सू-ए-दार चले...."

फैज़ यांच्या रचना

रोचना Fri, 03/07/2015 - 11:16

कालपासून फैज़ यांच्या ग़़़ज़ल (गजला? गजली?) ऐकतेय, वाचतेय. फाळणीच्या वेळी त्यांनी लिहीलेली ही कविता बहुदा मी त्यांची वाचलेली पहिली, जबरदस्त कविता.

सुबह-ए-आज़ादी

ये दाग़ दाग़ उजाला, ये शब-ग़जीदा सहर,
वो इंतज़ार था जिसका, ये वो सहर तो नहीं

ये वो सहर तो नहीं जिस की आरजू लेकर
चले थे यार कि मिल जायेगी कहीं न कहीं
फ़लक के दश्त में तारों कि आखरी मंजिल
कहीं तो होगा शब-ऐ-सुस्त मौज का साहिल
कहीं तो जा के रुकेगा सफीना-ऐ-गम-ऐ-दिल
जवां लहू की पुर-असरार शाहराहों से
चले जो यार तो दामन पे कितने हाथ पड़े
दयार-ऐ-हुस्न की बे-सब्र खाब-गाहों से
पुकारती रहीं बाहें, बदन बुलाते रहे
बहुत अज़ीज़ थी लेकिन रुख-ऐ-सहर की लगन
बहुत करीं था हसीना-ऐ-नूर का का दामन
सुबुक सुबुक थी तमन्ना , दबी दबी थी थकन

सुना है हो भी चुका है फिराक-ऐ-जुल्मत-ऐ-नूर
सुना है हो भी चुका है विसाल-ऐ-मंजिल-ओ-गाम
बदल चुका है बहुत अहल-ऐ-दर्द का दस्तूर
निशात-ऐ-वस्ल हलाल-ओ-अजाब-ऐ-हिज़र-ऐ-हराम
जिगर की आग, नज़र की उमंग, दिल की जलन
किसी पे चारा-ऐ-हिज्राँ का कुछ असर ही नहीं
कहाँ से आई निगार-ऐ-सबा , किधर को गई
अभी चिराग-ऐ-सर-ऐ-राह को कुछ ख़बर ही नहीं
अभी गरानी-ऐ-शब में कमी नहीं आई
नजात-ऐ-दीदा-ओ-दिल की घड़ी नहीं आई
चले चलो की वो मंजिल अभी नहीं आई