कुराण आणि प्रेषित सोडून

इसवी सन सातव्या शतकाच्या सुमारास प्रेषित मोहंमद यांनी अरबस्तानात केलेले कार्य महत्वपूर्ण आहे यात शंकाच नाही. विखुरलेल्या आणि सतत एकमेकांशी भांडत आणि युद्धे करत असलेल्या अरबी टोळ्यांना इस्लामच्या झेंड्याखाली संघटित करण्याचे काम त्यांनी केले आणि संपूर्ण सामाजिक व धार्मिक क्रांती घडवून आणली. त्यावेळचा अरब समाज मूर्तीपूजा, कर्मकांड ,अनिष्ट प्रथा यात गुंतलेला होता. तत्कालीन सामाजिक स्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या मुहम्मदांनी सुधारणा घडविण्यासाठी ज्यू आणि ख्रिश्चन धर्मग्रंथांचा आधार घेऊन आणि त्यात बदल करून आणि भर घालून एका नवीन क्रांतिकारी धर्माची स्थापना केली. त्या कालखंडाचा विचार करता त्त्यांचे कार्य हे त्यांची दूरदृष्टी नक्कीच दाखवते. परंतु दूरदृष्टी एका ठराविक कालमर्यादेपलीकडे जात नाही हेदेखील खरेच आहे.
माणूस कितीही काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा असला तरी तो त्या विचारांच्या आधारे भविष्य पाहू शकत नाही. समजा, आजपासून ठीक शंभर किंवा दोनशे वर्षांनंतर भारतातली परिस्थिती नक्की काय असेल याचा तर्क बांधायचा झाला तर आपण वर्तमान परिस्थिती पाहूनच अंदाजाने भविष्यातले ठोकताळे मांडू शकतो. भविष्यातल्या गोष्टींचे अंदाज बांधण्यासाठी आपण वर्तमानाचा आधार घेतो. आजपासून दोनशे वर्षांनी काय होईल याबद्दलचे अंदाज काही प्रमाणात बरोबर निघतीलही. पण तेच निकष हजारो वर्षानंतर लागू होतीलच असे नाही. किंबहुना मुळीच होणार नाहीत. कारण त्यावेळची सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक परिस्थिती ही प्रचंड वेगळी असेल. त्यामुळे देशहितार्थ निर्माण केल्या गेलेल्या आणि वर्तमानात भारतीय लोकशाहीचे मुलभूत अंग असणाऱ्या संविधानातील अनेक कलमे हजारो वर्षानंतर कालबाह्य झालेली असतील.पण समजा जर त्यावेळीही लोक अट्टाहासाने संविधानालाच अंतिम ग्रंथ मानून बदलांना विरोध करायला लागले तर? साहजिकच ते प्रतिगामी ठरतील. मग हीच बाब आजच्या काळातील मुस्लिमांना लागू होत नाही काय?

१४०० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या एका ग्रंथाला अजूनही सर्वस्वी प्रमाण मानून त्यानुसार कारभार चालावा किंवा त्यातील नियमांनुसारच वैयक्तिक आयुष्य जगावे हा अट्टाहास अजूनही जगभरांतील मुस्लीम लोकांमध्ये दिसून येतो. भले ते कितीही प्रगत राष्ट्रात का राहिनात. किंबहुना प्रगत राष्ट्रांमध्ये तर अजूनच आपण धर्माचे किती काटेकोर पालन करतो हे सतत दाखवण्याकडे त्यांचा कल दिसून येतो. इस्लाम आणि कुराणची चिकित्सा करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. तशी परवानगीच नाही ना कुराणमध्ये. यात जे काही लिहिलंय हे शत प्रतिशत सत्य आहे आणि कुणालाही याबद्दल शंका घेण्याचा अधिकार नाही असेच ते मानत आलेले आहेत. इस्लाम, कुराण आणि प्रेषितांविरुद्ध काहीही ऐकून मनस्थितीत मुस्लीम नसतात. जर कोणी काही बोललंच तर लगेच आक्रमक होतात. या आक्रमकतेचा उगम कुराणमध्येच कदाचित कुराणमधेच असावा.

मुळात आता उपलब्ध असलेलं कुराण हे मोहम्मद यांच्या मृत्युनंतर लिहिलं गेलं हे आता जवळजवळ सर्वच मुस्लीम विचारवंतांनी मान्य केलेलं आहे. प्रेषित हे निरक्षर होते त्यामुळे त्यांनी कुराण लिहिलं असण्याची शक्यता कमी आहे असंदेखील अनेकांच म्हणणं आहे. त्यांच्या मृत्युनंतर साधारणपणे दीडशे ते दोनशे वर्षे खलीफांच्या काळात कुराण आणि हदीथमध्ये बदल होत होत शेवटी आताचे कुराण निर्माण झाले. त्यामुळे त्यातील शब्दन शब्द प्रेषितांचाच असेल असे नाही. अनेकांनी त्यामध्ये आपापल्या मर्जीनुसार सरमिसळ केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये अनेक ओळी या परस्पर विरोधाभास निर्माण करणाऱ्या आहेत. अनेक ओळींचा नेमका अर्थ काय याबाबतही संभ्रम आहेत. त्याचा नेमका असा अर्थ काय यावर अजूनही चर्चा झडतायत. सोयीनुसार अर्थ लावून घेण्याची ‘सोय’ कुराणमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळेच तर कुराणचे आपापल्या सोयीचे अर्थ लावून मुस्लिमांना भडकावून देण्याचे काम मौलवी इमाम लोक इमाने इतबारे पार पाडत आहेत. सतत कुराणचे आणि हदीथचे दाखले देऊन , भीती दाखवून , भावनिक आवाहने करून आणि प्रसंगी चिथावणी देऊन मुस्लीम लोकांच्या मनातून आणि डोक्यातून धर्म जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. जरा कुठे खुट्ट झाले की ‘इस्लाम खतरे में’ चा नारा घुमलाच म्हणून समजा. इस्लामने हराम ठरवलेल्या गोष्टींची यादी तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हे इस्लाममध्ये चालत नाही , ते हराम आहे असले फतवे अधूनमधून ऐकतोच आपण.

कदाचित शिक्षणाचा अभाव आणि गरिबी हे कट्टरता वाढण्यामागील कारण असू शकेल असंच अगोदर वाटायचं. पण नाही. उलट शिकलेले मुस्लीम तर कुराणचा आणि खोलात अभ्यास (?) करून इस्लाम कसा scientific religion आहे हे सिध्द करण्याच्या नसत्या उठाठेवी करत बसतात. (हे प्राचीन काळी भारतीय लोक किती प्रगत होते हे सिध्द करण्यात गुंतलेल्या हिंदुत्वप्रेमींना पण लागू आहे बर का). म्हणजे एखादा मुस्लीम डॉक्टर असो वा सोफ्टवेअर इंजिनियर वा वैज्ञानिक, त्याचा ढांचा मात्र बदलत नाही. उलट उच्चशिक्षित असूनही आपण कसे विज्ञानाच्या नाकावर टिच्चून तंतोतंत आपल्या धर्माचे पालन करतो असाच अविर्भाव यांच्या वर्तनात असतो. बर काही शंका असेल तर निरसन करण्यासाठी आपला पोपटपंची किंग झाकीर नाईक आहेच की त्यांच्या मदतीला.

सगळ्यात राग येतो ते स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या मुस्लीम विचारवंतांचा. कुराणमधील चुकीच्या अथवा कालबाह्य गोष्टी सरळ सरळ मान्य न करता उगाच हे लोक फाटे फोडत बसतात. अमुक अमुक हे चुकीचं आहे किंवा सध्याच्या काळाला धरून नाही. काळाप्रमाणे बदलायला हवं असं स्पष्टपणे कबूल का नाही करत? उगाच हे असं नाहीच , मुळात लिहिलेलं वेगळंच आहे , खरा इस्लाम वेगळाच आहे असले युक्तिवाद करत बसतात. ज्यामुळे मुस्लीम जनतेतील संभ्रम अजून वाढायला मदत होते.

माझ्या मुस्लीम मित्रांनो , मी तुमच्या विरोधात नाहीये रे बाबांनो. तुमचं चांगलंच व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पण १४०० वर्षांपूर्वी लिहिलेली गोष्ट आजही त्रिकालाबाधित मानून आणि आज एकविसाव्या शतकात देखील तशाच पद्धतीने जगण्याचा अट्टाहास धरून तुम्ही तुमचंच वाटोळ करायला निघालाय असं नाही वाटत का तुम्हाला? अरे अरबस्तान आणि त्याच्या आजूबाजूचे प्रदेश सोडून पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा साधा उल्लेखदेखील नाही रे कुराणात इतकी मोठी पृथ्वी असूनही. पौराणिक कथांना टक्कर देतील अशा दंतकथांची काहीही कमी नाही या ग्रंथामध्ये . जगातील भाषांचा उगम कसा झाला याची कथा बाळबोध म्हणून पण खपणारी नाही आजच्या जगात. थोडे जागे व्हा. विचार करा. कुराणमध्ये लिहिलंय ते बरोबर कशावरून तर प्रेषित सांगतात म्हणून आणि प्रेषित सांगतात ते बरोबर कशावरून कारण कुराणमध्ये लिहिलंय म्हणून. या paradox मधून बाहेर येण्याची वेळ झालीये असं नाही का वाटत तुम्हाला ?
कदाचित प्रेषित मोहम्मदांनी इस्लामचा पाया रचताना भवतालची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती पाहून या धर्माची रचना केली असेल. कदाचित त्यांच्या डोळ्यापुढे येणारा दोन-तीनशे वर्षांचा कालखंड असेल. नाहीतरी इस्लामच्या उदयानंतर अनेक शतके जगाच्या परिस्थितीत फार काही फरक पडला नव्हता. पण आता त्या सर्व गोष्टी कालबाह्य झाल्यात. जग झपाट्याने बदलतंय. या बदलत्या जगात जुन्यापुराण्या मध्ययुगीन संकल्पना उगाच पुढे अट्टाहासाने कितपत आणि किती दिवस पुढे चालवायच्या आणि किती दिवस कुराणात लिहिलेला प्रत्येक शब्द हेच अंतिम सत्य आहे हे मानून असं भ्रमिष्टासारखं जगायचं हे तुमच्या हातात आहे.

काळाच्या पुढे विचार करणाऱ्या मोहम्मदांचा वारसा मिरवताना बदलत्या काळापासून आपण स्वत:ला किती मागे रेटायचं हेदेखील तुम्हीच ठरवायचं आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

कुराण आणि प्रेषित सोडून आजच्या जगातल्या मुस्लिम देश, राजकारण, भांडणं याबद्दल हा लेख वाचनात आला.
इराणला पर्शियन साम्राज्य करायचंय, सौदीला अरब साम्राज्य करायचंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कदाचित शिक्षणाचा अभाव आणि गरिबी हे कट्टरता वाढण्यामागील कारण असू शकेल असंच अगोदर वाटायचं. पण नाही. उलट शिकलेले मुस्लीम तर कुराणचा आणि खोलात अभ्यास (?) करून इस्लाम कसा scientific religion आहे हे सिध्द करण्याच्या नसत्या उठाठेवी करत बसतात. (हे प्राचीन काळी भारतीय लोक किती प्रगत होते हे सिध्द करण्यात गुंतलेल्या हिंदुत्वप्रेमींना पण लागू आहे बर का). म्हणजे एखादा मुस्लीम डॉक्टर असो वा सोफ्टवेअर इंजिनियर वा वैज्ञानिक, त्याचा ढांचा मात्र बदलत नाही. उलट उच्चशिक्षित असूनही आपण कसे विज्ञानाच्या नाकावर टिच्चून तंतोतंत आपल्या धर्माचे पालन करतो असाच अविर्भाव यांच्या वर्तनात असतो. बर काही शंका असेल तर निरसन करण्यासाठी आपला पोपटपंची किंग झाकीर नाईक आहेच की त्यांच्या मदतीला.

+१००००००
माझे स्वतःचे उच्च शिक्षित बरेच मुस्लीम मित्र आहेत. त्यातले ९०% जण वरील प्रकार करत असतात. एकेकाळी मला या सर्वांचा फार त्रास व्हायचा, पण आता मी शांतपणे ऐकून मजा बघतो. शांतपणे ऐकायचा अजून एक फायदा म्हणजे वर वर गरीब, सज्जन असे दिसणारे साधेसुधे मुस्लीम लोक सुद्धा कधी कधी बेसावधपणे त्यांची खरी मते जाहीर करतात तेव्हा त्यांचा खरा मुखवटा दिसतो. तुम्ही ते मुस्लीम देशात विचारल्या जाणार्या विविध पोल्स (उ. "तुम्ही शरियाला पाठिंबा देता का?", "मुस्लीम देशात ईतर धर्म पालन करण्यास अनुमती दिली पाहीजे का?" ई. ई.) ची आकडेवारी बघा. थक्क करून टाकणारी आकडेवारी असते. निव्वळ मेजॉरिटी लोक जुनाट कल्पनांना सपोर्ट करत नसतात तर ओव्हव्हेल्मिंग टक्केवारीने सपोर्ट करत असतात(जसे की ९०%+ इ.) सुरुवातीला मला याचा धक्का बसला आणि वाटले की यात नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे. पण जसजस मी मुस्लीम दोस्तांशी खासगीत बोलायला लागलो तसतशी त्यांची खरी मते बाहेर यायला लागली. उदा. माझ्या एका अमेरिकेतील उच्चशिक्षित शिया मित्राशी सहज गप्पा मारत असताना आयसिस वाल्या लोकांनी पत्रकारांचा क्रुरतेने केलेल्या शिरच्छेदाचा विषय निघाला. तो अगदी सहजरित्या म्हणाला की हो त्यात त्यांची चुकी काय आहे? त्यांना पण त्यांची पॉवर दाखवायला पाहिजेचना (यातील एका शियाने त्यांना सपोर्ट करण्यातील आयरनी दाखवू ईच्छितो). हे केवळ एक टोकन उदाहरण झाले.

सगळ्यात राग येतो ते स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या मुस्लीम विचारवंतांचा. कुराणमधील चुकीच्या अथवा कालबाह्य गोष्टी सरळ सरळ मान्य न करता उगाच हे लोक फाटे फोडत बसतात. अमुक अमुक हे चुकीचं आहे किंवा सध्याच्या काळाला धरून नाही. काळाप्रमाणे बदलायला हवं असं स्पष्टपणे कबूल का नाही करत? उगाच हे असं नाहीच , मुळात लिहिलेलं वेगळंच आहे , खरा इस्लाम वेगळाच आहे असले युक्तिवाद करत बसतात. ज्यामुळे मुस्लीम जनतेतील संभ्रम अजून वाढायला मदत होते.

हे जे सो कॉल्ड मॉडरेट मुस्लीम आहेत(एक उदा आमिर खान) हे जिकडे तिकडे "ते खरे मुस्लीम नाहीत" किंवा "त्यांना खरा ईस्लाम कळला नाही" याच तुणतुण वाजवत असतात. पण कुणी असा विचार करत नाही कि कदाचित हे जे फंडामेंटलिस्ट मुस्लीम्स आहेत, तेच कदाचित खराखुरा इस्लाम (टू द वर्ड इन द कुरान) पाळत आहेत. शेवटी फंडामेंटलिस्ट लोक जे अतिरेकी आचरण करतात, त्याच कारण म्हणजे धर्माची फंडामेंटल्स चुकिची आहेत हे कोणी ध्यानात घेत नाही.
एखादा ईफेक्टिव संगणक व्हायरस एखाद्या संगणकात घुसतो आणि पहीली गोष्ट म्हणजे त्यातील प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम्ला निष्प्रभ करतो. म्हणजे त्या प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझमनी जरी प्रयत्न केला, तरी तो त्या व्हयरसला बाहेर काढू शकत नाही.
माझ्या मते इस्लाम एक मनाचा व्हायरस आहे. लहानपणा पासून लोकांचे धार्मिक ब्रेनवॉशिंग केल्यावर, त्यांची "नॅचरली मोरली चुक/बरोबर" ठरवण्याची प्रणाली निष्प्रभ होते. अ‍ॅक्चुअली, त्या अर्थाने मला इस्लाम जबरदस्त आवडतो. १४०० वर्षांपुर्वी लिहिलेली ही प्रणाली अजूनही तितकीच ईफेक्टिव आहे आणि विविध ठिकाणांच्या लोकांच्या मनात एकदा घुसली(मोस्ट ऑफ द टाईम्स, बाय डीफॉल्ट अ‍ॅट बर्थ), की बाहेर काढता येणे अशक्य होते. मग त्यातुन वरील विविध कोलांट्या उड्या मारायची प्रव्रुत्ती(सॉलिप्सिझम) निर्माण होते. माझ्यामते, हे लोक कुठेतरी एका लेवलवर सेल्फ अवेअर असतात. त्यांना समोर असलेली वस्तुतिथी स्पष्ट दिसत असते, पण ह्या "कोलांट्या उड्या" म्हणजे त्यांच्या मनातील व्हायरस आणि डॉर्मंट असलेली, पण हळूहळू जाग्रुत होणारी नॅचरली प्रणाली यातील स्ट्रगल दर्शवते.

हे प्राचीन काळी भारतीय लोक किती प्रगत होते हे सिध्द करण्यात गुंतलेल्या हिंदुत्वप्रेमींना पण लागू आहे बर का

एक निरिक्षणः अशा प्रकारचे कुठलेही मत जाहीर करताना, हे असे लिहिल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. कारण की मुस्लीम हेटर चा कुठेतरी शिक्का पडेल ही भिती. कुठेही या स्पेसिफिक धर्मावर टिका करताना इतर धर्मांच एक पालुपद जोडल पाहिजे हा एक कंपल्सरी नियमच होऊन बसलाय. शेवटी आत्ताची कुठलीही अतिरेकी लिस्ट काढा, इतर धर्माचे किती लोक दिसून येतात?

लोक आळशी होत चालले आहेत. कुणालाही रॉ डेटा पाहून, स्वतः विचार करून निष्कर्ष काढायला आवडत नाही. मग काय होत की लोक त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे(जसे की हा ईंग्लिश सफाईदार बोलतो, तो माझ्या जातीचा आहे) जे "विचारवंत" असतात त्यांची मते ग्राह्य धरून ती आपली मते बनवतात (याला एका प्रमाणात मी ही अपवाद नाही).

मला मुस्लीम लोक कल्चरली खूप आवडतात आणि रीलिजियस आयडियॉलॉजिमुळे मला त्यांचा तिटकारा देखील येतो.
ईराणियन्स, पाकिस्तानी, भारतीय, बांग्लादेशी, अफ्रिक्न्स, इजिप्शियन्स, सौदी अरेबियन्स, जॉर्डेनियन्स, इराकी असे विविध मुस्लीम लोक बघितले, बोललो, मस्तीपण केली. बर्याच जणांच्या बर्याच गोष्टी, सवयी (खाणेपिणे, पोषाख, कुटुंब व्यवस्था) आवडल्या. बट, मेक नो मिस्टेक्स, अ‍ॅट द एंड ऑफ द डे, व्हेन यु आर लीस्ट एक्स्पेक्टींग ईट, दे विल टॉक अबाऊट द आयडियॉलॉजी.

उद्या सगळी मुस्लीम बहुल लोक झाली, आणि माझ्या समोर जर "ईस्लाम धर्म स्वीकारणे" किंवा "मरण" हे दोन पर्याय असतील, तर मी आनंदाने मुस्लिम धर्म स्वीकारेन. माझ्या द्रुष्टीने शेवटी जगणे महत्वाचे, मला माझा संभाजी होउन द्यायचा नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> कदाचित शिक्षणाचा अभाव आणि गरिबी हे कट्टरता वाढण्यामागील कारण असू
> शकेल असंच अगोदर वाटायचं. पण नाही. उलट शिकलेले मुस्लीम
हे खरे आहे, आणि यात थोडी गुंतागुंत आहे.
विसाव्या शतकात मुसलमान देशांत साम्यवादाचा पराभव करायला उर्वरित सर्व देशांनी धर्माची मदत घेतली. ही बाब ईरान* तसेच सौदी अरबस्तानाच्या बाबतीत खरी आहे. त्यामुळे शिक्षणाचा अभाव आणि गरिबी यांना हटवण्याच्या दोन प्रतिस्पर्धी पद्धतींमध्ये धर्मसत्ता आणि साम्यवाद असे दोनच (आम्ही किंवा आमच्या विरोधी) असे पक्ष राहिले. जर कोणी बिगर-साम्यवादी सुधारणावादी असला, तर साम्यवाद्यांबरोबर त्यांचाही नायनाट केला गेला. त्यामुळे उरलेले सुशिक्षित, वगैरे, उच्चविद्याधनविभूषित लोक धर्मानुनयी परंपरेतूनच फळफळले.
(*ईरानच्या बाबतीत इतिहास नव्हे, पण अनुभवकथन म्हणून "Reading Lolita in Tehran" हे आज़र नफीसी हा लेखिकेचे पुस्तक मला आवडले.)

ख्रिश्चनांमध्ये असा काही प्रकार, काही प्रमाणात, मध्य अमेरिकन (निकाराग्वा, ग्वातेमाला, वगैरे) देशांतील काही परिचितांबाबत मी बघितला आहे. परंतु या देशांमध्ये लिबरेशन थियॉलॉजी, वगैरे वेगवेगळे प्रवाह आहेत, साम्यवाद्यांसकट लिबरलांनाही मारून टाकायची धोरणे १००% नव्हती, हेसुद्धा खरेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला. एका मित्राला 'लग्नपूर्व शरीरसंबंधांची शिक्षा म्हणून देहदंड' हे अगदी व्यवस्थित मान्य होतं. त्यावरून वादही घालत होता तो.

एक निरिक्षणः अशा प्रकारचे कुठलेही मत जाहीर करताना, हे असे लिहिल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. कारण की मुस्लीम हेटर चा कुठेतरी शिक्का पडेल ही भिती. कुठेही या स्पेसिफिक धर्मावर टिका करताना इतर धर्मांच एक पालुपद जोडल पाहिजे हा एक कंपल्सरी नियमच होऊन बसलाय.

याच्याशी तर अगदी पूर्ण सहमत. दुसर्‍या एका धाग्यावर हेच मत व्य्क्त केलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

एक निरिक्षणः अशा प्रकारचे कुठलेही मत जाहीर करताना, हे असे लिहिल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. कारण की मुस्लीम हेटर चा कुठेतरी शिक्का पडेल ही भिती. कुठेही या स्पेसिफिक धर्मावर टिका करताना इतर धर्मांच एक पालुपद जोडल पाहिजे हा एक कंपल्सरी नियमच होऊन बसलाय.

माझ्या मते थोडंसं वेगळं चित्र आहे.

इस्लाम ला सिंगल आऊट करून कोणताही निगेटिव्ह ट्रेट अ‍ॅटॅच करायचा नाही असा निर्धार केलेला आहे जवळपास सर्व विचार करणार्‍या लोकांनी. They love to find out any and all excuses to absolve Islam/muslims of any wrongdoing whatsoever. व यापैकी अनेकांचा थेट प्रतिवाद हा एकच असतो - You love to find out all reasons to blame islam / muslims. आणि जोडीला इस्लाम व मुस्लिम्स हे भिन्न आहेत असा ही मखलाशी युक्त प्रतिवाद असतोच.

( आमचे मित्र बॅटमन हे यास अपवाद आहेत असं म्हणण्याचं धाडस करतो. खरंखोटं बॅटमन वा विश्वेश्वरच जाणे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोगोल जी , आपली प्रतिक्रिया आणि मते आवडली.

हे प्राचीन काळी भारतीय लोक किती प्रगत होते हे सिध्द करण्यात गुंतलेल्या हिंदुत्वप्रेमींना पण लागू आहे बर का

विश्वास ठेवा हे मी भीतीतून लिहिलेलं नाही. गेले काही वर्षांपासून हिंदू समाजही दिवसेंदिवस आपण किती धार्मिक आहोत हे दाखवण्याचा खटाटोप करण्यात लागलाय हे माझं निरीक्षण आहे.
मी कट्टर हिंदू आहे असे लोक आजकाल छाती ठोकून सांगत आहेत. परवाच शरद पोंक्षे यांचे एक भाषण ऐकले त्यात तर त्यांनी असे तारे तोडलेत की बोलायलाच नको.
अगदी उच्चविद्याविभूषित लोकपण प्राचीन काळी भारतात विमाने उडत असत यावर विश्वास ठेवतात. मीदेखील ठेवायचो.अगदी परवापरवापर्यंत. एवढंच काय डेरवणमध्ये बायकांना साडी नेसल्याशिवाय आत प्रवेश नाही याचंदेखील समर्थन संस्कृतीच्या नावाखाली मी करून बसलोय आधी. अजूनही लोक करतात. असा कुठला नियम वाचला तर चला कुठेतरी आपले संस्कार जिवंत आहेत असे समाधान व्यक्त करतात.

मुस्लिमांनी धर्मांधतेपायी स्वत:चं जे वाटोळं केलं ते हिंदु लोकांनी करून घेऊ नये इतकीच प्रामाणिक इच्छा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुस्लिमांनी धर्मांधतेपायी स्वत:चं जे वाटोळं केलं ते हिंदु लोकांनी करून घेऊ नये इतकीच प्रामाणिक इच्छा आहे.

मुस्लिम धर्मांधतेपायी स्वतःचं वाटोळं करुन घेतील. मात्र हिंदु लोकांना स्वतःचं वाटोळं करुन घेण्यासाठी आम्ही "सेक्युलर" आहोत इतक भासवत राहिले तरी पुरेसे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदू लोक सेक्युलर आहेत यावर माझा मुळीच विश्वास नाही. मुस्लीम लाउडस्पीकरवर आझान देतात म्हणून ठो ठो करणारे लोक जेंव्हा सार्वजनिक उत्सवांत रस्ते अडवून मांडव उभारतात किंवा कर्कश्य आवाजात डॉल्बीवर गाणी लावून नाचतात आणि ट्राफिकजामला कारणीभूत ठरतात किंवा दहीहंडीच्या नावाखाली मानवी थर रचून स्वत:चे प्राण धोक्यात घालणाऱ्या गोविन्दांकडे पाहत अस्वस्थ व्हायचे सोडून आनंदाने टाळ्या पिटत बसतात ते सेक्युलर कधीच नसतात.
भारतासारख्या संपूर्ण प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या देशाला धर्म रस्त्यावर आणणे परवडणारे नाही. भले तो मुस्लीम असो वा हिंदू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदू लोक सेक्युलर आहेत यावर माझा मुळीच विश्वास नाही.

तो पुढचा भाग झाला.

माझा प्रश्न हा आहे की - हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा हिंदुत्वाने प्रेरित होऊन हिंदुत्वाच्या समर्थकांनी किती हिंदूंना ठार मारले ?

( प्रत्युत्तर म्हणून - हिंदू व हिंदुत्व याची व्याख्या काय हा प्रश्न विचारलात तर त्याचा अर्थ हा की तुम्हाला एक सिंपल आर्ग्युमेंट घेऊन ते अधिकाधिक कॉम्प्लेक्स करण्यात रस आहे. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा हिंदुत्वाने प्रेरित होऊन हिंदुत्वाच्या समर्थकांनी किती हिंदूंना ठार मारले ?

हा प्रश्न थोडासा दिशाभूल करणारा आहे. कारण हिंदुत्व अशी काही कल्पना तशी नवीनच आहे. वेगवेगळ्या जातींचा तो समुच्चय आहे. तेव्हा खरा प्रश्न असा विचारायला पाहिजे -

जातीच्या नावाखाली किंवा जातींपोटी प्रेरित होऊन जातीयवादाच्या समर्थकांनी इतर जातींच्या किती लोकांना ठार मारले? किंवा अनन्वित अत्याचार केले?

या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर काही जळजळीत सत्यं समोर येतील याची खात्री आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही पटलं.

१) मुस्लिम अतिरेकी भारतात हल्ला करतात ते हिंदु धर्मातल्या केवळ एका विशिष्ठ जातीच्या लोकांना मारण्यासाठी हल्ला करत नाहीत. कोलॅटरल डॅमेज मधे मुस्लिम, हिंदु, शीख, ख्रिश्चन मरत असतीलही पण मुख्य टार्गेट हे हिंदुच असते.
२) भारतातला वाद हा एका बाजूला मुस्लिम व दुसर्‍या बाजूला विशिष्ठ एक जात (किंवा दोन तिन जाती) असा नाही. भारतातला वाद हा मुस्लिम वि. हिंदु असाच आहे.
३) फाळणी सुद्धा मुस्लिम वि. हिंदु धर्मातली एक विशिष्ठ जात अशा आधारावर झाली नव्हती. हिंदु वि. मुस्लिम अशीच झाली होती.
४) काश्मिर - जो कळीचा मुद्दा आहे (ज्यावरून भारत व पाक यांच्यात युद्धेही झालेली आहेत व ज्याच्यासाठी मुख्यत्वे पाकिस्तान पुरस्कृत इस्लामिक दहशतवादी कारवाया होतात) त्याच्यामागचा पाकिस्तानचा मुख्य क्लेम हाच आहे की काश्मिर हा मुस्लिम बहुल असल्यामुळे पाकिस्तानला मिळायला हवा होता कारण पाकिस्तानची निर्मीती ही हिंदु मुस्लिम एकत्र राहु शकत नाहीत या आधारावर झालेली आहे. (हिंदु मुस्लिम एकत्र राहु शकत नाहीत हे खरे की खोटे - हा पुढचा भाग झाला.)

तेव्हा मुद्दा हा हिंदु वि. मुस्लिम हाच आहे.

हिंदुत्व ही नवीन संकल्पना आहे हे जरी मान्य केले तरी मुद्दा हा हिंदु वि. मुस्लिम असल्याने माझे म्हणणे दिशाभूल करणारे बिल्कुल होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शैव वैष्णवांची भांडणं ऐकलीत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

'मुसलमान म्हणजे शैव' वगैरे (पुनाओकी) थियर्‍या ऐकल्यात का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. काबा हे अगोदर शिवमंदिर होते आणि मोहम्मदचे काका तिथे पुजारी होते असपण काहीबाही ऐकलय. झाकीरबाबा पण वेदांमध्ये मोहम्मद येणार म्हणून उल्लेख आहे, किंवा कल्की म्हणजेच मोहम्मद असलं काहीतरी त्याच्या भाषणांमधून सांगत असतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुस्लिम हे एक युनिट आहे असा दावा करण्यासाठी शिया आणि सुन्नी, सुन्नी आणि अहमदिया, सुन्नी आणि कुर्द यांच्यात मारामार्‍या होत नाहीत असा विदा हवा.

परंतु मुस्लिम ही जशी थिओक्रॅटिक कन्सेप्ट आहे तशी हिंदू ही कन्सेप्ट नाही. हिंदू म्हटल्या जाणार्‍या लोकांची पारंपरिक आयडेंटिटी जातीची असते. हिंदू हा शब्दच मुळी बाहेरच्या लोकांनी भारतात राहणार्‍या विविध जातीच्या लोकांना उद्देशून वापरलेला शब्द आहे. हिंदू म्हणजे वेद मानणारे अशी व्याख्या केली तरी हिंदू म्हणवले जाणारे लोक वेदातले काहीही अंमलात आणत नाहीत. वेदातल्या देवता पुजल्या जात नाहीत. हल्ली जशा अनेक ष्टोर्‍या/उपदेश कलाम किंवा नारायण मूर्तींच्या नावे खपवले जातात तसेच पूर्वी वेदांच्या नावे खपवले जात असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही मारले ठार. मान्य आहे. पण ठार मारावे असे वाटू लागण्याची मानसिकता निर्माण होऊ नये अशी इच्छा आहे. दाभोलकर पानसरे कलबुर्गी हत्यांमुळे अशी मानसिकता निर्माण होऊ लागेल ही भीती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> मुस्लिमांनी धर्मांधतेपायी स्वत:चं जे वाटोळं केलं ते हिंदु लोकांनी करून घेऊ नये इतकीच प्रामाणिक इच्छा आहे.

धर्म दुबळ्या मनाच्या लोकांना लागतो. ज्यांना स्वःतहून नैतिक रित्या काय चूक काय बरोबर ते ठरवता येत नाही.
त्यामुळे मला तस बघायला गेल तर कुठल्याही धर्माबद्दल आपुलकी नाही (एक्सेप्ट शिख धर्म! शिख लोक पगडी आणि दाढी मध्ये रुबाबदार दिसतात अस पर्सनल मत आहे. म्हणून कित्येकदा शिख म्हणून जन्माला यायला पाहिजे होत अस वाटत :प)

मला इस्लाम धर्माबद्दल देखील इतकाच आक्षेप आहे की मी उद्या भाजी आणायला बाजारात गेलो, तर तिथे एखादा मुस्लीम माथेफिरु येऊन बाँबस्फोट करून मला ठार करणार नाही याची काय शाश्वती?

विचार करा, तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपर्यात असाल(अगदी अमेरिकेतही), तरीही तुमच्या बाबतीत वर उल्लखेला घटना क्रम घडू शकतो. आणि या सगळ्याच कारण काय, तर एका पुस्तकात लिहिल आहे की या पुस्तकाला न मानणारे लोक मनुष्यच नाहीत. त्यांना किडा मुंगीप्रमाणे मारून टाकल तरी चालत, नव्हे तस मारलच पाहीजे! आणि लोकही स्वःची सारासार बुद्धी बाजुला ठेवून ते आचरणात आणतात. मग "मॉडरेट" मुस्लीम्स काय म्हणतात?
"आमच पुस्तक चुकीच आहे. त्याला एकतर खूप फेरफार करून चालू शतकात आणल पाहिजे किंवा त्याला आचरणात आणण पुर्णपणे थांबवल पाहिजे"
बरोबर?
नाही!
ते म्हणतात की "पुस्तक बरोबर आहे, पण त्या माथेफिरु त्याचा चुकीचा अर्थ लावला"
ही असली अम्बिग्युअस पुस्तक फॉलोच कशाला करायची?

माझी एव्हढी साधी अपेक्षा आहे की घराच्या बाहेर पडल्यावर मी ज्याच काही बर वाईट केलेल नाही, त्यानी मला येऊन मारू नये. बस्स इतकच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी.
सगळ्याच धर्मांना विरोध आहे, पण इस्लामचं उपद्रवमूल्य प्रचंड वाटतं.
हापिसात किंवा घरातही आपण कामांची निवड करतो (उ.दा. p0,p1,p2 bugs! )तसंच इथे धर्मांची केली, तर इस्लाम हा सध्या एक p0 bug झालेला आहे.
बाकीच्यांना जोपर्‍यंत इस्लाम :पक्षी इस्लामी माथेफिरू सुखाने जगू देत नाहीत तोपर्यंत बाकी धर्मांच्या आधी इस्लामचा काय तो बंदोबस्त करून टाका. मागाहून बाकीच्यांचं बघता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्याच धर्मांना विरोध आहे

याची २++ कारणे असू शकतात -

१) धर्म (तो कुठलाही असो) ही निरुपयोगी बाब आहे. म्हंजे उपयोग शून्य आहे (समाजास).
२) धर्माचा (तो कुठलाही असो) उपयोग कमी व उपद्रव जास्त आहे (समाजास).

यातले कोणते ?

की दुसरेच कोणते कारण आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मते धर्माचं उपद्रव मूल्य जास्त आहे.
आणि रोजच्या जगण्यात तरी धर्म निरूपयोगी/ अतिशय कमी relevant उरलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नरहर कुरुंदकरांनी कुराण आणि मुस्लिमांचे छान विश्लेषण केले आहे. कुरुंदकरांच्या मते, मुसमान व्यक्ती जो पर्यंत कुराणाच्या संपर्कात येत नाही, तो पर्यंत तो तुमच्या आमच्या सारखा सज्जन माणूस असतो. एकदा का तो कुराणाच्या संपर्कात आला की, तो कट्टरपंथी बनतो. दोष मुस्लिमांत नसून कुराणात आहे. जेहाद हे कुराणाचेच अपत्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अल कैदा, इसिससारख्या संघटन ही कुराणाचेच अपत्य आहेत. दुर्दैवाने जागतिक महासत्ता या संघटनांसंदर्भात सतत सोयीच्या भूमिका घेत आल्या आहेत. त्यामुळे इसिससारख्या संघटना निर्माण होतच राहतील. या विषयावर थोडेसे विवेचन येथे वाचायला मिळाले. जिज्ञासूंनी अवश्य पाहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शरीया कायदा, सौदी अरेबिया, तिथे स्त्रियांना दिली जाणारी वागणूक याबद्दल न्यू यॉर्करमध्ये आलेला हा एक लेख -
Sisters in Law
सौदीमधल्या वकील स्त्रियांनाही शरीयामध्ये खोट आहे असं वाटत नाही. शरीयाच्या अंमलबजावणीत खोट आहे असं वाटतं. (आपल्याकडे नाही का, काही स्त्रियाही स्त्रियांना 'नाव बदल', 'कुंकू-टिकली लाव' म्हणून छळतात.)

इरानमध्ये लहान मुली, स्त्रियांना मिळणाऱ्या देहदंडाविरोधात काम करणाऱ्या असेयाह अमिनी या कार्यकर्तीबद्दल आणि तिच्या कामाबद्दलही न्यू यॉर्करमधला लेख -
War of Words
अमिनी आणि इतर कार्यकर्त्यांना शरीयात खोट आहे, कायदा आणि मुख्यत्त्वे न्यायाधीशांनी आधुनिक असलं पाहिजे असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो बायका स्वत:च म्हणतात आम्हाला बुरखा आवडतो. मध्ये मी एका मुस्लीम महिलेची मुलाखत पाहत होतो टीव्हीवर त्यात ती म्हणत होती की "कोण म्हणत आम्हाला बुरख्यात कोंडल्यासारखं होतं? आम्ही असं कधी म्हटलंय का ? इतर मुली जशा fashion करतात तशी आम्हीही वेगवेगळ्या डिजाइन्स आणि स्टाईलचे बुरखे घालून fashion करतो. आम्हाला बुरखा stylish वाटतो बुरखा स्टायलिश असू शकत नाही का ? "

एकंदरीत असा प्रकार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बायका असं म्हणतच नाहीत असा दावा नाही. पण सगळ्या मुस्लिम स्त्रिया असंच म्हणतात असंही मला वाटत नाही. वर प्रतिसादात असेयाह अमिनीबद्दल आलेल्या लेखाचा दुवा आहेच. त्या स्त्रिया शरीयाच धुडकावून लावतात (म्हणून त्यांच्यावर नॉर्वेत पळून जाण्याची वेळ येते).

माझ्या कॉलेजात मुंब्र्याहून काही मुस्लिम मुली येत असत. १९९८-२००१ हा काळ. त्या रोज बुरखा घालून कॉलेजात यायच्या; आल्या-आल्या लेडीज रूममध्ये जाऊन बुरखा काढून बॅगेत टाकायच्या; दिवसभर आमच्यासारख्या, नॉर्मल कॉलेजात वावरायच्या; संध्याकाळी घरी परत जाण्याआधी पुन्हा लेडीज रूममध्ये जाऊन बुरखा परत चढवायच्या. "समाजात राहायचं तर बुरखा सोडून चालत नाही. काय करणार, आम्ही ठाण्यात राहत नाही", असं त्या नेहेमी म्हणायच्या. मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरात शिकत होते तेव्हा वर्गातली एक मुलगी कायमच बुरख्यात असायची. (२००१-२००३) एका मुस्लिम वर्गमित्राच्या घरी, कुर्ला (प.) भागात येणंजाणं होतं, त्याच्या घरच्या स्त्रिया बुरखा वापरत नसत. आपण प्रागतिक आणि भारतीय मुस्लिम आहोत याचा त्याच्या घरच्यांना थोडाबहुत अभिमान असलेला जाणवत असे.

ही अगदी मोजकी उदाहरणं आहेत हे मान्यच आहे. पण कोणत्याच बाजूने एवढ्या मोठ्या समाजाचं सरसकटीकरण मला पटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सरसकटीकरण नाही करत आहे. पण हिंदू समाजातील स्त्रिया जितक्या चुकीच्या प्रथांविरुद्ध आवाज उठवताना दिसतात तितक्या मुस्लीम स्त्रिया नाही दिसत. कदाचित त्यांनी या गोष्टींना नाईलाजाने का होईना स्वीकारलं असावं. म्हणजे आपण ठाण्यात न राहता मुंब्रयात राहतो हा आपल्या नशिबाचाच भोग असेल असं कुठेतरी त्यांनी मनातून मान्य केलेलं असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवाज उठवणं म्हणजे नक्की काय?

माझ्या आजूबाजूच्या बहुतांश हिंदू स्त्रिया टिकली-कुंकू-मंगळसूत्र उद्मेखून वापरणे, लग्नानंतर नाव बदलणे, (ब्राह्मण घरांत) मुलग्यांच्या मुंजी करणे, अशा गोष्टी करतात. मराठीतून इंटरनेटवर लिहिणाऱ्या अनेक स्त्रियाही 'सासरच्या घरची होण्यासाठी मी आडनाव बदललं' असं सहज लिहितात. यात काही अन्याय्य आहे असंही त्यांना वाटत नाही. मुळात अन्यायाची जाणीवच नसेल तर बदल होणार कसा? माझ्या वर्गातल्या त्या मुस्लिम मुलींना निदान अन्यायाची जाणीव होती; त्यांच्या घरातल्यांनाही ही जाणीव होती. या मुली आपल्या आईच्या पिढीतल्या बायका शिकल्या त्यापेक्षा बऱ्याच जास्त शिकलेल्याही आहेत. सगळ्यांनीच उठून आंदोलन करावं, आवाज उठवावा अशी अपेक्षा गैर आहे; त्यांच्यापुरतं त्यांनी त्यांचं आयुष्य सुधारलेलं आहेच.

या मुस्लिम मुलींना बुरखा नकोसा होता; पण वर्गातल्या धार्मिक, हिंदू मुली डोकं कसं झाकायचं हे हौसेने शिकून घेत होत्या.

गेल्या महिन्यात, शिकागो शहरात काही गोऱ्या (बहुदा ख्रिश्चन आणि ज्यू) मुली (डॉनल्ड ट्रंपचा निषेध करण्यासाठी आणि) मुस्लिम स्त्रियांप्रती भगिनीभाव म्हणून हिजाब वापरत डोकं झाकून शाळेत आल्या होत्या. तेव्हा भारतीय आणि इजिप्तमधल्या स्त्रियांनी लिहिलेला लेख - As Muslim women, we actually ask you not to wear the hijab in the name of interfaith solidarity

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवाज उठवणे म्हणजे बेंबीच्या देठापासून आमच्यावर अन्याय होतोय असे बोंबलणे असे मी म्हटले नाही. एखादी मुलगी सहजच मला टिकली नाही आवडत म्हणून मी नाही लावत असं बिनधास्त घरी सांगते हा नकळतपणे तिने उठवलेला आवाजच असतो. हिंदू स्त्रिया काही स्वतंत्रतेच्या लाटेवर स्वार झाल्यात असेच काही मी म्हणत नाही. डबल ग्रजुएट असून अगदी आंधळेपणाने करवाचौथ, वटपोर्णिमा करणाऱ्याही आहेतच. पण जिला करायचं नसेल ती मी हे करणार नाही असे ठामपणे सांगण्याइतपत हिम्मत हिंदू स्त्रीमध्ये आलेली आहे. जी मुस्लीम स्त्रियांमध्ये तुलनेने बरीच कमी आहे. (नाहीये असं म्हणत नाही). म्हणूनच घरच्यांच्या समाधानासाठी बुरखा घालणाऱ्या आणि कॉलेज/ऑफिस मध्ये येताच काढून ठेवणाऱ्या स्त्रिया पहावयास मिळतात. जितक्या लवकर हे सर्व सुधारेल तितकं चांगलंच आहे.असो तुम्हाला नक्की आक्षेप कशावर आहे हे समजत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवाज उठवणे म्हणजे बेंबीच्या देठापासून आमच्यावर अन्याय होतोय असे बोंबलणे असे मी म्हटले नाही.

बेंबीचा देठ नक्की कोठे असतो? (विशेषतः बायकांना?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंदुत्वाच्या नावाखाली किंवा हिंदुत्वाने प्रेरित होऊन हिंदुत्वाच्या समर्थकांनी किती हिंदूंना ठार मारले?

प्रश्न दिशाभूल करणारा आहे. महात्मा गांधी, कृष्णा देसाई, नरेन्द्र दाभोलकर, गोविन्द पानसरे, डॉ.कलबुर्गी ही धडधडीत उदाहरणे दिसत नाहीत का? आणखीही खूप नावे आहेत, आता एवढीच आठवली. शिवाय श्रीपाल सबनिस यांना मॉर्निंग वॉकला जाण्याचा सल्ला देण्यात आला आहेच. नेमाड्यांना धमकी मिळाली आहे. मुसलमानांनी असले खून पाड्लेले नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी सगळं ठीक असलं तरी शेवटचं विधान धाडसी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Saying "It" Has Nothing to Do with Terrorism Is a Lie

-------

Denying the Obvious About Islamist Terror

The drama of this recital needed no amplification, but there it was anyway: Clear security video images showed the assailant in his flowing white dishdasha—a robe favored by Muslim men—running toward the patrol car, shooting, sticking his hand in the window, and racing speedily away. Pictures too of the police officer lurching out of the car to give chase.

The wounded shooter, Commissioner Ross revealed, told police after his capture that he had mounted the attack in the name of Islam, that he believes that “the police defend laws that are contrary to Islam.” The man apparently wanted to talk only about his devotion to Islam.

It added to the surreal wonders of this scene that, immediately after the mayor’s pronouncement, the commander of the police department’s homicide unit calmly took the microphone. Capt. James Clark reported that the shooter (later identified as 30-year-old Edward Archer) had said, repeatedly, that he followed Allah, that he pledged allegiance to Islamic State and “That is the reason I did what I did.”

The mayor’s comments, so bizarre in their determined denial of the deluge of facts delivered by top police officials standing next to him, were, nonetheless, familiar enough. Americans have learned to expect, after every Islamist terror attack, lectures instructing them that such assaults should in no way be connected to Islamic faith of any kind.

-----------------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण पुर्ण जगामध्ये मुस्लीम विरोधी बातम्या दडपून टाकायची एक अहमहिका चालू असल्या सारखी वाटते. त्या मालदा का कुठेतरी दंगली झाल्या, ईतर वेळी बोंबाबोंब करणारे सेक्युलर मूग गिळून गप्प बसले. जर्मनीत आणलेल्या १००० इमिग्रंटस नी बलात्कार केले, बातम्या दडपून टाकण्यात येत आहेत.

नक्की का हे होत आहे ते कळत नाही किंवा माझ्याच समजण्यात काहीतरी गडबड होत असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर्मनीतली बातमी खरी आहे का पण ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इस्लाम, कुराण आणि प्रेषितांविरुद्ध काहीही ऐकून मनस्थितीत मुस्लीम नसतात. जर कोणी काही बोललंच तर लगेच आक्रमक होतात. या आक्रमकतेचा उगम कुराणमध्येच कदाचित कुराणमधेच असावा.

आपल्या धर्माबद्दल "काहीही" ऐकून घेणारे लोक कुठल्या धर्मात आहेत? हिंदू धर्मातील अंधश्रद्धांना विरोध करणा-या नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घालण्यात आल्या. लिंगायत हा वीरशैवांपेक्षा वेगळा धर्म आहे, असे लिहिणा-या कलबुर्गी यांनाही गोळ्या घालण्यात आल्या. अशाच कारणांवरून नुकतीच गौरी लंकेश यांची हत्या झाली. तिचे जाहीर सामरथनही केले गेले. या आक्रमकतेचा उगम कुराणमध्येच कुराणमधला अाहे का? या हत्यांमागील प्रेरणा कुराणातील आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विषय भरकटवण्याची ही एक स्टँडर्ड मोडस ऑपेरांडी. कुराणाचा विषय काढला की मनुस्मृतीबद्दल बोलायचे. काही झाले तरी कुराण आणि इस्लामवर टीका होऊ द्यायची नाही ही सध्याच्या युगातील एक मोठी फॅशन झालेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही झाले तरी कुराण आणि इस्लामवर टीका होऊ द्यायची नाही ही सध्याच्या युगातील एक मोठी फॅशन झालेली आहे.

अं .... हं.

काहीही झाले तरी इस्लाम व मुस्लिम समुदाय या दोघांना निर्दोष ठरवायचे. absolve करायचे ही फॅशन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

हिंदूंना चिथावणी देण्यासाठी कुराण आणि मुसलमानांचा विषय काढायचा, ही फॅशन नसून मोठे कटकारस्थान आहे. हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा किंवा धर्मग्रंथांतील मजकुराला विरोध करण्याचा प्रयत्न केला म्हणून कित्येक हत्या अलीकडच्या काळात भारतात झाल्या आहेत. मुस्लिमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला म्हणून कोणाची हत्या झाल्याचे उदाहरण भारतात आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुस्लिमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला म्हणून कोणाची हत्या झाल्याचे उदाहरण भारतात आहे काय?

अहो, त्यांच्यात सुधारणा करण्याचा कोणताही यत्न न करता सुद्धा व त्यांना सेपरेट राष्ट्र तोडून देऊन सुद्धा त्यांच्याकडून इतके दहशतवादी हल्ले झाले व इतकी माणसे मारली गेली. कसाब ने आपल्या जबानी मधे "दीन खतरेमे" हाच जयघोष चालवला होता. जर सुधारणा करायचा यत्न झाला असता तर मला वाटतं त्यांनी जिनोसाईडच केलं असतं हिंदूंचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0