श्रेणीकौल भाग-३ : श्रेणीसुविधेची उपयुक्तता किंवा उपद्रवमूल्य

भाग १ | भाग २
इथे श्रेणीसुविधेवरून काहीशी नाराजी अनेकदा दिसते. या सुविधेमागचा उद्देश कोणताही/कसाही असला तरी त्याचा वापर कसा होतो हे जाणण्यासाठी हा कौल सुरू करत आहे.

या श्रेणी कौल मालिकेत कृपया खरी व शक्य त्या सगळ्यांनी मते द्या जेणेकरून आवश्यक वाटल्यास या सुविधेत योग्य ते बदल करता येतील.

(संपादन : शीर्षक खूप लांब झाल्यामुळे 'नवे लेखन' पानावर धाग्यांची यादी दिसण्यात अडचण येत होती; शीर्षक छोटे केले आहे.)

Choices

You are not eligible to vote in this poll.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

उपद्रव कसा काय?

उपद्रव कसा काय?

मी वाचायचे असेल तर प्रत्येक प्रतिसाद वाचने

पसंत करतो. उगा एका वर्गात राहून आम्ही 93%+ तुम्ही - 90% वगैरे ग्रुप मी गर्दभ श्रोणित सोडत असल्याने माझ्या लेखी सुरेख वा खराब प्रतिसादाना महत्व आहे श्रेणी व्यवस्था मला उपयुक्त नाही मी सर्वात कमी अन जास्त श्रेणीवाले प्रतिसाद तितक्याच रोच्कपने वाचतो

actions not reactions..!...!

श्रेणीबद्दलचे तिन्ही कौल

श्रेणीबद्दलचे तिन्ही कौल बघितले. एकूण श्रेणी हा प्रकार चांगला आहे, हेतू पण चांगला आहे. पण सध्य स्वरूपात फारच किचकट असल्याने तेवढा उपयोगी होत नसावा. फक्त काही मोजके मेंबर्स पूर्ण उपयुक्त वापर करत असतील. बाकीचे जेमतेम वापर करत असावेत. असं मला वाटतंय.

त्यामुळे श्रेणीचे पर्याय मर्यादित असायला हवेत. अगदी दोनच - अपवोट आणि डाऊनवोट असले तरी हरकत नाही. किंवा अगदीच वाढवायचे असतील तर ३ धन आणि २ ऋण ठेवा. पर्याय निवडताना निवडणाऱ्याला विचार करायला लागलं नाही पाहिजे कि काय निवडू. अगदी हमखास मनातून आला पाहिजे, जर १-२ सेकंद विचार करायला लागणार असेल तर पर्याय जास्त आहेत असं मी म्हणेन.

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

अरे वा ! तुम्हाला समजलं

अरे वा !
तुम्हाला समजलं म्हणजे हुशार दिसता !! (स्माईल)
आम्हाला अजून कळलेलं नाही.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

कधी गर्व नाही केला..

कधी गर्व नाही केला.. (घासू)

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

गर्व करणे म्हणजे नेमकं काय

गर्व करणे म्हणजे नेमकं काय हो?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

सांगितलं असतं पण आबा

सांगितलं असतं पण आबा कावत्यात!

Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

माझे मत

माझ्या मते श्रेणी सुविधा निरुपयोगी आहे.
१. मी श्रेणी बघून प्रतिसाद वाचत नाही, बहुतेकदा सर्व प्रतिसाद वाचतो.
२. श्रेणी पद्धत थोड्या प्रमाणात आवडते, कारण त्यामुळे मला -ve प्रतिसाद नीट वाचता येतात, जे मला जास्त आवडते. (डोळा मारत)
३. या श्रेणी प्रकाराचा दुरुपयोग केलेला जाणवला आहे. बर्‍याचदा म्हणणार नाही, पण जाणवण्याइतपत दिसला आहे.
४. श्रेणी प्रकारामुळे माझे बायस वाढण्यास हातभार लागला आहे, असे वाटते. उदा. म्हणजे शुचिमामी सगळ्यांना छान-छान, गोडगोड श्रेण्या देत असणार, असे वाटते. प्रत्यक्षात तसे नसेलही कदाचित. (स्माईल)
५. सर्वात महत्वाचे म्हणजे मी मागे अदितीला म्हणालो होतो की हे ड्रूपल व्हर्जन खूप जुने आहे, अपग्रेड कर. तेव्हा ती म्हणाली होती की श्रेणी सुविधा अजून ड्रूपल ७ मध्ये उपलब्ध नाही, म्हणून ड्रूपल ६ वरच आहे. हे म्हणजे टांग्याने घोड्याला खेचण्याचा प्रकार वाटतो मला तरी.

नाही उदय फक्त गोड नाही. मी

नाही उदय फक्त गोड नाही. मी खवचट्/निरर्थक्/खोडसाळही देते आणि त्या तशा देऊन "confrontation" टाळणे मला बरेही वाटते (स्माईल)
___
तुम्ही दुरुपयग हा मुद्दा आणि माझे नाव एकाच वाक्यात गोवल्याने वाईट वाटले आहे. You need not have done that.

Oh! that's interesting.

तुम्ही दुरुपयग हा मुद्दा आणि माझे नाव एकाच वाक्यात गोवल्याने वाईट वाटले आहे. You need not have done that.

Oh! that's interesting.

सुविधा चांगली आहे. आणि

सुविधा चांगली आहे. आणि उपयोगीसुद्धा आहे.

हे राष्ट्रं देवतांचे ... हे राष्ट्रं प्रेषितांचे |
आचंद्रसूर्य नांदो ... स्वातंत्र्य भारताचे ||

फक्त point system (+१, not

फक्त point system (+१, not -१) हवी. खवचट, मार्मिक, वगैरेची गरज नाही.

स्वाक्षरी

ह्या विषयावरचं आमचं मत आमच्या स्वाक्षरीत स्पष्ट नोंदवलेलं आहे.
मग तो पुरूष असो वा स्त्री, आय डोन्ट गिव्ह अ रॅट्स अ‍ॅस!!!

वर शुचि म्हणाली अगदी तेच

वर शुचि म्हणाली अगदी तेच म्हणायचं आहे. जर श्रेण्यांचा योग्य वापर केला तर 'सहमत' ,'+१' हे असले प्रतिसादांचे लटांबर होत नाही. फक्त एका पर्यायाने आपले मत नोंदवता येते. शिवाय बरेचदा काही प्रतिसाद वाचून अगदी सहज " एक्दम मार्मिक"... "वा काय रोचक आहे".."किती ते खवचट"... "अगदीच निरर्थक" असे उद्गार निघतात त्यावेळी श्रेणी सुविधा फार मदत करते. उगीच तो एक शब्द प्रतिसादात लिहिण्यापेक्षा श्रेणीतल्या पर्यायांपैकी एक मत नोंदवता येतं. कधीकधी एखाद्याचा प्रतिसाद पटत नाही निरर्थक, भडकाऊ वाटतो पण सहसा प्रत्यक्ष त्या प्रतिसादकर्त्याला तसं सागणं काही लोकांना अवघड वाटतं (सगळेच स्पष्टवक्ते नसतात) अश्यावेळी श्रेणी सुविधांमुळे मत ही नोंदवता येतं आणि गुप्तता ही राखली जाते.

इतर मत प्रतिसाद:- काहीजणांस

इतर मत प्रतिसाद:-
काहीजणांस श्रेणी देण्याचा अधिकार नाही हे आताच कळलं.माझंतर म्हणणं आहे की सभासद नसलेल्यांस प्रतिसाद देता येत नाही हे ठीक आहे परंतू श्रेणी देण्याचा अधिकार/सोय सर्वच सभासद असलेल्या नसलेल्यांस देऊन टाका आणि एक नवा पायंडा पाडा.वाचकांस एक हक्क मिळवून देता येईल.

खरा { हट्टी } लेखक प्रतिसादांच्या श्रेणींना भीक न घालता लिहिणारच

इतर

उपयुक्त सुविधा वाटते. (सविस्तर उत्तर)

वादावादीच्या धाग्यावर कधीतरी श्रेण्यांचा सढळ हाताने लोक वापर करतात असे जाणवते. पण एरवी, महत्वाच्या धाग्यांवरील वापर योग्य वाटतो. वादावादीचे धागे कसे वाचावे हे समजत असल्याने त्याचा त्रास होत नाही.

चांगली व्यवस्था आहे यात काय

चांगली व्यवस्था आहे यात काय वादच नाही. धन-ऋण श्रेण्या किती मनाला लावुन घ्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न.

इतर

काय वाचावे व वाचु नये हे सांगणारी, तसेच बहुमतचा काही थोड्या लोकांचा, पण बहुतेक वेळा उपयोगी असा कल समजून देणारी अतिशय उपयुक्त सुविधा आहे.

श्रेणीवरुन काय वाचायचे ते मी

श्रेणीवरुन काय वाचायचे ते मी ठरवत नसल्याने माझ्यापुरती ही व्यवस्था निरुपयोगी आहे.
माझे प्रतिसाद झाकले काय किंवा उडवले काय, काहीही फरक पडत नाही; ते लिहिणे मला जास्त महत्त्वाचे वाटते (कधी कधी निरर्थकही).
मी फारशा श्रेण्या देत नाही; पण कधी कधी अगदीच कायच्याकाय प्रतिसाद असेल तर विनोदी किंवा रोचक किंवा खवचट अशी श्रेणी देतो. रुढार्थाने या धन असल्यातरी मी ऋण म्हणूनच देतो. कधी कधी काहींच्या प्रतिसादाच्या ऋण श्रेण्या असतील तर त्या बदलून सर्वसाधारण करण्याचा प्रयत्न करतो.
एकूणच माझ्या दृष्टीने ही सुविधा निरुपयोगी आहे. ती नसली तर मला चुकल्या-चुकल्यासारखे होणार नाही.

Hope is NOT a plan!

सुविधा चांगली असली तरी या सुविधेचा वापर

सुविधा चांगली असली तरी या सुविधेचा वापर मी प्रत्यक्षात काय वाचावे/वाचु नये हे ठरवायला करत नाही.

या पर्यायाला मत दिले आहे. उलट -१ व त्याखालील आणि लपविल्या गेलेल्या प्रतिसादांचे मुद्दाम वाचन करतो.

सुविधा चांगली आहे मात्र काही जण याचा दुरूपयोग करताना दिसल्याने उद्वेग निर्माण होतो.

असे नवीन नवीन असतांना वाटायचे पण आता माझी कातडी बर्‍यापैकी निबर झाली आहे त्यामुळे वाईट वाटत नाही. उलट आता आपल्या प्रतिसादाला कोणती श्रेणी मिळणार याचा अंदाज बांधण्याचा नवाच छंद जडवून घेतलेला आहे. व माझा निष्कर्ष बरोबर आल्यास स्वतःचीच पाठ थोपटून घेतो.
मात्र कधी कधी एखाद्या गंभीर प्रतिसादाला विनोदी श्रेणी मिळते तेव्हा श्रेणी देणारा / देणारी 'धुंद येथे मी स्वैर झोकीतो मद्याचे प्याले' अशा अवस्थेप्रत पोहोचलाय की काय अशी शंका मनास चाटून जाते.

मी तर म्हणतो की कोणी कोणास कोणती श्रेणी दिली हे देखील कळाले तर फार मजा येईल.
अवांतर : संपादक मंडळींस कोणी कोणास कोणती श्रेणी दिली हे माहित पडते काय ? खर्र सांगा बरे !

अवांतर : संपादक मंडळींस कोणी

अवांतर : संपादक मंडळींस कोणी कोणास कोणती श्रेणी दिली हे माहित पडते काय ? खर्र सांगा बरे !

नाही. कोणी किती एकंदर सकारात्मक/नकारात्मक श्रेणी दिल्या तेवढंच समजतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही सुविधा चांगलीच आहे. "वा

ही सुविधा चांगली आहे. "वा वा, अप्रतिम, छान, +१" अशा फुटकळ कमेंट्स वाचाव्या लागत नाहीत.
दुरुपयोग वगैरे फुकाचा आरडाओरडा आहे.

>>सुविधा चांगली आहे मात्र

>>सुविधा चांगली आहे मात्र काही जण याचा दुरूपयोग करताना दिसल्याने उद्वेग निर्माण होतो.

सुविधा चांगली आहे मात्र काही जण याचा दुरूपयोग करता अशी तक्रार काही सदस्यांनी केली आहे..

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

श्रेणी

श्रेणी पद्धत चांगली आहे, त्यामुळे प्रतिसादकाच्या बर्‍या-वाईट हेतूंचे माप, त्याच्या पदरांत , लगेचच घालता येते.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

मी श्रेणीनुसार प्रतिसाद झाकून

मी श्रेणीनुसार प्रतिसाद झाकून ठेवत नाही.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

काय वाचावं हे ठरवणं हा

काय वाचावं हे ठरवणं हा श्रेणीसुविधेचा एक आणि बऱ्यापैकी दुय्यम उपयोग आहे. मुख्य उपयोग म्हणजे प्रतिसाद लेखकाला फीडबॅक देणं हा आहे. अनेक वेळा मूळ लेखाइतकेच प्रतिसाद वाचण्याजोगे असतात. अशा चांगल्या लेखकांना त्यांच्या लेखनाबद्दल दाद श्रेणीसुविधेमुळे देता येते. त्यासाठी वा वा, छान छान, प्लस वन वगैरे उपप्रतिसादांची माळ लावण्याची गरज पडत नाही. विशेष दाद देण्यासाठी 'नुसती मार्मिक श्रेणी देऊन भागलं नाही म्हणून हा प्रतिसाद' असंही लिहिलं जातं. दुसरा भाग म्हणजे ऋण श्रेणींमुळे त्या विशिष्ट प्रतिसादावर मारामाऱ्या, उणीदुणी होण्याचं प्रमाण कमी होतो. ट्रोलिंग करणाराला अशा प्रतिसादांच्या खाद्याची गरज असते. ते कमी करूनही 'हा प्रतिसाद योग्य नाही' असं सांगता येतं. या सुविधेचा तिसरा फायदा असा की संपादकांचं 'कचरा काढणे' हे काम कमी होतं. आत्तापर्यंतच्या चार वर्षांत फक्त तीनचार प्रतिसाद काढलेले आहेत. याचं श्रेय ऐसीच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या धोरणाबरोबरच श्रेणीसुविधेलाही जातं.

काय वाचावं अन् काय वाचू नये

काय वाचावं अन् काय वाचू नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आईवडील, क्लास-मॉनिटर, लायब्ररियन, ब्यान-हॅपी सरकारं, सायटी ब्लॉक करणारे आयटी-अ‍ॅडमिस, संस्थळांवरचे संपादक्स, यांच्याबरोबरच श्रेण्या देणारे इतर सदस्य यांच्या हाती माझ्या वाचनाची दोरी द्यावीशी वाटत नाही. मी प्रतिसाद वाचायचा की नाही हे श्रेणी बघून ठरवत नाही.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

या तीनही सर्वेवर

या तीनही सर्वेवर व्यवस्थापकांनी मतदान करू नये असं वाटतं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.