Skip to main content

आज पुन्हा प्रकाशित करतोय -- खरडफळ्याची वेडसर वळणं!

*************************सहभागी कलाकाराम्ची परवानगी घेउन धागा पुनः प्रकाशित करत आहे************************************
****अर्थात गवि, चिंज ह्यांनी नुसतच कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा काही टिप्पणी करायची सूचना केली होती, ते मात्र जमलं नाही बराच विचार करुनही. त्यामुळे तस प्रकाशित करतोय.******

प्रमुख सहभागी कलाकार :-
घनु,बॅटमॅन, मनोबा,अनु राव, मेघना, अनुप ढेरे,विक्षिप्त अदिती, चिंज ,गवि
बोलताना कुठून कोणता विषय कुणीकडं जाइल ह्याचा नेम नसतो. म्हणजे आपण सुरु करतो एक विषय; त्यातून दुसरा उलगडत जातो; दुसर्‍यातून तिसरा.
दोस्ती-यारी, भांडण-तंटे, देणी-घेणी-व्यवहार... अशा विविध प्रकारच्या संवादात हे खूपदा नकळतपणे होतं.
(भांडणाचा सुरुवातीचा विषय किरकोळ.... अगदिच वेगळा, आणि तो बदलत बदलत जाउन शेवटी एकदम पार तुझा बा- तुझी माय वगैरेपर्यंत जातो.)
तर कधी दोस्तांच्या गप्पांमध्येही सुरुवातीला एखादा पाचकळ ज्योक, त्यातून दुसरा, दुसर्‍यातून तिसरा भन्नाट्/धम्माल किस्सा अशी लिंक लागत जाते.
फक्त ह्याची मोजदाद आपण मुद्दाम वेगळी अशी ठेवत नाही.
आता इतकं तीव्र वगैरे काही नाही; पण विषय कसे बदलत जातात; ह्याचं एक गमतीशीर उदाहरण खरडफळ्यावरुन उचलतोय.
सुरुवात झाली खान्देशातली 'कळणा' प्रकारातली भाकरी, तिथपासून ते अस्वच्छ हाटेल, टंच माल चिकण्या मुली, काही मुलींची लैंगिकता(लेस्बियन वगैरे) ते अगदि थेट कोणत्या(गिय्रच्या की बिनगियरच्या) गाड्या चांगल्या.. इथपर्यंत चर्चा येउन भिडली. थोडा प्रयत्न केला असता तर ओबामा-पुतीन-मोदी इथपासून ते "स्वयंपाकात काचेची भांडी बरी की फायबरची " किंवा समुद्राखाली खोल दोन चार हजार मीटारवरील जीवनवैविध्य इथपर्यंतही विषय गेला असता.
हे सर्व ज्ञानाम्रुत, बोधामृत, जीवनाचं सार, ज्ञानप्रकाश्,केवलज्ञान, अ‍ॅब्सोल्यूट ब्लिस्/ट्रुथ वगैरेपासून खरडफळा न वाचणारे अनभिज्ञ राहू नयेत; म्हणून ह्या वळणांशी संबंधित खरडफळ्यावरील संवाद एकत्र करुन इथे टाकतो आहे.
कोणत्याही वळणावर तुम्ही ह्या धाग्याची वाचक मंडळीही जॉइन तुमच्या प्रतिसादातून किंवा तुम्ही तिथून फाटे फोडू शकता.
तर फाटे फोडायला सोपं जावं, धुळवडीला संधी मिळावी म्हणून हा खफसंवाद :-
.
.
घनु
बुधवार, 23/09/2015 - 15:09
खानदेशात कळण्याची भाकरी हा वर्ल्ड-फेमस प्रकार आहे. हिवाळ्यात तर हमखास ह्या भाकरी होतातच होतात. (एकदा खानदेशी खाद्यपदार्थांविषयी धागा काढावाच म्हणतो, पाकृसहीत)
.
.
बॅटमॅन
बुधवार, 23/09/2015 - 15:11
धागा काढ अन पुण्यात खान्देशी पदार्थ मिळणारे एखादे चांगलेसे हाटेल कुठेशीक असले तर तेही सांग.
.
.
घनु
बुधवार, 23/09/2015 - 15:15

पुण्यात खान्देशी पदार्थ मिळणारे एखादे चांगलेसे हाटेल कुठेशीक असले तर तेही सांग.

फार पुर्वी एक दशभुजा गणपती जवळ होतं चागलं खान्देशी हाटेल. काल परवाच कोथरूड डेपोत ही पाहिलं एक (भारती नगर जवळ). पण पुण्यात कधीच गेलो नाहीये कुठल्याच खान्देशी हाटेलात. खान्देशी मित्रांकडून काही समजलं तर आवर्जून कळवतो तुला.
.
.
अनु राव
बुधवार, 23/09/2015 - 15:17

फार पुर्वी एक दशभुजा गणपती जवळ होतं चागलं खान्देशी हाटेल.

त्याची पाटी अजुनही दिसते. पण एकुणात स्वरुप असे आहे की आत जावेसे वाटत नाही.
.
.
मन१
बुधवार, 23/09/2015 - 16:07
होय. "कळणा" प्रकार कैकदा खाल्ल्लेला आहे. मस्त लागतो.
खान्देशी हाटेल कोथ्रुड डेपो ज्वळ आहे. तिथे गेलो आहे.
वनाज कंपनीकडून डेपोकडे जाताना मुख्य रस्त्यावरच उजव्या हाताला आहे.
चव चांगली. आवडली. टपरीछाप दिसतं दिसायला.
सोबत टकाटक टंच माल स्टाइल आयटीवाल्या मुली असतील; तर आत जाउ नये.
विचित्र वाटेल. अदरवाइज जाण्यास हरकत नसावी.
औम्ध परिसरात अजून एक आहे; स्पायसर कॉलेजच्या मागून जुन्या सांगवीत जाताना पेट्रोल पंपाच्या समोर.
मला दोन्ही ठिकाणे आवडली.
पण औंधवाल्याचा मेन्यू विचित्र आहे.
अमुक दिवशी अमुक एक दोन पदार्थच त्याच्याकडे असतात.
तेव्हा तिथे काही "टेस्ट" करायचे असेल; तर दोन तीनदा चक्कर मारणे श्रेयस्कर...वेगवेगळ्या दिवशी.
खान्देशी हाटेल आहे एक औंध परिसरात.
.
.

अनु राव
बुधवार, 23/09/2015 - 16:52

सोबत टकाटक टंच माल स्टाइल आयटीवाल्या मुली असतील; तर आत जाउ नये.
विचित्र वाटेल.

मनोबा, तुमच्या ह्या वाक्यांवरुन बरेच प्रश्न आले मनात
१. नक्की कोणाला विचित्र वाटेल, हॉटेल मधल्या गिर्‍हाईकांना? हॉटेल मालकाला? वेटर्स ना? का रस्त्यावरुन तुम्हाला आत जाताना बघणार्‍या?
२. टकाटक टंच माल स्टाइल ( काय काय टंकावे लागते आजकाल Sad ) मुली आहेत पण आयटी मधल्या नाहीत तर आत गेले तर चालेल का?
३. मुली आयटी मधल्या आहेत पण टकाटक टंच माल स्टाइल नाहीत, तर चालेल का?
४. माझ्या सारख्या मध्यमवयीन बाईने नवर्‍या किवा दुसर्‍या पुरुषा बरोबर ह्या हॉटेल ला गेले तर नक्की कोणाला विचित्र वाटेल?
अजुन बरेच, पण टायपायचा कंटाळा आला
.
.
मन१
बुधवार, 23/09/2015 - 17:02
टकाटक टंच माल स्टाइल मुली
मुलींना असे ठिकाण न आवडण्याची फारच जास्त शक्यता आहे. त्यांना उच्चभ्रूंच्या जागा अधिक बर्‍या(त्या क्याटेगरीतही काही चांगली हाटेले शोधल्यास सापदू शकतातच) आणि त्या उगीच सगळ्यांसमोर थेट मोठ्याने काही म्हणाल्या तर जरा अवघडल्यासारखे होइल.
.
.
म्हणजे उच्चवर्गातील स्त्री वर्ग असे मी म्हणू इच्छितो. नॉन-उच्च वर्गातील कुणीही जाउ शकते. आणी उच्च वर्गातील पुरुषही एखाद वेळी अशा ठिकाणी जाउ शकतात.
(साधारणतः व्हल्गर,बटाबटित पिच्चरला किम्वा अस्वच्छ ठिकाणी बायामाणसांना आपण नेत नाही; त्यांना ते आवडणार नाही म्हणून.)
नेमकं उदाहरण सापडणं कठिणे.
.
.
मेघना भुस्कुटे
बुधवार, 23/09/2015 - 17:31
अनु राव यांच्या प्रतिसादाकरता टाळ्या.
बायामाणसांबद्दलच्या जनरलीकरणासाठी मनोबांचा निषेध.
.
.
गवि
बुधवार, 23/09/2015 - 17:50
टकाटक टंच माल स्टाइल आयटीवाल्या मुली असतील; तर आत जाउ नये.
यावरुन "फक्त ऑफिसर्स आणि सभ्य गृहस्थ यांना प्रवेश" आठवला. (डोळा मारत)
.
.
बॅटमॅन
बुधवार, 23/09/2015 - 18:25
जनरलायझेशनचा निषेध असे म्हणायची फ्याषण आहे आजकाल. मात्र त्यापलीकडे जाऊन पाहिलं तर मनोबा काय चुकीचं बोलला तेवढे सांगा कुणीतरी.
.
.
मन
बुधवार, 23/09/2015 - 21:54
@अनुराव :-

१. नक्की कोणाला विचित्र वाटेल, हॉटेल मधल्या गिर्‍हाईकांना? हॉटेल मालकाला? वेटर्स ना? का रस्त्यावरुन तुम्हाला आत जाताना बघणार्‍या?

-- त्या बायकांनाच विचित्र वाटेल. त्यांचं ब्याकग्राउंद लक्षात घेता; अशा वातावरणात त्यांना कितपत रस असेल ह्याबद्दल शंकाच आहे.
(अहो आमच्या एरियात एक सेमिस्लम म्हणता यावी अशी वस्ती आहे. तिथे कधीकधी जावं लागतं कामासाठी. जवळची पीठगिरणी बंद असेल तर तिकडे जी आहे; तिकडे जाउन आम्ही दळून आनतो. पण माझी पत्नी तिकडे जाण्यास नाखुश असते गलिच्छ वस्तीमुळे. मलाही तिनं जावं असं वाटत नाही. अदरवाइज घरकामात मी आळशी नि ती कामसू असं चित्र आहे. पण हा मुद्दा आला की मी शक्यतो माझे नखरे,आलस्,कंटाळा बाजूला ठेवून चटकन निघतो; तिचं काम सोपं व्हावं म्हणून.)
आमच्याकडे काम करणार्या मावशी त्या वस्तीच्या जवळच राहतात. त्या बिनदिक्कत जा-ये करतात. पण माझ्या पत्नीनं तिकडं जावं असं मला किम्वा माझ्या पत्नीलाही वाटत नाही. तर सांगायचं म्हणजे जी गोष्ट वस्तीची तीच त्या हाटेलाची. टपरीछाप हाटेल आहे. अशा ठिकाणी बायामाणसांना येणं आवडण्याची शक्यता कमीच असते.
म्हणजे टक्केवारीनुसार पहायचं तर जितक्या टक्के मुलींना गियरवाली बाइक चालवण्यात रस असतो(अगदिच थोड्या) तितक्याच टक्के मुलींना अशा टपरीछाप हाटेलात यायला संकोच वाटत नाही. आता "टक्केवारीनुसार मुली गियरवाल्या बाइक कमी चालवतात " ह्याला तर जनरलायझेशन नका म्हणू यार.
जब वी मेट पिच्चर मध्ये एक डायलॉग आहे .
"हो सक्ता है बड्डे शहरवालों की तरह मै स्मार्ट नही हूं. मगर आखें है मेरी. देख सकता हूं."
तसच आहे हे. ज्या गोष्टी सरळ दिसतात त्याचा विदा मागणं किंवा त्याला जनरलायझेशन म्हण्णं ह्यातलं कुणी कै करणार नै अशी आशा आहे.

२. टकाटक टंच माल स्टाइल ( काय काय टंकावे लागते आजकाल Sad ) मुली आहेत पण आयटी मधल्या नाहीत तर आत गेले तर चालेल का?

नको. त्यांनाही आवडण्याची शक्यता कमीच.
.
.

३. मुली आयटी मधल्या आहेत पण टकाटक टंच माल स्टाइल नाहीत, तर चालेल का?

हो. एखादेवेळेस चालेल. त्या नॉर्मल मुली असतात ना; तशा मुलींना चालू शकेल. म्हणजे आपल्या मस्त ग्रुपमध्ये एखादी मैत्रिण वगैरे असते ना; तर तिने आलं तर कै हरकत नै. अशा नॉर्मल मुली आलेल्या आहेत की.

४. माझ्या सारख्या मध्यमवयीन बाईने नवर्‍या किवा दुसर्‍या पुरुषा बरोबर ह्या हॉटेल ला गेले तर नक्की कोणाला विचित्र वाटेल?

मला ब्याकग्राउंद माहित नाही. तुमचं हाय-फाय ब्याक्ग्राउंड असेल तर तुम्हाला हे आवडण्याची शक्यता फार कमी आहे.
"रोड साइद ईटारी" न आवडणारा एक मोठा उच्चभ्रू वर्ग आहे. त्यात तुम्ही असाल तर अशा ठिकाणी न गेलेलं बरं.
तुम्ही ती रजत कपूरची जाहिरात पाहिलित का ? तो कोनत्या तरी कारची जाहिरात करतो. त्यात एक प्रसं ग आहे.
त्याची बायको त्याला म्हणते "कार इज कार. कोइ भी लिया तो क्या फर्क पडता है." (इतकी भारीवाली कशाला घ्यायची कार ? काय सोनं लागून गेलय का , ह्या अर्थाने). तो म्हणतो; ठीकय तुझं म्हण्णं. चल जाउन चहा किंवा कॉफी पिउया का ? ती हो म्हणते. ते मस्त कॅफेच्या शोधात निघतात(सीसीडी वगैरे स्टाइल व्यवस्थित पॉश जागेच्या शोधात). पण अचानक तो कडेला कार थांबवतो एका रस्त्यावरच्या चहाच्या गाअडीवाल्यासमोर. ती लागलिच तोंड वेंगाडून म्हणते "इइइ यहां ? ये चाय ???"
तो मिश्किल हसून म्हणतो "सो व्हॉट ? टी इज टी! (जस्त लाइक कार इज कार)"
तर अशा मुलींना कशाला यायला आवडेल अशा ठिकाणी ?
म्हणून म्हटलं की उगीच बोअवून त्यांना आणि आपल्याला त्रास कशाला ?
ते एका वेगळ्या विश्वातले लोक आहेत; त्यांच्या फ्रेम्स वेगळ्या आहेत.
.
.

अनु राव यांच्या प्रतिसादाकरता टाळ्या.
बायामाणसांबद्दलच्या जनरलीकरणासाठी मनोबांचा निषेध.

मी नेमकं काय जनरलीकरण केलं हो ?
.
.
मेघना भुस्कुटे
गुरुवार, 24/09/2015 - 09:15
मुलींना अमकं आवडत नाही, तमकं चालत नाही - असं म्हणून तुम्ही - तुम्ही लोक त्यांच्याकडून विशिष्ट अपेक्षा तयार करता. निषेध. घोर निषेध.
.
.
मन
गुरुवार, 24/09/2015 - 10:19

मुलींना अमकं आवडत नाही, तमकं चालत नाही - असं म्हणून तुम्ही - तुम्ही लोक त्यांच्याकडून विशिष्ट अपेक्षा तयार करता. निषेध. घोर निषेध.

जे पाहण्यात येतं ते बोलतो. बोलायचंही नै का ?
" आपल्याकडे मुली दारु पीत नैत" ह्या वाक्यालाही जनरलायझेशन म्हण्णार का ?
माझ्या अनुभवविश्वानुसार हे सरसकटीकरण नाही. हे खरच आहे. पिणार्‍या मुली हा अपवाद आहेत.
आणि जो तो आपापल्या अनुब हवविश्वानुसारच लिहिणार ना.
दरवेळी मी लिहिलेलं वाक्य हाय सोसायटीमधले लोक, किम्वा अगदिच हलाखीची परिस्थिती असलेले लोक, अर्ध शिक्शित जनता, झोपडपट्टीसारख्या वस्त्यांमध्ये रहावे लागणारे लोक...अशा सगळ्या सगळ्या लोकांना ध्यानात घेउन, मग मोजून मापूनच का लिहायचं ?
ऑलरेडी मी म्हणतो आहे; त्याला काहीएक संदर्भ आहेच ना. माझ्या स्वतःच्या निम्नमध्यमवर्गीय असण्याचा तो संदर्भ आहे.
दरवेळी डिस्क्लेमर म्हणून का टाकावेत; किंवा वाक्ये ब्यालन्स्ड का असावीत ?
" गणपती-दहीहंडीत गर्दीत जायला नको वाटतं. पुरुष अंगाला झटतात्/खेटतात लोचटपणे" असं म्हण्णार्या मुली मला ठौक आहेत.
आता मी काही दरवेळी त्यांना "काही" पुरुश अंगाला खेटतात; काही चाम्गलेही असतात; अशी दुरुस्ती करायला सांगत जाउ का ?
समोरचा काय बोलतो आहे, त्याचा भावार्थ कळल्याशी मतलब असावा ना राव.
त्या वैतागून असं म्हणतात; तेव्हा त्यांना काय म्हणायचय ते आम्हाला समजलेलं असतं; आम्ही दुरुस्तीचा आग्रह धरत नाही.
जोवर हानी होत नाही; तोवर हरकत काये ?(ज्यू हरामी असतात; त्यांना जिवंत जाळा; हे वाक्य जनरलायझेशन व अगदिच धोकादायक आहे; हे मान्य. पण "दलितांमध्ये शिक्षणाचं प्रमाण आणि सरकारातलं प्रतिनिधित्व कमी आहे " असं आपण म्हणतो तेव्हा ते सरसकटीकरण नसतं ना. संदर्भ, भावार्थ समजून घ्या ना राव. भाषा ही भाषा असते. दरवेळी गणिताइतकं काटेकोर राहिलं तर काहीतरी जिवंतपणा राहिला का त्यात?)
.
.
.
अनु राव
गुरुवार, 24/09/2015 - 10:28
मनोबा, आधी तुम्ही टकाटक टंच माल स्टाइल मुलींबद्दल मत लिहीले होते, मी प्रश्न पण फक्त टकाटक टंच माल स्टाइल मुलींबद्दल च विचारले होते. मग तुम्ही उत्तर देताना एकदम जनरल उच्च्वर्गीय बायकांबद्दल लिहीले.
आता तर तुम्ही हे लिहुन एकदम सिक्सर च हाणली आहे.

त्या नॉर्मल मुली असतात ना; तशा मुलींना चालू शकेल. म्हणजे आपल्या मस्त ग्रुपमध्ये एखादी मैत्रिण वगैरे असते ना; तर तिने आलं तर कै हरकत नै. अशा नॉर्मल मुली आलेल्या आहेत की.

म्हणजे काय?
१. तुमच्या मते "टकाटक टंच माल स्टाइल" मुली नॉर्मल नसतात का? मुळात असे प्रोफायलिंग करणे बरोबर आहे का?
२. टपरी छाप हॉटेल मधे मुलीने यायची तयारी दाखवणे हे(च) तिच्या नॉर्मल असण्याचे लक्षण आहे का?
३. जी मुलगी "टकाटक टंच माल स्टाइल" नाही, तिने टपरी छाप हॉटेल मधे येण्याबद्दल तक्रार करु नये कारण तिला तो हक्क नाही.
३. शाररीक गुण-अवगुणांवर आणि टकाटक( ? ) रहाण्याच्या कोणा मुलीच्या आवडीनिवडीवर तुम्ही ती नॉर्मल आहे की नाही असे ठरवता का?
.
.
मन
गुरुवार, 24/09/2015 - 10:30
अनुराव, मेघना,
ही सरसकटीकरणवाली चर्चा एखाद्या धाग्यावर न्यावी काय ?
तिथे तुम्ही माझी जबरदस्त जाहिर धुलाइ करु शकाल.
म्हण्जे मी "टंच माल मुलींना नेउ नका" असं म्हणालो, त्या खरडीपासूनचे त्या संदर्भातले सर्व भाग जाहिर धाग्यावर न्यावेत काय ?
.
.
मेघना भुस्कुटे
गुरुवार, 24/09/2015 - 10:37
मनोबा, शांत हो. पाणी पी. मस्करी चालू आहे.
.
.
अनु राव
गुरुवार, 24/09/2015 - 10:46
अगदी अगदी, मनोबा मस्करी चालू होती.
मी माझ्या प्रतिसादाच्या खाली "हलके घे" असे लिहीणार होते, पण मग त्याने सगळी मजाच गेली असती.
.
.

अनुप ढेरे
गुरुवार, 24/09/2015 - 10:50
बादवे, मनोबा ती रजत कपूरची जाहिरात कारची नसून एल्क्ट्रिक फिटिंगची आहे. क्रॅबट्री बहुधा.

जितक्या टक्के मुलींना गियरवाली बाइक चालवण्यात रस असतो

मोटरसायकल चालवणार्‍या मुली आवडतात हे म्हणण देखील सरसकटीकरण आहे काय? (किंवा सेक्सिस्ट, जो कुठला इन वोग शब्द असेल तो वापरावा.) परवाच बजाज एलिमिनेटर चालवणारी मुलगी दिसली. छान वाटलं.
.
.
अनु राव
गुरुवार, 24/09/2015 - 10:58

मोटरसायकल चालवणार्‍या मुली आवडतात

आवडतात म्हणजे? फक्त बघायला आवडतात? का बायको/पार्टनर म्हणुन पण आवडतील?
का मोटरसायकल चालवतात म्हणजे जरा सटकलेल्या दिसतायत ह्या मुली म्हणजे ह्यांच्या बरोबरचा सेक्स ग्रेट असू शकेल वगैरे वगैरे...
.
.
.
बॅटमॅन
गुरुवार, 24/09/2015 - 12:31
मोटरसायकल चालवणार्‍या मुली आवडतात हे म्हणण देखील सरसकटीकरण आहे काय? (किंवा सेक्सिस्ट, जो कुठला इन वोग शब्द असेल तो वापरावा.) परवाच बजाज एलिमिनेटर चालवणारी मुलगी दिसली. छान वाटलं.
अगदी असेच म्हणतो. गिअरवाल्या बायकांचे बायकांशी फारसे पटत नसते इन जण्रल. त्यामुळे असे काही पाहिले की भारी वाटते.
.
.
चिंतातुर जंतू
गुरुवार, 24/09/2015 - 12:54
>> गिअरवाल्या बायकांचे बायकांशी फारसे पटत नसते इन जण्रल.
आं? गिअरवाल्या बायकांचे बायकांशीच पटते अशा काही असतात हो! (पक्षी : लेस्बियन)
'फटफटी' हा शब्दच मुळी त्या अर्थानं वापरला जातो.
.
.
.
बॅटमॅन
गुरुवार, 24/09/2015 - 13:01

आं? गिअरवाल्या बायकांचे बायकांशीच पटते अशा काही असतात हो! (पक्षी : लेस्बियन)

१. बाईक या शब्दाचे अनेकवचन बायका असे केलेले आहे.
२. साधारणपणे जण्रल ट्रेंड सांगितल्यावर स्पेसिफिक उदाहरणे देण्याने मूळ युक्तिवादास बाधा येत नाही.
.
.
.
चिंतातुर जंतू
गुरुवार, 24/09/2015 - 13:39
कायनेटिक होंडा येईपर्यंत पुण्यात बजाजच्या स्कूटर किंवा गियरवाल्या एम-८० वगैरे पुष्कळ बायका चालवत असत. मोटरबाईक तेव्हा महाग होती. पण गियर बायकांना झेपत नाहीत असं फार काही वाटत नाही. संसारी माणसांना मोटरबाईक अडचणीची होते (सामान ठेवायला पुरेशी जागा नसणं वगैरे) असं निरीक्षण आहे.
.
.
अनुप ढेरे
गुरुवार, 24/09/2015 - 13:53
मोटरसायकलला बाजूला बॅग/डबा लावणारे असतात की काही लोक. पण तो प्रकार अजिबात आवडत नाही. एकदम विचित्र दिसतं.
.
.
बॅटमॅन
गुरुवार, 24/09/2015 - 14:11
झेपते की नाही हा मुद्दाच नाही. फक्त वापरण्याच्या प्रमाणाबद्दल म्हणतोय. अगोदर असतीलही वापरत. सध्या दिसत नाहीत.
बाकी ब्याग/डबा लावणे हे त्या डिझाईनमध्येच अभिप्रेत नसल्याने विचित्र दिसतं.
.
.
केतकी आकडे
गुरुवार, 24/09/2015 - 14:18
बाईक चालवताना दोन्ही बाजूंना पाय टाकून बसणं बायकांच्या साडीसारख्या पोषाखामुळे अशक्य असतं, म्हणून स्कूटर किंवा एम-८० नंतर गिअर असलेल्या गाड्या चालवण्याची संख्या कमी झाली असेल.
.
.
.
बॅटमॅन
गुरुवार, 24/09/2015 - 14:30
पाय टाकताना तो शीटवरून टाकणे साडीसारख्या पोषाखात अवघड आहे. शिवाय अलीकडच्या बाईक्स मोपेडच्या तुलनेत हेवीवेट आहेत. त्यामुळे यूज़ कमी झाला असेल.
.
.
गवि
गुरुवार, 24/09/2015 - 14:38
बायका बहुतांश वेळा लँडिंग गियर डिप्लॉय केलेल्या अवस्थेत स्कूटर, बाईक वगैरे दुचाक्या चालवतात. क्रूझ सेगमेंटमधेही लँडिंग कॉन्फिगरेशन..
.
.
घनु
गुरुवार, 24/09/2015 - 14:57
काही बायका टू व्हिलर चालवताना पाय असे सताड फताडे करून रस्त्यावर घसरत ठेवतात (जसे कट्ट्यावर मस्त रममाण होत बसल्या आहेत, एक पाय इकडे तर एक पाय तिकडे सोडून आणि हवेत पाय झुलवत). असं वाटतं ती लाकडी पट्टी घ्यावी हतात आणि असे गाडी बाहेर फताडे पाय दिसले की सट्टकन एक चापटी मारावी त्या पायावर आणि खेकसून म्हणावं "पाय आत घे!!!"
.
.
बॅटमॅन
गुरुवार, 24/09/2015 - 15:08
@घनु:
ठ्ठो (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)
.
.
.
चिंतातुर जंतू
गुरुवार, 24/09/2015 - 15:37
>> झेपते की नाही हा मुद्दाच नाही. फक्त वापरण्याच्या प्रमाणाबद्दल म्हणतोय.
आणि मी म्हणतोय की कायनेटिक आणि अॅक्टिव्हांनी मार्केट कॅप्चर केलं म्हणून. अन्यथा पुण्यात तरी बायकांनी गियरच्या गाड्या चालवण्याचं प्रमाण पूर्वी बऱ्यापैकी होतं.
.
.
.
गवि
गुरुवार, 24/09/2015 - 15:54
काही बायका टू व्हिलर चालवताना पाय असे सताड फताडे करून रस्त्यावर घसरत ठेवतात (जसे कट्ट्यावर मस्त रममाण होत बसल्या आहेत, एक पाय इकडे तर एक पाय तिकडे सोडून आणि हवेत पाय झुलवत).
हेच ते लँडिंग गियर डाऊन..!!
.
.
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 24/09/2015 - 16:48
गियरवाली गाडी चालवणं भारतात मर्दानीचं लक्षण समजतात का? अमेरीकेत काही मोजके लोक सोडले तर बाकीचे आॅटोगियर गाड्या चालवतात.
अमेरिकेत गियरला स्टिक म्हणतात. पोरा जरा जपून दांडा धर.
.
.
अनुप ढेरे
गुरुवार, 24/09/2015 - 17:42

गियरवाली गाडी चालवणं भारतात मर्दानीचं लक्षण समजतात का?

असं का वाटलं?
.
.
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 24/09/2015 - 18:00

असं का वाटलं?

१. बायका स्कूटर चालवतात यावर भरपूर चर्चा आधी झाली आहे.
२. अॅक्टिव्हा, आणि तत्सम बिनगियरच्या गाड्यांना बायकी गाड्या म्हणत हिणवल्याचं आंजावरही वाचलं आहे.
३. भारतात अनेक ष्टड माचोगिरी करण्यासाठी बाईकचा वापर करतात हे दिसलं आहे.
(मुद्दा क्र ३ मध्ये धाग्याचं पोटेंशियल आहे. पण सध्या मला टाईम इल्ले.)
.
.
गवि
गुरुवार, 24/09/2015 - 18:05
३. भारतात अनेक ष्टड माचोगिरी करण्यासाठी बाईकचा वापर करतात हे दिसलं आहे.
ष्टड माचोगिरी की सुदृढ आकर्षक पुरुषी गुणसूत्रांचं की कायसंसं ते असतं त्याचं दर्शन?
.
.
बॅटमॅन
गुरुवार, 24/09/2015 - 18:19

अॅक्टिव्हा, आणि तत्सम बिनगियरच्या गाड्यांना बायकी गाड्या म्हणत हिणवल्याचं आंजावरही वाचलं आहे.

बिनगियर इज़ ब्यूटिफुल अशी नवीन फेमिनिस्ट चळवळ सुरू करून गियरवाल्यांना आपल्या अस्तित्वाबद्दल लाज वाटावी असे प्रयत्न सुरू ठेवावेत. काही रिकामटेकडे/ड्या जॉईन होतीलही.
.
.
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 24/09/2015 - 18:33

ष्टड माचोगिरी की सुदृढ आकर्षक पुरुषी गुणसूत्रांचं की कायसंसं ते असतं त्याचं दर्शन?

गुणसूत्रांचं नाही, मला ते अज्ञानाचं प्रदर्शन वाटतं. याबद्दल साईनफेल्डचा एक तुकडा आहे. त्यात तो असं काहीतरी म्हणतो - पुरुषांना काय हवं असतं? स्त्रिया. स्त्रियांना काय हवं असतं? कोणास ठाऊक. स्त्रिया दिसल्या की पुरुष गाडीचे भोंगे जोरात वाजवतात ... (अर्थातच स्त्रिया त्याला नाक मुरडून पुढे जातात, ते तो म्हणत नाही, पण ते इंप्लाईड आहे.)

अहं, आत्ताच्या खफवरच्या कुठल्या वाक्यांमुळे लोक अस समजतायत आअ तुमचा ग्रह झाला?

असं मी काही म्हटलं नाही. तुमचा असा ग्रह माझ्या कोणत्या वाक्यामुळे झाला?
.
.
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 24/09/2015 - 18:35

बिनगियर इज़ ब्यूटिफुल ...

आंजावर बहुसंख्येने पुरुष आहेत, साधारण सांख्यिकीच्या अभ्यासातून समजतं की हे बहुसंख्य पुरुष बहुसंख्येने हेटरोसेक्शुअल आहेत. त्यामुळे आंजावर मतदान घेतलं तर बिनगियर इज़ ब्यूटिफुल हे सहज सिद्ध होईल.

नंदन Tue, 29/09/2015 - 11:19

साधारण मुख्य बोर्डावरची चर्चा जशी फुलते तसंच आहे की. तेथीचा जिव्हाळा* तेथे बिंबे! :)

(*बडबड ह्या अर्थाने)

ऋषिकेश Tue, 29/09/2015 - 14:21

खरडफळा हा फक्त सदस्यांसाठीच असतो. तर धागा सदस्य नसणार्‍यांनाही वाचता येतो
त्यामुळे खरडफळ्यावरचा मजकूर असा जाहीर केला जाऊ नये असे माझे मत आहे.

नंदन Tue, 29/09/2015 - 14:49

मनोबांच्या क्षय्य धाग्यांना आणि क्षणभंगुर प्रतिसादांना, हा हायकू समर्पितः

perennial green
ephemeral butterfly
what time’s time enough?

(दुवा)

.शुचि. Tue, 29/09/2015 - 18:39

In reply to by मनीषा

मनीषा तुमची सही नेहमी अतिशय सुंदर असते. आपल्या सहीमुळेच खालील ओळी वाचनात आल्या.

यादों के धुंधले दर्पण में ,बीते हर पल की छाया है ,
हर मोड़ पे मैने जीवन के कुछ खोया है कुछ पाया है
कुछ अंतर्मन की पीडाए अपने ही लोग ना समझे है ,
जितने सुलझे है प्रश्न यहाँ वो रेशम जैसे उलझे है
क्यों मन कहने को अपना है ? जब इसमे दर्द पराया है ?
हर मोड़ पे मैने जीवन के कुछ खोया है कुछ पाया है

यादों के धुंधले दर्पण में,बीते हर पल की छाया है ,

अनु राव Tue, 29/09/2015 - 18:41

In reply to by XYZ

तेजायला, सदस्य आहात तर खरडफळ्यावर जाऊन वाचा की.

आणि तुम्हाला काही हीट अँड हॉट अपेक्षीत असेल तर तसे काहीही नव्हते.

अनु राव Tue, 29/09/2015 - 18:43

In reply to by .शुचि.

अनु शी तू तेजायला नको म्हणूस Sad तुला नाही शोभत. पुरुषी वाटतं

तुझ्याकडुन च शिकलिय हा शब्द. ;)

.शुचि. Mon, 12/10/2015 - 06:20

यावरुन "फक्त ऑफिसर्स आणि सभ्य गृहस्थ यांना प्रवेश" आठवला. (डोळा मारत)

हाहाहा मस्त हे वाक्य मी मिस केलेलं खफवर.
___

बायका बहुतांश वेळा लँडिंग गियर डिप्लॉय केलेल्या अवस्थेत स्कूटर, बाईक वगैरे दुचाक्या चालवतात. क्रूझ सेगमेंटमधेही लँडिंग कॉन्फिगरेशन..

या वाक्यावरही फुटले होते.
.

ष्टड माचोगिरी की सुदृढ आकर्षक पुरुषी गुणसूत्रांचं की कायसंसं ते असतं त्याचं दर्शन?

किंचीत पोट सुटलेले पुरुच बरे वाटतात खरं तर. होममेड पॉर्न आणि अति कृत्रिम पॉर्न मध्ये जो फरक असतो तोच.
डिस्क्लेमर - किंचीत पोट सुटलेले सर्व पुरुष नाही. अन्य क्रायटेरीयाज ही मस्ट आहेत.
पण सांगायचा मुद्दा फार मसल्स वाली लोकं रेमेडोके (रेडे) वाटतात :(

गब्बर सिंग Mon, 12/10/2015 - 06:37

सोबत टकाटक टंच माल स्टाइल आयटीवाल्या मुली असतील; तर आत जाउ नये.

असं पुरुष मुलींबद्दल क्रिएटिव्ह बोलतात. त्याप्रमाणे मुली पुरुषांबद्दल क्रिएटिव्ह काय बोलतात ?

इथे जनरलायझेशन इष्ट व अपेक्षितच आहे.

( आता पुरुषांबद्दल क्रिएटिव्ह बोलण्यासारखं काही नसतंच ... वगैरे डायलॉग मारू नका. पुरुष हे घाणेरडे व बुली असतात असं जवळपास सर्व स्त्रियांनी म्हणून आहे. तेव्हा त्याची पुनरुक्ती नको. )

अनु राव Mon, 12/10/2015 - 09:24

In reply to by गब्बर सिंग

आम्ही आमच्या आमच्यात खुष असतो, स्वकेंद्रीत म्हण ना. दुसर्‍या कोणाबद्दल ( त्यात ही ) पुरुष क्रिएटीव्हली बोलणे अवघडच आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे ( वेगळे विचार , अनुभव असतीलच ) कदाचित पुरुष हा फक्त शरीर म्हणुन समोर येतच नाही.
उदाहरण म्हणुन, हे भारतातले सांगतीय. हल्ली सिक्युरीटीला बायका पण असतात भारतात कंपनी मधे. त्यात एखादी खरच चांगली असते, अश्या बाई विषयी पुरुष कलिग्स बोलतात, अगदी वाट वाकडी करुन त्या बाजुनी पण जातात :-)
पण गेटवरचा बाऊंसर किंवा गेट मन कीतीका राजबिंडा असू दे, कोणा बाईला त्याच्याबद्दल बोलताना बघितले नाहीये.

आणी कंपनीत ( भारतात ) हजारात एखादा पुरुष चांगला दिसतो. इतक्या कमी लोकसंख्येबद्दल काय बोलणार? काय एकेकांच्या तब्येती, पोटे, चालणे ....
आणि तोंड उघडले की तर बावळटपणा उघड पडतो, अश्यांबद्दल काय क्रीएटीव्ह पणा दाखवणार?

हिंदी , मराठी सिनेमाचेच बघ ना, इतक्या सुंदर हिरोइनी मिळाल्या पण १-२ हिरो सोडले तर सगळे सुमार आणि बावळट. त्यांचे रोल पण विनोदी, बावळट, भोळे वगैरे. कधी प्रॉपर पुरुषाचे कॅरेक्टर लिहावे असे कोणा लेखकालाच वाटले नाही :-(

गब्बर सिंग Mon, 12/10/2015 - 09:47

In reply to by अनु राव

हिंदी , मराठी सिनेमाचेच बघ ना, इतक्या सुंदर हिरोइनी मिळाल्या पण १-२ हिरो सोडले तर सगळे सुमार आणि बावळट. त्यांचे रोल पण विनोदी, बावळट, भोळे वगैरे. कधी प्रॉपर पुरुषाचे कॅरेक्टर लिहावे असे कोणा लेखकालाच वाटले नाही

काय अभ्यास, काय अभ्यास !!!

एकदम मस्त निरिक्षण हो.

राज, गुरुदत्त, देव, दिलीप, संजीव, अशोक, राजेश, धरमजी, अमिताभ यातल्या कुणी नेमका पुरुष सादर केला हा प्रश्नच आहे. म्हंजे संवाद, पटकथा, डायरेक्टर यांच्या फिल्टरींग मधून जाऊन पुरुष सादर करणे हे अमिताभ व्यक्तिरिक्त कुणाला जमले ? (मी अमिताभच्या बाजूने बायस्ड आहे हे उघड आहे.). आता प्लीज भारतभूषण, प्रदीपकुमार व राजेंद्रकुमार ही नावं घेऊ नका. पुढे जाऊन खानत्रयी, अक्षय खन्ना, अक्षयकुमार, अजय वगैरे....

------

कदाचित पुरुष हा फक्त शरीर म्हणुन समोर येतच नाही.

पुरुष म्हंटल्यानंतर शरीर सोडल्यास नेमकी कोणती बाब पुढे येते व यावी असे वाटते ?? ( आता फक्त स्त्रीदाक्षिण्य चा मुद्दा उपस्थित करू नका. )

.शुचि. Mon, 12/10/2015 - 10:08

In reply to by अनु राव

आम्ही आमच्या आमच्यात खुष असतो, स्वकेंद्रीत म्हण ना.

अनु स्वकेंद्रित पेक्षा इनफ वात्रट मैत्रिणी मिळत नाहीत हा भाग आहे. इथे होतात की वीमेन्स नाईट आऊटस. त्याचे प्लॅन्स बनत असताना संपूर्ण पुरुष्केंद्रित नाही पण बरचसं पुरुषकेंद्रित बोलत असतील की बायका.
____
मला एक दीपीका म्हणून मस्त मैत्रिण होती. मला एकच क्रिएटीव्ह वाक्य आठवतय पण ते खरोखर लिहीण्यासारखे नाही. पण आमच्या टवाळकीच्या वेव्हलेंथ्स मॅच होत. एकदम हसरी आणिविनोदी होती ती. माझ्यापेक्षा कै गुना जास्तच.
.

काय एकेकांच्या तब्येती, पोटे, चालणे ....
आणि तोंड उघडले की तर बावळटपणा उघड पडतो, अश्यांबद्दल काय क्रीएटीव्ह पणा दाखवणार?

खरच ग लाज आणतात कधीकधी. मी एका कलीगबरोबर लंचला गेले होते. खरं तर बॅड आयडीया. हे यडं तेलुगु होतं, रस्सम भात एकदम गोळे करुन हातानी खायला लागलं. अमेरीकन लोकं बघताहेत.
.

हिंदी , मराठी सिनेमाचेच बघ ना, इतक्या सुंदर हिरोइनी मिळाल्या पण १-२ हिरो सोडले तर सगळे सुमार आणि बावळट. त्यांचे रोल पण विनोदी, बावळट, भोळे वगैरे. कधी प्रॉपर पुरुषाचे कॅरेक्टर लिहावे असे कोणा लेखकालाच वाटले नाही Sad

अगदी अगदी. जिस देश्मे गंगा बहती है इतका सुंदर सिनेमा आहे पण त्यातलं राज कपूरचं पद्मिनीला प्रपोझल काय तर बावळटासारखं लाजत लाजत - "क्यों जी मेरे लल्लेकी मां बनोगी?"
तो सीन आला ना की मी अक्षरक्षः ऊठून काहीतरी वेळ्काढूपणा करुन येते.
.
मराठीत काशीनाथ घाणेकर आवडायचा मला लहानपणी, श्रीकांत मोघेदेखील.

अनु राव Mon, 12/10/2015 - 10:17

In reply to by .शुचि.

पण आमच्या टवाळकीच्या वेव्हलेंथ्स मॅच होत. एकदम हसरी आणिविनोदी होती ती. माझ्यापेक्षा कै गुना जास्तच.

पुरुषांबद्दल बोलत असतातच बायका पण शेवटी पुरुषांबद्दल टवाळकीच होऊ शकते, हेच म्हणायचे आहे ना तुला. टकटकीत टंच टाईप चे कौतुक पुरुषांबद्दल होणे अवघडच.

बाई ( माझ्या घेट्टोतल्या ) वयाच्या कुठल्यातरी टप्प्यात चांगली दिसते / वाटते. मोस्टली पुरुषांच्या बाबतती तसेही म्हणता येणार नाही. मला जावई म्हणुन कोणी पसंत पडेल असे वाटत नाही. :-(

हल्ली ४ पुरुष बोलत असले की मला महीला मंडळ सुरु झालय असे वाटते, इतके घर्गुती आणि काल भाजी काय होती घरी वगैरे अश्या टाईप च्या विषयांवर बोलत असतात. अगदी नको होते. आणि सारखी तब्येतीची कुरकुर, काल चार शिंका आल्या, ९९ ताप होता वगैरे. शी....

मराठी सिनेमाचे सुपरस्टार कोण तर दादा कोंडके, बेर्डे, अशोक सराफ, भरत जाधव, अनासपुरे. त्यापेक्षा हिंदी सिनेमा बरे म्हणायचे.

.शुचि. Mon, 12/10/2015 - 10:20

In reply to by अनु राव

टकटकीत टंच टाईप चे कौतुक पुरुषांबद्दल होणे अवघडच.

टवाळकी नाही गं. पण पुरुष शरीर म्हणून समोर येतच नाही याला १००% आहेत माझ्याकडून. ते एक संपूर्ण पॅकेज या दृष्टीनेच पाहीले जातात. माझ्याकरता तरी प्रोफेशनली सक्सेस्फुल हा क्रायटेरीया आवश्यक होऊन बसला आहे. वय झालं आता, बाकीचे बालीश क्रायटेरीयास लाइक रुप, ऊंची गळून पडलेत.
ऑल्सो माईंड यु - श्रीमंत नाही, प्रोफेशनली सक्सेसफुल. आणि काही आहेत, अजुन एक क्रायटेरीया आहे- आवाज. आवाज या विषयावरची खालची कविता वाच्,

Your voice curls itself
Like a dark supple panther
In my cautious heart.
Sometimes it pads restlessly
And my heart trembles open.

Who could hope to imprison
Such dark wild beauty?

नितिन थत्ते Mon, 12/10/2015 - 11:29

In reply to by .शुचि.

>>टवाळकी नाही गं. पण पुरुष शरीर म्हणून समोर येतच नाही याला १००% आहेत माझ्याकडून. ते एक संपूर्ण पॅकेज या दृष्टीनेच पाहीले जातात. माझ्याकरता तरी प्रोफेशनली सक्सेस्फुल हा क्रायटेरीया आवश्यक होऊन बसला आहे. वय झालं आता, बाकीचे बालीश क्रायटेरीयास लाइक रुप, ऊंची गळून पडलेत.

हे कैतरी उत्क्रांतीनुसार योग्य आहे असं ऐसीवर वाचलंय ब्वॉ. प्रोफेशनली सक्सेसफुल म्हणजे पैसेवाला म्हणजे आपल्याला आणि पोरांना नीटपणे पोसणारा...........

.शुचि. Mon, 12/10/2015 - 11:42

In reply to by नितिन थत्ते

फक्त पैसे नाही थत्ते, सुरक्षितता. पैसा जाऊ शकतो पण कमावलेले कौशल्य टिकते/वाढते/उपयोगी पडते.
.
मला, नवर्‍याबरोबर लवकर रिटायर होऊन, निवांत आयुष्य जगायला फार आवडलं असतं/आवडेल.
.
एम्प्टी नेस्ट सिंड्रोम चे जितकें (अँटिसिपेटेड) दु:ख वाटते तितकेच आहाहा! जबाबादारीतून मुक्त होऊ लागू याचा आनंदही वाटतो. अर्थात ही स्वप्नं पूर्ण होतीलच याची गॅरंटी नाही. पण स्वप्न पहावीतच नाही का!

.शुचि. Mon, 12/10/2015 - 10:39

In reply to by अनु राव

मला जावई म्हणुन कोणी पसंत पडेल असे वाटत नाही. Sad

तुला भारतीयच हवा की काय? मला कोणीही चालेल. पण माझे काही क्रायटेरीयाज आहेत त्यां क्रायटेरेआना कोण पुसतय म्हणा.

अनु राव Mon, 12/10/2015 - 10:42

In reply to by .शुचि.

तुला भारतीयच हवा की काय

असे अजिबात नाही. मला कोण पुसणार पण नाही हे ही माहिती आहे. प्रश्न मला पसंत पडेल की नाही हा आहे ( बट हौ डज दॅट मॅटर :-( )

.शुचि. Mon, 12/10/2015 - 10:54

In reply to by अनु राव

बट हौ डज दॅट मॅटर Sad

यु आर राइट. पण तसं मॅटर न होणं एक प्रकारे चांगलच. कारण त्यांच्या चूका त्यांनी करुन निस्तरायच्या आहेत. फक्त गंभीर चूका (एडस , ड्रग्ज, अल्कोहोलिझम) या टाळायला शिकवणं आपलं काम. आईने निवडलेला भ्रतार करुन काय मोठे तीर मारलेत अन्य लोकांनी (माझ्या घेट्टोमधल्या :)) ते मला माहीतेत आणि म्हणून माझं ते मत बनलय.
.
जास्त व्यनितून बोलू यात.

चिमणराव Mon, 12/10/2015 - 10:49

मराठी सिनेमाचे सुपरस्टार कोण तर दादा कोंडके, बेर्डे, अशोक सराफ, भरत जाधव, अनासपुरे. त्यापेक्षा हिंदी सिनेमा बरे म्हणायचे.-

बाईभोवती घोटाळणारा पुरूष नट दाखवला की गल्ला भरतो हा समज जेव्हा खोटा ठरेल तेव्हा मराठी किंवा हिंदी अथवा कोणताही भारतीय सिनेमा बदलेल.

बाकी दोन तीन प्रतिसादांत महिलामंडळाने बोलती बंद

.शुचि. Mon, 12/10/2015 - 10:59

In reply to by चिमणराव

बाईभोवती घोटाळणारा पुरूष नट दाखवला की गल्ला भरतो हा समज जेव्हा खोटा ठरेल तेव्हा मराठी किंवा हिंदी अथवा कोणताही भारतीय सिनेमा बदलेल.

खरे आहे. तरी चोरी चोरी मस्त होता. सिलसिला आवडला. जिस देश्मे गंगा देखील बाईभोवती घुटमळण्याचा नव्हता.

अनु राव Mon, 12/10/2015 - 11:01

बाईभोवती घोटाळणारा पुरूष नट दाखवला

हे ही चालेल हो अचरट, पण बालिश, वेड्यासारखे अंगविक्षेप करणारे आणि आप्युष्यात ( कॅरेक्टरच्या ) काहीही अचिव्ह न करु शकलेले सिनेमाचे हिरो म्हणुन कॅरेक्टराइज करु शकतात?

अनु राव Mon, 12/10/2015 - 12:16

In reply to by अस्वल

भरत जाधव, अनासपुरेंचे चित्रपट सोडून. कारण बावळटपणा हाच त्या कॅरेक्टर्सचा USP आहे.>

वर बाकीची नावे दिली होती ती त्यातच मोडतात.

मान्य की बावळटपणा हे त्या कॅरेक्टरचा USP आहे, पण म्हणुन जवळजवळ सगळेच सिनेमा अश्या कॅरेक्टरचे असावेत?

मि. बीन/ पिंक पँथर हीट झाला म्हणुन तश्याच सिनेमांची रांग नाही लागली.

अस्वल Tue, 13/10/2015 - 00:43

In reply to by अनु राव

बाकीची नावं म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्या का? त्यांची कॅरेक्टर्स बावळट नक्कीच नाहीयेत, उलट बरेचदा स्ट्रीट स्मार्ट/आगाऊ आहेत.
तुमच्या मते अशोक लक्ष्याची उठून दिसणारी बावळट कॅरेक्टर्स कुठली आहेत?

मि. बीन/ पिंक पँथर हीट झाला म्हणुन तश्याच सिनेमांची रांग नाही लागली.

अहो कारण मि.बीन/ पिंक पॅंथर हा तुमच्या हॉलिवूडचा USP नाही म्हणून.
तिथे USP असलेल्या मेट्रोसेक्शुअल मेल {पहा: टाम क्रूझ, चॅनिंग टॅटम(?),ख्रिस हेमवर्थ} किंवा रावडी मारधाडपट {जेसन स्टेथम, स्टॅलोन, रॉक } ह्यांची रांग लागते.

.शुचि. Tue, 13/10/2015 - 00:59

In reply to by अस्वल

हम आपके है कौन की मैने प्यार किया कोणत्या तरी सिनेमात - लक्ष्मीकांत बेर्डे...... गचाळ पात्रावतार.
___
बाकी रमेश भाटकर, अमोल पालेकर, महेश मांजरेकर , सचिन खेडेकर, मिलिंद सोमण, नाना पाटेकर, विक्रम गोखले (महानंदा मस्तच)- चांगले वाटतात मला.

नितिन थत्ते Tue, 13/10/2015 - 07:47

In reply to by अनु राव

अनु राव यांच्या काही डिसमिसिव्ह प्रतिक्रिया वाचून "लिंबू आणायला पाठवा त्याला; स्तंभावरच्या लायब्ररीत जाऊन लिंबू मागेल" याची आठवण येते. :)

चिमणराव Mon, 12/10/2015 - 13:22

सिनेमावाले जे पुरुषांचं/हिरोंचं सादरीकरण करतात ते प्रड्युसरच ठरवतो आणि डिरेक्टरला सांगतो अरे अशा अशा लाइनवर मसाला मार, हीच थीम चालतेय मला माझे पैसे काढायचेत. या मेंगळटांना माचो दाखवून माझ्या खिशाचे बुट पालिशचे फडकं बनवायचे नाहीयै.

बाकी आपण सखाराम बाइंडर सारखे नाही बनू शकत हे कबूल करून मोकळे होतो.

काळा मठ्ठ बैल … Tue, 13/10/2015 - 13:44

मराठी लोकाच्यात सारखसारखं बोलायचे विशय -
खाणंपिणं
बायका
पुरुश
गाड्या
कविता

एवढंच कळ्लं ह्यातनं

चिमणराव Tue, 13/10/2015 - 17:04

इक्नॅामिक्स म्हणे त्यांच्या रक्तात असतं,
गरूडभरारी त्यांच्या दप्तरात ,
राजकारण तर सारखं चिमुटचिमुट तंबाकुसारखं अक्कलदाढेखाली धरतात.

चिमणराव Thu, 15/10/2015 - 06:19

""मराठी लोकाच्यात सारखसारखं बोलायचे विशय -
खाणंपिणं
बायका
पुरुश
गाड्या
कविता
एवढंच कळ्लं ह्यातनं""
--
इक्नॅामिक्स म्हणे त्यांच्या रक्तात असतं,
गरूडभरारी त्यांच्या दप्तरात ,
राजकारण तर सारखं चिमुटचिमुट तंबाकुसारखं अक्कलदाढेखाली धरतात.