रुची मातेच्या मांसा(विडंबना)त्मक चविष्ट पदार्थांचे समिक्षण आणि विडंबन भाग १- २-३... याच धाग्यावर विकसीत होत राहतील :)

विडंबन प्रेरणा : बीफचे चविष्ट पदार्थ - भाग एक - चप्पली कबाब हा लेखक/लेखिका: रुची (बुधवार, 07/10/2015 - 07:26) ऐसिअक्षरे संस्थळावरील धागा लेख (नोड क्रमांक:4448:) आणि त्यावरील प्रतिसाद दिनांक १३ ऑक्टोबर २०१५ रोजी जसे वाचले. छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स. (मंडळी विंडबन आहे ह. घ्या.)

ऐसीअक्षरे या संस्थळावरील महान लेखिका टोपणनाव रुची यांच्या मतानुसार (जगातील बहुतांश खवैय्ये आणि स्वैंपाक्यांसाठी Smile ) सामान्यतः खाणेपिणे, स्वयंपाक करणे आणि त्याबद्दल लिहिणे ही अतिशय आनंददायी, स्वांतसुखाय प्रक्रिया असते, कोणी कोणाची (गो)माता जरी खाल्ली म्हणून कुणी साधी कुरकुरही करु नये. ३१४ विक्षीप्त आदिती यांच्या एका प्रतिसादानुसार त्यांना मातेच्या केवळ डोक्याचाच भाग खाण्यासाठी आवडतो Smile ३१४ विक्षीप्त आदितींनी (गो)मातृमांस खाण्यासाठी चळवळोच्छूक मेघना भुस्कुटे यांना (गो)मातेचे मांस उपलब्ध होईपर्यंत मातेच्या केवळ डोक्याचा भाग
खाण्याचा सल्ला देणे शक्य असावे इतके वर्षे माते तु माझे (पदार्थ) खाल्लेस आता मी तुझेsss खाणार ! आलेच मी, हि ह्हा ह्हा sss !! Smile (गो)माते अर्रेsss घाबरून पळालीस ! थांब तो पर्यंत (गाईसम) सासूमातेचे (डोस्के) खाते आलेच मी, हि ह्हा ह्हा sss !! या वर काही साक्ष काढल्यास मी चक्क स्वातंत्र्यवीर सावरकरांचे डोके काढून (संदर्भ) त्यांच्या अनुयायांची डोकी फिरवून त्यातून उपयूक्त पशू(मांस) काढून दाखवणार आलेच मी, हि ह्हा ह्हा sss !! Smile असेच काहीसे चित्र अस्मादीकांच्या चेहर्‍यापुढे तरळले. चिंतातुर जंतू तसेच सर्वश्री ऋषिकेश, यांना वेदोक्त पदार्थांची मेजवानी न मिळाल्यासही ३१४ विक्षीप्त आदितींंचा विनोदी सल्ला कामास येऊ शकतो पण चिंतातुर जंतूची त्यामुळे चिंता वाढेल अशी शंका येऊन सर्वश्री अनुप ढेरे हे चिंतातुर जंतू आणि उर्वरीत (गो)मातामांसाकांक्षी वर्गाची नाराजी (गो)मातामांसा एवजी (गो)मांसभोक्त्या रुची नामक टोपण नावाचे मोठे आचारी अथवा रेसिपी मसाला लावून मैसाहाराने भागवता येईल का याची मोठीच शक्कल लढवण्याच्या तयारीत होते परंतु प्रतिसादकर्ते पिवळा डांबिस यांनी मैसाहारास उग्र हा शब्द संबोधल्याने ऐसीअक्षरेवरील समस्त (गो)मातामांस्भोक्त्या महामंडळाच्या महिला त्यांच्यावर नाराज असल्याची खाजगी गोटातली बातमी असून "मेलं मी काय म्हणते एखाद्याने खायची नाहीतर खाऊ नै म्हैस पण उग्र म्हणून का हिणवावे आणि वरुन ही पुरुषमंडळी प्रेमात येतात तेव्हा (गो)माते असे संबोधन करतात आणि इतर वेळी उग्र म्हणतात एकाच मनुष्यजातीला दोन विरुद्धरुपी प्राण्यांच्या उपमा जळो मेली त्यांची जिभ ! Smile " असा काहीसा सूर असल्याची वार्ता असल्याचे कळते.

यावर (गो)मातामांसखाद्यसम्राज्ञी रुची यांनी अशा बैलां(पुरुषां)ना रात्रभर मुरत ठेवल्याने आणि अनारदाना वापरून त्यांना शिजायला खूप कमी वेळ लागतो, त्यांनाही पहिल्यांदा आश्चर्य वाटले होते. तवा चांगला जाड बुडाचा असावा आणि बैल(मांस) थोड्या तीव्र आचेवर भाजावे. पहिला साधारण कबाब झाल्यासारखे वाटल्यावर त्या तो बैल(मांस) मधून चिरून खात्री करून घेतात म्हणजे त्याप्रमाणे पुढचे बैल(मांस) कबाब भाजता येतात.
आकाराचा बैल(मांस) पोळीत रोल करून खाण्याचा फायदाही बरोबर आहे. रात्रीचे बैल(मांस) कबाब जर शिल्लक राहिले असतील तर अनेकदा त्या बैल(मांस) पोळी, नान अथवा पीटा ब्रेडमधे थोडे सॅलड आणि रायता किंवा हमस घालून डब्यात घेऊन जातात असे उदाहरण त्यांनी समस्त नाराज (गो)मातामांसाकांक्षी महिला मंडळास दिला असल्याचे आणि या सल्ल्याने ऐसीअक्षरेवरील समस्त (गो)मातामांसाकांक्षी पुरुषमंडळींनी (गो)मांसभोक्त्या रुची यांचा हा ऐन नवरात्रात दुर्गावतार संचारल्याचे लक्षात घेऊन साष्टांग दंडवते घातल्याचे समजते अद्यापी आम्ही या बातमीची खातरजमा करण्याच्या प्रयत्नात आहोत. Smile

या लेखाचा उर्वरीत भाग लिहिण्यास विलंब होतो आहे तो पर्यंत रुची मातेचे मांसात्मक चविष्ट पदार्थांचे रुचीरा नामक पुरक निघाल्यास त्यांच्या पुस्तकात कदाचित जे पदार्थ जागा मिळवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जयघोष करु शकतील अशा काही पदार्थांची छायाचित्रे पाहूयात

*गोगलगाय आणि बुशमीटाचे पाल्म ऑईलातील रुचकर नायजेरीयन सूप गोगलगाय मध्ये गाय शब्द आहे म्हटल्यावर (गो)मातामांसाकांक्षी पण उपाशी लोकांना दुघाची तहान ताकावर भागवण्याचा आणि आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डिफायन्स सिद्ध करण्याचा कदाचित उत्तम मार्ग ! शाकाहारी लोकांसाठी यात खासकरून शाकाहारी पाल्म ऑईलच वापरावे असा संकेत आहे Smile

gogalgai sup

*सापांचे सूप बरेच भारतीय सापांचीपूजा करतात काही सर्प प्रेमी असतात त्यांच्या नाकावर टिच्चून खाता येईल असे चिनी सर्पसूप (गो)मातामांसाकांक्षी पण उपाशी लोकांना दुघाची तहान ताकावर भागवण्याचा आणि आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डिफायन्स सिद्ध करण्याचा कदाचित उत्तम मार्ग क्रमांक २ ! डिटेल रिसिपिंसाठी (गो)मातामांससंराज्ञी रुचीमातेच्या रूचीरा किंवा तत्सम ग्रंथाची अथवा ऐसी अक्षरेवरील लेखाची त्यांच्या अनुयायांच्या वतीने विनंती केली जात आहे, त्यांच्याकडून रिसिपिं येईपर्यंत या सुपाचे रुचकर मांडे डोळ्यांनी शक्य तेवढे पाहून सुरेख कल्पनेच्या प्रांगणात विहरत जावे. Smile
sap soup

*डिअरांचे बुशमीट ? (पहिला दुवा) डिअरांच्या बुशमीटांची काही छायाचित्रे गूगल प्रतिमांवर सुद्द्धा उपलब्ध असावित (दुसरा दुवा) या डिअरांच्या बुशमीट (छायाचित्रां)वर कॉपीराइट ('डिअरांच्या बुशमीट (छायाचित्रां)वर कॉपीराइट' हे वाचल्यावर हिंदीचित्रपटसृष्टीतील काही नायक नायिकांची आठवण आली का ? Smileपण रुचीमाता प्रसन्न असल्यानंतर- आणि रुचीमातेने २ ऑक्टोबरला मीठ सत्याग्रहाप्रमाणेच बाटली सत्याग्रह घडवतात याची अप्रत्यक्ष आठवण दिलेलीच आहे- डिअरांच्या बुशमीट चव अपनी अपनी धर्म अपना अपना म्हणून एंजॉयमेंटच्या मध्ये धडपडणार्‍यांना रुचीमाता नैवेद्यं समर्पयामी ने समाधान पावतील आणि डिफायन्ससाठी भरभरुन आशीर्वाद देऊ शकतील अशी शक्यता असल्याची अद्याप खातरजमा नकेलेली वार्ता आहे. रुचीमातेच्या प्रतिसादातील शब्दांचे त्या विशीष्ट हिंदी सिने तारे आणि तारकांनी जरासे विडंबन केले तर कसे दिसेल पहा "दोन ऑक्टोबरला दारुबंदी असते पण म्हणून कोणी विकली आणि कोणी प्यायली तर कोणाला काय पडलेली असते? तसे काहीसे डिअरहत्याबंदीचे असावे असे आम्हास वाटले होते पण अबकड हिंदी सिने तारे आणि तारकांवर कोर्टकेसेस झाल्यामुळे आम्हास खडबडून जाग आली, जनमत किती गढूळले आहे आणि धर्मांध उन्मादात जमाव कोणत्या थराला जाऊ शकतो हे पाहून शहारा आला. Smile हिंदी सिने तारे आणि तारकांकडे पैसा आहे म्हणून काय तो त्यांच्या अभिव्यक्तीवर आणि रुचीवर अन्याय Smile ! (समिक्षण: सदहूर धागा लेखाचे विडंबन कर्ते जे चुकीचे आहे, अन्याय्य आहे त्यास चुकीचेच म्हणतात याची नोंद घ्यावी कोणत्याही एका चुकीने दुसर्‍या चुकीचे निराकरण होतनाही हा मुद्दाही लक्षात घेणे जरुरी आहे असे वाटते) (संदर्भ रुचीमाता प्रतिसाद शुक्रवार, 09/10/2015 - 20:50 node/4448#comment-114522 भाप्रवे १४ ऑक्टोबर २०१५ रोजी १४वाजून २ मिनीटांनी जसा दिसला त्याचे विडबंन) कर्मठांची दांभिकता अंधश्रद्धा आणि कायदा हातात घेणे या गोष्टी चुकीच्याच आहेत पण स्वतःही कायदा हातात घेतला जाण्याचे आणि आम्ही कसे संभावित हे भासवून वरुन स्वतःला पुरोगामी म्हणवणारी दांभिकता खर्‍या पुरोगामी तत्त्वांपुढील अंधश्रद्ध कर्मठांपेक्षाही नुकसान कारक नसते का ?

१८५७च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास काही शाळांमधून व्यवस्थीत शिकवला गेला नाही किंवा सदहूर त्यावेळच्य इतर प्रासंगिक कारणाने का सोईस्कर विस्मरणाने सदहूर लेखिका ">त्याच प्रतिसादाच्या सुरवातीस काय म्हणतात पहा "ज्या भारतात मी वाढले तिथे वेगवेगळ्या समुहाचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे मांस खातात हे गृहित धरलेले असावे असे वाटायचे. मतांच्या राजकरणामुळे बीफबंदी आली तरी बीफ न खाणार्या सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने हा मुद्दा गौण होता आणि कायदा काही झाला तरी कोण काय खातंय याने त्यांना काही फरक पडत असेलसे वाटले नव्हते." लेखिकेला ज्यांच्या मतांच राजकारण होत असे वाटते त्यांची मते कर्मठ नसती तर मतांचे राजकारण होण्याचा प्रश्नच येत नाही, ज्या अर्थी लेखिकेस मतांचे राजकारण वाटते त्या अर्थी किमान काही समुदाय या विषयावर संवेदनशील असणार, त्या संवेदनशीलता कायदा हातात घेतला जाण्याच्या थराला जावयास नकोत हे खरेच, त्या जनमानसातील संवेदनशीलतांशी तुमची सहमती असो अथवा नसो त्या संवेदनशीलतांचे अस्तीत्व पुसले जात नाही, आपण चिकित्सा करत असलेल्या रुचीमातेच्या वाक्यात त्यांना कायदा काय आहे याची जाणीव दिसते पण कायद्यांची अंमलबजावणी सोईस्करपणे व्हावी असा आग्रह दिसतो; बहुसंख्यकांचा प्रत्येक दृष्टीकोण प्रत्येकवेळी बरोबर असतो असे नव्हे अल्पसंख्याकांच्या गरजांचीही दखल घेतली जावी हे ही खरे परंतु जी गरज जिवनावश्यक गरज नाही त्यास जिवनावश्यक असल्याचा अभास निर्माण करत बहुसंख्यांनी लोकशाही मार्गे निर्माण केलेल्या कायद्याची बुज न राखता संवेदनशीलतांची बुज न राखता आपल्या डिफायन्सलाच खरे म्हणण्याची अहंकारी वृत्ती कुणास पुरोगामी असल्याचे बिरुद लावून घेण्यास सोईची वाटत असेल तर तसे करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना जरुर आहे पण त्याने पुरोगामीत्वाचा रस्ता प्रशस्त होण्यापेक्षा पुरोगामीत्वातील दांभिकता उघडकीस येऊन अडसरच अधिक निर्माण होतात किंवा कसे या बद्दल तथाकथित पुरोगाम्यांनी पुर्नविचार करणे गरजेचे असावे किंवा कसे. माझा आक्षेप डिफायन्सला सुद्धा नाही, आक्षेप पुरोगामी चळवळीला दरीत ढकलणार्‍या छुप्या दाभिंकतांना आहे. आणि तो पुरोगामी दृष्टीकोनांना नितळ आणि स्वच्छ दृष्टी लाभावी यासाठी आहे

वराह उदीर ते साप असंख्य प्राणि भारतात पवित्र मानले जातात आणि असे पवित्र मानले जाणारे प्राणि खाल्लेखी जातात अगदी गोमांसासंबंधात पुर्वाश्रमीच्या हिदुधर्मीय श्रद्धा आणि आजच्या श्रद्धा यात जमिन अस्मानचे अंतर आहे. आणि त्या पुढेही बदलतील महत्वाचे हे की इतर पवित्र मानल्या गेलेल्या इतर प्राण्यांबाबत गोमातेप्रमाणे ममत्व भारतीयांना नाही पण ते गाईस मोठ्या प्रमाणावर राहीले. भारतीय उपखंड ही छोटी जागा नाही, इथे विचारवंतांचे आखाडे सर्व काळात भरत, अनेक श्रद्धा त्या-त्या प्रांतांच्या पलिकडे गेल्या नाहीत पण गाई बाबतची श्रद्धा अखंड भारतात पसरली यात मोठ्या अंशाने अधश्रद्धेने साथ दिली असेल पण त्याच्या मागे भारतीय शेती अर्थव्यवस्थेसाठी असलेला उपयूक्तता वाद कितीही अंधश्रद्धा खोडल्या कायदे बदलले तरी तो उपयुक्तता वाद हा पुसणे मिटवला जाणे सहज साध्य निश्चित नसावे. गाईच्या उपयुक्तता वादात काहीच तार्किक तथ्य नसते तर उभ्या हिंदूस्तानात तो तर्क प्रसारीत होणे एवढे सोपे राहीले नसते.

श्रद्धा बदलतात काल पाणि विकणे विकत घेणे पाप माणणारा समाज आज पाण्याची बिनदिक्कत खरेदी विक्री करतो तसे कदाचित गोमांसाबाबत होईलही उद्याचे कुणी सांगितले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मतानुसार भारतीय इतिहासात अस्पृष्यतेस गोमांस निशिद्ध करण्याची वेळ आणि अस्पृश्यतेस सुरवात होण्यास एक सारखीच वेळ किंवा कारणे असावित . ज्यांना लोकांनी उपयुक्तता वादातून गोमांस भक्षण करू नये असे वाटते त्यांनी निरंतर प्रबोधनाचा मार्ग निवडणे श्रेयस्कर ठरले असते त्या एवजी गोमांस भक्षण करण्याचे न सोडणार्‍यांना पिढ्या न पिढ्या सामाजीक बहिष्कारास तोंड द्यावे लागले, भारतीय समाजाच्या मनांची विभागणी झाली हि मनांची विभागणी टाळून गोमांस किंवा इतर कोनताही आहार घेतला म्हणून समाज बहिष्कृत केला गेल्ल्यांना सर्व समाजा सोबत घेण्याचा आणि अगदी गोमांसाहाराचे प्रसंगी समर्थनास तयार असण्याची स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका स्तुत्यच होती तेवढीच शांततातमय मार्गे आणि प्रसंगी कायद्याच्या मार्गाने गाई-बैलांचे भारतीय शेतीसाठीचे अर्थशास्त्रीय उपयूक्तता मुल्य प्रबोधन करुन सर्वोदयी मार्गाने पटवले आणि ठसवले जाण्यातही गैरनाही. एक एकर शेती ट्रॅक्टरने नांगरण्यासाठी खर्च होणार्‍या पेट्रोलीयमसाठी विदेशी गंगाजळी खर्च करण्या एवजी जेवढे बैलांकरवी झाले तेवढीच परकीय गंगाजळीची पैसा दोन पैसे बचतच होते हे सत्य आम्ही नाकारु इच्छितो का ? (अर्थात मांसाच्या एक्सपोर्ट मधून डॉलर्स मिळवून टृअ‍ॅक्टरसाठीच्या पेट्रोलीयमवर खर्च करावेत हा युक्तीवाद करणे शक्य आहेच; अर्थात पेट्रोलीयम पदार्थ मोनोपोली असलेले म्हणुन महाग आणि कापावयाचे गोमांस जगभरातून कुठूनही मिळू शकते म्हणून त्याचा परतावा कमी असेल हे हा तर्क आम्हाला समजून घ्यायचा नसेल तर समजणारच नाही. बैलाच्या मागे शेतात उभा टाकणारा माणूस काढून घेऊन त्याला खाटीक खान्यात रोजगारही मिळतो आणि उन्हात उभे टाकण्याचे कष्टही कमी होतात हाही तर्क एक असाच चांगलाच तर्क आहे ) अंधश्रद्ध लोकांचा विरोध करण्यासाठी मी डिफायन्स दाखवून एक गाय आणि एक बैल प्रत्येकाने मारलाच पाहीजे हे समाज मनावर बिंबवून भारताची परकीय चलनाची गंगाजळी खाली करण्याने देशाचे अथवा पुरोगामीत्वाचे काय भले होणार आहे हे गोमांस स्वतः खाण्यास तयार असूनही अद्यापतरी समजलेले नाही.

प्रसंगोपरत्वे वाघ मारण्यावर हत्ती मारण्यावर शासनास बंधने आणावीच लागतात यात केवळ धर्माचाच संबंध असतो असे नाही पुरोगामी म्हणून केवळ वाघ आणि हत्ती मारण्याचा विरोध करायचा आणि दुसरीकडे पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी गाईचे मांसही चिवडत बसायचे एकानी मताचे राजकारण केले म्हणून दुसर्‍याने लांगूलचालन करून लागली स्वतःस मोठे म्हणवून घ्यायचे ही पुरोगामी दांभिकता नव्हे काय ?

जगभरात अनेक जंगले पवित्र म्हणवली जाणारी आहेत त्यांच्या पवित्र म्हणवल्या जाण्याच्या श्रद्धांमुळे ती शिल्लक आहेत. वाघ, हत्ती असो वा काळविट त्यांना पावित्र्याची श्रद्धा लावल्यावर त्यांचे जे संरक्षण होते ते निव्वळ कायद्यापेक्षाही उत्तम प्रकारे होऊ शकते हे वस्तुनिष्ठ वास्तव नाकारण्यात खरेच काही अर्थ आहे का ? अंधश्रद्धे शिवायही लोक वाघ, हत्ती यांचे संरक्षण करतात नाही असे नाही पण त्यास मर्यादा पडतातच धार्मिकतेच्या पुटांमध्ये कितीही चुका असू द्यात हिंदी चित्रपटसृष्टीच्या (खल)नायकांनी कितीही पैसा लावलातरी काळविटाचे श्रद्धेतून संरक्षण करु इच्छिणारा साक्षीदार सहज फुटणार नाही तेच श्रद्धा काढून घ्या आणि साक्षीदार साक्ष फिरवून दुसर्‍या दिवशी गलेल्लठ श्रीमंत होऊ शकतो. तुम्ही ते धर्मांध आणि आम्ही तेवढेच ते शहाणे म्हणणारी पुरोगामी दांभिकता तर दांभिकताही ठिक पण ह्या दांभिकता सुश्रद्धेने केल्या जाणार्‍या संजिवनाची जागा कित्पत घेऊ शकतील याबद्दल आजतरी मी अत्यंत साशंक आहे.

रुची मातेस मिळणार्‍या अभिनंदनांवरून होणारे त्यांच्या एकमुठ्ठी नमकचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे पण कायद्यांची मस्करी करणार्‍यांचे समर्थन मग ते कोणत्याही नावे असो मग चोर्‍यांचे दरवंड्यांचे गाय मारण्याचे आणि गाईसम मातेची अब्रु घेण्याचे एकसारख्याच पारड्यात बसते याचे भान स्वतःची पाठ थोपाटून घेणार्‍यांना येईल का ? आणि नेम कुठे आणि नेमके कसे बसले ते सांगण्यास काळच समर्थ असतो.

...विडंबन आणि समिक्षण अद्ययावत करणे आणि विकास प्रसगोपरत्वे चालू ठेऊ आणि नेम लागल्याचे समाधान घेणार्‍यांना ते अधिकाधीक मिळवून देऊ या शुभेच्छेसह तुर्तास अल्प विराम देतो.

field_vote: 
1.545455
Your rating: None Average: 1.5 (11 votes)

प्रतिक्रिया

नक्की काय करायचं ठरवलं होतं त्या धाग्याचं?
विडंबन/चिरफाड/विरोधी मतप्रदर्शन/उपहास/व्यंगोक्ती?
काहीच समजलं नाही.

इतके कुरुप फोटो घालून काय साधलत तुम्ही? दोन्ही फोटो किळसवाणे आहेत.

"..लेखन चालू" रंवत्याक मरे! हरभको कुठचो. वशाड मेलो.

(एक्सक्यूज माय फ्रेंच)

*********
आलं का आलं आलं?

wiki-विनोद की काय हा?

विकी-पीडन.

(माहीतगारभाऊ, ह० घ्या० तुमच्या चिकाटीचं खरंच कौतुक वाटतं मला.)

*********
आलं का आलं आलं?

हं...

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'नेम' स्त्रीलिंगी आहे, हे कळून क्षणभर मूर्च्छित झालो.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

करमणूकीच्या दृष्टीने ह्या लिखाणाचे मूल्य श्रेष्ठ आहे असेच म्हणावे लागेल.
मोकलाया दाही दिशां नंतर बर्‍याच दिवसांनी असा हसलो!
ROFL

'आणि मंडळी', शिका म्हणावं जरा थोडं ह्यांच्यापासून! अन्यथा काहीतरी उद्बोधक कंटाळवाणं लिहित बसतात शिंचे!!!
Wink

'हॅम'सारखा लेखनसाठी काही शब्द बनवला पाहिजे. रुचीलाच त्याचीही सुपारी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाककृती फारच आवडली. या वीकांताला नक्की करून पाहीन!

मग माहितगारमराठी, कधी खिलवताय बनवून?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मग चोर्‍यांचे दरवंड्यांचे गाय मारण्याचे आणि गाईसम मातेची अब्रु घेण्याचे एकसारख्याच पारड्यात बसते याचे भान स्वतःची पाठ थोपाटून घेणार्‍यांना येईल का ?

वाट्टेल ते बरळताय. आणि या बरळण्याचा पाया काय - तुमची स्वतःची श्रद्धा.
.
दुसर्‍याच्या निरुपद्रवी कृतीस इतक्या घाणेरड्या तराजूत तोलण्याचा हक्क कोणी दिला? तुम्हीच ना विकीपंडीत, तुम्हाला जाहीर रीत्या काय बोलायचं भान राहू नये, काय काम करत असाल तुम्ही विकीचं, डोंबल!.

शुचितै आपण वाक्य अर्धवट क्वोट केले आहे, वाक्याची सुरवात "कायद्यांची मस्करी करणार्‍यांचे समर्थन मग ते कोणत्याही नावे.... " येथून होते. मुख्य म्हणजे हे वाक्य कायद्याचे कोणतेही उल्लंघन वावगे मानते हे आपण लक्षात घेतले असेलचं. आपल्या भावनांचा आवेग ओसरल्या नंतर हे लक्षात घ्यावयास हवे की कायद्यापुढे कायद्याचे उल्लंघन हे केवळ कायद्याचे उल्लंघनच असते. आपल्याला चूक काढायचीच असेल कायद्यांचे उल्लंघन करण्यात त्यात एवढे काय या तुमच्या आदर्श रुची मातेच्या वृत्तीत चुक दिसावयास नको का ? त्यांनी गोमांस विषयक कायदा बदलण्याचे आवाहन केलेले नव्हते त्यांचा दृष्टीकोण कायद्याच्या उल्लंघनात वावगे काय असा होता आणि बहुधा अद्यापही आहे, दुर्दैवाने भारतातील बहुतांश मध्यमवर्गीयांचाही खरा दृष्टीकोण कायदा आपल्याला सोईस्कर तेव्हा वाकवता येतो का हा असतो किंवा कसे ? माझी टिका या मध्यमवर्गीय वृत्तीवर आहे, आपली हि वृत्ती जोपासताना आपण कायद्याच्या उल्लंघनाच्या संस्कृतीचे संवर्धन करत असतो, कायद्याच्या उल्लंघनाची स्वरुप उल्लंघन करणार्‍या व्यक्ती परत्वे बदलते पण त्या मागची वृत्ती की कायद्याचे उल्लंघन केल्याने काय होते इतरजण करतातच की (इति रुची माता वृत्ती) हि वृत्ती एकसारखीच असते केवळ स्वतःचे हित बाधीत होते तेवढ्यापुरतेच कायदा असावा स्व हिताच्या आड येणारा कायदा नसावा हे प्रत्येकालाच वाटते, व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही हे सामाजिक विश्वास आणि कायदा यांच्या आधारावर ठरते.

-लेखन चालू

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मुळात सदर कायदा महाराष्ट्र राज्यापुरता आहे. त्याबाहेर रहाणार्‍या व्यक्तीस तो लागू नाही.
शिवाय बीफ सेवनावर महाराष्ट्रातही बंदी नाही! केवळ बैलांच्या कत्तलीवर आहे (गायींच्या १९७४ पासून होती) उगाच कंठशोष नको!

माझा शेवटचा प्रतिसाद...
तुम्ही वरील पाकृ करून खायला कधी बोलवताय ते सांगा, मग उर्वरीत चर्चा जेवणाच्या टेबलवरच करू काय?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझाही हा शेवटचा प्रतिसाद.

ऋषिकेश,

स्पष्टीकरण देणारे लेखन चालू असताना प्रतिसादाचे संपादन ब्लॉक व्हावयास नको होते, त्यामुळे हकनाक गैरसमज वाढतात. मला वाटते उर्वरीत प्रतिसाद लिहून आपणाकडे व्यनी करेन, कुणी कशावर कुणी कशावर कंठशोष करते कंठशोष करण्यावर बंधन नसावेच रुचिमातेने त्यांचा कंठशोष केला काही वावगे न मानता मीही गोमांस खाल्लेले आहे माझा आक्षेप मग तुम्ही त्यास कंठशोष म्हणा अथवा अजून काही मला माझा आक्षेप नोंदवावासा वाटतो इतरांच्या आक्षेपांना उत्तर द्याए वाटते. आणि अशा फोरम्सचा उद्देशात अशा चर्चा महत्वाचा भाग असाव्यात.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सर्वच मराठी संस्थळावर उपप्रतिसाद दिल्यावर प्रतिसादाचे संपादन आपोआप बंद होते. इथे तुमच्या प्रतिसादावर खास काही वेगळे केलेले नाही. असो.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

@ संपादक मला हा प्रतिसाद http://www.aisiakshare.com/node/4459#comment-114843 या माझ्या प्रतिसादात जोडून हवा आहे.

वाट्टेल ते बरळताय. आणि या बरळण्याचा पाया काय - तुमची स्वतःची श्रद्धा. ... तुम्हीच ना विकीपंडीत

माननिय शुचितै, आपन मला पंडित म्हणावे असे नै पण एक मात्र नक्की मराठी नव्हे इंग्रजी विकिपीडियावर (इंग्रजीप्रेमाने भारलेल्यांसाठी हे सांगणे महत्वाचे आहे) लिगल अवेअरनेस आणि लिगल सोशलायझेश या दोन लेखांचे लेखन माहितगार नामक अस्मादीकांचेच आहे, हे इथे चुकून वापस येऊन वाचलेत तर अवश्य लक्षात घ्यावे. त्या शिवाय माझ्या बरळण्याचा वर पाया दिलाच आहे आणि लागेल तर अजून संदर्भासहीत आणून टाकतो माझे बहुतांश लेखन संदर्भा सहीत होत असते हे आपणास वेगळे सांगावे लागेल का ? त्या शिवाय बर्‍याच जणांच्या दुर्दैवाने तार्कीक उणीवांवर चटकन बोट ठेवण्या एवढा माझा तर्कशास्त्राचाही परिपाठ झालेला आहे.

आपण आपला भावनांचा आवेग ओसरलेला असेल तेव्हा वापस याल तेव्हा आपण एक गोष्ट वस्तुनिष्ठ फॅक्ट म्हणून लक्षात घेऊ शकाल का की इतरांच्या श्रद्धेला मग ती कोणतीही असो अतीगौण लेखणे योग्य नव्हेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कशाशी खातात हे न समणारे कोट्यावधी मानव केवळ श्रद्धेपोटी दुसर्‍या स्त्री पुरुष व्यक्तींचा अनमान करणे टाळताना दिसतात, स्त्रीयांचे माता बहीण मुलगी देवी ही उदात्तीकरणे आजकालच्या भारतीय स्त्रीला कदाचित जाचक वाटत असतील पण या उदात्तीकरणांनी उभारलेल्या श्रद्धा कोणत्याही कायद्याच्या ज्ञानाशिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विशेष जाणीवे शिवाय किमान भारतातील असंख्य स्त्रीयांच्या सुरक्षीततेस रक्षणास हातभार लावतात या सुसंस्कृततेच्या मागे त्या कोट्यावधी लोकांच्या श्रद्धाच कारणीभूत आहेत. त्याच कोट्यावधी लोकांच्या श्रद्धा गेली कैक शतके गाईस माता गाई देव देवी मानत आल्या आहेत. परस्त्रीस माता म्हणण्याच्या माझ्याश्रद्धे बद्दल मला अभिमानच आहे आणि खूप मोठ्या संख्येने भारतीय पुरुषांची माझ्या प्रमाणेच श्रद्धा असेल येथे मुद्दा हा आहे की जग श्रद्धांच्या प्रभावावर बरेचसे अवलंबून असते कायद्याला श्रद्धेची जोड असेल तर कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेवरचा ताण आपोआप हलका राहतो.

कायदा आणि सुव्यवस्थेसाठी किमानपक्षी कायद्याच्या पालनाबद्दलची बद्दलची श्रद्धा महत्वाची असते, तुमच्या रुची मातेने कायद्याच्या पालना बद्दल बेदरकार विधाने केली आणि बाकी मुखस्तंभ होते त्यावृत्तीस मी जाहीरपणे आव्हान दिले एवढेच.

.

दुसर्‍याच्या निरुपद्रवी कृतीस इतक्या घाणेरड्या तराजूत तोलण्याचा हक्क कोणी दिला?

मी कायद्याचा तराजू आंधळाच असतो काय उपद्रवी घाणेरडे आणि काय निरुपद्रवी आणि चांगले हे सामाजिक विश्वास आणि कायद्यांनी निश्चीत होते, सामाजिक विश्वास आणि कायदे समाज देश आणि काल परत्वे बदलत जातात कायद्याच्या अभ्यासाच्या दृष्टीकोणातले वास्तव आहे

माझ्या श्रद्धा दुखावल्या जाऊ नयेत पण मी इतरांच्या श्रद्धा बेदरकारपणे दुखावेन तर त्याचे एका मर्यादेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळू शकते पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हत्यार निश्चित दुधारी असते श्रद्धांवर पलटवार झाले तर सहन करण्याचा मोकळेपणाही हवा.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ते ठिक आहे मला माझा प्रतिसाद एकत्र दिसून हवा आहे असे वाटते एवढेच.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ते आता गरजेचे राहिलेले नाही. तुमचे प्रतिसादाचे दोन्ही भाग (पुर्वार्ध व उत्तरार्ध) वाचकांसाठी खुले आहेत. व असे होणे त्यांच्या सवयीचे आहेत

(प्रतिसादास उपप्रतिसाद देऊ नये असे स्पष्ट लिहिले असते तर ही वेळ येती ना!)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हणजे तुम्हांला असं म्हणायचं आहे, की स्त्रीला देवी मानल्यामुळे स्त्रिया सुरक्षित राखल्या जातात? म्हणजेच - श्रद्धा ही स्त्रियांच्या संरक्षणाचं काम करते? आणि गाईला देव मानणं हे या श्रद्धेचं एक्स्टेंशन आहे? आणि रुचीच्या धाग्यामुळे त्या गायीविषयक श्रद्धेला - पर्यायानं स्त्रीविषयक श्रद्धांना - पर्यायानं स्त्रियांच्या सुरक्षिततेला धक्का पोचला? आणि खेरीज ही कायद्याबद्दलची बेपर्वाई आणि बेदरकारी आहे, असं?

नाही काय आहे, तुमचं म्हणणं नीट समजून घेतलं तर प्रतिवाद करणं शक्य आहे. नाहीतर उगाच गैरसमज होतात. म्हणून पुन्हा प्रश्न विचारले.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

म्हणजे तुम्हांला असं म्हणायचं आहे, की स्त्रीला देवी मानल्यामुळे स्त्रिया सुरक्षित राखल्या जातात? म्हणजेच - श्रद्धा ही स्त्रियांच्या संरक्षणाचं काम करते?

१) अगदी निव्वळ अभिव्यक्ती स्वांतत्र्य असेल किंवा निव्वळ कायदा असेल त्याचंही अस्तीत्व केवळ बहुतांश जनतेच्या श्रद्धेवर अवलंबून असेल -कायद्यांच्या बाबतीत धाक वगैरे इतर गोष्टी आहेत नाही असे नाही- पण श्रद्धा या एकुण सुव्यवस्थेपुढेचे प्रश्न हलके ठेवण्यास बर्‍याचदा सकारात्मक हातभारही लावत असतात, गुटखा खाऊन भिंतींवर थुंकणारे लोक त्याच भिंतीवर देवी देवतांची छायाचित्रे असतील तर थुंकत नाहीत इथे त्यांची श्रद्धा आणि समाजाचा धाक या दोन्ही गोष्टी काम करतात, केवळ श्रद्धा नव्हे पण सकारात्मक श्रद्धेचे खूप मोठे सुव्यवस्थेत मोठे योगदान असते तसे ते भारतीय स्त्रीस तिच्या एकुण आदर आणि सुरक्षीततेच्या बाबतीत मोठ्याप्रमाणावर मिळालेले आहे असेच माझे मत आहे. स्त्रीबद्दलचा आदर केवळ माता आणि देवी म्हणण्यावर अवलंबून असावा किंवा नसावा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा यांचे माता आणि देवी म्हणण्या पेक्षा अधिक योगदान असावे हा वेगळा चर्चेचा मुद्दा असू शकेल, पुनश्च एकवार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा यांच्या साठी सुद्धा श्रद्धा एक मोठी आणि सकारात्मक भूमिका निभावू शकते

आणि गाईला देव मानणं हे या श्रद्धेचं एक्स्टेंशन आहे? आणि रुचीच्या धाग्यामुळे त्या गायीविषयक श्रद्धेला - पर्यायानं स्त्रीविषयक श्रद्धांना - पर्यायानं स्त्रियांच्या सुरक्षिततेला धक्का पोचला? आणि खेरीज ही कायद्याबद्दलची बेपर्वाई आणि बेदरकारी आहे, असं?

आणि गाईला देव मानणं हे या श्रद्धेचं एक्स्टेंशन आहे? मला काही वेगळे म्हणावयाचे आहे ते नंतरच्या परिच्छेदात स्पष्ट करतोच पण आपण वेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे, आपल्या मांडणीच्या शब्दात गाईला माता म्हणणे माते बद्दलची श्रद्धा गाईत रुजवणे आले आणि भारतात मातृदेवोभव ही सुद्धा एक श्रद्धा आहे, गाईवरच्या श्रद्धेचे एक्सेटेंशन आईला किती मिळेल माहित नाही पण सश्रद्ध व्यक्ती आईवरील श्रद्धेचे एक्सटेंशन गाईस देऊ शकेल.

जिथे केवळ माझ्या म्हणण्याचा प्रश्न आहे की श्रद्धा माते वरची असो दगडावरची मस्जिदीवरची असो निर्गूण निराकार देवावरची असो देवाचे अस्तित्वच नाही यावरची असो श्रद्धा ही श्रद्धा असते आणि बर्‍याच श्रद्ध बर्‍याच व्यक्ती आणि समुहांसाठी प्रेरणा असतात.

रुचीच्या धाग्यामुळे काय झाले याचा जो सिक्वेन्स तुम्ही म्हणता आहात तसे मला मुळीच म्हणावयाचे नाही, गोमांसाबाबत अथवा गोहत्येबाबत बहुसंख्य जनतेचा श्रद्धेचा संबंध आहे तसा माझा स्वतःचाही संबंध श्रद्धेमुळे नाही रुचीतै आणि माझ्या दृष्टीकोणातील फरक

१) मी बहुस़ंख्य जनतेची श्रद्धा आहे ती आहे तीचे चुक असणे बरोबर असणे आणि श्रद्धेचे अस्तीत्व यांची मी सरमिसळ करत नाही, रुचीतैंचा धागा गेली कैक शतके राहीलेल्या बहुतांश जनतेच्या श्रद्धेचे अस्तीत्व नाकारतो आहे. आणि माझा धागा लेख बहुस़ंख्य जनतेची श्रद्धेच गेली कैक शतके असलेल अस्तीत्व -श्रद्धा चुक आहे का बरोबर यावर कॉमेंट न करता- एक वस्तुस्थिती म्हणून स्विकारतो , (लोकांचे विश्वास बदलले मिथके बदलली की श्रद्धा बदलतात)

भारतात लोक कोणत्याही प्राण्याचे मांस खाऊ शकतात म्हणजे कोणत्याही प्राण्याची हत्या करू शकतात असा रुची तैंच्या धाग्याचा मतितार्थ पूर्णतः बरोबर नाही धर्म हा विषय बाजूला सोडून सुद्धा प्राण्यांच्या हत्येबद्दल भारतात बंधने आहेत कदाचित काही प्राण्यांच्या बाबतीत जसे की गाय बैल इत्यादी ती प्रदेश परत्वे बदलतात.

लोकांचा विश्वास बदलण्याचा प्रयत्न करणे की जो सावरकरांनी केला किंवा खरेतर ते रुचकर लागते बाकी देशात याच्या पापपुण्याचा विचार होत नाही भारतीय माणूसच का करतो कोण जाणे म्हणून अगदी बीफच्या पाककृतींचे पुस्तकही छापले तरीही हरकत नाही.

एक डुक्कर मेले/मारले तर दंगल करून काही माणसे मारली जातात संपत्तीचा नाश केला जातो आणि तेच गाईच्या बाबतीत होते आपल्या माहितीसाठी १८९३ची दंगल ही या गोहत्येच्या प्रकरणीची महाराष्ट्रातील पहिली रेकॉर्डेड दंगल असावी, दोन्हीही प्रकारच्या दंगली माणसे मारणे वाईटच हे किमान १८९३ म्हणजे अदमासे गेली सव्वाशे वर्षे भारताच्या कोणत्यान कोणत्या भागात चालू आहे दोन्ही बाजूच्या कर्मठांची बाजू बघीतली असता त्यांना टिका केलीत तर दोघांवरही टिका करा असा दोन्हीबाजूच्या कर्मठांचा सूर असतो आणि एकाच बाजूवर टिका करणे दुसर्‍या बाजूच्या लोकांना अन्याय केल्यासारखे वाटते त्यात निष्पक्षता नसते. आणि त्यामुळे एकाच बाजूच्या मानवाधिकारा बद्दल केलेली चर्चा कितीही युक्तीसंगत असली तरीही सामाजिक दरी भरण्यास शुन्य उपयोगाची असते केवळ आगीत तेल ओतणारी असते आणि रुचीतैंच्या धागे कितीही केले तरी दुसर्‍या बाजूचा विश्वास कितपत संपादन करू शकतील रुची तैंच्या धाग्यास भावनेच्या भरातल्या एका धाग्यापेक्षा अधिकमुल्य नाही त्यांच्या धाग्यास एरवी गंभीरपने घेतले नसते परंतु निष्पक्षेतेची -अत्यंत कठीण स्थितीतही-गरज पुरोगामी लोकांच्या डोळ्या आड होण्याने ह्या सामाजिक समस्येची जटीलता कायम रहाते आणि माझा उद्देश (आता येथे मी तथाकथित हा शब्द वापरतो) पुरोगाम्यांना टिकेचे लक्ष बनवणे हा आहे जेणे करुन त्यांच्या पुरोगामीततेत काही निष्पक्षता रुजली तर सामाजिक दरी कमी होण्यास हातभार लागेल.

सामाजिक दरी कमी करणे हाच रुची तैंचा उद्देश असेल तर रिलीजीयस हार्मोनी इन इंडीया या विषयावर मी इंग्रजी विकिपीडियावर लेख लिहिला आहे त्यात योगदान करण्यास वाव आहेच पण सर्वात जास्त लोक रिलीजीयस व्हायोलन्स इन इंडीया या लेखात मोठ्या आवेशाने लेखनकरतात त्यात आणि शुचीतैंच्या लेखनात मुलतः फरक काय राहीला ?

२) रुची तैंचा धाग्यातील दोन आक्टोबर ला लोक पितच असतात हा दुसरा मुद्दा मला खटकून गेला. लोकांनी जिवंत महात्मा गांधींच्या बाजूस बसून दोन बाटल्या रिचवल्या तरी खटकण्यासारखे काही नाही कायदा इग्नोअर करण्यासाठी असतो हे सर्वसाधारणपणे सुद्धा आदर्श मत असू शकत नाही माझी दुसरा आक्षेप मुख्यत्वाने या मुद्यावर आहे.

याचाच उपभाग असा की दारुबंदी कायद्याकडे दुर्लक्ष केले जाते तुम्ही गोहत्या बंदी कायद्यांकडे दुर्लक्ष करु शकता ही बघा माझी ही रेसिपी हा असा अविर्भाव यातून अप्रत्यक्षपने कायद्याचे उल्लंघनास समर्थन मिळते कुठेतरी कायद्याचे उल्लंघन होते एखादी गाय मारली जाते किंवा डुक्कर मारुन कुठेतरी टाकले जाते मग लोकांच्या श्रद्धा दुखावल्या जातात ( आपण मध्यमवर्गीय स्वतःस कोणत्याही दंगलीची झळ न पोहोचू देता असे श्रद्धा आणि संवेदना दुखावल्या जाण्यास अप्रत्यक्षपणे हात भार लावत असतो या दंगलींना राजकारण, कर्मठता अंधश्रद्धा जेवढ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणीभूत असतात तेवढेच तथाकथित पक्षपाती/एकांगी/एकपक्षी 'पुरोगामीत्व' -जाहीर केलेले न केलेले- तेवढेच जबाबदार असते)

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

रुचीचा धागा कुणाचीही श्रद्धा नाकारत नाही. तो फक्त व्यक्तिगत आयुष्यातलं स्वातंत्र्य अधोरेखित करतो. बाकी तुमची प्रदीर्घ अर्थहीन श्रद्धास्तोत्रे चालू द्यात. माझ्याकडून पूर्णविराम.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रुचीचा धागा कुणाचीही श्रद्धा नाकारत नाही.

असं त्यांनी कुठे म्हटलेल दिसत नाही उलटपक्षी त्यांच्या धाग्यातील सर्व आटापिटा दुसर्‍यांच्या श्रद्धांचे अस्तीत्व नाकारणे हाच दिसतो.

बाकी ही श्रद्धास्त्रोत्रांमध्ये किती अर्थ आहे आणि नाही याचे कायद्यासहीत विवीध विषयाच्या ततवज्ञानातील तत्त्वज्ञांचे तरयस्थ संदर्भ मी देऊ शकतोच पण तुमची श्रद्धा इतरांच्या श्रद्धेपेक्षा इतर कशावरतरी आहे किंवा कसे हे काळ वेळ आणि इच्छा असेल तर प्रसंगानुरुप माणूस शिकत बदलत जातो तसे आपल्या बाबतीत होणारच नाही याचा आपला विश्वास किती दांडगा आहे आपले आपण स्वतःसच सांगावे.

मतांतरे झालीतरी प्रतिसाद आणि चर्चा सहभागासाठी धन्यवाद

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

काय शुचितै, बाकीचे प्रतिसादकर्ते बघा कसा धीर धरून आहेत, आणि तुम्ही दोन छायाचित्रात अवसान गाळलतं ? आता सूप बनवताना उरलेली गोगलगाय आणि सापाची शील्लक बघा काय मस्त दिसते !

amsul

सॉरी ही गोगलगाय अथवा सापाची त्वचा नाही ही शाकाहारी आमसूले आहेत. Smile किळस कदाचित केवळ दृश्यामुळे येत नाहीए साप किंवा गोगलगाय खाणे या तुमच्या व्यक्तीगत कल्पनेपलिकडच्या गोष्टी असाव्यात (त्या वस्तुतः माझ्याही कल्पने पलिकडच्या गोष्टी आहेत) त्याच प्रमाणे गोहत्या आणि गोमांस खाणे बहुसंख्य भारतीयांच्या कल्पने बाहेरची गोष्ट गेली कित्येक शतके राहीले आहे. आपली स्वतःची श्रद्धा असो अथवा नसो दुसर्‍यांची श्रद्धा पटो अगर न पटॉ किमानपक्षी दुसर्‍यांच्या तेही बहुसंख्यकांनी काही शतकांपासून बाळगलेल्या कल्पना आणि श्रद्धांचे अस्तीत्वच नाकारणे आणि केवळ स्वतःच्याच श्रद्धा आणि कल्पनांना कुरवाळण्यातला मनुष्यस्वभावात दुटप्पीपणा अधोरेखीत व्हावा हे ह्या छायाचित्रातून साधावयाचे होते ते नेमके आपल्या प्रतिसादाने साधले गेले. आपल्या प्रतिसादासाठी आणि मतांतरे झालीतरी चर्चासहभागासाठी आभारी आहे.

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कायदे पालनाचे सोयिस्करत्व हा खरंच ज्वलंत विषय आपण चर्चेत आणलात. पूर्वी पुण्यात चांदणी चौकातल्या चढाच्या रस्त्यावर चढणारी बस अत्यंत ट्रॅफिकमुळे हळू हळू जात असताना उलटी मागे आली आणि बसच्या मागून जाणारा बाईकस्वार शाळकरी युवक या अपघातात ठार झाला. तो त्याच्या परिक्षेसाठी चालला होता. मग प्रशासनाने त्याभागातले अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले वगैरे, लोकांनी अश्रू ढाळले वगैरे. पण प्रश्ण हा उरतोच की हा युवक १६ वर्षे वयाचा असताना गियरवाली मोटारसायकल कसा काय चालवत होता? तो बस पासून सुरक्षित (कमीत कमी जीव वाचवण्यास पळता येईल इतके ) अंतर ठेऊन का बरे जात नव्हता?
मग त्या दुर्दैवी युवकाच्या मृत्यू बाबत रडावे की त्याच्या कायदे न पाळण्याबद्दल त्रागा करावा हा मला नेहेमी सतावणारा प्रश्नं आहे.

काहीही हं श्री माहितगारमराठी Sad

कायद्याचे उल्लंघन करणे चुकीचे आहेच ..
पण कायदा स्वतःच्या हाती घेऊन , दुसर्‍याला त्यांच्या (तुमच्या मते असलेल्या) गुन्ह्या साठी शिक्षा करण्यासाठी दादागीरी करणे, हे त्याहूनही भयावह आहे.

********
इथे फुलांना म‌र‌ण‌ ज‌न्म‌ता - द‌ग‌डांना प‌ण‌ चिरंजिविता |
बोरी बाभ‌ळी उगाच‌ ज‌ग‌ती - चंद‌न‌ माथी कुठार‌ |
अज‌ब‌ तुझे स‌र‌कार‌ ...

तर ही असली लोकं विकी तयार करत असतात!
No wonder it has zero credibility after all that effort.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

साधारण एकशेबावीस वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातल्या एका सुनसान तरीही भयप्रद आणि श्वापदांनी भरलेल्या एका जंगलातल्या टॅलंट हंटसाठी "जो जास्त जोरात धावेल तो जिंकला" हा निकष ऐकल्यावर कासव जे म्हणालं तेच मी ह्या धाग्याचा उत्तरार्ध बघून म्हणेन-
"ही काय फालतूगिरी आहे?"

वायझेड अशी एक श्रेणी नसल्यामुळे अस्वलाच्या प्रतिसादाला मार्मिक म्हणत आहे. व्यवस्थापक मंडळाने याची कृपया नोंद घ्यावी.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

महत्त्वाच्या, मोठ्या, समाजोपयोगी प्रकल्पांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांनी स्वतःच्या बोलण्या-वागण्याबद्दल पथ्यं का पाळावीत, किंबहुना अंगी शहाणपण का बाळगावं याचं सोदाहरण स्पष्टीकरण देणारा प्रतिसाद. व्यक्तिगत पातळीवर आडकित्ता यांचे आभार.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्यक्तिगत प्रतिसाद आवडला. तुमचा, आधीचा असाच व्यक्तिगत, पातळी सोडून दिलेला प्रतिसाद आठवतोय आडकित्ताजी. अजून येउद्या ना!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.