तिश्नगी अर्थात तृष्णा

लोग दर्या पे क्युं जान दिये जाते है,
तिश्नगी का तो तआल्लुक नही पानी से

वा! काय चपखल , सुरेख वर्णन आहे तहानेचे. तृष्णा पाणी पिऊन थोड्या काळाकरता मिटते पण परत जागृत होते, त्रास देते. मग काय संबंध काय तहानेचा आणि जलाचा? काय संबंध आहे तृष्णेचा आणि अमर्याद पसरलेल्या अथांग सागराचा? जितका समुद्र अथांग तितकीच तहानही असीम नाही का?
.
"तृष्णा" हा शब्द कोणाला काय आठवण करुन देइल तर कोणाला काय. या शब्दाने मला मात्र आठवतो तो दुसरा शब्द - "द्वैत." वेगळेपण, भिन्नत्व. जर द्वैतच नसते तर कुठुन आली असती अमर्याद तडफड, व्याकुळ तहान?
जिथे द्वैतच नाही तिथे ना तृष्णा, ना तृषार्त ना जल. तिढाच मिटला असता कायमचा.
शांती असेल का अद्वैतात? ना तहान ना तृप्ती. ना ओढ ना मीलन.
कदाचित शांती असेलही पण जिवंतपणा असेल का? अनुभूती असेल का?
.
जेव्हा तहान लागते, ओढ लागते तेव्हा आपल्या माध्यमातून नक्की हा अनुभव कोण घेत असतं? माझी तहान ना पाण्याला कळते ना तहानेला कळते. फक्त मला जाणवते, व्याकुळ करते, वेडीपिशी करते. हा व्याकुळ होणारा "मी" कोण असतो? हाच तो फेमस कोहम प्रश्न का? हा "मी" मेंदूत असतो, हृदयात असतो की संप्रेरकांत की गुणसूत्रात?
.
तहानेचा अनुभव माझ्या माध्यमातून कोण अनुभवतं?
.
छान छान शेर आहेत या विषयावरती. कवींनी वेगवेगळ्या अँगलमधून "तहान" या संकल्पनेकडे पाहीले आहे. काही जणांनी तर त्यांचा काव्यसंग्रह या शब्दाला वाहीला आहे.
या विषयावरचे अजुन काही शेर -
.

वोह और होंगे जो पी के सरशार (धुंद) हो गये
हर जाम से हमे तो नई तिश्नगी मिली| - साहीर होशियारपुरी

.
हा शेवटचा आवडीचा -

विसाल-ए-दोस्त से भी कम ना हो सकी "राशिद",
अजल (beginning, eternity) से पाई हुई तिश्नगी को क्या कहिये|

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'तृष्णा'वरून आठवले. अलीकडेच फ्रेडा पिंटोचे काम असलेला 'तृष्णा' हा थॉमस हार्डीच्या Tess of the D'Urbervilles वर बेतलेला छान चित्रपट पाहिला. चित्रपटाची निर्मिति ब्रिटिश आहे पण सर्व वातावरण आणि चित्रीकरण राजस्थानी आहे. चित्रपट बहुतांशांनी इंग्लिश भाषेत आहे. यूटयूबवर येथे पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की पाहीन. धन्यवाद कोल्हट्करजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तृष्णा'पाहीलाय.
फ्रेडा पिंटोने वेगळ्याच 'तृष्णा'पूर्ण केल्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुमच्या शॉर्षकातील 'तिश्नगी' ह्या शब्दाचा अर्थ काय?

त्यावरून सुचले. नाना पाटेकर, पल्लवी जोशी, आलोक नाथ ह्यांची कामे असलेला आणि मध्य आशियातील बौद्ध पार्श्वभूमि असलेला 'तृषाग्नि' हा चित्रपटहि पाहण्याजोगा आहे. यूटयूबवर तो येथे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय हाच सिनेमा आठवत होते मघापासून. तो (नाना) सन्याशी असतो ना? फार आवडलेला तो सिनेमा मला. रात्री प्रौढांकरता सिनेमे लागायचे त्यात नेमका हा पहायला मिळाला होता आणखी एक - हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली.
हा तृषाग्नी खूप आवडला होता.
___
तिश्नगी म्हणजे तहान कोल्हटकरजी, thirst, desire, longing
______
आता सिनेमा पाहून झाला परत. उत्तम अभिनय व कथावस्तू तसेच दिग्दर्शनही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनंग म्हणजे कामदेव . ज्याला अंग नाही पण त्याचे अस्थित्व चिरंतन आहे. कामभावना ही अखंड तृष्णा . क्षणभरासाठी तृप्ती आणि मग निरंतन अतृप्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मदतीबद्दल आभार पण 'तिश्नगी' हा शब्द उर्दू (म्हणजे मूळचा अरेबिक वा फारसी) दिसतो. त्याचा अर्थ तिश्नगी= तृष्णा, प्यास, लालसा, अभिलाषा असा विक्शनरी मध्ये दिला आहे.

।यात 'अनंगा'चा संबंध नाही. चर्चेचा शब्द 'तिश्नगी' आहे, 'तिश्नंगी' नाही.

जाताजाता, अनंग म्हणजे ज्याला अंग नाही तो, पर्यायी कामदेव. त्यालाच 'मनोभव' 'मनात उत्पन्न होणारा', इत्यादि अनेक अन्य नावे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ माहिती :
१९८५ च्या आसपास 'तृष्णा' नावाची एक चांगली हिंदी मालिका दूरदर्शनवर प्रसारित होत असे. जेन ऑस्टिनच्या 'प्राईड अ‍ॅन्ड प्रेज्युडिस'वर आधारित पण ८५च्या भारतात घडणारी कथा सादर केली होती. मि. डार्सीच्या भूमिकेत तरूण धनराजगीर हा त्या काळचा ('डिग्जॅम' सूटिन्ग्स्-शर्टिन्ग्स्) मॉडेल नि संगीता हांडा नावाच्या अभिनेत्रीने एलिझाबेथ बेनेट्चे पात्र साकरले होते. किटू (कौशल्या) गिडवानी ही पाच बहिणींतली एक होती. प्रत्येक पात्राची निवड चपखल होती. ही मालिका कुणाकडे, कुठे उपलब्ध असल्यास मला कळवावे ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर लेख
आवडला
इतने तडपे के प्यास भी ना रही.
अभीप्सा म्हणजे तहान च का हो की काही फरक आहे अर्थात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

a cherished desire/aspiration असं सांगतोय गुगल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानात 'तृष्णा' हे दु:खाचे मूळ म्हणून येते. 'नीड' साठीची नव्हे तर 'ग्रीड'-- तीव्र इच्छा!
मनुजस्स पमत्तचारिनो तण्हा वड्ढति मालुवा विय|
सो प्लवती हुराहुरं फलमिच्चं व वनस्मि वानरो||
(प्रमादी माणसाची तृष्णा आकाश-वेली सारखी वाढते, तो लोक-लोकांत उड्या मारीत राहतो, जसे फळाच्या इच्छेने वनातले वानर!)
- धम्मपदांत स्वतंत्र 'तण्हावग्गो' चॅप्टरच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

आवडले.
____
बुद्धीझम वरती विशेषतः बुद्धीझम आणि बौद्ध मठामधील स्त्रियांचे नेतृत्व, या विषयावरचे पुस्तक वाचते आहे. नीट वाचून झालं की कदाचित लेख टाकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला, पण आणखी लांबीचा हवा होता. छोट्याशा लेखाने आम्हा वाचकांची तिश्नगी वाढली.

तिश्नगीविषयी आणखी काही शेरः

वह सामने हैं मगर तिश्नगी नहीं जाती
यह क्या सितम है के दरिया सराब जैसा है?

पीता हूँ जितनी उत्नी ही बढती है तिश्नगी
साक़ी ने जैसे प्यास मिला दी शराब में

अवांतरः तुम्ही उद्धृत केलेल्या पहिल्या शेरात दरियाचा अर्थ समुद्र घेतलात असे वाटते.

काय संबंध आहे तृष्णेचा आणि अमर्याद पसरलेल्या अथांग सागराचा? जितका समुद्र अथांग तितकीच तहानही असीम नाही का?

मराठीत दर्याचा अर्थ समुद्र असला तरी हिंदी व उर्दूत दरियाचे नदी व सागर असे दोन अर्थ आहेत. उर्दू शायरीत तो अधिकतर नदी ह्या अर्थाने वापरला जातो. तुमच्या उदाहरणातही नदी हाच योग्य अर्थ वाटतो. समुद्र हा अर्थ घेतल्यास शेर निरर्थक होतो, कारण तृष्णा भागवण्यासाठी समुद्राचे पाणी उपयोगी नाही. तृषार्त माणसे समुद्रावर जान का देतील?
लोक नदीला एवढे डोक्यावर का घेतात? माणसाची तहान ही पाण्याची नाहीच मुळी.ही तहान प्रेमाची असेल, शरीरसुखाची असेल, परमेश्वरदर्शनाची/कृपेची किंवा मोक्षाची असेल. असे विविध अर्थ काढता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

तहान प्रेमाची असेल, शरीरसुखाची असेल, परमेश्वरदर्शनाची/कृपेची किंवा मोक्षाची असेल.

वा! अगदी हेच होतं माझ्या डोक्यात.
.
दरिया = नदी असेल तोच अर्थ लागतोय.
____
तुमची सही -

हम मैकदे से हर दम प्यासे निकल गये
साकी की लाज रखने झूमे, फिसल गये

वल्लाह! खासच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची सही -

हम मैकदे से हर दम प्यासे निकल गये
साकी की लाज रखने झूमे, फिसल गये


वल्लाह! खासच.

ज़र्रानवाज़ी का शुक्रिया. :shy: Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

@मिलिंदजी,

तुम्ही क्वोट केलेल्या ओळींच्या निमित्ताने पूर्ण गझल कानात ऐकू यायला लागली आणि सगळे शब्द टाकल्याशिवाय राहवेना.

...............................

बदन में आग-सी चेहरा गुलाब जैसा है
के जहर ए गम का नशा भी शराब जैसा है

कहाँ वो कुर्ब के अब तो ये हाल है जैसे
तेरे फिराक का आलम भी ख्वाब जैसा है

मगर कभी कोई देखे कोई पढे तो सही
दिल आईना है तो चेहरा किताब जैसा है

वो सामने है मगर तिश्नगी नहीं जाती
ये क्या सितम है के दरिया सराब जैसा है

फराज संग-ए-मलामत से जख्म जख्म सही
हमें अजीज है खानाखराब जैसा है

.........................

वो सामने है मगर तिश्नगी नहीं जाती
ये क्या सितम है के दरिया सराब जैसा है

"शामक (व्यक्ती) खुद्द समोर असूनही तृष्णा शमत नाही, कारण ते जळ हे मृगजळच आहे.. जितके जवळ जावे तितका जळाचा निव्वळ आभासच आहे हे जाणवणारं आहे.."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे गझल.
____
मृगजळाचा शेर सुंदरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, गविजी. बर्‍याच दिवसांनी ही गझल पूर्ण वाचली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

गैर ले मह्फिल में बोंसे जाम के
हम रहें युं तिश्ना-लब पैगाम के

खत लिखेंगे गर्चे, मतलब कुछ ना हो
हम तो आशिक हैं तुम्हारे नाम के

इष्क ने गालिब निकम्मा कर दिया
वर्ना हम भी आदमी थे काम के

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! छानच लेख आहे. विस्तार करा की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0