एका कल्पनेतलं जग

त्या दिवशी रात्री संगीतावर आधारलेला तो चित्रपट अगदी रंगतदार अवस्थेत होता. शाळेच्या आणि शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरची कथा असलेल्या चित्रपटातल्या त्या भागात एकूणच बदललेला काळ आणि त्या काळातली शालेय मुलांची बदललेली अभिरूची दाखवणारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता. नेहमीप्रमाणेच मी चित्रपटाचा अगदी गंभीरपणे आस्वाद घेत होतो आणि तेवढ्यात बदललेली सांगीतिक अभिरूची दर्शवताना पार्श्वभूमीवर एक गाणं वाजू लागलं आणि ते ऐकताच काळजात कुठेतरी लक्कन् हललं. तो प्रसंग आणि चित्रपट पुढे सरकला पण ते गाणं काही माझा पिच्छा सोडत नव्हतं.

मला अत्यंत आवडणार्‍या चित्रपटांपैकी असलेला तो चित्रपट संपला तरीही ते गाणं माझ्याभोवती रुंजी घालतच होतं. चित्रपटात त्याचं एखादं कडवंच ऐकू आलं असलं तरी आता माझ्या मन:पटलावर अथपासून इतिपर्यंत पुन्हा पुन्हा ते वाजत होतं आणि गाण्याच्या प्रत्येक आवर्तनानंतर त्याचा परिणाम अधिकाधिक गडद होत राहिला.

का होऊ नये तसं? ते गाणं माझ्या अत्यंत आवडत्या संगीतकार - गायकाचं होतं. ते लिहिलंही त्यानेच होतं. त्याचे स्वतःचे विचार त्यात टोकदारपणे व्यक्त झालेले. तो अगदी भावविभोर होऊन गात होता. त्याचे त्या गीतातले शब्द एका अशा जगाचं वर्णन करत होते जे त्याने कल्पलं होतं. कसं होतं त्याच्या मनातलं जग?

एक असं जग, जिथे स्वर्ग नाही,
पायाखाली नाही पाताळ आणि डोईवर केवळ आकाश,
जगतोय प्रत्येक माणूस फक्त आजच्यादृष्टीने, आजच्यासाठी.

जिथे कोणतेही वेगवेगळे देश नाहीत,
जिथे मरण नाही नि मारणंही, आणि नाही धर्म,
कल्पा असं जग जिथे माणसाने शांततापूर्वक जगणं हेच कर्म.

तुम्ही म्हणाल की मी स्वप्नाळू आहे,
पण मी एकटा नाही, केव्हातरी तुम्हीही माझ्यात सामील व्हाल,
आणि सार्‍या जगाचा एक विशाल देशच बनलेला पहाल.

बघा, जिथे नसेल कुणाचं स्वामित्व,
नसेल कशाची गरज आणि भूक, नसेल कशाचा लोभ,
बंधुभावाने हे सारे जगच, वाटून घेतील लोक.

तुम्ही म्हणाल की मी स्वप्नाळू आहे,
पण मी एकटा नाही, केव्हातरी तुम्हीही माझ्यात सामील व्हाल,
आणि सार्‍या जगाचा एक विशाल देशच बनलेला पहाल.

गाणं - 'Imagine'
गीतकार - संगीतकार - गायक - सादरकर्ता - जॉन लेनन

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी आपणहून कधीच हे गाणं ऐकायला गेले नसते. पण गाणं सुरेख आहे. त्याची ओळख करून देण्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे माझं अतिशय आवडतं गाणं.

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव देश अन धर्मासाठी प्राण घेतलं हाती

हे रोमांचकारी वाटायचं. आपणही असंच कशासाठीतरी लढावं असं वाटायचं. मोठं झाल्यावर या सगळ्यातला फोलपणा लक्षात यायला लागला. देव, देश आणि धर्म या माणसाने तयार केलेल्या गोष्टी आहेत हे जाणवायला लागलं. यांच्यासाठी मारणं किंवा प्राणार्पण करणं इतक्या या मोठ्या गोष्टी आहेत का? असा प्रश्न पडायला लागला. आणि मग देव, देश आणि धर्म यापैकी काहीच नसलेलं जग कल्पना करायला या गाण्याने सुचवलं.

गाण्याच्या भाषांतरात थोडी धार कमी झाली आहे असं वाटलं. पण उत्तम गाणं सादर केल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मूळ इंग्रजीतील गीतासाठी......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

जॉन लेननचा आवाज आवडतो.

देव, देश आणि धर्म या मानवी संकल्पनाच आहेत याविषयी वाद नाही. पण जरा, व्याधी आणि मरण ह्या अवस्था जर मानवी शरिराला प्राप्तच असतिल तर एका सिद्धार्था प्रमाणे सर्व सोडून जाणे हे तुमच्या आमच्यांसाठी शक्य नाही...
लेननची सदर गाण्यातिल 'इमॅजिन' ही देखील मानवी संकल्पनाच आहे आणि कुणी असे स्वप्नाळू जगत असेल आणि त्यातून आनंद मिळवत असेल तर जरूर.. अर्थात हे विधान धाग्याला अवांतर आहे.

मूळ कल्पनेशी असहमत असले तरी लेननचा आवाज आवड्तो म्हणून गाणे एन्जॉय करणारी...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे अजिबातच माहित नव्हतं. मुळ गाणं आणि भाषांतर दोन्ही आवडलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!