संस्कृत काव्यातील श्रेय नामांकन आणि काव्यचौर्याचा निषेध
http://scroll.in नावाच्या संकेत स्थळावर Eric M Gurevitch यांचा लेख (· Jul 25, 2015 · 09:15 am ) वाचण्यात आला.
Eric M Gurevitch त्यांच्या लेखाच्या सुरवातीस म्ह्णतात The West doesn't have a copyright on proper attribution. Here's what Sanskrit commentators and anthologists have to say on the subject.
Eric M Gurevitch यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे हि संस्कृत साहित्यात बौद्धीक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.
दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला. (म्हणजे बेसीकली पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य होत असल्याकडे सोमदेव सुरीचे लक्ष गेल्याचे दिसते)
सोमदेव सुरीनेखालील श्लोकातून काव्यचौर्याचा निषेध व्यक्त केला आहे. (संस्कृतप्रेमी जाणकारांकडून या श्लोकांचा अनुवाद करून हवा आहे)
कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः।
तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३
११व्या शतकातील काश्मिरी पंडीत भिल्लणाने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे.
साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः ।
यदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति ।। १.११
१४ व्या शतकात पद्धती नावाच्या ग्रंथात सारंगधराने खालील श्लोकातून त्याचे मत प्रकट केले आहे
अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै ।
अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।। १९६
उपरोकत संस्कृत श्लोकांचे मराठी अनुवाद करून हवे आहेत.
* ह्या धागालेखातील प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पांसाठी वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे ते प्रताधिकार मुक्त समजले जातील
* आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आभार
यातील पहिला श्लोक इतर गूगल
यातील पहिला श्लोक इतर गूगल शोधात येत नाही म्हणजे अद्याप किमान युनिकोडात आंतरजालावर उपलब्ध नसावा म्हणून सध्यातरी पडताळणी करणे कठीण दिसते.
दुसरा आणि तीसरा श्लोक इतर आंतरजालिय शोधात येत आहेत. तिसर्या श्लोकाच्या लेखनात मायनर फरक दिसताहेत
*या दुव्यावरील लेखन खालील प्रमाणे आहे.
अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनैः ।
अनाख्याताः सतां मध्ये कविश्चौरो विभाव्यते ॥ १.६ ॥
* या दुव्यावरील लेखन खालील प्रमाणे आहे.
अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनैः ।
अनाख्यातः सतां मध्ये कविश्चोरो विभाव्यते ।।
तर तिसर्या श्लोकाचे तिन्ही पैकी प्रमाण लेखन कोणते समजावे या बद्दल कृ. मार्गदर्शन करावे.
आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी आभारी आहे.
प्रमाणलेखन
वरील दोनापैकी दुसरी अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनैः । अनाख्यातः सतां मध्ये कविश्चोरो विभाव्यते ।।? ही आवृत्ति योग्य आहे. पहिलीमध्ये विशेष्य असा जो 'कवि' तो एकवचनामध्ये असून त्याचे विशेषण 'अनाख्याताः' हे मात्र बहुवचनामध्ये आहे. हे अर्थातच चुकीचे आहे आणि जालासाठी श्लोकाचे टंकन करणार्याने ती चूक केली अहे.
अनुवाद
कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः।
तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३
जुन्या कृति पुढे ठेऊन त्या जशाच्या तशा वा बदलून तसेच बरळेल (लिहील) तो पातकी आणि काव्य चोर आहे.
(पहिल्या ओळीत 'प्रादरं' हा शब्द थोडा चुकीचा वाटतो कारण वृत्त जुळत नाही.)
साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः ।
यदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति ।। १.११
हे कवीन्द्रांनो, साहित्याच्या मार्गातील ठेव्याचे मन्थन करून काढलेल्या काव्यामृताचे रक्षण करा. कारण दैत्यांप्रमाणे त्यांच्यावर डाका घालायला टपलेले चोर वाढत आहेत.
अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै ।
अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।। १९६
(मला ह्याची पहिली ओळ इतकी स्पष्ट लागत नाही तरीपण...)
दुसर्याच्या लेखनाची आवृत्ति करून आणि त्याच्या खुणा लपवून सज्जनांच्यामध्ये न ओळखला जाता वावरणारा काव्यचोर धन्य होय.