लढा विपरीत परिस्थितीशी - एका कुत्र्याची गोष्ट

बाबा रामदेवांनी भ्रष्टाचार विरुद्ध लढा पुकारला, सरकार विरुद्ध एका रीतीने युद्धच पुकारले. याचे परिणामहि त्यांना भोगावे लागले. सर्व सरकारी यंत्रणा हात धुऊन पतंजलीच्या मागे पडली. विभिन्न सरकारी विभागांच्या शेकडोंच्या संख्येने नोटीसा, कोर्ट केसेस, इतकेच नव्हे तर अनेक वेळा पतंजलीचे अकाऊंट सुद्धा सीज केल्या गेले. आज एका वाहिनी वर एका कार्यक्रमात, एका पत्रकाराने आचार्य बाळकृष्ण यांना विचारले, त्या वेळच्या विपरीत परिस्थितीतहि पतंजलीची ‘दिन दुनी रात चौगुनी’ उन्नति कशी झाली. याचे रहस्य काय?

आचार्य म्हणाले तुम्हाला एका कुत्र्याची गोष्ट सांगतो. फार पूर्वी इंद्रप्रस्थ नगरीत एक कुत्रा रहात होता. त्याची इच्छा हरिद्वार येथे जाऊन गंगेत स्नान करायची होती. त्यांनी आपली इच्छा आपल्या बायकोला बोलून दाखविली. त्याच्या बायकोनेहि त्याला सहर्ष हरिद्वारला जाण्याची परवानगी दिली. हरिद्वार इंद्रप्रस्थ पासून २५० किमी दूर आहे. जायला ३ दिवस आणि यायला ३ दिवस असे किमान सहा दिवस लागणार होते. सोबत सहा दिवसाची शिदोरी आपल्या गळ्यात टांगून त्या कुत्र्याने दुसर्या दिवशी सूर्य उजाडताच हरिद्वारच्या दिशेने प्रयाण केले.

आपल्या सर्वांना माहित आहे, प्रत्येक कुत्र्याचा एक इलाका असतो. आपल्या इलाक्यात कुणा दुसर्या टोळीच्या कुत्र्याला तो प्रवेश करू देत नाही. जसे त्या कुत्र्याने आपला इलाका ओलांडला आणि दुसर्या कुंत्र्यांच्या इलाक्यात प्रवेश केला. तेथील कुत्रे त्याच्या मागे लागले. त्या कुत्र्या समोर एकच प्रश्न होता, परत फिरावे कि हरिद्वारच्या दिशेने यात्रा सुरु ठेवावी. कुत्र्याने पुढे जाण्याच्या दृढनिश्चय केला. जीव मुठीत घेऊन दुसर्या कुत्र्यांना चुकवत तो हरिद्वारच्या दिशेने धावत सुटला. अश्या रीतीने तो तिसर्या कुत्र्यांच्या इलाक्यात पोहचला, तेथील कुत्रे हि त्याच्या मागे धावले. अश्या रीतीने अनेक इलाक्यांच्या कुत्र्यांना चुकवत, धावत-धावत, तो ३ तासातच हरिद्वारला जाऊन पोहचला आणि गंगेत उडी टाकली. गंगेत स्नान केल्यावर पाहतो तर काय, तेथील कुत्रे त्याच्या स्वागतास सज्ज होते. पुन्हा सर्वशक्तीनिशी तो इंद्र्प्रस्थच्या दिशेने धावत सुटला. सर्यास्तापूर्वीच तो घरी देखील पोहचला. त्याच्या बायकोने त्याला विचारले, स्वामी तुम्ही हरिद्वारला जाणार होता, अजून येथेच कसे? तो म्हणाला, मी हरिद्वारला जाऊन सुद्धा आलो. तिच्या संतुष्टीसाठी सोबत आणलेले गंगाजळहि तिला दाखविले. कुत्र्यांच्या मेहरबानीने त्याने सहा दिवसांचा प्रवास एकाच दिवसात पूर्ण केला.

जशी मदत दुसर्या कुत्र्यांनी ६ दिवसांचा प्रवास एका दिवसात पूर्ण करण्यास त्या कुत्र्याला मदत केली तसेच सरकारच्या मेहरबानी(?) मुळे पतंजलीचे उत्पाद घरा-घरात पोहचले.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

आई ग्ग!!! काय प्रचंड चपखल आहेत दोन्ही गोष्टी. एक झाकावे, दुसरी काढावी आणि तरी संदेश तोच पोचतोय.
आवडली पटाइतजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0