दयेच्या छावण्या

पाणी पितो ती नदी आमची नाही
अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत
आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या
ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत!

युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा
WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स
RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त
युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या
यातलं काहीच आमचं नाही!

नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत!
ती रासवट आहेत, मारतात, मरतात
तलवारीने गळे चिरतात,
रक्ताच्या कुर्बान्या देतात
महाहिंसक माणसं!
त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो.......

पण तुमच्यात आलो म्हणजे
तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही!

एक काम करा कि साहेब!
ते जे No Man's Land म्हणता ना
ते द्या आम्हाला!
आमची घरं आम्ही थाटू
आमच्या नद्या आम्ही खणू
आमची शेती आम्ही करू!

ह्या ह्या, माहितीय साहेब! तुम्ही नाहीच म्हणणार...
आम्ही बेघर परागंदा नाही राहिलो, तर
तुमच्या दयेच्य छावण्या,
तुम्ही तरी कुठं उभारणार म्हणा!
असो..... चालू द्या.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कविता आवडली. तिरकसपणे आम्ही हिंस्र तुम्ही चकाचक गुळगुळीत म्हटलेलं आहे. तो तिरकसपणा आवडला. दया या शब्दाबद्दलच प्रश्नचिन्हं उभी राहातात.

ऐसीवर स्वागत. अजून अशाच सशक्त कविता येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सशक्त हे विशेषण आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसं विषाणू झालीयेत. विषाणूंना दयेची भावना नसते. असंतुलित गुणसूत्रांची अमर्याद पैदास हाच अस्तित्वाचा एकमात्र उद्देश. प्रेतांचे पर्वतप्राय ढिगारे रचत शेवटी त्याच्या कळसावर एक महाबळी विषाणू भुभूत्कार करेल आणि जेव्हा त्याचंही अस्तित्व राखण्यासाठी संपवण्यासारखं काहीच उरणार नाही तेंव्हा निद्रिस्त होइल. ही काळनिद्रा असेल. पुढचे ढिगारे निर्माण होतील इतकी जिवंत प्रेतं तयार होईपर्यंत. आकाश पक्षी चंद्र झाडं शेतं नद्या आख्खी पृथ्वी सब कुच झूठ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॅट्रिक्स सिनेमातला एजंट स्मिथचा हा डायलॉग आठवला:

I'd like to share a revelation that I've had during my time here. It came to me when I tried to classify your species and I realized that you're not actually mammals. Every mammal on this planet instinctively develops a natural equilibrium with the surrounding environment, but you humans do not. You move to an area and you multiply and multiply until every natural resource is consumed. The only way you can survive is to spread to another area. There is another organism on this planet that follows the same pattern. Do you know what it is? A virus. Human beings are a disease, a cancer of this planet; you are a plague and we are the cure.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदा खरे यांचे 'वारूळपुराण' आठवले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डायलॉग जबरदस्तच आहे हो
आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय. मलापण आवडतो तो डायलॉग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है| फार आवडली. मनापासून लिहीलेले कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता अतिशय आवडली.
'नो मॅन्स लँड'मधील प्रवेशासाठी स्वतःचे मानवत्व (पक्षी माणूसकी) नाकारण्याचे एक लूप होल किंवा सवलत/सुविधा/चोरदार्/राजमार्ग आहेच. हे नाकारले की तुम्ही अमर्यादतेचे मालक. कुठेही जा. तुम्हांला अटकाव नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेतला तिरकसपणा आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समजून वाचल्या बद्दल धन्यवाद अदिती. Smile
तिरकसपणा, उपहास इ इ समजावून सांगावा लागतो हल्ली!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुळतुळीत बायका हे विशेषण आवडले नाही. एकंदर कविता आवडली नाही. स्वतःच्या हिंस्त्रतेचे उदात्तीकरण आणि मदत करणार्‍यांना श्या घालणारी वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile बायका आणि मडमा यातला सांस्कृतिक फरक समजून घेतलात तर लक्षात येईल.
पण एकंदर कविताच आवडली नाही म्हटल्यावर, विषयच संपला.
प्रांजळ मत सांगितल्या बद्दल धन्यवाद .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुळतुळीत बायका हे विशेषण आवडले नाही

२००९ मधल्या 'सुषमा स्वराज" यांच्या संस्कारित फोटोची आठवण झाली. सोनिया पंतप्रधान झाल्या तर त्या तुळतुळीत गोटा करुन घेणार होत्या.

कविता फारच हिंस्र व एकांगी वाटली. हेच निर्वासित जेंव्हा युरोप वर ताबा मिळवतील तेंव्हा आत्ताचे गुळगुळीत बिच्चारे होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संकल्पना फार आवडली; पण कविता प्रचलित बाळबोध स्टिरिओटायपीकरणाला बळी पडलेली वाटते किंवा तेच उठावदार करण्याचा हेतू असेल तर यशस्वी झाली आहे.
शिवाय नुसतं तुळतुळीत म्हणण्यापेक्षा वॅक्स्ड तुळतुळीत म्हटलेलं जास्त परिणामकारक वाटलं असतं असं मला वाटून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित अवांतर आहे.

शारीरिक तपशीलांबद्दल - तुळतुळीतपणा फक्त वॅक्सिंग करून येतो असं नाही. एयरब्रश मेकप, रोज वापरायचे लेप, मॉइश्वरायजर्स आणि अशी यादी बरीच वाढवता येईल. अगदी व्यवस्थित, मोजून-मापून योग्य आहारही त्यात मोजता येईल.

पण इथे फक्त शारीरिक तुळतुळीतपणाबद्दल बोलणं चालू आहे असं वाटत नाही. जाणीवांचा बोथटपणाही त्यात येतो. वॅक्सिंगचा भस्सकन उल्लेख करून साटल्य घालवावं असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घासकडवी , नगरीनिरंजन, राही, तिरशिंगराव, अदिती, अंतराआनंद, हारून शेख, शुचि .... सर्वांचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0