महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल ?

महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने तो ९००० श्लोकांचा आहे हे ग्रंथातच नमुद करून ठेवले. काळाच्या ओघात त्यातील विवीध कथासूत्रांचा विस्तार होत गेला आणि श्लोक संख्या लाखाच्या घरात गेली. म्हणजे प्रचंड मोठा भाग हा वस्तुतः प्रक्षिप्त असला पाहीजे.

मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे की

१) महाभारताच्या प्रथम कर्त्याने ९००० श्लोकात समजा एक कथा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पुर्ण केली आहे, समजा अधिकतम शक्य असलेला प्रक्षिप्त भाग गृहीत धरावयाचा नाही असे ठरवले तर महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल कि ज्या शिवाय महाभारताची कथा आजीबात आकार घेणार नाही ?

किंवा असंही म्हणता येईल की तुम्हाला केवळ ९००० श्लोकांमध्ये महाभारताची मुख्य पटकथा सांगावयाची आहे तर तुमच्या पटकथेचे स्वरूप कसे असेल ?

२) महाभारतातील किमान पात्रे कोणती की ज्यांच्या शिवाय महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक आकारास येऊ शकत नाही ?

३) महाभारतातील किमान भागास आवश्यक नसणारी पण लाखभर श्लोकी महाभारतातील कोणती कथासूत्रे सहजपणे बाजूला ठेवता येतील अथवा टाळता येतील ?

(अशीच चर्चा रामायणा बाबतही करावयाची आहे पण नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यातून)

* प्रक्षिप्त = एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्‍या कुणीतरी मागाहून घातलेला भाग/लेखन (संदर्भ)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

भांडारकर संस्थेने संशोधित केलेली प्रत उपलब्ध आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भांडारकर संस्थेने संशोधित केलेली प्रत उपलब्ध आहे ना?

उपलब्ध आहे असे म्हणतात, आंतरजालावर युनिकोडासहीत आणि अनुवादांसहित का उपलब्ध नाही का मला शोधून सापडली नाही पता नही. पण इन एनी केस

१) त्यांचा मुख्य उद्देश उपलब्ध प्रतींपैकी प्रमाण प्रत निश्चितीकरणाचा असावा आणि ते करताना प्रमाण प्रत निश्चित करण्यासाठी अपरिहार्यपणे जेवढी प्रक्षिप्तता शोधावी लागली असेल त्या पलिकडे त्यांनी काही प्रयत्न केले का त्याची कल्पना नाही. एखादा पूर्ण भाग(कथासूत्र) अपरिहार्यतेने प्रक्षिप्त जाहीर करणे वेगळे आणि वाढवल्या गेलेल्या श्लोकांचा शोध घेणे वेगळे

२) अशी कोणतीही प्रक्षिप्तता शोधण्यापुर्वी किमान स्वरूपाच्या पटकथेचा एक्सरसाईज गरजेचा असावा असा एक्सरसाईज त्यांनी केला होता का माहित नाही.

३) भांडारकर प्रणीत काम चालू होते तेव्हा संगणक प्रणालींची पुरेशी उपलब्धता राहिली नसावी. आज संगणक प्रणाली अधिक विकसीत आहे भाषा संशोधनही बरेच पुढे गेले असणार त्यामुळे भांडारकरचा जुना एक्सरसाइज अधिक सुधारता येण्याची शक्यता असू शकणार नाही का असा प्रश्न मला पडत असतो

४) आंतर जालावर उपलब्ध प्रतीत काही शब्दांवर संगणकीय शोध घेतला असता बर्‍याच शब्दांची (बहुधा श्लोकांची सुद्धा) पुनरावृत्तीसुद्धा मला आढळली. पण शालेय काळातील विस्मरणात गेलेल्या संस्कृतपलिकडे माझी धाव नसल्यामुळे ठाम दावा करता येत नाही पण अधिक प्रयत्न केल्यास प्रक्षिप्तभागांच्या शोधात अजून प्रगती होऊ शकेल व्हावयास हवी असे माझे व्यक्तीगत मत राहीले आहे.

माझी उपरोक्त मते माझ्या अत्यल्प माहितीवर आधारीत आहेत. कुणी त्यात सुधारणा सुचवल्यास आनंदच असेल.

प्रतिसादासाठी धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

इरावती कर्वे यांच्या युगान्त मध्ये या संशोधनाच्या निकषांबद्दल लिहिले आहे. मला आठवते त्याप्रमाणे सर्वात जुनी जी प्रत उपलब्ध होती तीच इ स १००० च्या आसपासची आहे. त्याहून जुनी प्रत उपलब्ध नव्हती. त्या प्रतीत जेवढे महाभारत आहे त्यातले काही वगळता येणे शक्य नाही (कारण त्यापूर्वी काय होते हे ठाऊकच नाही) असा काहीसा निष्कर्ष त्यात मांडला होता.

त्यानंतर आणखी जुन्या प्रती उपलब्ध झालेल्या असल्यास कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

विषय खूपच मोठा आहे, पण थोडक्यात काही मुद्दे लिहितो:

१. महाभारताच्या अभ्यासकांचं (उदा. विंटरनित्झ, हॉपकिन्स) सर्वसाधारण मत असं की भारतीय युद्ध ही ऐतिहासिक घटना असण्याला ठाम पुरावा नाही, पण जर ते झालं असेलच तर अंदाजे इ.स. पूर्व सहाव्या-सातव्या शतकातलं असावं. त्यावर कुणीतरी काव्य रचलं, त्यानंतरच्या कवींनी (किंवा भाटांनी) यात भर घातली किंवा फेरफार केले (किंवा दोन्ही), आणि असं होत होत इ.स. चौथ्या शतकापर्यंत अात्ता आहे तितपत ते मोठं झालेलं होतं. तेव्हा महाभारताचा गाभा शोधायचा झाला तर ‘एका घराण्याच्या दोन उपशाखांमध्ये जमिनीवरून किंवा राज्यावरून वाद झाले, आणि त्याची परिणती युद्धात झाली’ असा सांगता येईल.

२. पण यात भाग घेणाऱ्या कवींची संख्या फार मोठी आहे, आणि काव्यरचनेचा काळ काही शतकांचा आहे. तेव्हा कथानकात स्थानिक फेरफार करणं, उपकथानकं घुसडणं, नव्या व्यक्तिरेखा घुसवणं, आधी रचला गेलेला भाग पुरता बदलणं हे सगळं झालेलं आहे. तेव्हा ‘मूळ’ महाभारतातले श्लोक यात कितपत टिकले असतील हे सांगणं अशक्य आहे. सबब ९००० ह्या आकड्याला काही विश्वासार्हता नाही. त्याचप्रमाणे ‘मूळ कथानका’त कोणकोण होतं (कृष्ण होता का? कर्ण होता का? भाऊ शंभर आणि पाचच होते का?) हेही सांगणं अशक्य दिसतं.

३. भांडारकर संस्थेच्या संशोधित प्रतीचा उद्देश हा ‘अस्तित्वात असलेली हस्तलिखितं पडताळून पाहून संपूर्ण महाकाव्याचं शक्य तितकं प्राचीन स्वरूप शोधून काढणं’ हा होता, ‘किमान कथानक शोधून काढणं’ हा नव्हता. संशोधित प्रतीत अंदाजे ७५००० श्लोक आहेत. सुकथनकरांनी (संशोधित प्रतीचे मुख्य संपादक) पहिल्या खंडाच्या आधी या विषयावर एक लांबलचक पूर्वपीठिका (prolegomena) लिहिलेली आहे.

४. जाताजाता हे नमूद करायला हवं की काही हिंदू धर्माभिमान्यांची मतं पूर्ण वेगळी आहेत. त्यातल्या काहींच्या मते भारतीय युद्ध इ.स. पूर्व ३१०२ मध्ये झालं आणि व्यास नावाच्या एकाच माणसाने हे सारं काव्य एकटाकी लिहून काढलं. पण मुख्य प्रवाहातले संशोधक अशी मतं गांभीर्याने घेत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

महाभारताचा गाभा शोधायचा झाला तर ‘एका घराण्याच्या दोन उपशाखांमध्ये जमिनीवरून किंवा राज्यावरून वाद झाले, आणि त्याची परिणती युद्धात झाली’

तेव्हा कथानकात स्थानिक फेरफार करणं, उपकथानकं घुसडणं, नव्या व्यक्तिरेखा घुसवणं, आधी रचला गेलेला भाग पुरता बदलणं हे सगळं झालेलं आहे. तेव्हा ‘मूळ’ महाभारतातले श्लोक यात कितपत टिकले असतील हे सांगणं अशक्य आहे.

# कथा मौखीकरित्या पुढच्या पिढीकडे दिल्या असतील तर शब्द संग्रहात फेरफार होईल, वाढवण्याच्या भरात प्रक्षिप्त भाग जोडले जातील पण कथासूत्राच्या गाभ्यास काहीच क्रिटीकल अस्पेक्ट नसते, कथासूत्र क्रिटीकल अस्पेक्ट्स शिवायची कुटूंबातंर्गत विवाद मात्र असता तर कथासूत्राची वाढ एवढ्या प्रमाणात शक्यही झाली नसती. म्हणजे कथेचे भाषा बदलेल पण कथेचा गाभ्याचे सगळेच क्रिटीकल अस्पेक्टस बदलले जाणे कठीण असेल.
# एकदा का क्रिटीकल अस्पेक्टस सहीत गाभा कथासूत्राचा अंदाजा आला आणि संगणकीय मदतीने शब्द संपदा कशी बदलत गेली आहे हे लक्षात आले तर सगळ्या नाहीतरी बर्‍याच लेयर्सचा उलगडा व्हावयास हवा असे वाटते.
# टेक्नॉलॉजी हाताशी नसताना भांडारकर २५ एक हजारांना कात्री लावू शकते तर आज टेक्नॉलॉजी हाताशी आहे. भांडारकर (संस्था) किंवा इरावती कर्वे वगैरेंचे काम पन्नास एक वर्षांपुर्वीचे आहे ५० वर्षात भाषाशास्त्र संशोधनही बरेच पुढे गेले असावयास हवे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मी 'ब्रह्मास्त्र' इतक मोठं युद्ध होऊनही माझा वापर मुख्य युद्धात झाला नाही.अर्जुन,कर्ण,भीष्म,द्रोण,अश्वत्थामा या सर्वांनी मला आपल्या भात्यात सडवत ठेवलं.अश्वत्थामा आणि अर्जुन ने शेवटी मला वापरलं पण कथानककाराने आणि मुख्य नायकाने हस्तक्षेप केला आणि मला माझं सामर्थ्य दाखवण्याची संधी दिली नाही.पण अश्वत्थामाने मला थोडा न्याय देण्याचा प्रयत्न केला पण मुख्य नायकाने तोही माझा प्रयत्न हाणून पाडला आणि परिक्षितला जिवंत केलं.किमान स्वरूपाच्या कथानाकामध्ये अर्थातच माझा काही संबंध नाही पण अठरा अक्षहौणी सैन्यापैकी एकाचाही माझ्यामुळे मृत्यु झाला नाही.एकंदरीतच माझ्यावर अन्याय झाला आहे.

--'ब्रह्मास्त्र'(खटक्यावर बोट जाग्याला पलटी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

Smile भावना पोहोचल्या. आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.