ब्रेन गेम्स- बी पॉजिटीव

न्याशनल जिअॉग्राफीवर एक 'ब्रेन - गेम्स' नावाचा कार्यक्रम पाहिला.
यात सकारात्मक विचार आपल्या व्यक्तिमत्त्वार किती परिणाम करतात,
याचे विवेचन प्रयोगासहित दाखवले गेले.
एका मैदानावर एक मुलगी बास्केटबॉल खेळत होती
.
सुरूवातीला तिला १० वेळा बॉल गोलपोस्ट मध्ये टाकायला सांगितला. तिचा बॉल एकदाही रिंग मधून गेला नाही कारण ती चांगली खेळाडू नव्हती.
नंतर तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला पुन्हा बॉल टाकायला सांगितले गेले,
परंतु यावेळी तिचा हा खेळ बघायला ८-१० प्रेक्षक ही बोलावले गेले.
त्या प्रेक्षकांना आधीच सांगून ठेवले होते की बॉल कसाही गेला तरी आनंदाने जल्लोष करायचा ः-))
पण हे त्या मुलिला माहित नव्हते.
तिने डोळे बंद केलेल्या अवस्थेत २ वेळा बॉल टाकला.... अर्थातच तिचा बॉल रिंग मधून गेला नाही.
पण प्रेक्षकांच्या जल्लोषामुळे तिला ते कळले नाही.
उलट तिचा उत्साह वाढला, प्रोत्साहन मिळाले अन् जेव्हा तिला पुन्हा डोळे उघडून बॉल टाकायला सांगितलं गेलं तेव्हा १० पैकी ४ वेळा तिचा बॉल रिंग मधून गेला.
भारी ना!!!!!!
खरंच सकारात्मक विचारांचा आपल्यावर किती सकारात्मक परिणाम होतो..(खरंतर हा सर्व प्रकार मला पूर्वनियोजित आहे असं वाटलेलं ,
पण यानंतरच्या प्रयोगामुळे माझा विश्वास बसला की 'सकारात्मक दृष्टिकोन' ही केवळ पुस्तकी कल्पना नाही.. विज्ञान आहे. तो प्रयोग नंतर लिहिते आणि त्यामागचे वैज्ञानिक कारणही!!!)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

"An autobiography of a Yogi" मधील काही पाने चाळली आहेत. पूर्ण वाचायचा पेशन्स नव्हता, असो त्या मध्ये परमहंस योगानंद यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की - बाळ पहील्यांदा चालावयास शिकते तेव्हा त्याचे जे कौतुक आई व तत्सम व्यक्ती करतात, जे प्रोत्साहन देतात, टाळ्या वाजवुन, गाण गाणे, लाड करणे वगैरे, that goes a long long way. मुलाच्या आत्मविश्वासाचा तो पाया असतो. अर्थात इतका सखोल परीणाम खरच होत असेल का हे फक्त बालमानसतज्ञच सांगू शकतात. पण हो असं वाटतय की प्रोत्साहनामुळे खूप फरक पडतो. "टोस्ट्मास्टर्स" नावाच्या बंडल प्रोग्रॅममध्ये मात्र सतत टाळ्या वाजवुन इतकं फेक्/ढोंगी प्रोत्साहन दिलं जातं की "ओ येते". तेव्हा जेन्युइन कौतुकाला महत्त्व आहे. कौतुक स्वस्त झालं तर त्याची किंमत घटते असे लक्षात आले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टोस्टमास्टर्स आणि जेन्युईन कौतुक या दोन्ही मुद्द्याबद्दल अतिशय सहमत. आमच्याकडे कॉर्पोरेट टोस्टमास्टर्स क्लब आहे त्यातही असंच. कोणी कसंही भाषण केलं तरी त्याचं कौतुकच करायचं आणि प्रोजेक्ट पूर्ण झाला समजायचं. सगळे प्रोजेक्ट पूर्ण केलेल्या माणसाच्या वक्तृत्वकौशल्यात काडीचाही बदल झालेला दिसत नाही. "निंदकाचे घर असावे शेजारी" हे जास्त खरं.
पॉझिटिव्ह विचार म्हणजे स्वतःचं/दुसर्‍याचं अनाठायी कौतुक करणे असा काहीसा समज झालेला असतो. विशेषतः आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल असा गंड फारच दिसतो. एकदा लै भारी म्हटलं की सुधारणा होण्याची शक्यता मावळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या एचआरला सांगायला पाहिजे, असला काहीतरी प्रकार एम्प्लॉई एनकरेजमेंटच्या कार्यक्रमातपण टाका. इथे खूपदा बघितले आहे, उगीच खोटंखोटं कौतुक करतात. निव्वळ भाग घेतला म्हणून प्रत्येकाला बक्षीस. छान छान, हा पण तसलाच प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0