Skip to main content

ऐसीवरचा आयडी ओळख

या धाग्यावर दर काही दिवसांनी एक चित्र देण्यात येईल. ते पाहून तुम्हाला कोणता आयडी आठवतो ते सांगायचे आहे. सगळी चित्रे जालावरून इथून तिथून डकवलेली असतील.
ज्याने उत्तर ओळखले त्याने ज्या चर्चेत त्या आयडीची ती प्रतिमा झाली ती लिंक द्यायचा प्रयत्न करायचा आहे.
==================================================
तुम्ही देखिल चित्र टाका. अन्य प्रयत्न करतील.
==================================================
ऐसीनी काही खास काल्पनिक कॅरॅक्टर्स निर्माण केली आहेत. म्हणजे ती आहेत अगोदरपासून, पण फोरममधे वैगेरे रेअरली चर्चिली जात असावीत. उदा. हस्तिदंती मनोर्‍यावरचा तत्त्वज्ञ, इ. त्यांची देखिल चित्रे टाकू शकता.
===================================================
सुरुवातीला वर्णन, टिपा, शीर्षक, हिंटा टाळा.
==========================================================
हे ओपनिंगचे चित्र.

मेघना भुस्कुटे Fri, 03/07/2015 - 13:59

हे स्वत: अजो आहेत. ९३, ९८, ४७ असले काहीतरी र्य़ांडम टक्के काढून वर त्याच्या अचूकपणाची जबाबदारी झटकणारे.

विवेक पटाईत Fri, 03/07/2015 - 18:08

माज्या सारख्या बालबुद्धी व्यक्तीला यातले काहीच कळणार नाही. तरी ही फोटोत मी कसा दाखविल्या जाईल या बाबत उत्सुकता आहे.

आडकित्ता Tue, 07/07/2015 - 22:43

स्वाक्षरी वाचून, मुद्दाम, खास तुमच्यासाठी, तुमचे नांव दिसले तिथे निरर्थक श्रेणी देऊन माझा आयक्यू उघडा पाडला आहे.
आता, त्या उघड्या आयक्यूचे तुम्ही काय करणार आहात?

अजो१२३ Fri, 10/07/2015 - 11:22

In reply to by आडकित्ता

आयक्यू उघडा पाडू नका अशी विनंती केली असताना देखिल आयक्यू उघडा पाडलात. आता इक्यू उघडा पाडू नकात अशी नम्र विनंती करतो नि थांबतो.

बॅटमॅन Fri, 10/07/2015 - 14:29

In reply to by आदूबाळ

अगदी अगदी. 'उघडा पाडू नये' वरून उत्सुकता अजूनच चाळवल्या गेली आहे. 'नॉटी' वगैरे एखादा शब्द कदाचित नजरचुकीने राहून गेला असावा काय?

अजो१२३ Fri, 10/07/2015 - 16:28

In reply to by आदूबाळ

ट्रिपल एक्स आयक्यू हा आयक्यूचा एक विशेष उपप्रकार आहे. आयक्यू कमी असणं, जास्त असणं हे नैसर्गिक/जेनेटिक्/सोशल इ इ असू शकतं. पण ट्रिपल एक्स आयक्यू ही एक एक्सक्लूसिव व्यक्तिगत अचिवमेंट असते.

आडकित्ता Fri, 10/07/2015 - 20:11

In reply to by अजो१२३

पण त्या आमच्या उघड्या पाडलेल्या xxx चं तुम्ही काय करणार, ते सांगा की जरा? ;)

नुस्त्या IQ बद्दल विनंती लिवली अस्ती, तं काय हर्कत नव्हती. ते xxx म्हटल्यावर आमची जरा चाळवली गेली... उत्सुकता.

(आमचा फटू आलाच, तर ट्रिपल एक्स येणारच याची खात्रीच नव्हे तर हमी व ग्यारंटी देखिल आहे!)

अतृप्त आत्मा Fri, 10/07/2015 - 17:37

प्र.का.टा. आ.