चाय पे चर्चा/ आवळ्याचे तेल देशी/ विदेशी

ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.

चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.

नुकताच अशोक नगर, मध्य प्रदेशला एक नातलगाला भेटायला गेलो होतो. एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली. आपको कोई एतराज ना हो तो "भाई साब सुबह का चाय व नाश्ता हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.

दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर समोर भिंती वर लक्ष गेल. भारत मातेचे मोठे चित्र आणि चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे आहे, हे पाहून तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे. मै भी बचपन में जाता था.

थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे पोह्यांवर पसरविले होते). सोबत गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादी. गप्पांसोबत पोहे आणि शिरा पोटात रिचविला, नंतर गरमागरम आले कडक चहा आला. आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली.

अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे. (वय हि ५५ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हया कडे जाऊन केसं बारीक कापून घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी केली तरच डोक्याला तेल लावतो. त्या तरुणाने डोक्यावरच्या हळू हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप कौनसा तेल लगाते हो? आता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारले, आवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु आहेत. शिकलेले आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतात? त्याचे बोलणे ऐकून मी अक्षरश: हादरलोच. पुन्हा समोर भिंती वर भारत मातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स कडे हि. मनात म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा हि....

आता चहावर इतक्या प्रेमाने का बोलविले आहे हे कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची ओळख करून द्यायला सुरुवात केली. एमवेचे प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचे, वनस्पती आणि natural पदार्थांपासून बनविलेले असतात. कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक व्यापारी, दुकानदार इत्यादि लोकांना दिले जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते. (त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे) एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही (हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन कंपन्याचे विज्ञापन टीवी वर येतात) . लाखो कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.

थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. हे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार आला एक तर अमेरिकन कंपनी, ती हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के). १० रुपयाची वस्तू १०० शंभर रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.

हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पू, शेविंग क्रीम, साबण इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण सदस्य बनू शकतात. एमवे आंवला तेलाची बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल. याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच आहे अर्थात २००ml, ८० रुपये. मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी काय? त्याने बाटलीवर लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल ऑइल (तीळ, खोबर्याचे, ओलिव ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे .... तेल असावे), मिनिरल तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता थबकला. त्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते हि निकृष्ट निघाले असते तर त्याचे मानसिक समाधान झाले असते. दुकानात येऊन त्याने आंवला ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते). निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता. मासा गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला चर्चेचा योग्य परिणाम साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे 'विज्ञापन' फुकट गेले.

मनात एकच विचार आला, आपल्या देश्यात सुशिक्षित उच्च वर्ग, बिना विचार करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू वापरण्यात स्वत:ला धन्य मानू लागले आहे. दीड रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी ७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने किमान नुकसान तरी होणार नाही).असो .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

छान, खुसखुशीत किस्सा.

अॅमवेने इतर काही केलं नसेल तरी अनेक लोकांना असा चहा-नाश्ता मिळवून दिला असेल. समाजातल्या लोकांना एकमेकांबरोबर मैत्री करण्यासाठी उद्युक्त करणं ही काही कमी गोष्ट नाही. त्यासाठीतरी अॅमवेची प्रॉडक्टं घ्यावीत. बिचारे अॅमवेचे एजंट सतत फिरत - याला चहा-नाश्ता देता येईल, त्याला देता येईल असे लोक शोधत असतात. परोपकाराची अशी आस केवळ अॅमवेच निर्माण करू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाजातल्या लोकांना एकमेकांबरोबर मैत्री करण्यासाठी उद्युक्त करणं ही काही कमी गोष्ट नाही

अ‍ॅमवे मुळे असलेली मैत्री तुटते असे ऐकुन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाट लावलीत ना माझ्या तिरकस विनोदाची?!?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक पिरॅमिड स्किम वाला मुसलमान मनुष्य आमच्या शेजारी रहात असे. तो पाकिस्तानचा होता. त्याच्या अ‍ॅमवेच्या धंद्यामुळेच आमची बळजबरीने ओळख झालेली होती. आम्ही कधी प्रॉडक्ट विकत घेतले नाही परंतु एक "सोशल इन्टरॅक्शन" व्हावी या दृष्टीने आम्ही त्याला घरी चहा-फराळासाठी बोलवत असू. अर्थात त्याने ना आम्हाला कधी बोलावलं ना ते आम्हाला कधी खटकलं. पण तो मात्र आमंत्रण स्वीकारुन पाहुणचार झोडून अन तीच अ‍ॅमवे ची कटकट लावून जात असे. कारण हे लोक झपाटलेले असतात त्यांना स्वतःच्या पिरॅमिड धंद्याशिवाय काहीही दिसत नसते आणि फक्त मिल्योनेअर होण्याची स्वप्ने असे लोक बघत असतात.
हा मनुष्य सडा होता. त्याने आम्हाला काही फरक ना पडला ना पडण्याचे कारण होते.
.
मात्र एकदा त्याचे लग्न झाले. आणि हे दोघं सोसायटीत जोडीने दिसू लागले. पण हा आता नजरेला नजरच देइना. अक्षरक्षः टाळायला लागला. काही पुरुष बायकोच्या बाबतीत एवढे कसे असुरक्षित असतात? अर्थात ती बुरख्यातच असायची. मी मनात म्हटलं ब्याद तर गेलीच पण एक उत्तम धडा शिकायला मिळाला.
.
आपण सरळ असलो की वाटतं प्रत्येकजण सरळ असेल. पण तसं नसतं. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे, संस्कारांचे, नीतीमत्तेचे, मानसिकतेचे लोक वेगवेगळे वागतात. अर्थात या गोष्टीचा अर्थ, प्रत्येक पाकिस्तानी असाच असेल असे नाही.
.
मग मी त्याच्या धर्माचा/देशाचा उल्लेख का टाळला नाही? काय फरक पडला असता जर टाळला असता तर? त्याला माझे उत्तर हे की नाही टाळला तरी काय फरक पडतो?
_________
पटाईतजींचा किस्सा आवडला. त्यांच्याकडे एकापेक्षा एक मजेदार किस्से तर आहेतच पण सांगण्याची हातोटीही विलक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशजी आणि शुची ताई दोघांना धन्यवाद.

मध्यप्रदेशातील अशोक नगर हळू हळू समृद्धी कडे वळतो आहे, स्वत:ला इतरांपासून वेगळे दाखविण्यासाठी नव मध्यमवर्ग विदेशी वस्तू जास्ती वापरू लागला आहे, कुठला हि विचार न करता. विदेशी ब्रांडच्या वस्तू घेताना आपण काय विकत घेतो आहे, हे वाचण्याचे कष्ट कुणी करीत नाही. शिवाय आपल्याला काही पैसा हि कमविता येईल हि अशा हि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0