अध्यात्माचे विज्ञान

नुकताच माझा एक अध्यात्म वाला मित्र येऊन गेला. माझी मते चांगलीच ठाऊक असल्यामुळे, तो कधी माझ्यासमोर तसले विषय काढत नाही. पण आज त्याला निकड होती. विज्ञान आणि अध्यात्म, या विषयावर त्याला एक लेख लिहायचा होता. वेळ कमी होता. तो विज्ञान शाखेचा नसल्यामुळे त्याला माझी मदत हवी होती. 'तू मला नुसते मुद्दे दिलेस तरी चालेल, मी त्याचा योग्य तो विस्तार करीन', असे त्याचे म्हणणे होते. मदत करण्याचा प्रयत्न करतो, एवढेच आश्वासन मी दिले. नंतर विचार करता करता ठरवले, आपल्याला जेवढे सुचते तेवढे लिहून काढायचे. ते वाचल्यावर, जालावरील ज्ञानी, बुद्धिमान आणि तैलबुद्धी असलेले मदतीचा हात देतीलच. निव्वळ या भरवशावर हे लिहिण्याचे धाडस करत आहे.

अध्यात्म म्हणजे आत्मा आलाच. आता या आत्म्याला विज्ञानात कुठे चिकटवायचा? मनांशी, आत्मा,आत्मा, आटमां, अ‍ॅटमा असे म्हटले. एकदम ट्युब पेटली. येस्स! आत्मा म्हणजे अ‍ॅटम! तो मॉलेक्युल बनवण्याच्या शोधांत. स्वार्थी आत्मे जास्तीतजास्त घेण्याच्या प्रयत्नांत. म्हणजे ते कमी ईलेक्ट्रॉन्स असलेले! परमार्थी आत्मे म्हणजे ईलेक्ट्रॉन रिच! द्यायला अगदी उत्सुक असलेले. म्हणजे आत्मा कसाही असो, त्याचा दुसर्‍याबरोबर मॉलेक्युल होणारच. लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे मीलन. ते सिग्मा बाँड असतील तर लग्न टिकणार, पाय बाँड असतील तर घटस्फोटाची शक्यता जास्त! मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. समाजातली डबल आणि ट्रिपल बाँड असलेली जोडपी दिसू लागली. त्यांना वाटत होते की आपले विवाहबंधन अगदी दृढ आहे, प्रत्यक्षांत परिस्थिती विपरीत! मैत्रीत देखील हाच बाँडचा कायदा लागू! मला अगदी जेम्स बाँड झाल्यासारखे वाटू लागले. चला, एक मुद्दा सापडला. त्याचा विस्तार ज्ञानी मंडळी करतीलच.

नामस्मरण. आता याचे महत्त्व कसे पटवायचे ? जितके नामस्मरण जास्त तितके पुण्य अधिक. सारखे एकच नांव जपल्याने काय होते? वास्तवाचा विसर पडून एक सुखद ग्लानी येते. म्हातारपणी, अल्झायमर झाला तरी रोज ते नांव असंख्य वेळा जपल्याने ते विसरणे अशक्यच. म्हणजे बाकीच्या जगाशी तुमचा तेवढा तरी संबंध रहाणारच. कुठल्याही विचारांनी वा कृतीनेसुद्धा, मेंदूत ईलेक्ट्रोकेमिकल सिग्नल जाणारच. मग नामस्मरणाने काय होते? मेंदूतल्या चुकीच्या जोडण्या दुरुस्त होतात, थोडक्यांत, म्हातारपणी झालेला अल्झायमर, बरा व्हायला मदत होते. द्यावे ठोकून!

होमहवन. ही वारंवार घरी करावे. त्यामुळे ६.५ फॅटच्या दुधापासून झालेले तूप असते, ते तुमच्या पोटांत जाऊन, तुम्ही तुंदिलतनु बनण्याऐवजी जाळले जाते. नुसते फेकून द्या असे सांगितले तर ते जीवावर येते. मंत्र म्हटल्याने पोटाच्या स्नायूंना व्यायाम होतो. धूर डोळ्यांत गेल्याने पाणी वाहून डोळे स्वच्छ होतात.

मंत्रजागर केल्यामुळे घरांत सगळीकडे मांगल्यच मांगल्य पसरते आणि आता आपले काहीही वाईट होणार नाही असे वाटून यजमानाला प्लासिबो इफेक्टचा लाभ होतो.

अध्यात्माच्या आसपासही कधी न फिरकल्यामुळे यापेक्षा जास्त मुद्दे कठीणच आहे. तरी सर्व वाचकांनी यांत मोलाची भर घालून सहकार्य करावे. एक परिपूर्ण लेख झाल्यास, एखाद्या आध्यात्मिक वाहिनीवर तो वाचला जाऊन आपल्या सगळ्यांच्या पुण्यात वाढ होईल.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

थोडंफार जमलं की राव,तिरशिंगराव.बाकी प्रवचनकार इतकी वैज्ञानिक उदाहरणं देतात की आपण चाट पडावं
पॅाझिटिव आणि नेगटिव {सुद्धा} एनर्जी कशी काम करते अध्यात्मात फिट्ट बसवतात.एनर्जीला ऊर्जा म्हणायचं तिचं मूर्त रूप दुर्गा बरंका.पुन्हा ते ओम ॐ आणि ध्वनिची शक्ती तुमच्या उद्धारास कशी जुंपायची तेही सांगता येईल.एक्सरे ,सिटिस्कॅन,तापमापक,होकायंत्र,संगणक,मोबाइल,रेडार वगैरे सर्व यंत्रांना कामाला लावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकडे लावण्याबद्दलही बोललं पाहिजे. तुमचा लकी नंबर काय तत्सम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय सांगतेस तुला माहीत नाही? इंग्रजी ८ आकडा बघ .... बघ बघ कळफलकावर. अंगाश्शी. काय जाणवतं तुझ्या ६थ सेन्स्ला, तुझ्यातील सूक्ष्म सतचित शक्तीला?
बरं चल मीच सांगते.
तरल पातळीवरती - आपल्याला जाणवते की २ प्रतले- अध्यात्मिक आणि भौतिक अकमेकांना जोडलेली आहेत. अर्थात ८ नंबर वाल्या व्यक्ती या दोन्ही प्रतलामध्ये विहार करतात. दोन्ही प्रतलांत मास्टरी मिळवतात.
.
स्थूल पातळीवरती मात्र त्यांना इंग्रजी ८ आकड्याचा शेप असलेली स्त्री आवडते असा घेता येतो.
.
हे सर्व कूट ज्ञान आहे.
___________________
12 आकडा बघ. १=गुरु, २=गुडघ्यावरती शरण आलेला शिष्य. तेव्हा तरल प्रतलावरती या १२ नंबरच्या व्यक्तींना गुरुकृपा होण्याचा अनुभव हा येतोच.
.
हां आता स्थूल प्रतलावरती काही भलताच अर्थ निघत असेल तर तो दोष स्थूलत्वाचा आहे.
हरी ॐ!!!!
____________
6 = हा शुक्राचा नंबर
9 = मंगळाचा नंबर
शुक्र-मंगळ युती ही कामवासना प्रज्वलित करणारी असतेच. ..... 69 आकड्याची महीती आम्ही काय सांगावी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सामान्य माणसांची बुद्धी तोकडी पडते तिथे सनातन प्रभात सुरू होतं.
अध्यात्म, रूढी किंवा आपल्या पूर्वजांची हुशारी चेक करायला इथे जरूर जा - http://www.sanatan.org/mr/

एंजॉय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त हो तिमा तांबे Wink
______
राधा या शब्दाचा उगम मूळात इजिप्शिअन भाषेत आहे. रा म्हणजे सूर्य. धा हा संस्कृत धातू. धा म्हणजे धारण करणे. अर्थात सूर्य्समान तेज धारण केलेली ती वृषभानु कन्या राधा.
कृष्ण म्हणजे तम्/काळेपण्/अंधार. तेव्हा २ सर्वस्वी विरोधी शक्ती या कृष्ण-राधेच्या रुपाने एकत्र येतात. त्यांचे मीलन होते.
असा अर्थ रासक्रीडेमध्ये अभिप्रेत आहे.
____
पण आपण करंटे हे असे गूढ खोल अर्थ समजू शकत नाही.
_________
द्रोपदीवस्त्रहरण तरी काय हो. आत्म्याने फेकून दिलेले एकेक वस्त्र्=जन्म आणि कृष्णाने साक्षात नारायणाने हे जन्म दिले .... पाच पांडव हे पंचेंद्रिये व अंध धृतराष्ट्र म्हणजे भ्रमलेली बुद्धी.
जरुर सनातन प्रभात साईटला भेट द्या अशी सर्व कोडी उमगून येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

द्रोपदीवस्त्रहरण तरी काय हो. आत्म्याने फेकून दिलेले एकेक वस्त्र्=जन्म आणि कृष्णाने साक्षात नारायणाने हे जन्म दिले .... पाच पांडव हे पंचेंद्रिये व अंध धृतराष्ट्र म्हणजे भ्रमलेली बुद्धी.

कमाल! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

राधा या शब्दाचा उगम मूळात इजिप्शिअन भाषेत आहे.

इतकं सगळं बयाजवार सांगूनही इथे मात्र तुम्ही हिटविकेट झालात बघा शुचिमामी. जगातील सर्व भाषांची जननी संस्कृत आहे हे कसे बरे विसरून चालेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रवासाला निघालो की संध्यानंद अथवा सनातन प्रभात पेपर घेतो. झोप चांगली लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0