कॉकटेल लाउंज : गाथा ब्रॅन्डीची

ब्रॅन्डीची ओळख सनातन महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आचार्य अत्र्यांनी 'ब्रॅन्डीची बाटली' ह्या सिनेमाची कथा लिहून करून दिली. त्यानंतर बहुजन समाजाला खोकला झाला की चमचाभर ब्रॅन्डी घ्यायची असा शोध लागला. त्यामुळे ब्रॅन्डी ही चमचाभर औषध म्हणून घेण्यापलीकडे दारू किंवा मादक द्रव्य म्हणून माझ्या खिजगिणतीतही नव्हती. त्यात देशी दारूमध्ये ब्रॅन्डी जास्त विकला जाणारा प्रकार आहे (अजून एक ब्लेंडी नावाचा प्रकार असून तोही ब्रॅन्डीच्या नावावार खपतो असे जाणकार सूत्रांकडून कळते). आमच्या वाड्यात राहणारा एक जहाल बेवडा ही ब्रॅन्डी पिऊन आमच्या वाड्याच्या दारात नेहमी पडलेला असायचा त्यामुळे ब्रॅन्डी तशी 'डोक्यात' गेलेली होती.

पण एकदा माझ्या बॉसने त्याच्याकडे गेल्यावर कोन्यॅक दिली तीही एकदम साग्रसंगीत 'स्निफर' ग्लासमधून. काय आहे ते माहिती नव्हते पण एक घोट घेतल्यावर भन्नाट लागली आणि काय आहे ते बॉसला विचारल्यावर त्याने सांगितले ब्रॅन्डी. एकदम चकितच झालो आणि एवढ्या चांगल्या दारूला उगाचच पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिल्या बद्दल स्वतःचाच राग आला. त्या गुन्ह्याचे परिमार्जन करण्यासाठी ही ब्रॅन्डी गाथा समर्पित करतो आहे.

असो, नमनाला घडाभर तेल जाळून झाले आहे, आता मूळ कथेकडे वळूया.

ब्रॅन्डी ही डच लोकांची देणगी आहे दारू विश्वाला. ब्रॅन्डीचा फॉर्म्युला काही डच व्यापाऱ्यांकडून व्यापारात केल्या गेलेल्या तडजोडींमुळे अचानकच शोधला गेला. ते म्हणतात नं 'करायला गेलो एक...' अगदी तसेच झाले.

सोळाव्या शतकात नेदरलँड्सला (हॉलंड) फ्रान्समधून वाइन मोठ्या प्रमाणात आयात केली जायची. पण ती आयात करताना डच व्यापाऱ्यांना बर्‍याच अडचणी येत असत. फ्रान्समधील ज्या परगण्यांतून ही आयात केली जायची तेथील नद्यांतून वाइन घेऊन जाण्यावर बरेच कर भरावे लागत असत. एवढे कर भरून झाल्यावरही समुद्री चाच्यांकडूनही लुटालूट फार मोठ्या प्रमाणावर व्ह्यायची. फ्रान्समधून नेदरलँड्सला जायला लागणार्‍या कालावधी मुळे बर्‍याचवेळा वाइन खराबही व्हायची (वाइनमधल्या पाण्यामुळे). अशा ह्या तिहेरी संकटाचा सामना करण्यासाठी काहीतरी करणे आवश्यकच होते. बनिया, अगदी आपल्या कच्छ-मारवाडातला असो किंवा युरोपातला, नुकसान कसे काय होऊ देणार?

ह्या व्यापार्‍यांनी मग ही वाइन डिस्टील करायला सुरुवात केली. म्हणजे वाइनमधला पाण्याचा अंश काढून टाकायचा. त्यामुळे

  • आकारमान कमी होऊन कर बचत
  • कमीत कमी कार्गो स्पेस मध्ये आयात करणे सुलभ,
  • चाच्यांना असल्या वाइनमध्ये काही रुची नसायची त्यामुळे त्यांच्या त्रासापासून मुक्ती
  • आणि आता वाइन 'कॉन्संट्रेटेड' (डिस्टील्ड) असल्यामुळे खराब व्हायचा ही धोका नाही.

अशी भन्नाट कॢप्ती त्यांनी शोधून काढली. ह्या कॢप्तीला डचांच्या स्थानिक भाषेत 'Brandewijn' असे म्हणतात. म्हणजे 'Burnt Wine'. ह्या Brandewijn चाच पुढे अपभ्रंश होऊन 'ब्रॅन्डी' असे नामकरण झाले.

ब्रॅन्डी कशापासून बनवली आहे त्यावरून तिची तीन मूलभूत प्रकारात विभागणी होते.

1. ग्रेप ब्रॅन्डी :

ही ब्रॅन्डी नावाप्रमाणेच द्राक्षांपासून बनवतात. फर्मेंट केलेल्या द्राक्षाच्या रसाला डिस्टील्ड करून ही ब्रॅन्डी बनवली जाते. ह्या डिस्टील्ड झालेली ब्रॅन्डी रंगहीन असते. तिला ओक झाडाच्या लाकडापासून बनवलेल्या ड्रममध्ये मुरवत ठेवले जाते. त्या लाकडामुळे तिला वैषिट्यपूर्ण रंग आणि गंध प्राप्त होतो. मुरवत ठेवण्याचा कालावधी 2 वर्ष ते 20 वर्ष एवढा असू शकतो.

2. पोमेस (Pomace) ब्रॅन्डी :

वाइनसाठी क्रश केलेल्या द्राक्षांच्या उरलेल्या चोथ्यापासून म्हणजे, रस गेलेला गर, साली, द्राक्षांचे देठ ह्यापासून पोमेस ब्रॅन्डी बनवली जाते. ही ब्रॅन्डी फार कमी काळासाठी मुरवली जाते त्यामुळे चवीला जरा रॉ (अपक्व) असते. तसेच ही लाकडाच्या ड्रममध्ये मुरवत ठेवली जात नाही त्यामुळे मूळ द्राक्षाच्या चवीशी इमान राखून चवीला फ्रुटी असते.

3. फ्रूट ब्रॅन्डी :

द्राक्षांऐवजी वेगवेगळ्या फळांपासून ही ब्रॅन्डी बनवली जाते. सफरचंद, जरदाळू, वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज, प्लम ह्या फळांच्या रसाला फर्मेंट कले जाते आणि मग डिस्टील्ड करून फ्रूट ब्रॅन्डी तयार होते.

ब्रॅन्डीची खरी ओळख ती जगाच्या कुठल्या भागात बनवली गेली आहे त्यानुसार होते. दारूचे माहेरघर असलेले फ्रान्स हे अत्युच्च दर्जाच्या ब्रॅन्डीसाठीही प्रख्यात आहे. ब्रॅन्डीचेही युरोपियन आणि उरलेले जग अशी भौगोलिक विभागणी आहे.

फ्रेंच ब्रॅन्डीज

कोन्यॅक
जगप्रसिद्ध आणि एक नंबरवर असणारी 'कोन्यॅक' ही फ्रेंच ब्रॅन्डी आहे. फ्रांसच्या कोन्यॅक नावाच्या परगण्यात तयार होणारी ही 'ग्रेप ब्रॅन्डी' आहे.बाजूच्या चित्रात निळ्या रंगाने दर्शवलेला फ्रान्समधील हा कोन्यॅक परगणा.
ही इतकी प्रसिद्ध आणि अत्युच्च दर्जाची आहे की ब्रॅन्डीसाठी व्यापक अर्थाने सामान्य नावा होऊन बसले आहे. कोन्यॅक 'डबल डिस्टील्ड' असते. ही इतकी सुपरफाईन असण्याचे कारण म्हणजे ज्या कास्क मध्ये ही मुरवली जाते त्याचे लाकूड ओक वृक्षांच्या कुठल्या जंगलातले वापरायचे याचे नियम ठरलेले आहेत. Limousin or Tronçais ह्या जातीच्या ओक झाडांच्या लाकडापासून तयार केलेली कास्कंच मुरवण्याकरिता वापरली जातात. त्याचे कारण म्हणजे ह्या लाकडाने व्हॅनिलाचा गंध आणि काहीशी चव ब्रॅन्डीला मिळते.
अर्मान्यॅक (Armagnac) :
फ्रान्समधल्या दक्षिणेकडील Gascony ह्या प्रांतातील अर्मान्यॅक ह्या परगण्यात तयार होणारी ही ब्रॅन्डी Armagnac म्हणून ओळखली जाते. ह्या परगण्यातल्या खालील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने अर्मान्यॅक तयार केली जाते.
  1. Bas-Armagnac
  2. Armagnac-Ténarèze
  3. Haut-Armagnac
ही कोन्यॅकशी मिळती जुळती असली तरीही बनवण्यासाठी वापरली जाणारी द्राक्षे, जमिनीचा (माती) पोत, डिस्टीलेशन प्रोसेस, चव,गंध आणि ब्रॅन्डीचा पोत असे फार फरक आहेत ह्या दोन प्रकारांत.अर्मान्यॅक कोन्यॅकप्रमाणे 'डबल डिस्टील्ड' नसून 'सिंगल डिस्टील्ड' असते.ही ब्रॅन्डी कोन्यॅकच्या आधी सुमारे 150 वर्षापासून अस्तित्वात आहे असे म्हटले जातेपण दुर्दैवाने कोन्यॅकला मिळालेली लोकप्रियता, प्रतिष्ठा काही अर्मान्यॅक नाही मिळवू शकली.अर्मान्यॅक मुरवण्यासाठी वापरले जाणारे कास्क Limousin, Alsace ह्या जातीच्या ओक वृक्षाचे लाकडापासून बनविलेले असतात. Monlezun ह्या जंगलात मिळणार्‍या काही ओक वृक्षांचे लाकूडही वापरले जाते. ह्या लाकडांमध्ये 'टॅनीन' जास्त प्रमाणात असते हे ब्रॅन्डीमधे मिसळले जाते आणि एक आगळा स्वाद आणि गंध अर्मान्यॅकला बहाल करते.

इतर ब्रॅन्डीज

फ्रान्स खालोखाल इटलीचा नंबर लागतो लोकप्रिय ब्रॅन्डी बनवण्यामध्ये. 'ग्रॅपा' ही प्रसिद्ध ब्रॅन्डी (Pomace प्रकारातली) ही इटालियन ब्रॅन्डी आहे. त्यानंतर अमेरिकन, स्पॅनिश आणि जर्मन ब्रॅन्डीज लोकप्रिय आहेत.

ब्रॅन्डीच्या ग्रेड्स

ब्रॅन्डी मुरवत ठेवलेल्या कालावधीप्रमाणे ब्रॅन्डीच्या ग्रेड्स ठरवलेल्या आहेत. ब्रॅन्डी साधारण 2 वर्षे ते 20 वर्षे मुरवत ठेवली जाते. 25 वर्षापेक्षा जास्त जुनी ब्रॅन्डी खराबा आणि पिण्यासाठी अयोग्य मानली जाते.

डिस्टील्ड झालेली पण मुरवण्यासाठी कास्कमधे ठेवण्यापूर्वीची जी ब्रॅन्डीची अवस्था तारुण्यावस्था असते तिला 'eau-de-vie' असे म्हटले जाते. ह्या eau-de-vie ला किती काळ मुरवेले जाते त्यावरून ब्रॅन्डीची ग्रेड ठरते.

VS
(Very Special)
कास्क मध्ये कमीत कमी 2 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी
VSOP
(Very Special Old Pale)
कास्क मध्ये कमीत कमी 4 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी
XO
(Extra Old)
कास्क मध्ये कमीत कमी 6 वर्षे मुरवत ठेवली गेलेली ब्रॅन्डी. भविष्यात ही सहा वर्षाची मर्यादा 10 वर्षे होणार आहे.

ह्या व्यतिरिक्त अजूनही काही मानांकने आहेत पण ती खासकरून कोन्यॅकसाठी वापरली जातात.

Napoleon VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Extra कमीत कमी 6 वर्षे मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Vieux VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Vieille Réserve Xo पेक्षा जास्त पण Hors d’age पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Hors d’âge Xo पेक्षा जास्त मुरवलेली. Hors d’age म्हणजे beyond age. उच्च दर्जाची कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

ब्रॅन्डी पिण्याचा 'ब्रॅन्डी स्निफर (Brandy Snifter)'

ब्रॅन्डी पिण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ग्लासला ब्रॅन्डी स्निफर म्हणतात.
ह्यातून ब्रॅन्डी पिण्याआधी मनसोक्त हुंगायची असते.

ब्रॅन्डी पिण्याची पद्धत

हा ब्रॅन्डी स्निफर ह्या चित्रात दाखल्याप्रमाणे पकडायचा असतो. असे पकडण्यामुळे ग्लासातली ब्रॅन्डी हलकीशी गरम (उबदार) होउन तिच गंध खुलतो आणि चवही खुलते.ब्रॅन्डीत किंचीत कोमट पाणी घालून प्यायल्यास तिची लज्जत काही औरच असते. थंड केलेली (बाटली फ्रीझमध्ये ठेवून, ग्लासात बर्फ घालून नव्हे) ब्रॅन्डी 'नीट' घेतल्यास एक आगळाच आनंद देते.

ब्रॅन्डी ही प्रामुखाने जेवणानंतर प्यायचे मद्य आहे. जेवल्यानंतर, ब्रॅन्डीसोबत जर सिगार, तोही क्युबन, असेल तर जी काही ब्रम्हानंदी टाळी लागते की साक्षात यम जरी त्यावेळी आला तर त्याचीही, माणसाला त्या समाधिस्त अवस्थेतून बाहेर काढायची, ईच्छा होणार नाही. Smile

अशी ही ब्रॅन्डीची गाथा सुफळ संपूर्ण करतो.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अरे वा! उत्तम जेवणानंतर थोडी कोन्याक घ्यायची मजा आगळीच.

कोन्याक न पिणार्‍या रसिकांनाही आस्वादता येतील अशा कोन्याकच्या जुन्या जाहिराती (आंतरजालावरून साभार) काही खाली देत आहे. जाहिरातीतल्या उत्पादनाच्या प्रतिमेपेक्षा कमनीय तरुणी नजरेत अधिक भरेल अशा पद्धतीनं चितारणं तर नेहमीचंच आहे, पण यांपैकी काही जाहिरातीत काही वेगळे प्राणीदेखील दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मझा आला ह्या जाहिरातींची चित्रे बघून!
धन्यवाद!

- ( ऋणी ) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉकटेल मधे एवढे प्रकार असतात हे 'कॉकटेल लाऊंज' वाचून माहिती झालं.

सोकाजीराव एक शंका :
Napoleon VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.
Vieux VSOP पेक्षा जास्त पण Xo पेक्षा कमी मुरवलेली कोन्यॅक दर्शवण्यासाठी हे मानांकन वापरले जाते.

या दोन प्रकारांमधे फरक काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगवेगळया प्रोडक्ट कंपन्या ही मानांकनं आपापल्या पद्धातीने वापरतात.
ही मानांकनं मार्केटिंग गिमीक्स असतात आपापल्या प्रॉडक्टला प्रमोट करण्यासाठी.

अधिक जाणकार आणखी प्रकाश टाकू शकतील तर मजा येईल.

- (साकिया) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अह्हाहा! सोकाजीराव! सलाम! सलाम!! त्रिवार सलाम!

स्वगतः एक दिवशी हा माणूस प्यायला लावणारच बहुदा! याचे लेख वाचणं बंद केलं पाहिजे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सोकाजी तुमच्या थियरीमुळे प्रँक्टीकलचा अनुभव न घेताच दुसऱ्‍यावर इंप्रेशन मारता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

सोकाजी, तू माझा पुढचा गुर्जी रे! प्रणाम स्वीकार करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सोकाजी, तू माझा पुढचा गुर्जी रे! प्रणाम स्वीकार करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सोकाजी, तू माझा पुढचा गुर्जी रे! प्रणाम स्वीकार करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(दारवा हे दारू चे अनेकवचन आहे.) तर, वेगवेगळ्या दारवा पिणे. त्यांच्या चवी अन पिण्याचे प्रकार चाखणे, करणे हा माझाही छंद आहे. ते कोंबड्याचं शेपूट काय लै मजा देत नाही, पण एकेक दारू वेगवेगळी, किंवा एकापाठी एक पिऊन पोटात कॉकटेल लैदा केलय.

कोन्याकची चव पहिल्यांदा घेतली ती एका मित्राचे तिर्थरूप पायलट होते, अन त्याच्याकडे त्या काळी खूप सार्‍या 'मिनिएअचर्स' होत्या. ( तेंव्हा आम्ही 'एफ' ब्लॉकला होस्टेलमधे रहात असू. माननिय मित्रवर्य आजकाल मोठ्ठे कार्डिऑलॉजिस्ट असतात. दारू सोडली आहे त्यांनी. (म्हणे)..) अनेक ब्रँड्सच्या. कोन्याक जास्त आवडते, अर्मान्याकपेक्षा. कदाचित अर्मान्याक म्हणुन पिलवली ती तिसरिच असेल किंवा आधीची ग्लेन्फिडिच जऽरा जास्त झाली असावी.. असो.

अवांतर : त्या काळी म्हणजे, एक ब्लू-बर्ड नावाची जिन १६ रुपयांना खंबा मिळायचा. गोवलकोंडाची पोर्ट वाईन मिळायची. (ही गोड वाईन कधी बंद झाली कुणास ठाऊक. तसल्या मधुर चवीची सुलाची लेट हार्वेस्ट मिळते आजकाल. विनेगारच्या जवळ जाणार्‍या आंबट वाईन्स न आवडणार्‍यांनी नोटावेच)

तर, या लेखात राहून गेलंय ते : कॉफी लेस्ड विथ ब्रँडी.. (caffè corretto) त्याबद्दल बी लिवा सोकाजीराव. निकोटीन अन कॅफिन, दोघे सिनर्जेस्टिकली काम करतात. दारू सोबत तिची किक वाढवायला सिगार सारखीच कॉफी पण मजा देते..

ता.क. बाकी तुमच्या तकिलाच्या फ्रेंच स्टाईलीत मॉडीफिकेशन्स करून चुक्लोय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नेट, किंवा अय्या ची वाट लागली आहे... ३.१४ चा प्रतिसादही ३ वेळा आला आहे.. म्हणून संपादित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अरे हो! माझा प्रतिसाद तीनदा येण्याला माझ्या जुनाट कंप्यूटरला मी दोष देते आहे.
सोकाजीला मी त्रिवार गुर्जी-३ म्हणते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

_/\_ मद्यमुनी
इथे एका ओरिगिनल चिनी रेस्तराँमध्ये एक्स-ओ सॉस घालून बनवलेला चविष्ट फ्राईड राईस मिळतो, त्याच्या नावाचा आज उलगडा झाला.

किंचित अवांतर - ग्रेप ब्रँडीचे हे द. अमेरिकन कॉकटेलः
http://en.wikipedia.org/wiki/Pisco_Sour

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा खिताब आवडला.
आदरणीय सोत्रीजींना शोभून दिसतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

+१ मद्यमुनी ब्येष्ट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!