जीवनाची प्रभावी दशसूत्री!!

आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!!
म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो.
खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल.
अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?

1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. जे मिळवायचे आहे त्याबद्दल दिवसभरात प्रयत्न करावेत. कर्म करत जावे. प्रत्येक दिवस हा चांगलाच दिवस असतो असे मनावर ठसवावे. कुठेतरी लिहून ठेवावे आणि मेंदूच्या एका कप्प्यात नेहेमीकरता जतन करून ठेवावे.
मोबाईल च्या फ्रंट स्क्रीन वर लिहून ठेवावे की - "Every day is a good day!"

2) रोज प्राणायाम आणि योगासने करावीत. जमल्यास सूर्यनमस्कार करा, विविध व्यायाम प्रकार करा किंवा सकारात्मक संगीत लावून तालबद्धतेने एकट्याने किंवा जमल्यास समुहात नाच करावा. तोही एक प्रकारचा व्यायामच होय.

3) रोज किमान अर्धा तास मौन बाळगावे आणि थोडे एकांतात चिंतन करावे. रोज एक वाईट सवय सोडण्याच्या दिशेने आणि एक तरी चांगली सवय अंगीकारण्याच्या दिशेने पाऊल टाकावे व थोडा तरी त्या दिशेने रोज प्रयत्न करावा. आणि स्वतःची कुणाशीच तुलना करू नये. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. आपल्या पूर्वीच्या आणि आजच्या सुधारणेत फक्त तुलना करावी.

4) रोज थोडे अंतर एकट्याने चालावे. शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात थोडा तरी वेळ चालत चालत घालवावा.

5) रोज आपल्या वाट्याला आलेले काम (कर्म) मनापासून करावे. आशा, श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास आणि धैर्य कधीही गमावू नये. इतर काहीही गमावले तरी हरकत नाही, पण स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नये. आजच्या क्षणात पूर्ण जगावे मात्र भविष्याची जाणीव असू द्यावी.

6) रोज सकारात्मक सुविचार, पुस्तके, थोर पुरुषांची चरित्रे वाचावीत किंवा आॅडिओ टेप ऎकाव्यात.

7) रोज सकारात्मक संगीत ऎकावे.

Dirol रोज चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवावे, हास्यविनोद करावा. त्यामुळे मन हलके होते.

9) रोज कुणाला तरी छोटीशी का होईना मदत करावी. कुणाला तरी रोज सकारात्मक प्रेरणा जरूर द्यावी.

10) प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी. त्यामुळे विसरलेल्या गोष्टी किंवा धागे किंवा एखादा मुद्दा ल्क्षात येतो. आपल्या समस्या व अडचणी या निसर्ग आणि दैवी शक्तींच्या हाती रात्रीपुरत्या सोपवून, दिवस कसाही गेला तरी जे दिवसभरात बरे वाईट घडले ते भविष्यातील चांगल्याची चाहूल होती असे समजून पुन्हा कृतज्ञतेने झोपून जावे.

वरच्या गोष्टींसाठी थोडा का होईना वेळ जरूर काढावा. मी सुद्धा या दहा गोष्टींत प्राविण्य मिळवले नाही किंवा सर्व गोष्टी अजून रोज करू शकत नाही पण प्रयत्न मात्र जरूर करत आहे. आपल्या मुलाना सुद्धा त्यांच्या कुमारावस्थेतच या गोष्टी शिकवा आणि शक्यतो सवय लावा.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (4 votes)

प्रतिक्रिया

7) रोज सकारात्मक संगीत ऎकावे.

- मंग नकारात्मक संगीत ते काय असतं भौ?
___
बाकी मुद्दे पटनीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नकारात्मक संगीत

.. मैं कहूं तो साला, कॅरेक्टर ढीला है
.. गोली मार भेजे में
.. छत पर आ कर गिद्ध बैठें और परनालों से खून बहें

.. वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

परनालों म्हणजे काय रे भाऊ?

वरील शब्द वाचून मला एकदम 'पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्' या जयराम पिंड्ये कृत काव्याची आठवण झाली. त्यातला पर्णालपर्वत = पन्हाळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाणी वाहून जाण्यासाठीचं पन्हाळ/ळी*

घराच्या छपरावर गिधाडं बसली आहेत, आणि पन्हाळातून रक्त वाहतं आहे. (म्हणजे गुलजारभौ इथे सांगतेत की त्या घरातल्यांचं निर्घृण शिरकाण झालेलं आहे.)

*असा माझा समज आहे. पण त्याला काय अर्थ नाही. मला बरेच दिवस "लाँग गवाच्चा" मधला लाँग म्हणजे लवंग वाटत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रोचक! धन्यवाद. पन्हाळा हा शब्द आणि त्याचे संस्कृतीकरण, तसेच पन्हळ/पन्हाळ हा अर्थ आणि परनाल हे त्याचे उर्दू रूप या जोड्यांमधील साम्य लक्षणीय आहे खास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहां?"; दिल के आरमा आसुओ में बह गये; या प्रकारचे गीत किंवा त्या प्रकारचे खिन्न विषाद निर्माण करणारे संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे.
आणि "देवा श्रीगणेशा" (अग्निपथ); "हूड हूड द्बंग" (द्बंग); बैंग बैंग (टायटल सॉंग); "जर्राती जर्राती राफ्तारे है" (रा वन) अशा प्रकारची गाणी आणि संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून सकारात्मक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

उन्मादी मूडमध्ये खिन्न संगीत खूप बॅलंन्स साधतं. खूप फरक पडतो. याउलट डिप्रेशनमध्ये थोडं हलकंफुलकं संगीत बरं वाटतं.

बाकी "ह्लवावाला आ गया" वगैरे संगीत हीण्कस दर्जाचं जे की मूड एलेव्हेट करत नाही. पण नकारात्मक असं कोणतं वाटत नाही ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाळेत गेल्यासारखं वाटलं. तिथे भिंतींवर असे सुविचार लिहून ठेवलेले असायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रत्येक मुद्द्यावर मस्त लिहीले होते पण खोडुन टाकले. विचार केला की असल्या लेखावर प्रतिक्रीया द्यायला मी काय डोक्यावर पडले आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी पडले? कुठून पडले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

मला हा लेख आवडला. हा लेख खूप सकारात्मक आहे. लेखातले पॉईंट नंबर ३,५,९ मला पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकारात्मक लेख. एकंदरीत जीवनात शिस्त लावायला, आणि रोज काहीतरी थोडं थोडं चांगलं घडवण्यासाठी या सवयी उपयुक्त ठरतील.

माझी ही अकरावीची भर

११) वरच्या दहापैकी कुठच्याही गोष्टी जमल्या नाहीत, आणि तुमचा दिवस दोस्तांबरोबर दारू पिण्यात, दंगा करण्यात, नुसतंच हॅहॅहूहू करण्यात गेला तर सर्वात छान. कारण असे जास्त दिवस मिळवण्यासाठीच वरच्या दहा सवयी उपयुक्त आहेत, त्या सवयींसाठी तुमचं आयुष्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निमिष दादा, भयकथा वाचणं सकारात्मक की नकारात्मक हो? नाही नाही, भयकथा वाचून घाबरायला होतं, भिती वाटते आणि भिती-घाबरणे हे नकारात्मक असतं म्हणून हा प्रश्न नाहीये पण काही भयकथा ह्या जाम थुकरट असतात आणि त्या वाचून संताप, चिडचिड, खुनाची भावना जागृत होते मग त्याला नकारात्मक म्हणावं का? असल्यास वाचू नये का? वाचण्यापलिकडेही त्यास प्रत्साहन कसं मिळत नाही ह्या साठी वाचकांनी प्रयत्न करायला हवेत का?

हा प्रतिसाद लिहून बाकी फार मंगल वाटतंय बरं - धन्यवाद!
Wink Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कुणालाही जबरदस्ती करत नाही वाचण्याची!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी. त्यामुळे विसरलेल्या गोष्टी किंवा धागे किंवा एखादा मुद्दा ल्क्षात येतो. आपल्या समस्या व अडचणी या निसर्ग आणि दैवी शक्तींच्या हाती रात्रीपुरत्या सोपवून, दिवस कसाही गेला तरी जे दिवसभरात बरे वाईट घडले ते भविष्यातील चांगल्याची चाहूल होती असे समजून पुन्हा कृतज्ञतेने झोपून जावे.

...हे पटले बॉ !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच प्रभावी दशसुत्री आहे. पण ती राबवण्यातच दिवस खर्ची पडल्याने बाकी तसे काही न उरण्याचाच संभव आहे. असं चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारखा उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी|
पाहू तिथे भगवद्गीता, चोहीकडे ज्ञानेश्वरी|
काळजी आमच्या हिताची येवढी वाहू नका|
जाऊ सुखे नरकात आम्ही, तेथे तरी येऊ नका||
(कै. भाऊसाहेब पाटणकर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

जाऊ सुखे नरकात आम्ही, तेथे तरी येऊ नका||

आह्हा! क्या बात है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनारगुरुजींचे 'जीवनोन्नतीचे दहा सोपान' आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रम्हकुमारि विश्वविद्यालय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही....कारण मग करु नये अशी अजुन एक गोष्ट अ‍ॅड झाली असती....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जग ही माया आहे.
प्रेम माया आहे.
आलेला जीव जाणारच.
हेच ब्रम्हज्ञान.
नाही आत्मा.
नाही परमात्मा.
नाही कर्म.
एकच अटळ मृत्यू.
हेच ब्रम्हज्ञान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या माऊंट अबू, या शाखेत फार सुंदर, फुलांची बाग आहे. आमचा हॉटेलवाला म्हणाला, बाग जरुर बघून या, पण त्यासाठी आधी बौद्धिक ऐकण्याची सहनशक्ती असेल, तरच जा. आता, या देशांत आमच्या अंगी, सहनशक्तीचा तर अमर्याद साठा आहे. म्हणून गेलो. फुलबाग तर अप्रतिमच होती, पण फोटो काढायला बंदी होती. बौद्धिकांत, एक आकर्षक स्कीम होती. जर त्यांचे मेंबर झालो तर लवकरच येणार्‍या सत्ययुगांत, आमच्या चारजणांचे जन्म नक्की! आता, लवकरच म्हणजे नक्की कधी, यावर मी हटून बसल्यामुळे, टाळाटाळ करणार्‍या त्या प्रजापित्याने ३०-३५ वर्षे असे सांगितले. वरील घटनेला आता १५ वर्षे तरी झाली असावीत. म्हणजे आता फक्त १५-२० वर्षेच राहिली आहेत. त्यानंतर कलियुगाचा 'दी एन्ड' आणि ढँट-ढॅण सत्ययुगाची सुरवात! आम्ही तर मेंबर झालो नाही, पण इच्छुकांना लाभ घेता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी पुण्यात एका नातेवाईकांकडे सुट्टीत राहायला गेलो होतो. एकदा अंघोळ झाल्यावर बंबात परत पाणी भरण्याचे विसरलो तेंव्हा येजामानानी 'जगात कसे वागावे ? ह्या नावाचे एक उपदेशांचे टेराबाईटी पुस्तक मला वाचायला दिल्याची आठवण जागी झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्याकडे खडी टाकून झाली आहे.रोलर फिरवून रस्ता होत नाहीये.डांबर घातल्याशिवाय दहावेळा रोलर फिरवला तरी रस्ता होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0