शोधत-शोधत

शोधत-शोधत

शोधत-शोधत तुझा आत्मा
गेलो उकलत एकेक पाकळी
गुलाबासारखी.

नाही सापडला.

पण दरवळला,
अवघे भरून आसमंत :
अनंत, भव्य, जिवंत.

(हुआन रामोन हिमेनेथ या स्पॅनिश कवीच्या एका कवितेवरून, मूळ कविता प्रत-अधिकारमुक्त आहे. मूळ कविता गूगलपुस्तक पृष्ठ ७५, शीर्षक "LVII")

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (6 votes)

प्रतिक्रिया

खाजत खाजवत

खाजत खाजवत इकडे तिकडे
गेलो उकलत एकेक पुटकुळी
गुलाबासारखी.(गुलाबी?)

नाही सापडली. (पण नेमकी खाजरी)

पण दरवळला,
अवघे भरून आसमंत :
आता आली का पंचाईत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

समजले नाही.

परंतु तुमची विडंबने अनेक वाचकांना आवडतात. त्यामुळे हे विडंबनसुद्धा अनेक वाचकांना आवडेल, आणि त्यांच्या प्रतिसादातून मला समजेल अशी खात्री वाटते. समजल्यावर आवडल्याची पावती देईन.

(कुरूप घिसाडघाईचे जितके दु:ख नाही, तितके दु:ख याचे आहे : ज्या व्यक्तीला कौशल्य आणि प्रतिभा आहे, त्याच्याकडून जिन्नस-एकसंधता नसलेली रचना वारंवार तयार होते आहे. वैयक्तिक दर्जा नियंत्रण इतके शिथील कसे होऊ देता?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(कुरूप घिसाडघाईचे जितके दु:ख नाही, तितके दु:ख याचे आहे : ज्या व्यक्तीला कौशल्य आणि प्रतिभा आहे, त्याच्याकडून जिन्नस-एकसंधता नसलेली रचना वारंवार तयार होते आहे. वैयक्तिक दर्जा नियंत्रण इतके शिथील कसे होऊ देता?)
क्षमस्व. वन डे म्याचेसचा अतिरेक झाल्यामुळे आउटसाईड दी ऑफस्टम्प असलेला प्रत्येक चेंडू स्टेडियममध्ये भिरकावून देण्याचा मोह होतो आहे. फ्लेचर यांच्याकडून चेंडू सोडून देण्याचे धडे नव्याने घेतो आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आउटसाईड दी ऑफस्टम्प असलेला प्रत्येक चेंडू स्टेडियममध्ये भिरकावून देण्याचा मोह होतो आहे.

नको. अशा चेंडूंवर झेल उडण्याचा धोका मोठा Wink आणि जालावर बरेच सोलकर, ऱ्होड्स आहेत हे मी तुम्हाला काय सांगणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>वैयक्तिक दर्जा नियंत्रण इतके शिथील कसे होऊ देता?
वयोमानानुसार इंद्रियांत शैथिल्य आले असेल. उदा. मेंदू, हात आदी.
(संबंधीतांनी विनोदी अंगाने घ्यावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

टेनिसच्या खेळात चेंडू बाउंडरीला मारणे फारच सोपे असते.

हेच विस्ताराने आणि विनयाने सांगण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे (दुवा).

तुमच्या "क्षमस्व"बाबत मलाच वाईट वाटले. तुमच्यापाशी प्रतिभा आणि कौशल्य आहे, हे मत प्रामाणिक आहे.

- - -
तुमच्या सहीतील सुंदर शेर सुद्धा शब्दास शब्द बदलून निरर्थकतेच्या बाउंडरीला लावता येतो :
बस के किलिंडर हैं हम काम तो आसान हुवा
प्यासिंजर तो मेजबां नही हैवान हुवा ।
तुम्ही मला गालिबाचा कुठलाही शेर द्या आणि मी त्याचा विचका करून दाखवू शकतो.* टेनिसकोर्टात रॅकेटऐवजी बॅट घेऊन गेले, तर गालिबाच्या सर्व्हलाही सहज सिक्सर मारता येतो.

*पण हा शेर शब्दबदल करून विचका करण्याचे आव्हान म्हणून तुमच्या सहीत नाही, हे भान मी ठेवले असते, तर बरे झाले असते. सिक्सर मारायच्या भानगडीत पडून "बस"चा "बसगाडी" हा श्लेष मनात आणला, "इन्सान" ऐवजी "हैवान" यमक चालेल का? असा बालिश विचार करत बसलो. पण त्यामुळे गालिबाचा मूळ आशय मनात घोळवण्यात अडथळा आला. आणि "बस-किलिंडर" आणि "हैवान" शब्द तर आता या शेराच्या संदर्भात मनातून घालवता येत नाहीत. हा शेर माझ्यासाठी सदाकरिता खराब झाला. म्हणूनच तुम्ही दुसरा कुठला सुंदर शेर दिला तर इरेस पडून मी निरर्थक बाउंडरीवर पोचवणार नाही. झाली तितकी बरबादी पुरे झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेनिसच्या खेळात चेंडू बाउंडरीला मारणे फारच सोपे असते.

तुम्हाला बहुधा टेनिसबॉल क्रिकेट म्हणायचे असावे असे गृहीत धरतो. मला बाउंडरी मारण्यावरून आठवले की टेनिसबॉल क्रिकेटसाठी वेगवेगळ्या छापाचे चेंडू बाजारात उपलब्ध असतात. ह्या चेंडूंचे वजन आणि त्यावरील फरचे प्रमाण कमी जास्त असते. चेंडू जेवढा हलका आणि त्यावरील फर जेवढी जास्त तेवढे बाउंडरी मारणे कठीण. नुसते जोरदार फटके लावून चेंडू सीमारेषेबाहेर जाईलच असे नाही. त्यामुळे टायमिंग आणि प्लेसमेंटला अशावेळी अर्थातच अधिक महत्त्व येते.

बाकी कविता छानच आहे. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेनिस कोर्टावरचे टेनिस (उदा. विंबल्डन स्पर्धेतला) म्हणायचे आहे.

या खेळात चेंडू जाळीपलीकडे, सीमेच्या आतच पडला पाहिजे, असा प्रयत्न खेळाडू करतात. ज्यांना खेळाचा सराव नसतो, ते लोक चेंडू या सीमेच्या बाहेर मारतात. (सराव वाढतो, किंवा उपजत जाण असेल, तर चेंडू सीमेच्या आत मारू लागतात.) सीमाबाहेर मारणे सोपे, सीमेच्या आत मारणे कष्टसाध्य असते.

जर एखाद्या चांगल्या "पोटेन्शियल" असलेल्या व्यक्तीला टेनिस कोर्टावर आहोत याचे भान नसेल, उलट आपण क्रिकेट खेळत आहोत असा गैरसमज असेल, तर काय होईल? कोर्टात अगदी सुयोग्य रीतीने पडलेली सर्व्ह "ऑफ साइड" आहे समजून तो बाहेरच्या दिशेने टोलवेल. चेंडू सीमारेषेबाहेर जाईल. परंतु हे टोलवणे म्हणजे उत्कृष्ट खेळ नाहीच. जर क्रिकेटचे कौशल्य असेल तर या ठिकाणी त्या कौशल्याचा अपव्यय आहे. कारण कुठलेच कौशल्य नसलेले लोकही चेंडू सीमारेषेबाहेरच मारत असतात.

- - -

वरच्या उदाहरणात गालिबाचा शेर अनुभवायची एक चौकट परंपरेत आहे. ती चौकट विशाल आहे, हजारो आस्वादकांनी वेगवेगळ्या प्रकारे तो शेर आस्वादलेला आहे. पण "बस" शब्दाचा "बसगाडी" हा श्लेष मनात आणून अर्थ लावू बघणे, हे त्या विशाल चौकटीच्याही फार बाहेर आहे. पण जर "चौकटीबाहेर मारण्याच्या हेतूने गालिबाने शेर आपल्याकडे टाकला आहे" असा गैरसमज असला, तर असे असंबद्ध विचार करणे सोपे असते. ज्या व्यक्तीला विशाल चौकटीचे नाविन्यपूर्ण कानेकोपरे उजळता आले असते, त्याने "आपण चौकटीबाहेर विचार केला" असे अभिमानाने म्हटले, तर भकास आश्चर्य वाटते.

अर्थात एखादा विलक्षण कल्पकतेचा विभूती टेनिस कोर्टावर असा कुठला नवीनच खेळ तयार करेल - त्या खेळात चेंडू सीमेच्या बाहेर ठेवण्यातच हशील असेल. खेळाडू त्या प्रकारे तो नवीन खेळ खेळू लागतील. आणि प्रेक्षकही ती परंपरा शिकून आस्वादतील. पण त्यासाठी कल्पकता अनन्यसाधारण लागेल. (अमेरिकन फुटबॉल हातात झेलतात/धावतात, पायांनी क्वचितच मारतात. "फुट"बॉल पासून हा फुटलेस खेळ उत्पन्न करू शकणारा शतकात एखाद-दुसरा असतो. वगैरे, वगैरे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेनिस कोर्टावरचे टेनिस (उदा. विंबल्डन स्पर्धेतला) म्हणायचे आहे.

बाउंडरीवरी ह्या शब्दामुळे क्रिकेट वाटले.

तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांत आणखी कोही मुद्दे जोडतो टेनिसपटूला कोर्टाकोर्टानुसार आणि स्पर्धेनुसार खेळ बदलावा लागतो. काही खेळाडू क्ले कोर्टावर प्रभावी ठरतात, तर काही ग्रासकोर्टावर क्ले कोर्टावर नेट आणि व्हॉलीचा खेळ तितकासा यशस्वी होत नाही. तिथे बेसलाईनवरून जास्त खेळ होतो. आणि रॅल्या लांबलचक होतात. ग्रास कोर्टावर छोट्या रॅल्या होत्यात. पण दोन्ही प्रकारच्या कोर्टांवर खेळल्या जाणाऱ्या खेळाला टेनिसच म्हणतात. असो. खेळाडूने आपण कुठल्या कोर्टावर आणि कुठल्या स्पर्धेत खेळतो आहोत ह्याचे भान ठेवणेही आवश्यक ठरते.

----

पण "बस" शब्दाचा "बसगाडी" हा श्लेष मनात आणून अर्थ लावू बघणे, हे त्या विशाल चौकटीच्याही फार बाहेर आहे.

खरे आहे. 'बस के दुशवार है हर काम का आसां होना' ह्या ओळींचा अर्थ एकेकाळी आम्ही 'असा बसून राहिलास तर तुझे कठीण आहे' असा काढला होता'होता ते आठवले. असो. गालिबच्या गझलांच्या शेरांना अर्थांचे पदर असतात. त्याची विनोदबुद्धीही प्रसिद्ध आहेच. कदाचित गालिबला बसगाडी अर्थदेखील आवडल्यास नवल नाही. 'कमोदिनी काय जाणे तो परिमळ' ह्या ओळीचे 'कमोड मी काय जाणे तो परी मल' असे सॅक्रिलेजस विडंबन कॉलेजात सुचले होते. पण तिथेच थांबलो. काय लिहावे ह्यापेक्षा काय लिहू नये हे कळणे अशावेळी महत्त्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितक आवडले..
कवितक म्हणावे का कविता.. आणि मुळात या दोन्हीत फरक कसा करावा? (मी साधारणतः अगदी कमी शब्दात -कवितेसारख्या रचनेत- बरेच काहि मांडलेल्या रचनांना कवितक म्हनतो. पण नक्की अर्थ-फरक काय आहे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता म्हणा वा कवितक, सुंदर आहे, अर्थपूर्ण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कविता वाचली. दोन दिवस बराच विचार केला..
मूळ कविला किंवा येथे असा अर्थ अपेक्षित अथवा अभिप्रेत नसेल पण आत्मशोधाच्या अनुभवाशी मिळती-जुळती प्रचिति... असे वाटून गेले.
कविता आवडली.

<<(कुरूप घिसाडघाईचे जितके दु:ख नाही, तितके दु:ख याचे आहे : ज्या व्यक्तीला कौशल्य आणि प्रतिभा आहे, त्याच्याकडून जिन्नस-एकसंधता नसलेली रचना वारंवार तयार होते आहे. वैयक्तिक दर्जा नियंत्रण इतके शिथील कसे होऊ देता?)>>

नेमके शब्द आणि भावना ... सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान .. आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा वेगळा शब्दक्रम बघूया (सदस्य सुवर्णमयी यांच्याशी झालेल्या चर्चेचे आभार मानतो):

शोधत-शोधत

गुलाबासारखी एकेक पाकळी
उकलत गेलो : शोधत होतो
तुझा आत्मा.

नाही सापडला.

पण दरवळला,
भरून अवघे आसमंत :
अनंत, भव्य, जिवंत.

(ही आवृत्ती लिहिताना मुद्दामून स्पॅनिश मूळपाठ्य बघितले नाही. आधी दिलेल्या भाषांतरात शब्दांचा क्रम अमुकच असावा, याबाबत मी मूलपाठ्याकडे बघून ठरवले होते - मूलपाठ्यात तो क्रम होता, असे नव्हे. पण मूलपाठ्यातील कुठलासा पैलू त्या शब्दक्रमामुळे दिसत होता, म्हणून.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा बदल का करावासा वाटला?
म्हणजे मला मुळ रचनाच अधिक आवडली आहे, मात्र प्रश्न विचारायचे ते कारण नाही.. रचना वेगळी केली आहे ती प्रयोग म्हणून की काही खास वेगळे कारण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मूळ रचनाही चांगली आहे आणि त्यावरून आपण केलेले मुक्तक ही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पहिली आवृत्ती अधिक आवडली. कारणाबद्दल थोडा विचार केला तर असं सांगता येईल: 'मी तुझा आत्मा शोधत आहे' ही मला कळीची बाब वाटली. तो कसा शोधत होतो, शोधत असताना काय झालं ते पहिल्या आवृत्तीत नंतर येतं. दुसर्‍या आवृत्तीत मात्र गुलाबाच्या प्रतिमेपासून सुरुवात झाल्यामुळे त्या प्रतिमेला गरजेहून अधिक महत्त्व येतं की काय असं काहीसं वाटलं. मी काय शोधत होतो याचा रहस्यभेद तिसर्‍या ओळीत होतो. तोपर्यंत जी उत्सुकता ताणली जाते ती कवितेच्या अर्थाला किंचित अनावश्यक वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सुवर्णमयी यांच्याशी चर्चा झाली, तेव्हा हा विचार चर्चिला : मी मूळ निवडलेला शब्दांचा क्रम मराठीकरिता सहज आहे काय?

(तांत्रिक चर्चा नव्हती, पण माझ्या मतीने त्याचा तांत्रिक सारांश असा : साधारणपणे मराठीत क्रियापद हे वाक्याच्या शेवटाजवळ येते. मराठी वाक्यांतील शब्दांचा विचलनपूर्व "न्यूट्रल" क्रम असा असतो - आणि पुढील घटकांत फक्त क्रियापद आवश्यक आहे - कर्ता/स्थल-काल-तर्‍हावाचक/"टेनंट"/कर्म/क्रियापद. उदाहरणार्थ : चोराने/काल-गाडीत-गुपचुप/मित्राला/पिशवी/दिली. मात्र संदर्भासह बोलताना वाक्याचे जे उद्देश्य "टॉपिक" आहे, ते विचलित होऊन वाक्याच्या सुरुवातीकडे जाते. वगैरे. व्याकरण-विश्लेषण अशोक केळकर यांचे.)

तांत्रिक मुद्द्यात न शिरताही असे म्हणता येईल की मूळ भाशांतराच्या शब्दक्रमात न्यूट्रल क्रमापेक्षा वेगळा क्रम आहे. त्यातील प्रत्येक विचलन अर्थपूर्णच आहे काय? चितातुर जंतूंनी वर सांगितले आहे (आणि मला पटते) की मूळ भाषांतरातील विचलने अर्थपूर्ण आहेत. पण क्रम न्यूट्रलपेक्षा जितका दूर जातो, तितका "हे काहीसे कृत्रिम आहे" असे वाटण्याचा धोका वाढत जातो.

या नव्या आवृत्तीतत वाक्य मराठी न्यूट्रल क्रमाच्या जवळ जाते. पण वाक्याचे उद्देश्य "टॉपिक" काय आहे, ही अर्थच्छटा बदलते.

इकडे आड तिकडे विहीर, ही गंमत दाखवण्याकरिता हा प्रयोग मी येथे दिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयोग या दृष्टिकोनातून वाहवा करावीच लागेल! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>: साधारणपणे मराठीत क्रियापद हे वाक्याच्या शेवटाजवळ येते. मराठी वाक्यांतील शब्दांचा विचलनपूर्व "न्यूट्रल" क्रम असा असतो - आणि पुढील घटकांत फक्त क्रियापद आवश्यक आहे - कर्ता/स्थल-काल-तर्‍हावाचक/"टेनंट"/कर्म/क्रियापद. उदाहरणार्थ : चोराने/काल-गाडीत-गुपचुप/मित्राला/पिशवी/दिली. मात्र संदर्भासह बोलताना वाक्याचे जे उद्देश्य "टॉपिक" आहे, ते विचलित होऊन वाक्याच्या सुरुवातीकडे जाते. वगैरे. व्याकरण-विश्लेषण अशोक केळकर यांचे.<<

हे बरोबरच आहे. प्रयोग कसला असावा याचा मला म्हणूनच अंदाज आला होता आणि प्रयोग म्हणून तो रोचक वाटलाच. फक्त हे लक्षात घ्यायला हवं की कवितेत हा न्यूट्रल क्रम बदलण्याचं स्वातंत्र्य पूर्वीपासून घेतलं जातं. उदा: अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने (तुकाराम), उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया (गदिमा), पिपात मेले ओल्या उंदीर, तरीही येतो वास फुलांना (मर्ढेकर), वगैरे. त्यामुळे गद्य बोलण्यात किंवा लिहिण्यात जे कृत्रिम वाटतं ते कवितेत वाटत नाही. म्हणून अभिप्रेत अर्थबोधन अधोरेखित करण्यासाठी (किंवा नादमयतेसाठीसुद्धा) ते स्वातंत्र्य खुशाल घ्यावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मूळ कवीने शब्दक्रम बदलला तर अनुवादात पण आणखी काही बदल होईल का असा एक प्रश्न मनात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मूळ कवीने शब्दक्रम बदलला तर अनुवादात पण आणखी काही बदल होईल का असा एक प्रश्न मनात आला.<<

जर त्यामुळे अर्थच्छटेत बदल होत असेल तर अनुवादात त्याचं प्रतिबिंब पडणं योग्य ठरेल. अर्थात, अनुवादात प्रत्येक अर्थच्छटा येईलच असं नाही; किंबहुना पुष्कळदा येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उच्च कविता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0