सौंदर्य प्रसाधनापासून होणारे अपाय
सौंदर्य उजळविण्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याएेवजी सहज उपलब्ध होणारी मेंदी, खोबरेल तेल, डाळीचे पीठ, रिठा, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग केल्यास पैशाची बचत हाईल. तसेच बाजारातील स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता असते.
खालील प्रसाधने नेहमी वापरली जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.
1. हेअर डाईज :
आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारे बरेच जण असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरले जाते. बऱ्याच जणांना कलप वापरल्याने चेहेरा सुजणं, लाल होणं, तसेच टाळू, चेहेरा आणि डोळ्यांची आग होणं अशा व्याधी सूरू होतात. तसेच त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही उदाहरणं आहेत.
2. शांपू :
अनेक सुगंधी शांपूच्या सतत वापरानं डोक्याच्या त्वचेला गंभीर स्वरूपाचे अपाय होऊ शकतात. तसेच शांपूमुळे केसांची चमकही नाहीशी होते आणि केस गळायला लागतात.
3. साबण :
बहुतेक साबणांमध्ये कॉस्टिक सोडा व जंतू प्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.
4. केसांचे सुगंधी तेल :
सुगंधी द्रव्यांची ऍलर्जी असल्यांनी अशी तेलं वापरल्याने डोक जड होणं, दुखणं, अशी दुखणी सुरू होतात.
5. टिकली :
निरनिरळ्या रंगाची कुमकुम बाजारात मिळतात. त्यात अनिलाईन डाईन आणि मधमाशांचं मेण वापरलेले असते. अशा कुंकवांच्या वापरामुळे आगपेणं आणि कोडसुद्धा होऊ शकतं.
6. मस्कारा व आग शॅडोज :
या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळे त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो. डागही पडू शकतात.
7. लिपस्टिक :
लिपस्टिकच्या वापरामुळं ओठ आकर्षक दिसत असले तरी काही जणींना यातील मेण आणि रंग अपायकारक ठरू शकतात.
8. फेस पावडर क्रीम :
फेस पावडर क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना ऍलर्जी असते. त्यामुळं त्वचा लाल होते. आग करणारं पुरळ उमटतं तर कित्येकदा चेहऱ्यावर चट्टेही पडतात.
9. जीवनसत्त्वांचा वापर :
आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त औषधांचा तात्पुरता वापर केला केला तर त्वचा ठीक राहतेही पण सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.
10. ब्लिचिंग एजंटस :
आपल्या त्वचेच्या काळ्या, सावळ्या रंगावर नाराज होऊन बऱ्याच स्त्रिया ‘ब्लिचिंग’ करून गोरे बनण्याचा अट्टाहास करतात. या ब्लिचिंग एजंटसमध्ये अमोनियाकरण केलेला पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळं त्वचेला अपायच होत असतो.
11. नेल पॉलिश :
सर्वसामान्यपणे नेलपॉलिशमध्ये "फॉर्मलडिहाईड लिकर" या द्र्वाचा वापर केलेला असतो. त्यामुळं पैरानोसिया म्हणजे नखांचा विकार होऊ शकतो.
त्याहून अधिक सौंदर्यासाठी
त्याहून अधिक सौंदर्यासाठी ऑर्गॅनिक काय किंवा इतर काय औषधे/रसायने/मलमे/झाडपाला इत्यादी किती वापरायचा हे इन्फिरीऑरिटी क्लॉप्लेक्सशी थेट नातं सांधणारं असतं का?
धाग्याहून हा शेरा जाम इंट्रेष्टिंग वाटला, म्हणून थोडे आत्मचरित्रनदीतले तुषार उडवत आहे. ;-)
असं एकास एक नातं जोडणं मोहक आणि सोपं आहे. पण मला नाही तसं वाटत. मला सौंदर्यप्रसाधनं वापरण्याचा अपार कंटाळा आणि अज्ञान आहे. साधं मॉइश्चरायजर लावायचाही कंटाळा येतो. पण म्हणून मला क्षुद्रत्वगंड (हा शब्द बरोबर आहे का? याहून चपखल / रुळलेला शब्द अस्तित्वात आहे का? असल्यास मदतीसाठी आवाहन.) नाही, असं नाही. अजूनही 'काही होत नाही, बोल जाऊन, जमेल तुला, भारी आहेस तू!' असा स्वसंवाद साधायची वेळ अनेकदा येते.
मुळातच गंड हे फक्त बाह्य रूपाशीच निगडीत असतील असं काही नाही. आपल्या इंग्रजीचं अगाध ज्ञान, आपल्या वाचनाबद्दलचे आपले गैरसमज, आपल्या सामाजिक कौशल्यांबद्दलच्या आपल्या समजुती... आणि खेरीज चेहरा-शरीर - अशी एकूणच आत्मप्रतिमा तिथे फार महत्त्वाची असते. उदाहरण देते - माझं वजन तसं भरपूर आहे. अनेक वर्षांपासून आहे. पण एरोबिक्स नामक गोष्टीची ओ़ळख होण्यापूर्वी मला माझ्या शरीराबद्दल अपार संकोच होता. मग चारचौघांत नाचण्यासाठी चार पावलं टाकणं तर दूरच. काही कारणानं एरोबिक्सची सवय झाली, आत्मविश्वास वाढला, शरीराबद्दलचे अनाठायी संकोच दूर झाले. आता त्या काळातल्या माझ्या वजनापेक्षा माझं वजन थोडं जास्तच असेल. तरीही आत्मविश्वास मात्र काहीसा वाढलेला आहे. सामाजिक कौशल्यांमध्येही याचं प्रतिबिंब पडलेलं मला स्पष्ट जाणवतं. याचा थेट प्रसाधनांशी वा रूढ सौंदर्यकल्पनांशी वा सडपातळपणाशी काय संबंध आहे? काहीच नाही. शरीर आत्मविश्वासानं वागवण्याची सवय होण्याशी मात्र आहे.
अर्थातच, माझं जे
अर्थातच, माझं जे प्रश्नचिन्हांकीत मत वर दिलं आहे त्याचा व्यत्यास लागु आहे असा दावा नाही की त्या मताचे 'निगेशन' मागू आहे असाही नाही.
त्याहून अधिक सौंदर्यासाठी ऑर्गॅनिक काय किंवा इतर काय औषधे/रसायने/मलमे/झाडपाला इत्यादी किती वापरायचा हे इन्फिरीऑरिटी क्लॉप्लेक्सशी थेट नातं सांधणारं असतं का?
हे ते प्रश्नांकीत मत
याचा अर्थ
इन्फिरीऑरिटी क्लॉप्लेक्स असला की अधिक सौंदर्यासाठी ऑर्गॅनिक काय किंवा इतर काय औषधे/रसायने/मलमे/झाडपाला इत्यादी खूप वापरला जातो
किंवा
अधिक सौंदर्यासाठी ऑर्गॅनिक काय किंवा इतर काय औषधे/रसायने/मलमे/झाडपाला इत्यादी वापरला नाही म्हणजे इन्फिरीऑरिटी क्लॉप्लेक्सशी नसेलच
असं दोन्ही म्हणणं नाही.
मात्र भरपूर प्रसाधने वापरणे हे मात्र एक प्रकारच्या गंडाचे लक्षण आहे असे मात्र मी मानतो. तो गंडासाठी एकच घटक कारणीभूत असेल असे नाही मात्र ते गंडाचे एक बाह्य लक्षण जरूर आहे.
हे केवळ स्त्रियाच नाही तर पुरूषांच्याही बाबतीत तितकेच लागू आहे.
(कलप, वीग इत्यादी गोष्टी सहज दिसणारी उदाहरणे)
रामदेव बाबांना
रामदेव बाबांना सांगा......
http://www.ramdevproducts.com/category/skin-and-face-care.htm
स्वच्छ शरीर हे साधारणतः सुंदर
स्वच्छ, व्यवस्थित 'आवरलेलं' आणि आरोग्यपूर्ण शरीर हे साधारणतः सुंदर दिसतं
त्याहून अधिक सौंदर्यासाठी ऑर्गॅनिक काय किंवा इतर काय औषधे/रसायने/मलमे/झाडपाला इत्यादी किती वापरायचा हे इन्फिरीऑरिटी क्लॉप्लेक्सशी थेट नातं सांधणारं असतं का?