"वाचा लेको" ऐसीवर टंकुन.
"ऊठ बाबा, चुलीतली राख घीऊन दात घास" जख्खड म्हातारी, आज्जी कुठली.
"बग माजा कसा भिंगतुय!" सकाळपारी भोवरा फिरवायचा रोजचा पराक्रम.
"आये, मी न्हाय जाणार साळंला" खाकी चड्डी पाढरा शर्ट. शेंबुड पुसणारा गबाळा अवतार.
"चल रै भावड्या, कालची गणितं सोडवलीका?" दोन वेण्या घातलेली थोरली बहीण. गुडीगुडी.
"तायं, मला गाभुळ्या चिच्चा दि की काढुन" वाटेतल्या झाडाकडे अंगुलीनिर्देश करत.
" पाटीवर बदकाचे चित्र काढा" फळ्यावर छडी ठेवत मास्तरीण. ढबरी.
"चौघडे वाजले .......सुरवंटराव उदास झाले.......सोनुताई सोनुताई..." एका सुरात अख्खा वर्ग.
"आज डब्यात शिरा आणलायं" बोरीच्या झाडाखाली पंगत.
"सरयं बाजुला, मला ध्वु दी आधी" बारकुल्या तोटीवर डबे धुवायला गर्दीच गर्दी. तिच्यात मुसंडी मारत.
"पुं..गी .. कु..णाची.." आतल्या गड्यांना औट करायच्या नादात. रिंगणाबाहेर फिरत फिरत.
"सुकडी घ्या रे" शाळा सुटण्याची चाहुल. डबे काढुन तयार.
"ये आता तुज्यावर राज्य, यी शिवायला" परतीच्या वाटेवर शिवनापाणी.
"आयं, म्या चाल्लु खेळायला" दारातुन दप्तर घरात भिरकावत बाहेरच्या बाहेर सुसाट.
"मलाबी घ्या रै" आता लौंपाट खेळाय मजा येणार.
"आज्जे, राकीसाची गोष्ट सांगकी" निद्रादेवीच्या कुशीत शिरत. मायेची ऊब पांघरत.
हाहाहा ओह नो!!!
=)) हाहाहा ओह नो!!!
___
बरय मग आम्ही (मी) मानभावीपणे म्हणू - सारखा तोच्च तोच्च विषय काय गडे? ;)
____
बाय द वे लहानपणी पाहुण्यांकडे गेल्यावरती कोणी जर खाण्याचं विचारलं तर नाही म्हणायचं असं आई-बाबांनी शिकवलं होतं. पण माझ्याच्याने कधीही खोट्ट खोट्ट मानभावी नाही म्हणवलच नाही. ;)
च्यायला जिकडेतिकडे प्रांजळपणा नडतो.
झकास, एक जुनी आठवण ताजी
झकास, एक जुनी आठवण ताजी झाली. खुर्चीवर बसून मास्तर डुलक्या घ्यायचा आणि आमच्यासारखी उनाड मुले वर्गात कंचे खेळायची. आवाज वाढला कि मास्तरांची झोप मोड व्हायची आणि आमचे तळहात लाल व्हायचे.