प्रेमाचा वर्षाव

व्याकूळ चातक
विरही मीरा
दग्ध धरती
भूक बळीची.
आसुसलेल्या
डोळ्यांना
एकच आस
प्रेमाचा वर्षाव.


टीप: स्पष्टीकरण:

अश्या प्रकारच्या कविता हिंदीत पूर्वी अमीर खुसरो यांनी लिहिल्या होत्या. एकदम वेगळ्या वस्तूंमध्ये/ व्यक्तींमध्ये निसबत (समानता) दाखविली जात होती. तोच प्रकार मराठीत; अमीर खुसरो यांचे एक उद:

बादशाह और मुर्ग (कोंबडा) में क्या निसबत है.
दोनों ताज पहनते हैं.

तसेच चातक, मीरा, धरती आणि बळीराजा यात एक समानता आहे, ती म्हणजे ते सर्व प्रेमाच्या पाऊसाची आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत आहे.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

वर्षाव/पाऊस्/तहान यावरील सर्व कविता फार आवडतात.
"प्रेमसुधा इतनी बरसा दो जग जलथल हो जाए" ही त्या गाण्यातील राधेची आळवणी परत वैश्विकच आहे. फक्त तिच्यापुरता प्रेम नको तर संपूर्ण जगाकरता हवय. आपण तर ब्वॉ जेलस झालो असतो. अन म्हणूनच ती राधा आहे आपण , आपण आहोत, Wink
____
कविता आवडली विशेषतः चौघे व्याकुळ आहेत. शेवटी जर जिवनाचा (होत र्‍हस्व 'जि' च) तर दोन्ही साधले असते. जिवन म्हणजे पाणी, प्रेम हेच जीवन असते. अशा टाइप.
अर्थात प्रेम हेच जीवन असते याचा व्यत्यास काही खरा होत नाहीये. पण तरीही एक च्छल.
___
पण कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0