हा खेळ संख्यांचा! - एक

अंकांच्या विशिष्ट गुणधर्मासंबंधी विचार करताना 1 या अंकाचे भरपूर गुणधर्म आहेत हे लक्षात येईल.

  • पहिली विषम संख्या.
  • कुठल्याही संख्येला 1 ने गुणल्यास त्या संख्येत बदल होत नाही.
  • सांख्यिकीत (statistics) 1 म्हणजे 100 टक्के शक्यता.
  • भूमितीतील sine व cosine चे कमाल मूल्य 1 असते.
  • 1 ही परिपूर्ण वर्ग व घनसंख्या, 1 = 12 = 13.

झेनोच्या पॅरॉडॉक्सलासुद्धा (490 -430 क्रि.श.पू) याच संख्येचा आधार आहे. झेनोच्या या विरोधाभासात आपल्याला ईप्सित ठिकाणी पोचण्यासाठी पहिल्यांदा अर्धे अंतर पार करायला हवे. यात काय विशेष असे वाटत असेल. परंतु उरलेल्या अंतराचेसुद्धा असेच अर्धे अर्धे करत गेल्यास आपण कधीच आपल्या ईप्सित ठिकाणी पोचू शकत नाही. 1 = 1/2+1/4+1/8+1/16+1/32 ........
परंतु 17व्या शतकात लेब्निट्झ व न्यूटन यांच्या कॅल्क्युलसच्या शोधामुळे convergence series चा जगाला परिचय झाला व झेनोच्या पॅरॉडॉक्सला विश्रांती मिळाली.

  • बुद्धीबळ स्पर्धेच्या परिणामांचा उल्लेख करताना 1 म्हणजे जिंकणे, ० म्हणजे हरणे व 1-1 म्हणजे बरोबरीने सुटणे असा अर्थ होतो.
  • स्पर्धात्मक युगात वावरताना प्रथम क्रमांकावर असणे श्रेयस्कर ठरते. तेथेही 1 हीच संख्या महत्वाची ठरते.
  • एकेश्वरवादात एकाच ईश्वराचे विधान व एकाच ईश्वरावर श्रद्धा असते.
  • एकच अग्नी अनेक ठिकाणी प्रज्वलित होतो, एकच सूर्य जगभर प्रकाश पाडतो व एकच उषा सर्व विश्व प्रकाशित करते. एकापासून हा सर्व पसारा झाला आहे. (ऋग्वेद 8-58-2)
  • एकतत्ववादात या जगात फक्त एकच सत्य तत्व आहे, मग ते भौतिक असो अथवा आध्यात्मिक असो.
  • एकात्मवादानुसार आत्मा एक आहे व तो सर्वत्र व्याप्त आहे. हा वेदांतशास्त्राचा एक मुख्य सिद्धांत समजला जातो

.

(यासंबंधात धार्मिक, पौराणिक उल्लेख मोठ्या प्रमाणात सापडतील त्या वगळून आपणही यात यथाशक्ती भर घालू शकता. )

....क्रमशः
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

राम एकपत्नी होता. (कदाचित आपल्या तीर्थरूपांनी केलेल्या चुकांची फळे प्रत्यक्ष भोगायला लागल्यामुळे असेल!)

जगातील बहुसंख्य लोकसंख्या एकेश्वरी धर्म मानणारांपैकी आहे.

Prime संख्येच्या बहुतेक सर्व अटी पूर्ण करूनही एक ही संख्या prime मानली जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फीबोनाच्ची सीक्वेन्समधे एक हा आकडा दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर येतो. बाकी कोणतेच आकडे पुन्हा येत नाहीत.

सुनील, primary संख्या का prime संख्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लै वर्स झाली घोकून आता काय आठवत नाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला त्याचा मराठी शब्द आठवत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile