थेट स्वर्गातून

( वास्तविक ही माझी कविता नाही , ही अनुवादित आहे , परंतु ऐसी वर अनुवादित साहित्य असा विभाग दिसला नाही. म्हणून थेट इथे टाकतो आहे. गुस्ताखी मुआफ़ !)


थेट स्वर्गातून :

स्वर्गातला कामाचा आठवडा म्हणजे इन मीन तीस तास
इथे वाढत जातो तो पगार आणि कमी होत जातात त्या किंमती
शारीरिक कष्ट थकवत नाहीत इथे ( गुरुत्वाकर्षण कमी आहे न !! )
लाकडं फोडण्याचं काम म्हणजे जणू टाईपरायटर वर केलेलं लिखाणच
समाजव्यवस्था अगदी स्थिर आहे आणि सरकारे विवेकी
खरंच ! कुठल्याही देशापेक्षा स्वर्गात अगदी मस्तच आहे !

सुरुवातीला काहीतरी वेगळं असणार होतं
गाणारे प्रकाशवृंद आणि अमूर्ताच्या अनेक मात्रा वगैरे
पण काही जमलं नाही ,
शरीर आणि आत्म्याचं पृथक्करण
जमलं नाही
चरबीच्या थेम्बातून मांसाचा एक धागा आला इथे
आणि
परम-सुप्रीम बीजाला मृण्मय बीजात मिसळावं लागलं
अपवादाच्या मागच्या सिद्धांताला अजून एक अपवाद
फक्त जॉनलाच ते दिसलं : तुम्हा सर्वांच्या शरीराचं पुनरुत्थान (होईल)

त्याचं दर्शन सर्वांनाच होत नाही ,
ज्यांची फुफ्फुसे स्वच्छ आहेत त्याचं ते काम
बाकीचे ऐकत बसतात चमत्काराच्या आणि महापुराच्या कथा वगैरे
प्रत्येकालाच तो दिसेल , ज्याची त्याची वेळ , येईल
पण नक्की कधी , कुणास ठाऊक

सध्या तरी , आजच्या शनिवारी दुपारी बारा वाजता
गोड सायरन वाजताहेत
गिरण्यांमधून , कारखान्यांमधून निळ्या रंगाचे कपडे घालून
कामकरी बाहेर येत आहेत
आणि आपापल्या काखांखाली त्यांनी आपले पंख घट्ट
पकडून ठेवले आहेत,
वायोलिन सारखे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
मूळ पोलिश कविता - झ्बिग्निएव हेर्बेर्त
मराठी रुपांतर - सर्व_संचारी
नोवेंबर १३ , २०१५

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कम्युनिझम काय ते अनुभवलेल्यांस या कविता किती दाहक आहेत ते समजेल.डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या आणि दागिन्याने लगडलेल्या मूर्तीसाख्या लोकशाहीत आहोत आम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0