कांगावा करावा तर असा.

कांगावा करावा तर असा.
.
.
सत्यमेव जयते या सुंदर कार्यक्रमात केलेले दावे हे आमिर खान या व्यक्तीचे नव्हते, तर तो कार्यक्रम चालवणा-या पात्राचे होते, हे मधूनमधून दिसू लागले आहे.

आताच्या तथाकथित असहिष्णु परिस्थितीची कोणती झळ फाइव्ह स्टार गाड्या, गाद्या किंवा खुर्च्या सदैव ढुंगणाशी असणा-या त्याच्यासारख्यांना लागलेली असते, की त्यामुळे यांना देश सोडून जावेसे वाटते किंवा तसा विचार तरी मनात येतो? शिवाय हा बाण आपल्या पत्नीच्या माध्यमातून मारलेला. याचा अर्थ काय लावायचा, तर मी किंवा शाहरूख, आम्ही मुस्लिम आहोत म्हणून केवळ आम्हालाच देशात असहिष्णु परिस्थिती आहे असे वाटत नाही, तर माझ्या हिंदू असलेल्या बायकोलाही तसेच वाटते.

कालच एक तुलना वाचण्यात आली. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी अलीकडेच झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी म्हणते की ती तिच्या दोन्ही मुलांना आर्मीमध्ये जाण्यासाठीच प्रोत्साहन देईल आणि हा इकडे हा दिवटा त्याला प्रत्यक्ष कसलीही झळ लागलेली नसताना किंवा लागण्याची शक्यताही नसताना देश सोडण्याची भाषा करतो आहे.

बरे, याची बायको त्याला खरोखरच तसे म्हणाली असेल किंवा नसेल, पण तू तरी तिला समजावलेस का, की बये, तुला वाटते तसे काही नाही. आपण या देशात सुखरूप आहोत. काही काळजी करू नकोस. तरी चांगला संदेश गेला असता की नाही? तसे तरी काही केल्याचे हा म्हणाला का? म्हणजे या त्याच्याही भावना आहेत का? त्या आहेतच. उगाच नाव मात्र बायकोचे घेतो.

एक विचार मनात येतो, काल सय्यदभाई हे महाराष्ट्रातले सुधारणावादी नेते समान नागरी कायदा आणण्याच्या दृष्टीने व देशातील इतर महिलांचेच हक्क मुस्लिम महिलांनाही मिळावेत या दृष्टीने आपले मत मांडत होते. तथाकथित असहिष्णुतेची झळ लागलीच तर ती आमीरपेक्षा त्यांच्यासारख्या सामान्यांनाच लागत असेल. ते त्याबद्दल काही न बोलता आपले कार्य करतच आहेत. इथल्या म्हणजे ‘हिंदूंच्या’ असहिष्णुतेचे सोडा, उद्या जर इसिससारख्या संघटनेचा येथे थोडा जरी जम बसला, तर सर्वप्रथम सय्यदभाईंसारखे आवाज बंद होणार आहेत. आमीरचे तसेही कशात काही नाही, तर त्याच्यासारख्याला काय धाड भरली आहे कोणास ठाऊक!

सिनेमात दुस-याने लिहिलेले संवाद बोलावे लागतात. सर्वांसमोर माइक हातात आल्यावर अनेकदा खूप बागडायला होते. आमीरचे तसेच झाले की हे संवादही त्याला कोणीतरी लिहूनच दिले होते असे वाटायला जागा आहे.

तेथे जेटलीसाहेबांनी तुझे कांगावखोर बोलणे शांतपणे ऐकून घेतले असेलही, मी तेथे असतो, तर तुला दोन प्रश्न निश्चितपणे विचारले असते.

तिकडे शाहरूख – सलमानचे अनेक वर्षांपूर्वीचे भांडण मिटते आहे, दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत, इकडे आमीर शाहरूखच्या सुरात सूर मिळवताना दिसत आहे. एरवी शाहरूखच्या बोलण्याला काहीही किंमत देण्यासारखे नव्हते.

होय, एकेका घटनेचा अर्थ लागत आहे.

आणि हो, आमिरखानला शिव्या द्यायच्या नाहीत. एवढा समजुतदार वाटला खरा, पण असा घसरला, इतके बेजबाबदारपणे बोलला, त्याबद्दल त्याच्यावर दया करायची.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

आमीरची मर्जी, तो बोलला. Any publicity is good म्हणूनही त्याने राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्दयांचा ह्यापूर्वी वापर केला आहेच.
आपण भारतीय लोक सिनेमातल्या कोणालाही (आणि स्टार्र लोकांना जास्तच) महत्त्व देतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जा म्हणावं निघून तेजायला! देशाला नावं ठेऊन कशाला फुटतोयस. सांग ना लै कमावलं आता परदेशी आराम करायला चाल्लोय. एवढी हिंमत असेल तर पाकिस्तानात सेटल होऊन दाखव म्हणावं ROFL
___
आज एक फेसबुक स्टेटस वाचून धन्य झाले - आमि‍र जी आपके लि‍ए हॉलीबुड ज्‍यादा ठीक रहेगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत राहूनही भारताची तुलना पाकिस्तानशिवाय इतर कोणत्या देशाशी तुम्ही करू शकत नाहीत हे दाखवून दिल्याबद्दल. यावरून तुमचे भारताबद्दलचे मत काय आहे हे स्पष्टच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मत मांडणं याला कांगावा म्हणतात का आजकाल?

मला वाटतं कांगाव्यामागे एक आक्रस्ताळेपणा असतो. त्याने आपल्या बायकोबरोबर झालेला संवाद सांगितला. त्यातही तिने 'मला असं वाटायला लागलेलं आहे' इतकंच म्हटलं. आता त्यामागे तिची काय कारणपरंपरा आहे हे समजावून न घेता त्यावर राळ उडवणंच चाललेलं दिसतं.

माझ्या कितीतरी मित्रांनी 'इंडिया में कुछ रखा नही यार, जॉब अपॉर्चुनिटी चाहिये तो अमेरिकाही जाना अच्छा' असं म्हटलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. हे सगळे एनाराय लोकंदेखील भारताला तुच्छ नजरेने पाहिल्याबद्दल दोषी आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो कांगावा नाही बकवास करतोय ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  1. (भारतात) कोणत्याही असहिष्णुतेचा सामना करायला लागलेला नसतानाही (विशेषतः गेल्या दोन तीन दशकांमधे) हजारो लक्षावधी (सर्व धर्माचे) अनिवासी भारतीय पाश्चात्य देशात गेलेच ना ?
  2. (भारतात) कोणत्याही असहिष्णुतेचा सामना करायला लागलेला नसतानाही हजारो मुसलमान फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेच ना ? (दंगली झाल्या पण जाणार्‍यांना जाण्यासाठी जी प्रेरणा मिळाली ती दंगलीमुळे की धर्मामुळे)
  3. (भारतात) कोणत्याही असहिष्णुतेचा सामना करायला लागलेला नसतानाही हजारो नागरिक (सर्व धर्माचे) आखातात जातातच ना ? (सेटल होत नसतीलही पण ...)

---

फाळणीच्यावेळी जे पाकिस्तानातून भारतात आले ते त्यांना असहिष्णुतेचा सामना करावा लागला म्हणून आले की त्यांच्यासाठी धर्म हा प्रेरक होता ? तिकडून इकडे आलेल्यांना निर्वासित (व इकडून तिकडे गेलेल्यांना मुहाजिर) असे संबोधण्यात आलेच ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणीही असं असं असल्याने देश सोडून जाऊ असं म्हणू लागलं की ठीक आहे जातोस तर जा असे म्हणण्यावाचून गत्यंतर नसते. मग ती कीरण राव असो वा अनुराग कश्यप!

(याचा अर्थ इथे असहिष्णुता नाही वा ती वाढत नाहीये असा नाही होत. पण त्यावर देश सोडणे हा उपाय नाही. फार तर स्वतःपुरता केलेला पळपुटेपणा झाला)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Is India tolerant? It doesn't matter because the reactions to Aamir Khan's remark justify his fears

"Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me. She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers every day. That does indicate that there is a sense of growing disquiet,” he said at an Indian Express awards function on Sunday.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपला कोणाबरोबर तरी झालेला संवाद, अगदी आपल्या खुद्द भावना बोलून दाखवण्यात इतकं काय गैर ?? देश सोडून जाण्याची धमकी तर लताबाईंनी पण दिलीच होती.. अगदी शुल्लक कारणासाठी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गैर काहीच नाही पण त्यानंतर लोकांनी लताबाईंनाही "जायचं तर जा बॉ" असेच म्हटल्याचे आठवतेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

केवळ आशाबाई नाही. लताबाई आणि आशाबाई दोघींनी धमकी दिली होती. आशाबाईंनी तर डेस्टिनेशन दुबई असल्याचेही सांगितले होते.

मात्र यापैकी थोरल्या भगिनींना चक्क भारतरत्न आणि धाकट्या भगिनीला पद्म पुरस्कार मिळालेले आहेत. मात्र बायकोशी झालेला संवाद बोलून दाखवणारा आमीर देशद्रोही असल्याचे लोकांना वाटलेले दिसते.

वरती घासकडवींनी छान उदाहरण दिले आहे. भारतातली घाण, पचापच थुंकणारे लोक, प्रदूषण, गर्दी, बायकांना होणारे धक्काबुक्कीचे प्रकार याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारे एनाराय कायम स्वतःच्या 'देशभक्तीचे' अगदी उबग येईपर्यंत प्रदर्शन करत असतात. अरे बाबा मग भारतातच का राहिला नाहीस? असं विचारावं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातली घाण, पचापच थुंकणारे लोक, प्रदूषण, गर्दी, बायकांना होणारे धक्काबुक्कीचे प्रकार याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारे एनाराय कायम स्वतःच्या 'देशभक्तीचे' अगदी उबग येईपर्यंत प्रदर्शन करत असतात. अरे बाबा मग भारतातच का राहिला नाहीस? असं विचारावं वाटतं.

मला बरंच काही इतरही विचारावं वाटतं, पण तुम्ही म्हणताय त्याच्याशी शंभर टक्के सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वरती घासकडवींनी छान उदाहरण दिले आहे. भारतातली घाण, पचापच थुंकणारे लोक, प्रदूषण, गर्दी, बायकांना होणारे धक्काबुक्कीचे प्रकार याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारे एनाराय कायम स्वतःच्या 'देशभक्तीचे' अगदी उबग येईपर्यंत प्रदर्शन करत असतात. अरे बाबा मग भारतातच का राहिला नाहीस? असं विचारावं वाटतं.

अगदी.

Ask them this question - where are most of their assets located ? India or Abroad ?

कुठे किती ची आकडेवारी प्रायव्हेट असते हे सगळ्यांनाच माहीती आहे. अ‍ॅसेट्स जास्त कुठे आहेत (भारतात की विदेशात ?) ? या एका प्रश्नाचे उत्तर महत्वाचे. सर्वसामान्यपणे - Talk is cheap - असे म्हंटले जाते. अनेकदा ते खरे असतेही. आणि हा प्रश्न विचारला की क्लीन बोल्ड होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरती घासकडवींनी छान उदाहरण दिले आहे. भारतातली घाण, पचापच थुंकणारे लोक, प्रदूषण, गर्दी, बायकांना होणारे धक्काबुक्कीचे प्रकार याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारे एनाराय कायम स्वतःच्या 'देशभक्तीचे' अगदी उबग येईपर्यंत प्रदर्शन करत असतात. अरे बाबा मग भारतातच का राहिला नाहीस? असं विचारावं वाटतं.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी बरोबर... आमीरलाही आपण जायचे तर "जा बाबा,गेल्या देशी तू सुखी रहा" असे म्हणू शकतो ना !त्याला इतके महत्व द्यायचे कारणच नाही.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रत्यक्षांत, दरवेळेस दंगलीत भरडून निघणार्‍या, गरीब हिंदु व मुसलमान प्रजेला कोणीच विचारत नाही, असुरक्षित वाटताय का हे! त्यांचे बिचार्‍यांचे संसार तर कायम उघड्यावर असतात. धोका त्यांना जास्त आहे का सदैव हाय सिक्युरिटी असलेल्या या श्रीमंत फिल्लम स्टार्सना ? स्वतःच्या सुरक्षेएवढीच काळजी या गरीबांचीही वाटायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमीर/किरण ह्यांनी देश सोडून जाण्याएवढी काय चिंताजनक परिस्थिती उद्भवलीये त्याची कारणं ऐकायला आवडतील.
खरोखरची अशी परिस्थिती उद्भवली असेल तर ती सामान्यांच्या प्रतिसादांतून समजायला हवी होती. डायरे़क्ट समजाच्या टॉपफ्लोरला त्याची झळ पोचतेय आणि बाकी जन्ता विषेश काही बोलत नाही- हे अज्याबात पटत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ष्टार्स स्वत:ला जन्तेचे अ‍ॅम्बॅसेडर्स समजत असतील तर? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परवा एका भडक भगव्या फेसबुक ग्रूपमधून मी बाहेर पडले. तिथला आक्रस्ताळेपणा मला सहन होईना. तर ग्रूप अॅडमिनचं इमेल आलं मला, "आता काय, पाकिस्तानी ग्रूपमध्ये जाणार का?"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा आक्रस्ताळेपणा नवा आहे असं वाटत नाही. पण तो जास्त जाणवू लागलाय -
१. सोशल मिडीया आता विशीतल्या लोकांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. तो सगळ्यांच्या हाती पडलाय. त्यामुळे पूर्वी जे काही लोक आपल्या आपल्यात बोलत ते सगळं आता बाहेर भिरकावलं जातंय आणि दिसतंय.
"सगळ्या लांड्यांना पाकिस्ताना पाठवा/ मुसलमानांची लायकीच ती" सारखी वाक्यं नवी नाहीत. पण ती फेसबुकी वॉल्स आणि आपल्या मोबाईलपर्‍यंत सर्रास यायला लागली तर मग ती घाण बघून दचकायला होतं.

२. भाजपा सरकार असल्याने त्यांच्यासोबत असणार्‍य भंकस बुवा-बाईंच्या मूर्ख आणि तद्दन बेताल बडबडीला फार भाव मिळतो आहे. पूर्वीही बजरंग दल तेच बोलत, पण आता ते पहिल्या पानावर येतं.
तोगाडियांची मंदिरविषयक वक्तव्यं, साध्वींचा कोप, कोणी काय नेसावं किंवा नेसू नये ह्यावरचे आगाऊ सल्ले असल्या गोष्टींना ठळक बातम्यांत स्थान दिल्यावर लोक जास्त बिथरू शकतात हे अगदी मान्य आहे. असल्या भडकाऊ गोष्टींना अवाजवी महत्त्व दिलं जात असेल तर ते तापदायक आहे.

गोमांसासारखे मुद्दे ह्या गोष्टी फारच वरवरच्या आहेत. "देशात असहिष्णुता वाढत चालली आहे" हे गेल्या सहा महिन्यांत नव्याने होतं आहे असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमीर खान आत्ताच का बोलला याचं कारण सहज समजण्यासारखं आहे.

आक्रस्ताळेपणा सहन न होणं, त्याचा आपल्यावर परिणाम होईल अशी भीती मला फेसबुकवर वाटते. जे फेसबुक मला कधीही बंद करता येतं (हो, मला खरोखरच फेसबुक बंद करणं जमतं.) तिथल्या असहिष्णुतेचा मला त्रास होतो. ज्या गोष्टीपासून आपली सुटकाच नाही तिथे असहिष्णुता वाढली तर माझ्यापेक्षा अधिक संवेदनशील असणाऱ्या माणसांना माझ्यापेक्षा बराच जास्त त्रास होत असेल. हे समजून घेणं तर सोडाच, असं कोणी काही बोललं की त्याबद्दल कशा प्रतिक्रिया येतात? माझ्या आजूबाजूला बऱ्यापैकी उदारमतवादी, पुरोगामी लोक आहेत तरीही आमीर खान-किरण राव यांच्या नावाने चीप जोक्स आणि "सिरीयात पाठवा" असली असहिष्णू बडबड जास्त दिसली आणि "जाऊ द्या, प्रसिद्धीचा स्टंट आहे" किंवा 'ह्याच्याकडे काय लक्ष द्यायचं' किंवा "असहिष्णू आहे खरं" असं म्हणणारे दहापेक्षा कमी लोक दिसले.

असहिष्णुता वाढली का सहिष्णू लोक फार बोलत नाहीत हे मला नक्की सांगता येणार नाही. पण राहुल गांधीच्या बावळटपणाचे विनोद, सनातन प्रभातचा मूर्खपणा, साध्वी-स्वामी यांचे दहा-सत्रा पोरांचे उद्गार यांचे विनोद माझ्या आजूबाजूचे करत होते, त्याबद्दल एकत्र हसत होते. आता एकमेकांवर चिखलफेक करणं चालतं. याला सहिष्णू वर्तन म्हणायचं का? का "नाही आवडला तुम्हाला भारत तर सिरीयात जा," ही सहिष्णुता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हेच टंकणार होतो. दोन्ही मुद्द्यांशी सहमत.

इंटरनेटमुळे सगळ्यांचे विचार पसरतात. ते कसे का असेना. आधी निवडक लोकांकडे मक्तेदारी होती. पेपर मालक वगैरे. ते जे अप्रूव करणार तेच लोकांनी वाचायचं. त्यापेक्षा आत्ता बरच चांगलं आहे. इंटरनेट इज दी फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रसी! जय झुक्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> हा आक्रस्ताळेपणा नवा आहे असं वाटत नाही. पण तो जास्त जाणवू लागलाय - <<

>> "देशात असहिष्णुता वाढत चालली आहे" हे गेल्या सहा महिन्यांत नव्याने होतं आहे असं वाटत नाही. <<

  1. केंद्रातले मंत्री, राज्याचे राज्यपाल, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष वगैरे सरकारदरबारचे लोक बेताल वक्तव्यं करायला लागली आहेत आणि त्यांना कुणाचा चाप नाही असं वाटतंय का?
  2. त्यामुळे सामान्य माणसांतल्या अशा विचारांना अधिक प्रोत्साहन मिळतं असं वाटतं का?
  3. आणि कदाचित अशा काही 'सामान्य' माणसांना 'मोले घातले ट्रोलाया' असू शकतं का? हे वाचा : The Power of Social Media: Emboldened Right-Wing Trolls Who are Attempting an Internet purge
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भाजपाला विकासासाठी मतं दिली तेव्हाच बहुतांश लोकांना आपण हिंदुत्व आणि तत्सम लोड विकत घेतलंय ह्याची कल्पना होतीच.
भाजपाची सोशल मिडियावरची पकड आधीही (२०१४ मधे) होतीच- आणि तशी बेताल बडबड सरकारमधल्या काही लोकांनी आधीही केलीच होती.
१ आणि २ सपशेल मान्य आहे पण त्यामुळे "संपूर्ण देशातली असहिष्णुता" वाढते आहे असं का वाटावं? हे खरंच कळत नाहीये.
.
माझ्या अल्पमतीप्रमाणे आगीत तेल घालायला काँग्रेस किंवा विरोधी पक्षांनी हे low hanging fruit पकडून भाजपला पेचात पकडण्याचा प्रयत्न केलाय असं वाटतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काँग्रेस किंवा विरोधी पक्षांनी हे low hanging fruit पकडून भाजपला पेचात पकडण्याचा प्रयत्न केलाय

इथे सहमती आहे.
याहून कितीतरी खरे प्रश्न या असहिष्णुतेच्या कार्पेटमागे भाजपाला दडवता येताहेत (जसे पेटंट कायद्यातील बदल, आर्थिक आघाडीवरचे अपयश इत्यादी) त्यामुळे या सोप्या बॉलिंगवर ब्याटिंग करत रहाण्यात त्यांनाही मजा येऊ लागलीयेसे वाट्ते.

==

मात्र काही घटनांमुळे - विशेषतः दादरी - खाण्यापासून बोलण्यापर्यंतच्या बेसिक अभिव्यतीवर बंधने येणार असतील तर अर्थातच अनेकांना भिती मात्र अधिक वाटते आहे आणि त्यामुळे असहिष्णुता वाढल्यासारखे वाटत असेल तर तसे वाटणार्‍यांना मी मोडीत काढु इच्छित नाही आणि शकतही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वीडिश अभ्यासकांना पाकिस्तानात पाठवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताचे काय आहे ते असू दे पण अमेरिका देश सर्व वर्णांवर आणि धर्मावर सारखेच प्रेम करणार्‍या सहिष्णु लोकांनी भरलेला आहे हे सध्याच्या anecdotal evidence बरोबर न जुळणारे आहे.

आजहि काळ्या तरुणांना गोळ्या घालून ठार मारणार्‍या अमेरिकी पोलिसांच्या कथा रोज उघड होत आहेत. सध्याची चालू घटना म्हणजे एक काळ्या तरुणाकडे तीन-इंची चाकू होता आणि त्यामुळे आपणास आणि आपल्या सहकार्‍यांस जिवाचा धोका आहे असे मानणार्‍या पोलिसाने त्या तरुणास एक नाही दोन नाही तर १६ गोळ्या घालून ठार मारले. सधन आणि सुशिक्षित असे कृष्णवर्णी कुटुंब आपल्या गल्लीत राहण्यास आले तर आपल्या घराची किंमत पडेल म्हणून चिंता वाटणारे गोरे अमेरिकन भरपूर सापडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताचे काय आहे ते असू दे पण अमेरिका देश सर्व वर्णांवर आणि धर्मावर सारखेच प्रेम करणार्‍या सहिष्णु लोकांनी भरलेला आहे हे सध्याच्या anecdotal evidence बरोबर न जुळणारे आहे.

घासकडवींचेच लाडके 'पर क्यापिटा' तत्त्व लावून पहा. आपली अडचण दूर होईल.

अरे हो! पण भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या मानाने खूपच जास्त आहे, नाही का? मग 'पर क्यापिटा' तत्त्व लावून चालणार नाही. त्यापेक्षा 'पर स्क्वेअर माईल' तत्त्व लावून पाहू. कसें?

(थोडक्यात काय, 'फर्ष्ट अराइव्ह अ‍ॅट युअर कन्क्लूजन, देन चूझ युअर मेट्रिक'. हाय काय नि नाय काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम, एक प्रश्न: हे कॉण्ट्र्याक्ट एन्फोर्सेबल आहे काय?

बोले तो, समजा कोणी हे निवेदन ऐकून आमीर खानला खरोखरच थप्पड लगावली (किंवा अनेक थपडा लगावल्या), तर निवेदनानुसार त्या व्यक्तीस खरोखरच पर थप्पड एक लाख रुपये देण्यास शिवसेना (किंवा शिवसेनेचे पंजाब युनिट, किंवा गेला बाजार श्री. राजीव टंडन व्यक्तिशः) कायद्याने बांधील आहे काय? आणि समजा तसे ते न दिल्यास त्यांस त्याबद्दल कोर्टात खेचता येईल काय / खेचल्यास फिर्यादीस कोर्टात यश मिळण्याची शक्यता किती?

नाहीतर कोणी ही ऑफर काय म्हणून घ्यावी?

आणि एन्फोर्सेबल असेल, तर मग उपाय अगदी सोपा आहे. "गब्बर के ताप से एक ही आदमी बचा सकता है, और वह है खु़द गब्बर|" बोले तो, खुद्द आमीर खानने जाहीरपणे (अगदी लाइव्ह व्हिडियो ब्रॉडकाष्टसहित) स्वतःच स्वतःस एकापाठोपाठ एक भरपूर थपडा लगावाव्यात. (किती जोरात, ते कॉण्ट्र्याक्टमध्ये कोठेच स्पेसिफाय केलेले नाही, त्यामुळे... आमीर खानची मर्जी! मी मारल्यासारखे करतो, आणि मीच रडल्यासारखेही करतो. असो.) आणि मग रीतसर (आणि जाहीरपणे!) शिवसेनेस केअर ऑफ श्री. टंडन बिल पाठवावे. आणि वळते न झाल्यास रीतसर कोर्टात खेचावे.

(टीव्हीवरचा प्रायोजित कार्यक्रमाचा स्लॉट कमीतकमी किती वेळाचा असतो? अर्धा तास? मायनस जाहिराती वगैरे धरून नेट वीसएक मिनिटे धरू. त्यात पर मिनिट पंचवीसएक थपडा जरी धरल्या, तरी पाचशे थपडा झाल्या. बोले तो, गेला बाजार पाच कोटी रुपयांना चुना!)

ब्यांकरप्ट द जंटलमेन (औट ऑफ एक्झिष्टन्स)! या सज्जनांशी डील करण्याचा तोच एक मार्ग (आता शिल्लक) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमिर खान ची वक्तव्ये काहीही असोत ... त्यांची दखल घेतली गेली. आरडाओरडा झाला, टीका झाली, टिंगल ही झाली पण आमिर विरोधक त्याच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत. Why do his statements matter so much to his detractors ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर कोणी अशी तक्रार केली तरी कदाचित विचार करता येईल.

पण सेलेब्रिटीजच्या कुटुंबाची/ मुलांची सुरक्षितता, प्रायव्हसी,संचारस्वातंत्र्य, मानसिक इजा अशासारख्या गोष्टींवर भारतातल्या असहिष्णुतेपेक्षा खुद्द त्यांच्या पालकांच्या स्टारडमचा अधिक थेट आणि दुरित इफेक्ट होतो असं नाही का वाटत? चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या जिवांवर निश्चित काहीसा परिणाम होतो पण खुद्द पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम त्यांच्यावर बराच जास्त असतो हे दुर्लक्षित करता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्टारडम, ग्लॅमर आणि असहिष्णुता या गोष्टी एकसमान कधीपासून झाल्या?

भौतिकशास्त्रीय उपमा द्यायचीच असेल तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण -ग्लॅमर आणि अवकाशातून येणारे वैश्विक किरण -असहिष्णुता अशी करता येईल. डोक्यावरचं वातावरण नाहीसं झालं तर हे वैश्विक किरण लगेचच कार्सिनोजेनिक ठरतील. पृथ्वीच्या एक षष्ठांश गुरुत्वाकर्षण असणार्‍या चंद्रावर वातावरण नाही. जगातले कोणीही पैसेवाले चंद्रावर आजही मुक्काम ठोकून राहू शकत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्टारडम, ग्लॅमर आणि असहिष्णुता या गोष्टी एकसमान कधीपासून झाल्या?

अजिबात कधीपासूनही एकसमान नाही झाल्या. त्यांना मुलांच्या सुरक्षिततेविषयी जो कन्सर्न आहे त्याबाबत आहे ते. जाऊदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0