श्रद्धांजली

प्लास्टिकच्या या निळ्या सागरी
भगभगती धुरकट उमटे रेघ
कुठुनि येसी कुठवर जासी
कुणास्तव घेसी हा प्रचंड वेग ||

काळोखाचे अस्तर फाटे
मोडका झिपर उघडी चेन
काळेकुट्ट हे भविष्य लिहिण्या
जलरंगाचे सरसावे पेन ||

तळपत झळकत उल्का सरके
ज्ञाताचे ओलांडुनि कुंपण
मूढ मतीच्या मेंढ्यांच्या या
तोंडाला देशभक्तीचे लिंपण ||

अजुनि आणतो पहाटवारा
श्रांतक्लांत ग्लानीची पेंग
फोडफोडुनि अति जरि दमलो
एक तरीही उरली शेंग ||

पूर्वप्रसिद्धी 'मनोगत' १४ ०१ २००८

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आज 'श्रद्धांजली' हे शीर्षक वाचताच शरद जोशी आठवले. पण चौकस आणि कविता म्हणजे काही वेगळे असणार हे तात्काळ उमगून कविता उघडली. फारशी समजली नाही. पन शब्दयोजना आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0