कहाणी गृहचंडीकेची

ऐक गृहचंडीके तुझी कहाणी.
.
एक आटपाट नगर होतं. या नगरात नातीवर अतिप्रेम करणारी सासू आणि rebellious टीनेजर मुलगी यांच्या तडाख्यात सापडलेली एक गरीब गाय रहात होती. टीनएजर मुलीच्या ऊठसूठच्या eye-rolling आणि उलट दुरुत्तरांनी ती अतिशय त्रासली होती. ती अशीच एकदा हापीसातून, ऐसीवरती पडीक असताना, आपल्या प्रिय मैत्रिणीच्या खवत डोकावली. तिथे कोणीही विचारलेले नसतानाही नेहमीप्रमाणे तिने तिच्या त्रासाचे गाणे गायले.
.
खवची मालकिण दुसर्‍या दिवशी लॉग इन झाली. तिला गरीब गायीची व्यथा लक्षात आली आणि आपल्या मैत्रिणीचे दु:खनिवारण करण्या करीता व स्वतःची खव परत परत फ्लड होऊ नये या उदात्त हेतूने प्रेरित होऊनतिने गायीला गृहचंडीकेचे व्रत सांगीतले.
.
बाई बाई येत्या शुक्रवारच्या पे-डे पासून तू हे गृहचंडीकेचे व्रत मनोभावे कर. शुक्रवार असल्याने सारा दिवस यथेच्छ कॉफी प्यावी, ऐसीवरती मेगाबायटी प्रतिसाद टंकावे, जमल्यास धागे प्रसवावे मात्र संध्याकाळी घरी गेल्यावरती "हुश्श! किती दमले गं बाई" म्हणून खुशाल तंगड्या ताणून बसून रहावे. पसारा मी-मी म्हणेल, त्याला म्हणू द्यावे. सासू कानीकपाळी ओरडेल, स्वयंपाक करावा म्हणून टुमणे मागे लावेल, तू साफ दुर्लक्ष करावे. मुलगी पोहून आल्या आल्या भूक-भूक म्हणून त्राही माम करुन सोडेल पण तू ढिम्म हलू नये. तिला स्वतः करुन घे नाहीतर सिरीअल खा सांगून खुशाल यु-ट्युबवर गाणी लावून बसावे.
.
रात्री मुलगी नेहमीप्रमाणे दुसर्‍या दिवशीच्या अर्थात शनिवारच्या मैत्रिणींबरोबरच्या नाईट-आऊट विषयी भुंगा लावेल, तिला तू बधू नये. ती चेहरा कमालीचा रडवेला करुन इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल पण तू तुझे लोण्यासारखे वितळणारे, हृदय काबूत ठेवावे. थोड्याच वेळात सासूदेखील, मुलीची बाजू घेऊन तुझ्यावरती प्रेशर टाकण्याचे नेहमीचे तंत्र अवलंबेल पण तू कानाला लावलेले हेडफोन दूर करु नये.
.
रात्र झाल्यावर सासू तुला पंगतीस बोलावण्यास विसरेल, मुलगी तर तू गुन्हेगार असल्यासारखी तुझ्याशी वागेल पण तू गिल्टी वाटून न घेता, निर्लज्जपणे सासूने रांधलेल्या पदार्थांचा मिटक्या मारत समाचार घ्यावा. रात्री ८ नंतर मुलगी नेहमीप्रमाणे, अभ्यास सोडून एका मॉनिटरवर स्काइपवर मैत्रिणीशी गप्पा तर त्याच वेळी दुसर्‍या मॉनिटरवर माईन क्राफ्ट खेळत बसेल, तू नेहमीप्रमाणे करवदून तुझा रक्तदाब वाढविण्याऐवजी, कॉप्युटर सरळ टर्न ऑफ करुन टाकावा. मुलीने जास्त अकांडतांडव केले तर पॉकेटमनी बंद करुन त्या जागी ऊठता लाथ-बसता बुक्की खुराक चालू करेन अशी तिला धमकी द्यावी. तिच्या दुप्पट eye-rolling करुन दाखवावे. मुलीला तिची खोली , कपाट आवरावयास सांगावे, ऐकले नाही तर ... एकंदर जिस्ट तुझ्या लक्षात आला असेलच. ऐक असे १६ शुक्रवार झाले की उद्यापन म्हणून स्वतःला पॅम्पर करावे, मनमुराद शॉपिंग करुन नवर्‍याचा खिसा हलका करावा. स्पामध्ये जाऊन पेडे-मॅनी वगैरे हवे ते चोचले पुरवावे. मुख्य म्हणजे घरात मग्रुर व बेफिकीर रहावे.
.
गरीब गाय मनाशी निश्चय करुन घरी आली. आल्या शुक्रवारपासून तिने गृहचंडीकेचे व्रत बिनचूक सुरु केले.प्रथम घरात हलकल्लोळ उडाला, घरचे हबकले, रागावले, गायीच्या उर्मटपणावर स्तंभित झाले पण करतात काय, सांगतात कुणाला...हळूहळू घराची घडी परत बसली. अहो आश्चर्य टीनेजर मुलगी अर्ध्या वचनात राहू लागली, सिन्सियरली अभ्यास करु लागली. मुख्य म्हणजे eye-rolling आणि उलट दुरुत्तरे बंद झाली. उलट आपल्या कणखर मातेचा तिला अभिमानच वाटू लागला.
.
मग मात्र गायीने सासू व मुलगी दोघींना क्षमा केले, व हृदयाशी धरले. गृहचंडीकेने जसे तिला समर्थ करुन आनंदी केले तसे तुम्हा आम्हा करो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा!

पोरांशी वागताना आपण दुप्पट बालिशपणा करण्याचा प्रकार फारच आवडला. शरीराने वाढलेल्या बालकांवर ही मात्रा लागू पडेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चला आता समद्यांनी फुलं टाका. पंचामृतानं देविच्या मुर्तीवर अभिषेक करा. निरंजनावर हात फिरवुन डोक्यावर ठेवा. देव्हाऱ्यात उदबत्ती लावा. आणि मनोभावे टाळ्याच्या गजरात देवीची आरती सुरु करा.
"जयदेव जयदेव ......................."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवीची आरती सुरु करा.
"जयदेव जयदेव ......................."

देवीची आरती जयदेव कशी काय? जयदेवी असायला पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कहाणी आवडली ! पण १६ शुक्रवार जरा जास्तच आहे. आजच्या इन्संट जमान्यात ३-४ शुक्रवारात अपेक्षीत फळ मिळेल. १६ शुक्रवारपर्यंत व्रत ताणले तर कदाचित शेजारच्यांची पण पोरं सुधरुन जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन बायबलात "शेजारची पोरं सुधरवा" असंही लिहिता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वळूने कसंही उंडारलं तरी चालवून घेतात पण गरीब गायीने मारकुटे झालेलं सहन होत नाही.घराघरांत माइक्रोलेवलला कमर्शल वाटाघाटी चालत असतात.त्या मानसिक पातळीवर असतात.तो असा वागला की आपण तसं वागायचं वगैरे.गृहचंडिकेचाच अवतार धारण करण्याअगोदरच लॅागरिदमिक उतार चालू करायचा.आज दहा टक्के कमी गरीबगायपणा केला उद्या ९० च्या दहा टक्के.परवा ८१ च्या दहा टक्के याप्रमाणे.हा उतारा लागू पडेल आणि फार बॅकफाइअर होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी पिच्चर "आत्मविश्वास " पाहिलाय का ?
सचिन,अशोक सराफ,सुनील बर्वे आहेत. पण प्रमुख भूमिका एका स्त्री पात्राची आहे.
नाना पाटेकरच्या पत्नीने ती भूमिका केलेली आहे. जबरदस्त पिच्चर आहे.
"गरिबगायछाप" भूमिकांचं स्तोम मराठीत असतानाच्या काळातला शिनुमा आहे.
बारावीला इंग्लिशमध्ये एक धडा होता; तोही ऑल्मोस्ट ह्या कथेच्याच धाटणीचा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाना पाटेकरच्या पत्नीने ती भूमिका केलेली आहे.

नीलकांती पाटेकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

हे मसत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा आयडी मी रवेळरवंडोबा(र-वे-ळ-र-वं-डो-बा) असा वाचला आणि फुटलोच राव!
असचं दिसतय स्क्रिनवर..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय तसाच घेतलाय त्यांनी Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माखाडी सारवर रवातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख २० एक वर्षाआधी वाचला असता तर काही प्रेरणा घेतली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

My baby's growin' up
She think's she's fallin' all in love
And that I hate her
At seventeen, she's just like me when I was seventeen
So I don't blame her
.
We're always wrong, their always right
We use to be the one's breakin' the rules
Now we're just mothers, we're just fathers of
Teenage Daughters
.
She rolls her eye's when I'm funny
But she's sweet when she wants money and her freedom
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता नेमकी आहे. असे असले तरी ज्या त्या वयात तसे वागलेच पाहिजे, नायतर फक्त आणि फक्त समंजसपणा दाखवला की बाकीचे उंडारायला मोकळे होतात. ती मोकळीक द्यायला नको म्हणून थोडे उपद्रवमूल्य दाखवलेच पाहिजे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा खरं आहे. ऐकून प्रतिसादल्याबद्दल धन्यवादस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0