निरोप

काळाच्या या नाजुक गाठी
दातांनीही सुटतिल ना
हळूच उमलती पंख हे कोमल
दो हातांनि मिटतिल ना ||

काळ बसला मारित गाठी
मिटुनि डोळे लावुनि मन
वैशाख वणवा अलगद पेटे
कातरस्मृतींचे जळते वन ||

कालाचे हे चाक दातेरी
ना कधीही मागे फिरे
कोण चिरडते पदी तयाच्या
कोण उरे आणि कोण मरे ||

प्रसन्नतेचा झरा खळाळे
ओसंडुनि हे गात्र न् गात्र
निरोप देतो तुजला आता
भरूनि गेले घटिका पात्र ||

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुंदरच!!! खूप आवडली.

हळूच उमलती पंख हे कोमल
दो हातांनि मिटतिल ना ||

वा!
काळ हे काही जखमांवरचे औषधदेखील असते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0