Skip to main content

ही बातमी समजली का? - ९२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.

------------

http://www.hindustantimes.com/india/sc-gives-previous-nda-govt-a-clean-…

वाजपेयी सरकारवरचा एक कलंक म्हणून ओळखल्या जाणार्‍या आरोपांमध्ये दम नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय!

अनु राव Tue, 13/10/2015 - 16:51

In reply to by ऋषिकेश

जॉर्ज माझा फार्फार आवडता माणुस, फॅनच म्हणाना. त्याला २ मिनिटे जरी बोलताना ऐकले तरी त्याची प्रचंड बुद्धीमत्ता कळुन यायची.
तसेही त्याचे वकृत्व आणि त्या मागचा अभ्यास मी दुसर्‍या कुठल्या भारतीय राजकारण्यात बघितले नाही.
देशाचा प्रमुख होण्याची आणि ते उत्तम प्रकारे निभावुन नेण्याची क्षमता असलेला माणुस. युरोप किंवा अमेरिकेत असता तर खरी कदर झाली असती.

चिंतातुर जंतू Tue, 13/10/2015 - 16:57

In reply to by अनु राव

>> जॉर्ज माझा फार्फार आवडता माणुस, फॅनच म्हणाना.

त्यांचे विचार पाहता त्यांना माओ आवडत असावा बहुतेक. मग ह्या समाजवाद्याचं काय करणार तुम्ही?

In 1969, he was chosen General Secretary of the Samyukta Socialist Party, and in 1973 became the Chairman of the Socialist Party.

विकीपीडियावरून साभार.

अनु राव Tue, 13/10/2015 - 17:13

In reply to by चिंतातुर जंतू

माणसाची आयडीओलॉजी बघुन तो आवडता/नावडता होत नाही हो चिंज. यु हॅव मिस्स्ड द पॉईट.

विरुद्ध विचार असलेले पण आवडु शकतात. पण आपल्याला पटणारे विचार असतील पण माणुस चोर असेल तर नाही आवडणार.

चांगल्याला चांगले म्हणायला मला लाज वाटत नाही. जॉर्ज जर चांगला असेल तर त्याला माओ आवडत असेल तरी मला काही फरक पडणार नाही.

अवांतर - काल पुरुषांना नावे ठेवत होते मी, पण जॉर्ज हा मला पुरुष म्हणुन पण आवडतो, असा पाहिजे पुरुष.

अनु राव Tue, 13/10/2015 - 17:18

In reply to by चिंतातुर जंतू

चिंज - मी काल तुम्हाला मी कोणाला समाजवादी म्हणते ते सांगितले, त्यात जॉर्ज बसत नाही ( जरी पूर्वी तो स्वताला समाजवादी म्हणायचा ). पण सुधेंद्रू कुलकर्णी मी म्हणते तसा समाजवादी आहे ( जरी तो गेली कीत्येकवर्ष भाजप मधे आहे )

चिंतातुर जंतू Tue, 13/10/2015 - 17:34

In reply to by अनु राव

अनु राव उवाच (काल) -

>> मेंढ्याचे कातडे पांघरुन कळपात शिरलेला कोल्हा!!!

>> २०२० साली जर मोदीच पंप्र असतील तर मेंढ्याचे कातडे पांघरलेले लाखो कोल्हे दिसतील. त्यात सध्याचे सेक्युलर समाजवादी अग्रणी असतील.

जॉर्ज फर्नांडिस - एकेकाळचे डावे, कट्टर संघविरोधी -

In a debate preceding a vote of confidence two years into the government's tenure in 1979, he vehemently spoke out against the practice of permitting members to retain connections to the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) while being in the ministry in the Janata Party. The leaders of the Bharatiya Jan Sangh, among them Atal Bihari Vajpayee and Lal Krishna Advani, refused to give up their allegiance with the RSS, leading to a split within the Janata Party. The issue of "dual membership" caused Morarji Desai to lose the vote of confidence, and his government was reduced to a minority in the Lok Sabha

(विकीपिडियावरून साभार)

पण अनेक वर्षं सत्तेपासून दूर राहिल्यानंतर वाजपेयींच्या सरकारमध्ये सामील (१९९६ आणि १९९८).

अनु राव Tue, 13/10/2015 - 17:41

In reply to by चिंतातुर जंतू

चिंज - जॉर्ज ची सर्व हिस्टरी मला माहीती आहे. मला काय म्हणायचे ते तुम्हाला नीट कळले आहे पण तुम्ही मुद्दाम वेड घेऊन पेडगावला जात आहात.

जॉर्ज संघाच्या जवळ गेला म्हणुन मला आवडायला लागला नाही. तो विरोधात असता तरी तितकाच आवडला असता.
जॉर्ज आवडतो कारण तो आवडण्यासारखा आहे म्हणुन.

अ.बि. बाजपाई हा माझा अत्यंत नावडता माणुस आणि राजकारणी आहे. तर नरसिंह राव आवडता राजकारणी आहे ( त्यात ते माझ्या ५० % जातीचे होते). अटलबिहारी ला मी माझे समाजवादी हे विशेषण लावते.

अस्वल Tue, 13/10/2015 - 21:37

In reply to by अनु राव

तुम्ही तुमची सोम-बुध-शुक्रवारची मतं आणि मंगळ-गुरू-शनिवारची मतं वेगळी आहेत ते एकदा स्पष्ट करून टाकाच.
म्हणजे मग वाचताना आम्ही लक्षात ठेवून वाचू.
रविवारी तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही सुट्टी. एंजॉय.

.शुचि. Tue, 13/10/2015 - 21:40

In reply to by अस्वल

अनुचं हे समाजवादी/कम्युनिस्ट काही मला कळत नाही पण ती जर स्वतःला कॉन्ट्रॅडिक्ट (इन केस) करत असेल तर .... मी वॉल्ट व्हिटमन च्या या ओळी म्हणेन -
.
Do I contradict myself?
Very well then I contradict myself,
(I am large, I contain multitudes.)

चिमणराव Tue, 13/10/2015 - 17:18

माफ करा-
सर्व कम्युनिस्ट फर्डे वक्ते असतात,
शेवटचा कारखाना बंद होईपर्यंत.
तो बंद झाला की बोलायलाच काही उरत नाही.

आखाती देशांतून बक्कळ पैशे आणून काही केरळींनी परत येऊन डेअरी व्यवसाय सुरू केलाय.-
केरळी गडी लाल झेंडा एका हातात घेऊन दूध काढतात,
तमिळ गडी सारखे सारखे सुट्टीवर जातात गावी घर शाकरायला,
शेवटी युपी बिहिरी आले.
गोरखपूर/पटना -एर्नाकुलम/तिरुवनंतपुरम गाड्या वाढवल्या आहेत.

गब्बर सिंग Tue, 13/10/2015 - 21:26

Measuring World Poverty as It Shrinks

या वर्षीचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक विजेते Angus Deaton यांच्याबद्दल --

Mr. Deaton is a strong critic of foreign aid. He believes that the approximately $5 trillion given by governments of rich countries to poor countries over the past 50 years has undercut good governance by making poor countries’ leaders less accountable to their own citizens.

.शुचि. Tue, 13/10/2015 - 21:59

In reply to by गब्बर सिंग

वाचयचा प्रयत्न केला. कळत नाही. तुम्ही हे पाहीलं असेलच (९९.९९%). जस्ट इन केस - http://blogs.lse.ac.uk/politicsandpolicy/five-minutes-with-angus-deaton…

In your book’s introduction, you say: “Those of us who were lucky enough to be born in the right countries have a moral obligation to reduce poverty and ill health in the world”.

The moral obligation is important because I don’t want it to sound like I’m a heartless bastard who has no interest in this partly because there’s just this: these people are hurting and if you can help them you ought to help them. Secondly, some of their hurt is to do with us, you know the colonial programme was not a great success. It might have been a great success for the Brits, it was not a great success for what happened in India. So we owe them big.
----- I have students I meet at Princeton who come to me and say “I want to devote my life to making the world a better place” and “I want to dedicate my self to reducing global poverty” and I say there are two ways: one is impossibly hard but I know at least one person who did that, some other people have done it. You go to Sierra Leone, you go to India or wherever. You become a citizen, you use your skills to help local groups agitate. You don’t take any money from outside, you just become like them and you use the skills and knowledge you’ve learnt here to help them. My friend Jean Drèze is an activist in India who’s been incredibly successful in doing this. He had to renounce his Belgian citizenship, it was very hard for him to even get that done. He lives without money because he’s frightened of being compromised by that and he’s been enormously successful. But it’s like the camel going through the eye of the needle right? It’s hard.

गब्बर सिंग Tue, 13/10/2015 - 22:27

In reply to by .शुचि.

“Those of us who were lucky enough to be born in the right countries have a moral obligation to reduce poverty and ill health in the world”.

माझं नेमकं इथं अडतं. माझे इतरांप्रति ऑब्लिगेशन आहे कारण मी रिसोर्सफुल आहे ?? इतरांचं माझ्याप्रति काहीही ऑब्लिगेशन नाही ?? मला इतरांचा अंशतः गुलाम बनवून तुम्ही काय साध्य करू इच्छिता ? मोरल ऑब्लिगेशन माझ्यावर टाकून मोरल हजार्ड निर्माण करत नाही आहात ?? नक्की ??

------------

you go to India or wherever. You become a citizen, you use your skills to help local groups agitate. You don’t take any money from outside, you just become like them and you use the skills and knowledge you’ve learnt

जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा.

.शुचि. Tue, 13/10/2015 - 22:34

In reply to by गब्बर सिंग

तेच ... त्यांचे विचार आणि तुमचे जुळत नाहीत असेच मला प्रथमदर्शनी वाटले.

The moral obligation is important because I don’t want it to sound like I’m a heartless bastard

हे वाचून हसू आलं होतं :)
____
पण गब्बर, तुम्हाला त्यांचे विचार पटतात का आणि असल्यास कोणते विचार पटतात आणि का ते वाचायला खूप आवडेल. विशेषतः त्यांचे म्हणणे असे वाटले की गरीब देशात पॉलिसी व्यवस्थित, लोकांच्या/मतदारांच्या संमतीने राबवल्या जात नाहीत त्यामुळे फॉरीन एड फुकट जाते.

.शुचि. Thu, 15/10/2015 - 02:21

In reply to by गब्बर सिंग

=)) चो च्वीट .... मी खूप हसतेय. मी त्या वाक्यावरच हसले आणि आता तू डिफेन्सिव्ह झालायस हे पाहून .... माझे डोळे निवले गब्बर :)
मूर्खासारखं बरळतेय मी. I better stay away a couple of days. Will do good to me & everyone else.

उदय. Thu, 15/10/2015 - 04:08

In reply to by .शुचि.

नवीन प्रतिसाद देण्याऐवजी खालचा 15:41 चा प्रतिसाद संपादित करायचा ना? पुढच्या वेळी यादीत नाव वरती येण्यासाठी किती तो खटाटोप? :P

.शुचि. Thu, 15/10/2015 - 02:11

In reply to by गब्बर सिंग

गब्बर तुमचा मुद्दा मान्य आहे शिवाय भीका मागून परत जे कोणी देणार नाही त्यांना "हार्ट्लेस बा**" म्हणायची ऑडेसिटी दाखवायची - हा हसण्याचा मुद्दा नाही/नव्हता. I take back my snicker(laughter).
.
मलाच वरचं माझं हसणं एकदम मूर्खपणाचं वाटतय.
.
I am terribly sorry of my tactless, tasteless remark. :(
.
हेच सांगायचं होतं.

गब्बर सिंग Tue, 13/10/2015 - 22:43

In reply to by .शुचि.

विशेषतः त्यांचे म्हणणे असे वाटले की गरीब देशात पॉलिसी व्यवस्थित, लोकांच्या/मतदारांच्या संमतीने राबवल्या जात नाहीत त्यामुळे फॉरीन एड फुकट जाते.

फॉरिन एड फुकट जाते असे असेल तर डोमॅस्टिक एड काम करते असे कसे ?? फॉरिन एड फुकट जाते कारण - it undercuts good governance by making poor countries’ leaders less accountable to their own citizens. हा मुद्दा डांबिसा मोयो यांनीही मांडला होता. Dead Aid या पुस्तकात. मग डोमॅस्टिक एड दिल्यामुळे अचानक अकाऊंटॅबिलिटी कशी सुधारते ? शेतकर्‍यांना कर्जमुक्ती/कर्जमाफी देणे, कमी दराने कर्ज देणे, सबसिड्या देणे - ही डोमॅस्टिक एड कशी नाही ??

.शुचि. Tue, 13/10/2015 - 22:55

In reply to by गब्बर सिंग

हा मुद्दाही कळला -

We have also got ourselves into the situation where the donors have to give money even more than the guys have to receive it. Because guys at the World Bank don’t get paid if they don’t shift the money! I think it’s much the same in the UK’s Department for International Development (DFID). I think they have very strong incentives to keep the aid flowing. Of course the people receiving it know that very well and they can behave badly and with impunity. I think that really does make this contract very fragile.
ते म्हणतायत की जागतोक बँकेला मदतीचा प्रवाह कायम ठेवावाच लागतो कारण त्यावरच तर त्यांची (जागतिक बँक) रोजीरोटी अवलंबून आहे. पण त्यामुळे गरीब देशांनी माजुर्डेपणा केला तरी खपतो/चालविला जातो.
.
काही उतारे कळतायत रे. पण जर तू मस्त लेख टाकलास तर .... खूप आवडेल. विनंती आहे. तुला वेळ आणि रस किती आहे त्यावर अर्थात तू ठरवशीलच. पण बरेचदा तू भरभरुन बोलावस अन छान चर्चा झडाव्यात असे वाटते. आम्ही (मी) ढ आहोत रे अर्थशास्त्रात.

.शुचि. Tue, 13/10/2015 - 23:59

In reply to by गब्बर सिंग

ह्म्म्म! तुमचं म्हणणं असं दिसतय की सिस्टीमच बदलली पाहीजे. श्रीमंत अधिक श्रीमंत होवोत व गरीब एक तर गरीब होत जावोत किंवा दुप्पट्/तिप्पट जोर लावून गरीबांनी त्यांचे राहाणीमान सुधारावे. अन असा तिप्पट जोर ज्यांना जमणार नाही , ते नष्ट (डेमॉलिश) झाले तरी हरकत नाही.
थोडक्यात - Survival of the fittest.
.
तुम्ही Karpman drama triangle वाचले आहे का? - The drama triangle is a psychological and social model of human interaction. human interaction – typically between the roles of Persecutor, Victim and Rescuer
.

Initially, a drama triangle arises when a person takes on the role of a victim or persecutor. This person then feels the need to enlist other players in to the conflict. These enlisted players take on roles of their own that are not static and therefore various scenarios can occur. For example, the victim might turn on the rescuer, the rescuer then switches to persecuting — or as often happens, a rescuer is encouraged to enter the situation.[4]
.
मला वाटतं या मॉडेलनुसार जर कोणी तरी व्हिक्टीम च रोल केला जसे गरीब तर कोणी ना कोणी तरी "The Rescuer" बनतच रहाणार. जसे की गव्हर्न्मेन्ट.
.
गब्बरसारखे लोक - The Persecutor: The Persecutor insists, "It's all your fault." The Persecutor is controlling, blaming, critical, oppressive, angry, authoritative, rigid, and superior.
गरीब - The Victim: The Victim is of course persecuted. The Victim's stance is "Poor me!" The Victim feels victimized, oppressed, helpless, hopeless, powerless, ashamed, and seems unable to make decisions, solve problems, take pleasure in life, or achieve insight.
गवर्न्मेन्ट - The Rescuer: The rescuer's line is "Let me help you." A classic enabler, the Rescuer feels guilty if he/she doesn't go to the rescue. Yet his/her rescuing has negative effects: It keeps the Victim dependent and gives the Victim permission to fail.

नितिन थत्ते Tue, 13/10/2015 - 22:34

In reply to by गब्बर सिंग

>>माझे इतरांप्रति ऑब्लिगेशन आहे कारण मी रिसोर्सफुल आहे ??

मी रिसोर्सफ़ुल आहे कारण मीच थोर आहे असं तो मानत नसावा. माझ्या रिसोर्सफुल असण्यात माझ्या थोरपणाखेरीज इतरही बाबींचा वाटा आहे असं तो मानत असावा.

.शुचि. Tue, 13/10/2015 - 22:36

In reply to by नितिन थत्ते

पण मग थत्ते इतर बाबी सर्वांना सारख्याच होत्या की. मीच का रिसोर्सफुल झालो? माझा केवळ माझा थोरपणाच असला पाहीजे.

नितिन थत्ते Wed, 14/10/2015 - 07:21

In reply to by .शुचि.

का बुवा? माझ्या पणजोबांनी तुमच्या पणजोबांवर बळजोरी करून त्यांना लुटले असेल. आता मी या लुटलेल्या संपत्तीचा वारस आहे. (प्लीज नोट: गब्बर रिसोर्सफुल फक्त पैसेवाल्यांना समजतो]. म्हणून माझ्याकडे (तुमच्या पणजोबाची लुटलेली) संपत्ती आहे. मग मीच रिसोर्सफुल आहे म्हणून श्रीमंत आहे हे कसे म्हणणार?

गब्बर सिंग Tue, 13/10/2015 - 23:28

In reply to by नितिन थत्ते

मी रिसोर्सफ़ुल आहे कारण मीच थोर आहे असं तो मानत नसावा. माझ्या रिसोर्सफुल असण्यात माझ्या थोरपणाखेरीज इतरही बाबींचा वाटा आहे असं तो मानत असावा.

https://en.wikipedia.org/wiki/You_didn%27t_build_that

.शुचि. Tue, 13/10/2015 - 23:51

In reply to by गब्बर सिंग

हां कळलं मला - Economic liberalism - (Smith claimed that if everyone is left to their own economic devices instead of being controlled by the state, then the result would be a harmonious and more equal society of ever-increasing prosperity) चे गब्बर पुरस्कर्ते आहेत. जे की ओबामा पुरस्कृत - Economic progressivism च्या विरुद्ध आहे.
___
हे परत लक्षात रहाणार नाही. पण निदान मेंदूला व्यायाम घडतोय :) .... मस्त!!! Stretching of mind everyday is as important as stretching your body.

मनोज२८ Tue, 13/10/2015 - 22:00

साथी जॉर्ज भाई खरा थोर समाजवादी . महाराष्ट्र , बिहार , कर्नाटक कुठूनही निवडणूक लढण्यास हा गडी तय्यार असे. राजकारणाची सूक्ष्म जाणीव आणि नेहरू घराण्याचा तिरस्कार करण्याचा समर्थ वारसा चालवणारा राम मनोहर लोहीयांचा चेला.

बाकी चेले सोय पाहून अंकित झाले म्हणू साथी जॉर्ज - साथी असूनही कडक सलाम.

अस्वल Wed, 14/10/2015 - 01:27

सेनेची भूमिका पटत नसेल तर भाजपने सत्तेतून बाहेर पडावे
शिवसेनेच्या प्रातिनिधींची वाक्य शिरिअसली घेणं कधीच बंद केलं तरी हे लेटेश्ट म्हणजे कहर आहे.
ह्यांच्या पक्षाची पोजिशन काय, ह्यांचे उद्योग काय, किती चिंधीगिरी करावी ह्याला काही लिमिट?
एक तर सत्तेत आहात तर चुपचाप आपलं काम करा नाहीतर गुमान विरोधी पक्षात बसून नेहेमीचे चाळे चालू ठेवा.
दोन्ही एकत्र करण्यात काय अर्थ आहे?

.शुचि. Wed, 14/10/2015 - 02:33

In reply to by अस्वल

शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत?
.
विधानसभा निवडणुकांपासूनच बिनसलेले शिवसेना-भाजप युतीचे सूत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुटल्याचे जवळपास स्पष्ट झालेले असतानाच आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर सुधींद्र कुलकर्णींवरील शाईफेक प्रकरणावर भाजपने शिवसेनेवर जाहिरपणे टीका केल्याने उभय पक्षांमधील दरी आणखीन रुंदावली आहे.

पिवळा डांबिस Thu, 15/10/2015 - 00:50

In reply to by .शुचि.

उभय पक्षांमधील दरी आणखीन रुंदावली आहे.

मग हे उभय पक्ष त्याच दरीमध्ये उड्या मारून जीव का देत नाहीत एकदाचे?
शिंची कटकट मिटेल! नीट राज्यकारभार करायचा ते सोडून उगाच पब्लिकला धमक्या कशाला देतायत?
(संतप्त इमोटी)

.शुचि. Wed, 14/10/2015 - 02:12

alumni interviews make applying to college resemble a lengthy romantic courtship. Rejection feels less like striking out on a first date than getting left at the altar.
बाप रे! वास्तव कठीण आहे.
Although I see why they want so much information, all this data puts a mask of intimacy on what is inevitably a factory system.
.
You may have heard this chestnut: “The hardest thing about getting a Yale (or Harvard, or Stanford or Fill-in-the-Blank Elite University) degree is getting accepted in the first place.” For me, it rings true. Dozens of people have asked me, “Wow, how did you get into Yale?” Not a single one has ever asked, “Wow, how did you manage Yale coursework?”

उदय. Wed, 14/10/2015 - 03:28

In reply to by .शुचि.

बरे झाले, अमेरिकन कॉलेजमधील अ‍ॅडमिशनचा मूर्खपणा कोणीतरी स्पष्टपणे सांगितला. सध्या याच फेजमधून जात आहे, पण we are not going to play this stupid game. माझ्या मुलाने ठरवले आहे की त्याला कुठे जायचे आहे. १ टॉपचा पर्याय, १ मध्यम पर्याय आणि १ हमखास पर्याय अश्या ३ च ठि़काणी अप्लाय करणार. जिथे अ‍ॅडमिशन मिळेल तिथे जाणार, जास्त कटकट नाही. :)

पिवळा डांबिस Thu, 15/10/2015 - 22:33

In reply to by उदय.

तुम्हाला (आणि शुचिलाही) काय कमी आहे हो? :)
कॉलेज टूर काही कंपल्सरी नसते.
आणि जर तुमचा #१,२,आणि ३ चॉईस ठरला असेल तर मग टूरचीही गरज नाही.
बाकी अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसबद्दल म्हणाल तर त्यांना काय काय हवंय ते त्यांनी पाठवलेल्या अ‍ॅप्लिकेशन पॅकेटमध्ये स्वच्छ लिहिलेलं असतं.
ती सगळी डॉक्युमेंटस जर व्यवस्थित पाठवली तर अजून काहीही त्रास नसतो.
फक्त शेवटी जो होकार/ नकार येईल तो पचवायचा इतकंच काम बाकी असतं.
:)

.शुचि. Thu, 15/10/2015 - 23:09

In reply to by पिवळा डांबिस

शुचिलाही) काय कमी आहे हो?

पिडां मी वाचलय (आणि मी असलेच लेख आजकाल वाचून काळजी करतेय)

इन युअर ट्वेन्टीज - $२००,०००
इन युअर थर्टीज - $३००,०००
इन युअर फॉर्टीज -$४००,०००
इतकं सेव्हिंग असलच पाहीजे :(

आणि तुम्ही विचारा काय कमी आहे ;)

पिवळा डांबिस Thu, 15/10/2015 - 23:55

In reply to by .शुचि.

इन युअर ट्वेन्टीज - $२००,०००
इन युअर थर्टीज - $३००,०००
इन युअर फॉर्टीज -$४००,०००
इतकं सेव्हिंग असलच पाहीजे

हे काही मला माहिती नाही बॉ. हे पर पर्सन की पर फॅमिली?
पण मला हे माहिती आहे की एका मुला/मुलीच्या चार वर्षांचा कॉलेजचा खर्च $~२००के आहे.
जास्तच असेल पण कमी नाही....

.शुचि. Fri, 16/10/2015 - 00:18

In reply to by पिवळा डांबिस

येस मलाही तेच वाटलं. पण आत्ता त्यांच्या ट्वीट वर जाऊन "कॉलेज" या शब्दावर सर्च देऊन आले. तेव्हा इतकच दिसलं की वॉलस्ट्रीटने काहीतरी लक्ष घालावं म्हणे. ते कळलं नाही म्हणून गप्प बसले.
.
http://www.politics1.com/p2016.htm ..............https://twitter.com/SenSanders
.
I want Wall Street to help kids in this country attend public colleges and universities tuition-free with a Wall Street speculation tax. ---------- याचा अर्थ काय तेच कळेना =))

पिवळा डांबिस Fri, 16/10/2015 - 00:23

In reply to by .शुचि.

I want Wall Street to help kids in this country attend public colleges and universities tuition-free with a Wall Street speculation tax. ---------- याचा अर्थ काय तेच कळेना

आता आमी ते काय सांगणार?
इथे एकसे एक वरचढ डेमोक्रॅट्स (खरे आणि उतावळे दोन्ही प्रकारचे!) आहेत ऐसीवर, ते सांगतीलच!
;)
आम्ही पडलो त्या पार्टीबाहेरचे, आम्ही गुमान ते २००के जमा करायच्या प्रयत्नात आहोत!

Nile Sat, 17/10/2015 - 00:09

In reply to by .शुचि.

काय शुचि काकू, इथे आहे की लिवलेलं. (स्पष्टीकरणं उतावळ्या डेमोक्राट्सनाच मागा, आम्हाला तशीही फी सवलत मिळणार नाही आणि आम्ही वॉल स्ट्रीटवरही नाही तेव्हा आम्ही इकडे दुर्लक्ष करीत आहोत!)

बाकी, क्यालिफोर्न्यातल्या लोकांना शिक्षणाच्या खर्चाची तक्रार करणे संविधानात बसत नाही. इतक्या चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिट्या असताना, अन त्यात इन-स्टेट ट्युशनमध्ये काम भागत असताना (वर गलेलठ्ठ पगारी नोकर्‍या उपलब्ध असताना) प्रॉब्लेम काय आहे? ;-) (पळा!)

.शुचि. Sat, 17/10/2015 - 00:48

In reply to by Nile

छान आहे दुवा.

Today, total tuition at public colleges and universities amounts to about $70 billion per year. Under
the College for All Act, the federal government would cover 67% of this cost, while the states would
be responsible for the remaining 33% of the cost.

मस्त मस्त.

Nile Tue, 20/10/2015 - 10:27

In reply to by .शुचि.

जेब बुश किंवा ट्रंम्प येइल का पिडां?

या मिडवेष्टातल्या लोकांना जरा जरी राजकारण कळलं असतं कल्याण झालं असतं एव्हाना देशाचं. कॉर्न कमी खा जरा!!

पिवळा डांबिस Mon, 19/10/2015 - 09:13

In reply to by Nile

गब्बर मोड ऑन
"कॅलिफोर्नियातील लोकांनी हा प्रॉब्लेम म्हणून दर्शवलेला नाही. किंबहुना बाकीच्या ४९ फडतूस स्टेटसबरोबर जावं लागतं हे कॅलिफोर्नियाचं दुर्दैव आहे"
गब्बर मोड ऑफ
:)

स्वतंत्र कॅलिफोर्निया झालाच पाहिजे
- अमेरिकन बबन

गब्बर सिंग Mon, 19/10/2015 - 10:03

In reply to by पिवळा डांबिस

वाह. याला म्हणतात स्क्वेअर ड्राईव्ह.

बाय द वे. या दुव्यावरचे पहिले ५ चार्ट्स पहा. विशेषतः क्र. २ व ३.

नंदन Tue, 20/10/2015 - 03:58

In reply to by गब्बर सिंग

AEI ही पैसे घेऊन सोयीस्कर विदा छापणारी संस्था आहे, हे गब्बरेतर जनांच्या माहितीसाठी येथे नमूद करावेसे वाटते.

बाकी स्वतंत्र कॅलिफोर्नियाच्या मागणीला पाठिंबा आहे! तेवढी राजधानी उत्तरेतच ठेवा ब्वॉ.

गब्बर सिंग Tue, 20/10/2015 - 06:43

In reply to by नंदन

AEI ही पैसे घेऊन सोयीस्कर विदा छापणारी संस्था आहे, हे गब्बरेतर जनांच्या माहितीसाठी येथे नमूद करावेसे वाटते.

AEI ने दिलेला हा डेटा खोटा आहे असं म्हणायचंय का ??

ओके. मग हा डेटा पहा

१) CNBC
२) The New York Times
३) usnews
४) The Huffington Post

आणि प्लीज ह्याचे खापर वॉल स्ट्रीट वरच्या फायनान्स कंपन्यांवर फोडा ना. प्लीज. मला खूप आवडेल ते. कितने भूले हुए जख्मों का पता याद आया... असं वाटेल.

नंदन Tue, 20/10/2015 - 08:55

In reply to by गब्बर सिंग

AEI ने दिलेला हा डेटा खोटा आहे असं म्हणायचंय का ??

नै, फक्त Thomas Sowell म्हणतात तसा चेरी-पिक केलेला. आपणच दिलेल्या इतर दुव्यांतल्या मीमांसेने फरक स्पष्ट होईल.

आणि प्लीज ह्याचे खापर वॉल स्ट्रीट वरच्या फायनान्स कंपन्यांवर फोडा ना. प्लीज. मला खूप आवडेल ते.

हॅ हॅ हॅ! तुम्हाला हवं तसं, हवं ते वदवून द्यायला मी AEI आणि तुम्ही ExxonMobil का आहात? ;)

गब्बर सिंग Tue, 20/10/2015 - 10:06

In reply to by नंदन

काय राव ?? फक्त आरोपच करणार आहात का ? ही संस्था खोटा डेटा देते अन तो युजर चेरि पिकिंग करतो !!!

तुम्हाला जे म्हणायचं आहे ते नेमकं मांडा.

नैतर मी मांडतो. बघा पटतंय का ?

१) गेली काही वर्ष अमेरिकेत कॉलेज एज्युकेशन सेक्टर मधे ट्युशन वाढत गेलेली आहे असा माझा दावा आहे. (मी दिलेला डेटा खोटा आहे की चूक आहे की गैरलागू आहे की दिशाभूल करणारा आहे ??)
२) मी दिलेला डेटा पब्लिक व प्रायव्हेट एजुकेशन इन्स्टिट्युट्स मधील विद्यार्थ्यांच्या कर्जाचा आहे. फॉर प्रॉफिट प्रायव्हेट, नॉट फॉर प्रॉफिट प्रायव्हेट, पब्लिक व कम्युनिटी कॉलेजेस तसेच दोन वर्षाचे व चार वर्षांच्या कोर्सेस चा डेटा. आणखी इथे, आणि इथे
३) पुढे - स्टूडंट लोन्स ची आकडेवारी वाढत गेलेली आहे गेली काही वर्षं हे तरी तुम्हास मान्य आहे ?
४) स्टूडंट लोन डिफॉल्ट्स चा डेटा देऊ ?? (डिफॉल्ट्स चा डेटा हा मूळ मुद्द्याशी संबंधित कसा आहे ते सांगू ?)
५) नेमका कसा व कोणता डेटा दिला की तुम्हास हे मान्य होईल की हे चेरिपिकिंग नैय्ये ते ?? को़णी दिलेला डेटा विश्वसनीय असेल (तुमच्या दृष्टीने) ?
६) हा आणखी एक दुवा देतो. हा अमेरिकन सरकारच्या शिक्षण विभागाने जारी केलेला आहे - Do you think this is Cherry Picking ? Or Credible Data ? Truthful ??

पिवळा डांबिस Tue, 20/10/2015 - 10:30

In reply to by गब्बर सिंग

यावर श्री नंदन यांचा प्रतिसाद वाचायला उत्सुक आहे.
तूर्तास तळलेल्या कोलंब्या (पॉपकॉर्न, माय अ‍ॅस!!!) घेऊन बसलो आहे!!!!
:)

गब्बर सिंग Tue, 20/10/2015 - 11:02

In reply to by पिवळा डांबिस

याला Harassment म्हणतात. आम्ही इकडे सात्विक भोपळ्याचे भरीत खाणार आणि तुम्ही मात्र तळलेल्या कोळंब्या ?? कोळंब्यांच्या किंमती वाढत गेलेल्या आहेत याचा डेटा देऊ काय ?? चेरीपिकिंग न करता ?? म्हंजे श्रिंप, लॉब्स्टर, टायगर प्रॉन्स वगैरे सगळ्यांचा डेटा आहे.

पिवळा डांबिस Wed, 21/10/2015 - 00:43

In reply to by गब्बर सिंग

कोळंब्यांच्या किंमती वाढत गेलेल्या आहेत याचा डेटा देऊ काय ??

माशे-मटणात इष्टेटी घालवल्या आम्ही सारस्वतांनी!!! :)

.शुचि. Wed, 21/10/2015 - 00:49

In reply to by पिवळा डांबिस

इष्टेटी घालवल्या

=)) तुमचं काय सांगता ओ ... आम्ही शीकेपींनी कोळ्यांचे मजलेच्या मजले चढविले ;) =))
यावरुन कोणाचा असा गैरसमज झाला की मला मासे फार चांगले बनविता येतात तर मी तो दूर करायला जाणार नाही :P

पिवळा डांबिस Wed, 21/10/2015 - 00:52

In reply to by .शुचि.

लहानपणी माझं माशे खाण्यचं वेड पाहून माझी आई करवादायची,
"मेल्या, कोळणीशीच लगीन कर मोठेपणी!!" :)
ते नाय जमलं...
म्हणून मग एक सीकेपीणच केली!!!!
=))
बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्डस!!!!

नंदन Thu, 22/10/2015 - 03:13

In reply to by गब्बर सिंग

AEI च्या पर्दाफाशाबद्दल इतके हळवे होऊ नका ;)
कॉलेजचे दर वाढत/वाढले आहेत, हे ढळढळीत दिसतंच आहे - मी (विदा + मीमांसा) विरूद्ध चेरी-पिक्ड् विदा (AEIद्वारा) अशी तुलना केली आहे. तुम्हीच दिलेल्या इतर दुव्यांत त्याबद्दल महत्त्वाची माहिती आहे.

.शुचि. Tue, 20/10/2015 - 21:59

In reply to by उपाशी बोका

वा ते वाक्य किती सुंदर आहे. असंच एक प्रचंड आवडलेले वाक्य - Learning is optional so is survival
लर्निंग च्या जागी चेंज वगैरे शब्दही घालू शकता .

.शुचि. Fri, 16/10/2015 - 02:26

In reply to by पिवळा डांबिस

पण नवरा प्रोफेसर आहे तेव्हा त्याच्या सध्याच्या युनिव्हर्सिटीत तरी मुलगी, ४०% ऑफ फी वरती शिकू शकते. :)
हा एक दिलासा आहे.

.शुचि. Wed, 21/10/2015 - 00:48

In reply to by पिवळा डांबिस

पिडा एक्जण तर होते ओळखीचे ते काहीतरी असेच प्रोफेसर होते की कॉलेजात शिकवत म्हणे .... त्यांच्या ४ पोरांना १००% फ्री शिक्षण मिळालं म्हणे.
.
सॉलीड!! लॉटरीच म्हणायची की. पण त्यांनीही ४ पोरं जन्माला घालण्यात रिस्क घेतलेलीच म्हणा. कदाचित त्या रिस्कमुळेच कदाचित त्यांनी ते प्रोफेशन निवडले असावे.

चिमणराव Wed, 14/10/2015 - 03:28

राष्ट्रीय वि स्थानिक स्तरावरचे पक्ष अशी लढाई आहे.इथेही हार खाल्ली,भाजपाच्या हो ला हो केलं तर शिवसेनेला कठीण जाईल.म्हणून सतत विरोध करणं गरजेचं आहे.

अनुप ढेरे Wed, 14/10/2015 - 11:03

http://www.thehindu.com/news/national/sc-says-no-to-sanjiv-bhatt-plea-s…

It condemned his conduct, saying it did not befit a senior police officer. The apex court said Mr. Bhatt was in active touch with “top rival political leaders of Gujarat” in the background of the 2002 riots, and his actions were orchestrated by them to ambush the then Gujarat government.

आणि

It is apparent that the petitioner (Mr. Bhatt) acted in deliberation and consultation with the leaders of rival political party, NGOs. Petitioner in spite of being a senior IPS officer was interacting with the top rival political leaders of Gujarat. He had exchanged e-mails with rival political party leaders and was being tutored by the lawyer of NGO and its activists.

गब्बर सिंग Thu, 15/10/2015 - 09:15

Won’t deploy women on warships yet: Navy

-----------------------------------------------------------------------------------

Driverless buses, platoons of trucks to shape Singapore's transport future

Singapore unveiled its public transport future on Monday, and it was a vision of passengers commuting in driverless buses along roads and freeways populated by platoons of autonomous trucks following a single driver. The city state's plans to streamline its transport future have begun with two self-driving vehicles going through their paces in a Singapore estate that is home to research facilities and educational institutes. The vehicles are the vanguard of two projects - one run by the Singapore-MIT Alliance for Research and Technology (SMART) with the National University of Singapore and one by the Agency for Science, Technology and Research.

ए ए वाघमारे Thu, 15/10/2015 - 10:39

वाजपेयी सरकारवरचा एक कलंक म्हणून ओळखल्या जाणार्‍या आरोपांमध्ये दम नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय!

गंमत म्हणजे या आणि संजीव भट्ट यांच्या बातमीबद्दल एकाही वृत्तवाहिनीवर (मराठी/हिंदी) पॅनेल चर्चा होत असलेली मला तरी दिसली नाही.

ऋषिकेश Thu, 15/10/2015 - 11:27

In reply to by अनुप ढेरे

त्यापेक्षा त्यातली मुख्य पात्रे (वाजपेयी, फर्नांडीस) तित्कासा ट्यार्पी मिळवून देत नाहीत हे कारण असावे :)
किंवा त्यांच्याविरोधात बोलायच्या चौकटीत कोणी बसायला मिळत नसेल :प

अनु राव Thu, 15/10/2015 - 11:40

In reply to by ऋषिकेश

एकाच वेळेस
१. विचारजंतांचे मालक सत्तेवरुन गेल्यामुळे ते विधवा होणे आणि
२. मोदींच्या प्रतिक्रीयेला आक्षेप असणे

ह्या दोन्ही गोष्टी अस्तीत्वात असू शकत नाहीत का? दोन्ही गोष्टी म्युच्युअली एक्स्क्युसीव्ह असायला पाहीजेतच का?

ह्या अश्या "हे" किंवा "ते" असे वॉटर टाईट कंपार्टमेंटलायझेशन मुळे माझ्या सारखी विचारजंत विरोधी लोक थेट मोदीं कँम्पात जातात.

ऋषिकेश Thu, 15/10/2015 - 12:18

In reply to by अनु राव

विचारवंतांचा मुद्द नाही - आधी आधीच्या अग्रलेखात अश्या घटनांवर मोदींनी बोलायलाच हवे वगैरे ठासून न म्हणणारा अग्रलेख अचानक (लोकापवादाच्या भयाने?) मोदींनी बोलायलाच हवे होते म्हणू लागला असे मला वाटले.

गब्बर सिंग Thu, 15/10/2015 - 11:56

शोभा डे यांच्या विरुद्ध हक्क भंग कारवाई ?

विधिमंडल सार्वभौम सभागृह आहे - म्हंजे नेमके काय ? शोभा डे या सार्वभौम नाहीत ??? कोण सार्वभौम नाही ? सार्वभौमत्वाचे मायने कोणते व व्यक्ती सार्वभौम नसल्यास व्यक्तीच्या प्रतिनिधीला सार्वभौमत्व कुठुन मिळते ?? विधीमंडलाचे सार्वभौमत्व हे व्यक्तीच्या सार्वभौमत्वाचे डेरिव्हेटिव्ह आहे की नाही ? हक्कभंगाची कारवाई करताना विधीमंडल हे पोलिसांच्या बलाचा आधार घेणार की नाही ?? घेणार असल्यास - विधीमंडलाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणार्थ पोलिस/सेनादले असतील तर व्यक्तीच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणार्थ कोण आहे ??

विधिमंडलावर अति कटु शब्दात टीका केल्यास विधीमंडलाच्या रेप्युटेशन मधे खूप घट होत असेल तर टीकास्त्र हे इष्टच आहे. नैका ? टीकेमुळे जर विधीमंडलाचे रेप्युटेशन कमी होत नसेल तर टीकास्त्र निष्प्रभ होणार नाही का ? जर टीकास्त्र हे जनतेच्या (विशेषतः पत्रकारांच्या) हातून काढून घ्यायचे असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याची नौटंकी कशासाठी ?? केवळ - स्वातंत्र्य म्हंजे स्वैराचार नव्हे चा बकवास चालू ठेवण्यासाठी ??

.शुचि. Thu, 15/10/2015 - 23:32

In reply to by गब्बर सिंग

विधीमंडळ सार्वभौम म्हणजे कोर्टाच्या "अखत्यारीत " येत नाही असे ते म्हणतायत. पहीले वाक्य - विधीमंडळ हे सार्वभौम सभागृह आहे. त्यामुळे कोर्टाने विधीमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करता कामा नये.
.
शोभा डे कशा असतील सार्वभौम? त्या तर नागरीक म्हणून कोर्टाच्या अखत्यारीत येणारच की.
.
बाय द वे, सार्वभौम म्हणजेच ऑटोनॉमस का?
_____
बाकी ही बातमी वरच्या बातमीशी संबंधीत आहे म्हणून -The author poked fun at Maharashtra government's statement on Twitter, saying they would also replace pop corn with local snacks like vada pav and dahi misal.
"No more pop corn at multiplexes in Mumbai? Dahi misal and vada pav only. To go better with the Marathi movies at prime time," the writer had tweeted.
It prompted Shiv Sena legislator Pratap Sarnaik to demand an apology and move a privilege motion against Shobha De, stating that she had insulted the sentiments of Maharashtrians.
Irked by the author's tweet, Shiv Sena activists staged protests outside her home and brought trays of vada pav and dahi misal with them.
In response, De had tweeted: "Now a privilege motion demanding an apology from me? Come on! I am a proud Maharashtrian and love Marathi films. Always have. Always will!"

ऋषिकेश Thu, 15/10/2015 - 13:54

महाराष्ट्राचे नवे उद्योग धोरण जाहिर

-- राज्यस्तरीय अथवा प्रशासकीय विभाग खरेदी समितीला खरेदीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार
-- खरेदीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी यापुढे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची सर्व प्रकारची खरेदी ई-निविदा पद्धतीने करण्यात येणार
-- सूक्ष्म व लघु उद्योजकांमार्फत खरेदी करण्यासाठी एकूण २४१ वस्तु राखीव
-- त्या वस्तुंच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येणार. (या राखीव वस्तुंची खरेदी करताना त्यापैंकी २० टक्के खरेदी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून करणे बंधनकारक तर राखीव नसलेल्या वस्तुंच्या २० टक्के खरेदीतही ४ टक्के आरक्षण अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांना).
-- राज्याबाहेरील पुरवठादारांचा दर कमीत-कमी ठरल्यास, त्यांच्याकडून फक्त ५० टक्के खरेदी करण्यात येईल व उर्वरित ५० टक्के खरेदी राज्यातील उद्योजकांकडून खरेदी करणे बंधनकारक
-- केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे शासकीय खरेदीत राज्य हातमाग महासंघ व नागपूरस्थित महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ या दोन संस्थांच्या ११ वस्तुंसाठी आरक्षण कायम. परंतु शासनाची इतर महामंडळे, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ व इतर अंगिकृत उपक्रमांना दिलेले आरक्षण रद्द , तथापी त्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतल्यास एकूण खरेदीच्या ३० टक्के खरेदी राखीव ठेवण्यात येणार आहे.
-- अंध व अपंग यांच्या धर्मादाय सस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या दरनिश्चितीसाठी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.

स्वागतार्ह बदल वाटताहेत. गब्बर भौ तुमचे काय मत?

आदूबाळ Thu, 15/10/2015 - 16:00

In reply to by ऋषिकेश

महाराष्ट्राचे नवे उद्योग धोरण जाहिर

मी काही चुकीचं समजतो आहे का? हे महाराष्ट्र सरकारचं खरेदी (प्रॉक्युरमेंट) धोरण आहे.

ऋषिकेश Thu, 15/10/2015 - 16:03

In reply to by आदूबाळ

होय खरेदी धोरण
वर टंकताना उद्योग धोरण कुठून डोक्यात आलं, का टंकलं कळायला मार्ग नाही :)

गब्बर सिंग Fri, 16/10/2015 - 08:20

In reply to by ऋषिकेश

माझं मत निळ्या रंगात.

-- राज्यस्तरीय अथवा प्रशासकीय विभाग खरेदी समितीला खरेदीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार (राज्यस्तरीय असेल तर केंद्रीकरण. हे स्वागतार्ह नाही. )

-- खरेदीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी यापुढे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची सर्व प्रकारची खरेदी ई-निविदा पद्धतीने करण्यात येणार. ( तपशील बघायला हवा. दहा लाखाची खरेदी चार ऑर्डर मधे केली की इ-निविदा पद्धत बोंबलली. पण तरीही पाऊल पडले पुढे.)

-- सूक्ष्म व लघु उद्योजकांमार्फत खरेदी करण्यासाठी एकूण २४१ वस्तु राखीव. (हा प्रकार चक्रमपणाचा आहे. छोट्या उद्योजकांना सर्व्हाईव्ह करता यावे म्हणून हे उद्योग सरकार करते. पण स्केल इकॉनॉमी बोंबलते व त्यामुळे इफिशियन्सी चा जो लॉस होतो त्याचे काय ? तो ग्राहकाला भुर्दंड नैका ? वाजपेयींच्या कालात पण ९०० पेक्षा जास्त आयटम्स जे SSI साठी असलेल्या राखीव लिस्ट मधून काढावे की ठेवावे याचा विचार झाला तेव्हा स्वदेशी जागरण मंच आणि कंपनी ने "कुटिरोद्योगांचे नुकसान होते" असा आरडाओरडा केला होता. मला आठवतं त्याप्रमाणे कै. कुशाभाऊ ठाकरे व एस आर गुरुमूर्ती हे या चक्रमपणाचे म्होरके होते.)

-- त्या वस्तुंच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येणार. (या राखीव वस्तुंची खरेदी करताना त्यापैंकी २० टक्के खरेदी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या उद्योजकांकडून करणे बंधनकारक तर राखीव नसलेल्या वस्तुंच्या २० टक्के खरेदीतही ४ टक्के आरक्षण अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांना). (ही टीकेच्या पलिकडे गेलेली केस आहे.)

-- राज्याबाहेरील पुरवठादारांचा दर कमीत-कमी ठरल्यास, त्यांच्याकडून फक्त ५० टक्के खरेदी करण्यात येईल व उर्वरित ५० टक्के खरेदी राज्यातील उद्योजकांकडून खरेदी करणे बंधनकारक. ( ही तरतूद चॅलेंज केली पाहिजे कोर्टात. एक तर ही क्रोनी कॅपिटलिझम ची केस असण्याची शक्यता आहे. व दुसरे म्हंजे देशांतर्गत ट्रेड वर अशी क्वोटा बंधने लावणे हे अँटी काँपिटिटिव्ह आहेच पण करदात्यांवर अन्याय आहे. हे करताना राज्यसरकारने - हे करून राज्यात बेकारी कमी होईल कारण राज्यात उद्योगधंद्यास पोषक वातावरण निर्माण होईल - अशी पुस्ती जोडलेली असेलच. नक्कीच. )

-- केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे शासकीय खरेदीत राज्य हातमाग महासंघ व नागपूरस्थित महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ या दोन संस्थांच्या ११ वस्तुंसाठी आरक्षण कायम. परंतु शासनाची इतर महामंडळे, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ व इतर अंगिकृत उपक्रमांना दिलेले आरक्षण रद्द , तथापी त्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतल्यास एकूण खरेदीच्या ३० टक्के खरेदी राखीव ठेवण्यात येणार आहे.

(हातमाग मंडळ बरखास्त करून त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव केला पाहीजे. पॉवरलूम्स आले त्याला १००+ वर्षं झाली. हातमागांचं काय घेऊन बसलात ? आणि सरकारने कापण विणण्याच्या धंद्यात का असावे ??)

-- अंध व अपंग यांच्या धर्मादाय सस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या दरनिश्चितीसाठी आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. ( हे सोडून देऊ. )

(अपडेट करतो. बूच मारू नका.)

.शुचि. Fri, 16/10/2015 - 01:52

In reply to by ऋषिकेश

मला जेवढं कळलं त्याप्रमाणे, खाजगी पार्टी सोलिसिटेड किंवा अनसोलिसिटेड ऑफर(प्रस्ताव) राज्यसरकारकडे देते. म्हणजे बहुतेक जर अमका पूल बांधयचा आहे आम्ही इतक्या खर्चात/वेळेत बांधून देउ मग सरकार एक बीड जाहीर करून आवाहन करते की कोणी यापेक्षा कमी खर्चात/वेळेत देईल का? प्रतिस्पर्धी मग स्पर्धेत उतरतात व सरकारला या competition मुळे चांगली फायद्याची ऑफर मिळते. याला स्विस चॅलेन्ज सिस्टीम म्हणतात वाटतं.
.
L1 - हे जर सर्वाधिक कमी पैसे/वेळ वगैरे बीड असेल तर या नव्या खरेदी धोरणापूर्वी पूर्वी ते बीड महाराष्ट्र किंवा अन्य कोणाही राज्यातील पार्टीचे बीड असो त्यांचेकडे जात असे.
.
मात्र आता नवीन धोरणानुसार - L1 हा जर महाराष्ट्र सोडून अन्य राज्यीय स्पर्धक असेल तर त्याला फक्त ५०% च योगदान देता येईल बाकीचे ५०% महाराष्ट्रातून कोणाला तरी द्यावे लागेल (L2 ). मात्र L2 ला L1 चाच दर match करावा लागेल किंवा तसे न करता येण्याचे निदान सुयोग्य कारण द्यावं लागेल.
______
या बदलेल्या धोरणामुळे महाराष्ट्रातील उद्योजकांना प्राधान्य मिळणार हे सूर्यप्रकाशाइतकं लख्ख आहेच पण अजुन आर्थिक दूर्गामी परीणाम काय होतील ते माहीत नाही. :)

माहितगारमराठी Thu, 15/10/2015 - 15:01

In reply to by अनु राव

हायकोर्ट-सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांची वृतपत्रीय बातमी महत्वाची वाटल्यास आपल्याला कोर्टाचा निर्णय मूळातून वाचायचा आहे एवढेच लक्षात घेणे श्रेयस्कर असावे, या अथवा कोणत्याच न्यायालयीन वृत्तांकनाबाबतीत सर्वसाधारण वृत्तपत्रांवर अवलंबित्वास खुपच मर्यादा पडतात, एखाद महिना थांबल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अथवा indiankanoon.org वर आजकल पूर्ण निकाल वाचण्यास मिळण्याची शक्यता असावी. आपल्या माहिती देणार्‍या प्रतिसादासाठी आभार

अनु राव Thu, 15/10/2015 - 15:04

In reply to by माहितगारमराठी

अहो मला फक्त विरोधाभास दाखवून द्यायचा होता.

एकुणात इथे सर्व लोक म्हणतायत की हिंदुत्ववाद्यांसाठी गोहत्या बंदी केली सरकार नी.

पण कोर्ट म्हणतय "धर्मनिरपेक्षतेसाठी" गोहत्या बंदी करा. आहे की नाही गंम्मत.

.शुचि. Thu, 15/10/2015 - 23:36

In reply to by अनु राव

कारण विशिष्ठ धर्माच्या (हिंदू) भावना दुखावु नये म्हणून ही बंदी घाला असे कोर्ट म्हणतय. आणि या पार्शालिटीला "धर्मनिरपेक्षता" असे डिफाइन करतय.
.
मग पोर्कवरही बंदी येणार का?

गब्बर सिंग Fri, 16/10/2015 - 00:07

In reply to by .शुचि.

शॉल्लेट.

भारतीय नागरिकांशी कोणताही व्यवहार करताना भारत केंद्र/राज्य सरकारने कोणत्याही निर्णयप्रक्रियेत धर्म हा निकष म्हणून न वापरणे म्हंजे सेक्युलरिझम - ही व्याख्या कोणालाही मान्य होणार नाही.

ऋषिकेश Thu, 15/10/2015 - 15:05

In reply to by अनु राव

य निकालाची त्वरीत अंमलबजावणी होऊन "आम्ही तर केवळ कोर्टाच्या आदेशाचे पालन करत आहोत" असे सरकार कधी म्हणतेय बघायचे :(

ऋषिकेश Thu, 15/10/2015 - 15:41

बिहार निवडणुकीच्या निमित्ताने चिदंबरम यांचे मुक्तचिंतन वाचनीय आहे.

देशांतर्गत समाजसुधारक आणि कथित विदेशी आक्रमक यांनी वेळोवेळी या समाजव्यस्थेला आव्हान दिले होते. समाजसुधारकांना व्यवस्थेने ताबडतोबीने सामावून घेतले आणि त्यांचे दैवतीकरण केले. आक्रमकांमुळे निश्चितच काही समस्या नव्याने निर्माण झाल्या. या आक्रमकांना तिरस्कृत करण्यात आले. विशेषत: इस्लाम वा ख्रिस्ती या धर्माच्या आक्रमकांबाबत ही प्रक्रिया प्रकर्षांने घडलेली दिसते.
भारतीय घटनेची निर्मिती आणि धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि उदारमतवादी प्रजासत्ताकाचा उदय याद्वारे पारंपरिक एतद्देशीय समाजरचनेला आतापर्यंतचे सर्वाधिक शक्तिशाली आव्हान देण्यात आले.

हा त्यांचा अन्वयार्थ अतिशय रोचक आहे.

अनुप ढेरे Thu, 15/10/2015 - 18:04

http://www.livemint.com/Politics/XoXAlzO9SeGqB15LvBj0yN/SC-extends-volu…

कुठल्याही योजनेसाठी आधार वापरता येणार. ऑगस्टमध्ये कोर्टाने आधार पीडीएस आणि गॅस/केरोसिन सबसीडीसाठी वापरण्याची परवानगी दिली होती. आता पीएफ, जनधन योजना यांसाठी वापरता येइल आधार. डुप्लिकेट आणि बोगस लाभार्थींना वगळण्यासाठी आधारचा खूप उपयोग होतो असं सरकार म्हणतय. आत्तापर्यंत यामुळे झालेल्या बचतीचे सरकारने क्लेम केलेले आकडे बरेच मोठे आहेत. (१२००० करोड).

अनु राव Thu, 15/10/2015 - 18:13

१% लोकांनी क्ष% मालमत्ता बाळगणे समजण्यासारखे आहे. पण २००० पासुन २०१५ पर्यंत हे प्रमाण ३६% वरुन ५३% पर्यत जाणे काही चांगले लक्षण नाही.

a recent study conducted by Credit Suisse throws up some startling facts. The richest 1% of Indians own a mind-boggling 53% of the country's wealth! ( They owned just 36.8% of the country's wealth in 2000 )

In fact, this is one game where we have even managed to beat the mighty US, where the richest 1% own 37.3% of the total country's wealth.

This, even as at the other end of the spectrum 50% of Indians make do with a paltry 4.1% of wealth.

अनुप ढेरे Thu, 15/10/2015 - 18:17

In reply to by अनु राव

यात जर शेअर्सच्या किमती असतील तर थोडं फसवं आहे हे. सेंसेक्स ऑल्मोस्ट पाचपट झाला आहे २००० सालापासून. टॉप १% लोकांची मालमत्ता सेंसेक्स रिलेटेड नक्की असेल.

गब्बर सिंग Thu, 15/10/2015 - 22:55

In reply to by अनुप ढेरे

यात जर शेअर्सच्या किमती असतील तर थोडं फसवं आहे हे. सेंसेक्स ऑल्मोस्ट पाचपट झाला आहे २००० सालापासून. टॉप १% लोकांची मालमत्ता सेंसेक्स रिलेटेड नक्की असेल.

हे जरा तपशील वार सांगा. प्रामाणिक प्रश्न.

अनुप ढेरे Sat, 17/10/2015 - 12:04

In reply to by गब्बर सिंग

गबरू, मुंबैमध्ये लाखोलोकांच्या राहत्या घराची किंमत कोटींमध्ये असेल. या सगळ्यांना कोट्याधीश म्हणणं किंवा मुंबैत लाखो लोक कोट्याधीश म्हणणं हे फसवं आहे असं वाटतं.

पैचान कौन Sun, 18/10/2015 - 20:23

In reply to by नगरीनिरंजन

मुंबईत धरत नाहीत बहुधा कारण नंतर मुले त्याच घरात राहतात आणि जागा सहसा कोणी विकत नाही. भारताबाहेर बहुधा किंमत नेट-वर्थमध्ये धरतात कारण रिवर्स मोर्टगेज प्रकार तिथे वापरले जातात. (चु.भू.दे.घे.)

गब्बर सिंग Thu, 15/10/2015 - 23:00

In reply to by अनु राव

१% लोकांनी क्ष% मालमत्ता बाळगणे समजण्यासारखे आहे. पण २००० पासुन २०१५ पर्यंत हे प्रमाण ३६% वरुन ५३% पर्यत जाणे काही चांगले लक्षण नाही.

फ्रेंच लेखक थॉमस पिकेटी चे पुस्तक** जे २०१३ मधे प्रकाशित झाले त्याचा गाभा हाच आहे. अमेरिकेत हा मुद्दा (इन्कम इनिक्वॅलिटी) हॉट बटन इश्यु झालेला आहे. राजकीय चर्चा तसेच ब्लॉगोस्फिअर मधे.

** पुस्तकाचे नाव - Capital in the 21st Century - हे नाव - दास कॅपिटल वरून घेतलेले असावे. अँगस डीटन यांना २०१५ चे नोबेल मिळाले व त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 15/10/2015 - 18:33

अन्य कारणांवरून सुरू असणाऱ्या कायदेबंदीच्या चर्चेच्या संदर्भात ही बातमी वाचली आणि खरंतर सकारात्मक भावना उत्पन्न झाली.

Jafar Panahi’s Remarkable “Taxi”

.शुचि. Thu, 15/10/2015 - 23:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खूप क्रिएटिव्हली रिबेलस आहे. लेख आवडला.
___
Russian Ark या आर्ट्फिल्मची आठवण झाली. यात एक नॅरेटर (खरं तर भूत) राजवाड्यातून फिरत असतो व कॅमेरा त्याच्याबरोबर फिरत, त्याच्या दृष्टीकोनातून तो पॅलेस त्यातील पेंटींग्ज, व्यक्तीरेखा उभ्या करतो.
____
अर्थात "टॅक्सी" सिनेमातील व Russian Ark सिनेमातील साम्य फक्त फिरता कॅमेरा इथेच समाप्त होते.

.शुचि. Thu, 15/10/2015 - 21:38

Awards mean nothing to me and therefore I won't bother returning them - Naseeruddin Shah
.
On over 40 writers returning their awards in protest against the lynching of a Muslim man in Dadri and a series of murders of writers and rationalists, Shah said he did not approve of their actions. "I wish those writers, instead of returning their awards, had written more strongly on what is happening to India in protest," he said.
"Awards mean nothing to me and therefore I won't bother returning them," Shah, a recipient of Padma Bhushan, Sangeet Natak Akademi and other prestigious awards, said.

.शुचि. Fri, 16/10/2015 - 00:54

Angus Deaton & More nutrition puzzles
(१) urban areas, was eating fewer calories in 2005 than it was in 1983. This was despite the fact that the average household were getting richer, and that many people would have been healthier if they consumed more.
.
(२) Considering that height is importantly shaped by early-life health, and that richer people tend to be healthier, we might expect a country’s economic performance to be a good predictor of the average height of its people. But, as Professor Deaton has demonstrated, per capita gross domestic product is a poor predictor of the average height of adult women in developing countries. In fact, women and children in sub-Saharan Africa are taller than women and children in India, despite the fact that Indians are on average richer.
.
(३) year after year, younger generations of adult men in India are becoming taller than the older generations at a faster rate than Indian women are becoming taller. This strongly suggests some form of discrimination against the girl child in health or nutrition.

.शुचि. Fri, 16/10/2015 - 11:15

In reply to by गब्बर सिंग

मन ने ही पोस्ट ८ ऑक्ट ला खफवर टाकलेली आहे.
वरच्या बातमीत जरी म्हटलं असलं, शेफाली वैद्य यांची ही पोस्ट नाहीच मुळी.
______________________
प्रद्युम्न परांजपे ह्यांची एक फेसबुक पोस्ट अनुरावांना आवडेल असं वाटतं :-
माझा भारत देश ………
जिथे दीड वर्षांपूर्वीपर्यंत सर्वार्थाने धार्मिक सलोखा होता,नाटक,पुस्तक,चित्रपट यावर कधीच बंदी घातली गेली नव्हती, जातीयवाद अस्तित्वातच नव्हता, गरीब की भूख वगैरे फक्त चित्रपटांत ऐकलं होतं,शेतकरी अब्जाधीश होते त्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या वगैरे त्यांनी स्वप्नातही पाहिलं नव्हतं,पर्यावरण तळ-हाताच्या फोडा सारखं जपलं होतं ,गोहत्या बंदी सारखे कायदे अस्तित्वात यायचे होते (अनेक राज्यांत ते पहिल्यापासून आहेत असं सांगणारे खोटारडे आहेत) ,भ्रष्टाचार,खून,बलात्कार हे शब्द माहीतही नव्हते, दंगल आणि हिंसाचार फक्त बाबरी मशीद आणि गोध्रा यामुळेच माहित होते,१९८४ असं वर्ष या देशात कधी आलंच नाही (त्यामुळे १९८४ मध्ये शिखांची वंशहत्या केली ही अफवा आहे). त्यामुळे २००२ च्या आधी संपूर्ण देशात आणि त्यानंतर गुजरात वगळता संपूर्ण देशात टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता नांदत होती. दु:ख म्हणजे नक्की काय बुवा हे जाणून घेण्यासाठी लोक केसरी टूर्स बरोबर पालेस्टाईन किंवा सुदानला जाऊन यायचे. सुख,स्वर्ग,चांगलं-चुंगलं म्हणजे केवळ भारत हेच जगाला माहित होतं. काय दिवस होते ते !!
पण … नियतीला हे सुख बघवलं नाही आणि १६ मे २०१४ चा तो काळा दिवस उगवला……… केंद्रात नवीन सरकार आलं आणि जे जे म्हणून वाईट आहे ते ते या देशाने आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं.
आमच्या इमारती समोरची कचरापेटी हलवण्या पासून ते राज्यांत कायदा सुव्यवस्था राखणे ही केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांची कामं आहेत हे आम्ही हुशार नागरिक जाणतो पण या केंद्र सरकारला हे माहित नसावं. त्यामुळेच आमच्या नळाला pressure कमी आहे आणि तरीही पंतप्रधान गप्प आहेत. GDP १०० trillion dollars वरून २ trillion dollars वर आला आहे. संभाजी ब्रिगेड आणि "विवेकवादी" मंडळींनी एकत्र येउन पुरांदारेंना ते नीच जातीचे असल्याने (हा जातीयवाद नव्हे याची नोंद घ्या) विरोध केला होता तरीही त्यांच्या सारख्यांना पुरस्कार मिळत आहेत. रोज दंगली होत आहेत.१६ मे च्या रात्री पासून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. हिंसा तर इतकी वाढली की २०१९ मध्ये मतदानाला कोणी शिल्लक नसेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही पेज ३ विचारवंत आणि फेसबुक विचारवंतांनी (मी यांना गुरुस्थानी मानतो) देशाचा तालिबान झाला आहे अशी प्रतिक्रिया गुप्तपणे व्यक्त केली (कारण उघडपणे बोलायची सोय आता राहिली नाही) तेव्हा, इतक्या वाईट सरकारशी आपली तुलना केल्याचं बघून नाराज झालेल्या तालिबानने एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करायचं ठरवलं आहे. या सगळ्यावरून लक्षात येईलच की देश दु:खाच्या खाईत लोटला गेला आहे. कोणाला वाटेल की मी परदेशात असल्याने सुरक्षित आहे पण तसं नाही. १६ मे २०१४ पासून माझा देखील पोटदुखीचा त्रास बळावला आहे आणि पंतप्रधानांनी यावर एकदाही भाष्य केलेलं नाही. पोटाचा विकार ,जातीयवाद,धार्मिक तेढ,अस्वच्छता,भ्रष्टाचार, खून,बलात्कार यात जनतेची काहीही चूक नाही. जर कोणी चुकत असेल तर ते पंतप्रधान.
तर अशा या वाईट सरकारचा आणि पंतप्रधानांचा निषेध म्हणून मी पण या सरकारला काहीतरी परत करायचं ठरवलं आहे. दासबोध पाठांतर स्पर्धेतलं बक्षीस परत करणार होतो पण रामदास स्वामींना संभाजी ब्रिगेड या पुरोगामी संघटनेने वाईट ठरवलं असल्याने त्या बक्षिसाला काही किंमत नाही. तर मग शेवटचा पर्याय म्हणून मी माझी १२वी ची गुणपत्रिका (१२ वी हे माझं highest qualification आहे ) या सरकारला परत करत आहे आणि हा publicity stunt नसून माझी जळजळ ……. हे आपलं तळमळ आहे.
आम्हा अनेक पुरोगाम्यांच्या आवडत्या ओवेसीं सारख्यांचं राज्य या देशात यावं आणि हा देश परत पूर्वीसारखा बनावा ही इच्छा.

अतिशहाणा Fri, 16/10/2015 - 16:02

भारतात राहण्यासाठी मुस्लिमांनी बीफत्याग करणे आवश्यक इति हरयाणा मुख्यमंत्री. (हिंदूंनी बीफ खाल्ले तर चालेल काय याबाबत काही टिप्पणी नाही)
http://indianexpress.com/article/india/india-news-india/muslims-can-liv…

आधी मी असे म्हटलोच नाही वगैरे कोलांटउडी मारली परंतु त्या दुव्यावर आता ऑडिओ क्लिपच उपलब्ध आहेत.

अतिशहाणा Fri, 16/10/2015 - 18:10

जुनी बातमी पण तरीही द्यावीशी वाटली. गूगल कारने १ मिलियन मैलांचा प्रवास अपघात न करता पूर्ण केला. (काही अपघात झाले परंतु त्यात सिग्नलला थांबल्यानंतर मागून बसलेली धडक आणि बाजूच्या गाड्यांच्या ड्रायवरचे लक्ष विचलित झाल्याने खरचटणे असे नॉन-फॉल्ट अपघात होते. इतर वेळेस गाडी वापरात नव्हती).

http://venturebeat.com/2015/06/03/googles-self-driving-cars-have-driven…

अतिशहाणा Sat, 17/10/2015 - 00:37

लोकप्रिय गायकांनी लिहिलेली गाणी दुसऱ्या कुणीतरी लिहिलेली असतात हा एवढा धक्कादायक प्रकार का वाटतोय?

http://www.theatlantic.com/magazine/archive/2015/10/hit-charade/403192/…

भारतात तर हा प्रकार अगदी सर्वमान्य आहे. लता-आशा-रफी-तलत पासून आजकालचे बहुतांशी सगळेच गायक दुसऱ्यांनी लिहिलेलीच गाणी गातात.

गब्बर सिंग Sat, 17/10/2015 - 06:58

Most secular people are pro-Muslims and anti-Hindu. They protest against the acts of Hindu fundamentalists and defend the heinous acts of Muslim fundamentalists (तस्लीमा नसरीन उवाच)

-----

https://www.youtube.com/watch?v=3Stdq_3XjPg

बिल माहर व रिचर्ड डॉकिन्स यांचे संभाषण - यात - From 4:35 to 7:00 च्या दरम्यान बरोब्बर मुद्दा मांडलेला आहे. मुसलमानांवर टीका करायची म्हंटलं की लगेच लोकांची तारांबळ उडते.

गब्बर सिंग Sat, 17/10/2015 - 23:48


.....they do not fight on their own, they are made to fight _____ सोनिया गांधी

काय चक्रम बाई आहे ही. कमाल आहे. एक क्षण हे मान्य करू की संघ परिवार हिंदूंना भडकवतो व व भांडणास प्रोत्साहित करतो. मग मुसलमानांना कोण भडकवतं ??? Who makes Muslims Fight ??

.शुचि. Sun, 18/10/2015 - 02:49

In reply to by गब्बर सिंग

हे तू-तू-मै-मै सोडून भविष्यवेधी राजकारण का करत नाहीत आपले नेते? :( जग कुठे चाललय...आपण आपले गायीत ३३ कोटी देव आहेत यच भ्रमात आहोत. निदान मोदी "डिजिटल इंडीया" सारखी भविष्य घडविण्याचे पोटेन्शिअल (मराठी शब्द?) असलेली योजना ऊराशी बाळगून आहेत - आता त्यात तरी अडथळे आणू नका.
अजुन एक - मला सिन्सिअर शंका आहे, राज्यावर असलेल्या पक्षास आवश्यक ठीकाणी विरोध करणे सोडून, अन्य कोणती कामे विरोधी नेते करतात/करायची असतात? ती कामे काँग्रेस करते आहे का?
.
सापडलं -

the opposition has a duty to themselves and to their voters to play the role of
an alternative government and indeed, the role of a government in waiting. In the more mature
democracies, this is well recognized and the leader of the largest opposition party is often given
access to sensitive information on the basis that he or she, as the Prime Minister in waiting, has
to be ready to perform the role of running the country at comparatively short notice.