खगोलविश्वः या महिना अखेरीस आकाशात गुरु व शुक्राबरोबर चंद्राची शोभा

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

येत्या आठवड्यात काही मनोरम अशा सुंदर खगोलीय घटना दिसण्याचा योग येतो आहे.
कोणत्या ते पाहूयात...

२६ जानेवारी २०१२
चंद्र आणि शुक्र यांची युती

२६ जानेवारी २०१२, भारताचा प्रजासत्ताक दिन.
या दिवशी संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान एक विहंगम दृष्य आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे.
सध्या पश्चिम आकाशात दिमाखाने चमकणारा शुक्र सत्ता गाजवत आहे.
पण या महिन्याच्या महिन्याच्या, म्हणजे अजून २ दिवसांत शुक्राचा अभिमान गळून पडणार आहे.

असे असले तरी चंद्राला शुक्राच्या परिसस्पर्शाने जे सौंदर्य लाभणार आहे ते अत्भुत असणार आहे.
चंद्राची कोर आणि शुक्राची चांदणी एकमेकांच्या अगदी जवळ असे हे मनोरम दृष्य आपल्या सर्वांना पहावयास मिळणार आहे. नशीब चांगले असेल तर ही शुक्राची चांदणी चंद्रकोरीच्या अगदी वर पाहता येईल. संध्याकाळी साडेसहा ते पावणे आठच्या आसपासपर्यंत हे दृष्य दिसेल.

From Khagol

या घटनेनंतर जवळपास दर दिवशी आकाशात पुढील सुंदर दृश्ये पहावयास मिळतील Smile

२७ जाने. २०१२:

From Khagol

२९ जाने. २०१२:

From Khagol

३० जाने. २०१२: (गुरु चंद्र युति

From Khagol

३१ जाने. २०१२:

From Khagol

तेव्हा पहा आणि कसे वाटले ते याच धाग्यावर कळवा
कोणी त्यांच्या एसएलआर कॅमेर्‍याने फोटो काढून येथे टाकले तर अतिउत्तम Smile

डिस्क्लेमरः लेखात वापरलेली चित्रे जालावरुन घेतली आहेत व आवश्यकतेनुसार त्यात बदल केले आहेत. या चित्रांचे सर्वाधिकार त्या त्या संस्थांकडे सुरक्षित आहेत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

सागर, वेळेत कळवलंस. या गोष्टींकडे "फॉर्वर्ड" आल्याशिवाय माझं लक्ष जात नाही.

नायल्या, तुझ्याकडे कॅमेरा आणि ट्रायपॉड दोन्ही आहेतच. फोटो काढायला वेळ नसेल तर ते मला पाठवून दे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आदिती,

तुझी विषयांतली आवड मला माहिती होती, सहज माझ्या लक्षात आले आणि टंकले Smile
फोटो काढल्यावर इथे द्यायला विसरु नकोस Wink

तुला आकाशनिरिक्षण करताना मोकळे आकाश बघायला मिळो अशी मनापासूनची इच्छा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे बहुदा आकाश मोकळं असेल; पण माझ्याकडे ना ट्रायपॉड आहे ना एसेलार. बहुदा माझ्या कॅमेर्‍याने (Canon S3 IS) ट्रायपॉड असेल तर असे फोटो येतील, पण मला उद्याच्या दिवसातच खरेदी करावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेटवर हवे तितके मिळतील की.
खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष स्वतः निरिक्षण केल्याचा आनंद मिलाला तरी पुरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नेटवर हवे तितके मिळतील की.

पण मग किडे कसे करणार?

आमच्या घराच्या जवळच, चालत जाण्याच्या अंतरावर मोठ्या रस्त्यावर एक पूल आहे. त्या पुलावरून चांगला अँगल मिळाला तर फोटो काढायला मजा येईल. खालून जाणार्‍या वाहनांच्या दिव्यांच्या शेपट्या आणि वरती चंद्र+ग्रह.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगला अँगल मिळाला तर फोटो काढायला मजा येईल. खालून जाणार्‍या वाहनांच्या दिव्यांच्या शेपट्या आणि वरती चंद्र+ग्रह.

असा आनंद जालीय फोटोवरुन मिळेल? कधीच नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! आता आवर्जुन लक्ष ठेवेन..
बाकी पुण्यात एसेलार कोणाकडे आहे? वापरणार नसाल तर मलाही पाठवून द्या बरे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम माहितीबद्दल धन्यवाद. फोटो जमल्यास डकावेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असल्यास कॄपया डकवा इथे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम आकाश निरीक्षणाची संधी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मस्त रे भावा.
सुंदर माहिती दिलीस. आता हे खगोलनिरीक्षण केलेच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

ह्या संधीकडे लक्ष ठेवून होतोच. पण तरी अंतर थोडं जास्त असल्याने फोटो काढण्यात खास मजा येणार नाही (पण तरीही सर्वांने प्रयत्न करा! Wink ). फोटो काढायला मी 'ट्रांसिटची' ( http://en.wikipedia.org/wiki/Astronomical_transit) वाट पाहतो आहे. मागे एकदा शुक्र अगदी चंद्राचा तुटलेला टवका असल्यासारखा खाली आला होता तसा फोटो काढायला मजा येईल.

बाकी, संध्या खगोल निरिक्षकांनी मंगळाकडे लक्ष द्यायला हवं. मंगळ नेहमीच दिसत नाही. येत्या काही महिन्यांचा काळ मंगळ दिसण्यासाठी खूप चांगला आहे.

आकाशाकडे लक्ष ठेवायला मी ही वेबसाईट वापरतो: http://earthsky.org/tonight/mars-starts-to-retrograde-on-january-24-2012

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आकाशाकडे लक्ष ठेवायला मी ही वेबसाईट वापरतो: http://earthsky.org/tonight/mars-starts-to-retrograde-on-january-24-2012

मी याच साईटवरील प्रिडिक्शन्सचा आधार घेऊन चित्रे (बदल करुन) दिली आहेत. Smile

पण मी काही सॉफ्टवेअर्स वापरतो, त्यामुळे जास्त मदत होते.

शुक्र चंद्र युतीच्या वेळीस दुर्बिणीतून पाहिले तर चंद्राच्या दिसतात तशा शुक्राच्याही कला पहावयास मिळतील Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुक्र इतका तेजस्वी आहे की त्याच्या कला पहायच्या असतील तर मोठा टेलिस्कोप लागेल. माझ्या ५ इंची टेलिस्कोपमधून कला दिसत नाहीत. माझा अंदाज आहे ८-१० इंची टेलिस्कोप तरी लागेल कला पहायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

४ इंची न्यूटोनियन रेफ्लेक्टरमधून मला कला दिसल्याचं आठवतं. पण तेव्हा बहुदा शुक्र पृथ्वीच्या बराच जवळ आला होता. ८ इंची न्यूटोनियनमधून अर्थातच शुक्राच्या कला दिसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हीनसचा मीनीमम ब्राईटनेस तो सूर्याच्या पलिकडे लांबवर असल्यावर असतो. त्यामुळे बहुतेक तो पलिकडे असेल. ब्राईट असल्यामुळे कला दिसत नाहीत. प्रकाशाचा हॅलो खूप होतो.

अर्थात, त्याशिवाय मॅग्निफिकेशनने फरक पडतोच, मी २५एमएम च्या आयपीस मधून पाहिला होता. ६ एमएमचा आयपीस वापरल्यास कदाचित कला दिसेल. त्याशिवाय कोणती कला आहे त्यावरही अवलंबून आहे. आज कोणती कला आहे हे पाहण्याकरता स्टेलरीयमचा उपयोग होतो. (सद्ध्या कोणती कला आहे हे पाहिलेले नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हे विकिपेडियावाले म्हणताहेत नुसत्या डोळ्यांनी शुक्राच्या कला पाहणे शक्य आहे म्हणून!
http://en.wikipedia.org/wiki/Phases_of_Venus#Naked_eye_observations

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला असा भास झालेला आहे. पण तरी माझ्याच निरीक्षणाबाबत साशंक* आहे. शुक्रकोर कुठल्या दिशेने आहे हे माहीत असल्यामुळे तर डोळे बळेच कोर बघत नसतील ना?
- - -
*पण "भ्रम कशाला म्हणावे" यातही सापेक्षता असते. दूरवरच्या पाट्या अक्षरे अस्पष्ट असतानाच मी वाचू शकतो. म्हणजे अक्षरांचे "स्पष्ट" आकार काय आहेत हे माहीत असल्यामुळे अस्पष्ट बिंबातही तो आकार दिसतो. (हे सांगितले पाहिजे, की पाटीवरचा मजकूर आधीच माहीत नसतो, त्यातील माहिती नवीन असते.) पण जवळ आल्यावर मजकुराचा ताळा जमतो, त्या अर्थी नुसताच भास नाही. अपेक्षेपेक्षा काही अधिक माहितीसुद्धा मिळवलेली असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला असा भास टेलिस्कोपमधून बघितल्यानंतरही झालेला नाही. माझ्या दुर्बिणीतून प्रतिमा उलटी दिसायची त्याचा विचार करूनही बघायचा प्रयत्न केला पण जमले नाही. मला स्वतःला शुक्राच्या कला कधी दिसल्या नाहीत याचं कारण चष्मा लावूनही माझी दृष्टी फार उत्कृष्ट म्हणावी अशी नाही हे ही असू शकतं. मी पाहिलेली कोर साधारणतः ६०-६५% भाग दाखवणारी होती. शुक्र जवळ असणं म्हणजे सूर्याच्या विरुद्ध बाजूस (प्रतियुती) किंवा आपल्याच बाजूला (युती) असं नसून दीर्घवर्तुळाकृती कक्षांचा विचार करून शुक्र काकणभर जवळ होता, असं काहीसं स्मरतं.

थोडी अधिक आठवण अशी की भारतातून साधारणतः रात्री ८:३० च्या सुमारास शुक्र पाहिला होता, म्हणजे सूर्योदयानंतर बराच काळ झाला होता. तेव्हाही शुक्र आकाशात होता म्हणजे सूर्य-शुक्र-पृथ्वी यांच्यात ९० अंशाच्या आसपास कोन झालेला असणार. साधारण असं किंवा याची मिरर इमेज.

सूर्य ----- शुक्र
----------- |
----------- |
----------- |
----------- पृथ्वी

हे सगळं बघितलं तेव्हा अर्थातच नोंदी करण्याची सवय लागलेली नव्हती Sad आणि डिजीटल कॅमेरा हातात असण्याचेही दिवस नव्हते.

विकीपीडीयावर म्हटल्याप्रमाणे, शुक्राच्या कला दुर्बिणीच्या आधी पाहिल्याची नोंद नाही. डोळ्यांनी दिसणार्‍या सर्वच ग्रहांची, सर्व संस्कृतींमधे सखोल निरीक्षणं होत असत. त्यामुळे डोळ्यांनी शुक्राच्या कला दिसतात का याबद्दल थोडी शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आदिती म्हणते त्याप्रमाणे शुक्र सध्या सूर्याशी मोठा कोन करुन असल्यामुळे शुक्र आकाशात जास्त वेळ दिसू शकतो आहे.

शुक्राच्या कला संपूर्ण पहायच्या असतील तरी खूप दिवस त्यासाठी शुक्राचे निरिक्षण करावे लागेल, तेव्हा कुठे या कला दिसतील. Smile

शुक्राच्या कला कशा दिसतात. ते पुढील रेखाचित्रावरुन स्पष्ट व्हावे.

शुक्राच्या कला नुसत्या डोळ्यांनी मी देखील पाहिलेल्या नाहियेत. शुक्राच्या कलांमुळे फारतर त्याच्या तेजस्वितेते फरक पडतो. पण कला नुसत्या डोळ्यांना दुर्बिणीशिवाय दिसणे अशक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भास युतीच्या वेळेला व्हायची शक्यता सर्वाधिक आहे. (म्हणजे शुक्र-अमावास्या म्हणा ना.) वर सागर यांनी दिलेले चित्र बघावे. जेव्हा कोर सर्वात प्रतिपच्चंद्रलेखेव असते, तेव्हा "बिंब गोल नाही" असा अस्पष्ट अनुभव होण्याची शक्यता अधिक. बिंब ५०%-६५%-९०% वगैरे असेल, तर हे बिंब डोळ्यांना वर्तुळावेगळे जाणवण्याची शक्यता तितकीच कमीकमी होत जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रांसिटची' मजा काही औरच असते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आताच पाहिले विहंगम दृष्य..चंद्र आणि शुक्राची युती.
ऑफिस मध्ये असल्याने हातात कॅमेरा नाहीये त्याचं खुपच वाईट वाटतयं...आय्-फोन वरुन एवढ्या अंधारात छायाचित्राची काहिच खात्री नाही.
पण नीरभ्र आकाशात केवळ अप्रतिम नजारा.दिलेली वेळ्ही अचुक.
धन्यवाद सागर.

--मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मयुरा, आठवण केल्याबद्दल धन्यवाद. मी पुन्हा एकदा विसरलेच होते. डोळ्यांना छान दिसलं तरी कॅमेर्‍यासाठी खास वाटलं नाही. हे दोन फोटो त्यातल्यात्यात बरे आलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बहुतेक ऑफिसातल्या फायरवॉलच्या अवकृपेचा परिणाम असावा... Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मयुरा,

हे विहंगम दृष्य पहावयास मिळाले हेच खूप आहे.

आपल्या इथे अनेक दर्दी आकाशप्रेमी आहेत, कोणीना कोणी टाकेनच छायाचित्रे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद देणार्‍या सर्वांना धन्यवाद

छान चर्चा सुरु आहे व त्याद्वारे नवनवीन माहितीही मिळते आहे.

उदा: नायल्या या सदस्याला दुर्बिणीचे तांत्रिक ज्ञान खूप चांगले आहे Wink

आकाशनिरिक्षण नियमित करा आणि त्याचा निखळ अनुभव घ्या.

फोटो टाका रे कुणीतरी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल संध्याकाळचे हे एक छायाचित्र

अर्थस्कायवरुन साभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा शुक्र उलट्या बाजूला का दिसतो आहे? ... ओह, समजलं. मला हे असं बघण्यासाठी अजून दहाएक तास वाट बघावी लागणार आहे. हा भविष्यातला फोटो आहे. Wink

सागर, मी फेस्बुकावरून फोटो टाकले आहेत. त्यामुळे बहुदा तुला दिसत नसावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऑफिसात फेसबुक ब्लॉक आहे. म्हणून दिसत नव्हते...

आता दिसले फोटो. मस्तच दिसताहेत Smile

मी दिलेला फोटो बहुतेक रोटेट न करता जालावर मिळाला तसाच्या तसा दिला त्यामुळे असा उलटा दिसत असावा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रायपॉडशिवाय पाण्यातलं प्रतिबिंबच पकडता आलं.

(फोटो फेसबुकावर आहे; फेसबुक ब्लॉक्ड असेल तर दिसणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त फोटू.
क्यामेरा कुठला आहे हो तुमचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

हेच म्हणते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कॅमेर्‍याची चौकशी करता? कळतात हो असली बोलणी! Wink

कॅमेरा तोच, वरच्या प्रतिसादात उल्लेख केलेला कॅनन S3 IS. फोटोत डाव्या बाजूला खाली कोपर्‍यात डीफोकस्ड कातळ दिसतो आहे, त्याच कातळावर झोपून, कातळावरच कॅमेरा टेकवून फोटो काढला आहे. थोडक्यात नशीब, मी फोटो काढताना माझा फोटो कोणी काढला नाही. तो ही एक मजेशीर देखावा झाला असता. Biggrin

काल फोटो काढतेवेळी ट्रायपॉड नसल्यामुळे हातातून फोटो काढताना आयएसो जास्त ठेवावं लागलं. नाहीतर हात हलल्यामुळे फोटो नीट येत नव्हते. उच्च आयएसओमुळे फोटो noisy आले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फटु काढायला घेणार्‍या पोजेस काय, 'नॉईजी' काय, आय एस ओ काय!!१
छ्या! दुर्बिटणे बै आता आमेरिकन फुल्टु फटुग्राफर झालेल्या दिसताहेत! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चंद्राजवळ गुरु आणि थोडा खाली शुक्र एक छान दॄष्य दिसावे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल रात्री ऑफिसातून घरी यायला उशीर झाला.

साधारण साडेआठच्या सुमारास आकाशात चंद्र आणि गुरु यांची युती इतकी विलोभनीय दिसत होती की बास Smile
त्यात भर म्हणजे शुक्राची ठळक उपस्थिती पश्चिम क्षितिजावर अगदी मावळतीला टेकलेला....

एक विलोभनीय दृष्य होते ते. अंदाजाने पाहिलेली चित्रे व प्रत्यक्ष दृष्य यात बरीच तफावत असते हेच खरे... Smile

कोणी गुरु चंद्राची युती पाहिली का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी ढग आणि नंतर पाऊस आला. गुरू-चंद्राची युती बघता आली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरे नॉईज काय कुठेही दिसतो, आंजावरही दिसतो. तो काढावा किंवा टाळावा कसा हे शिकणं महत्त्वाचं. मी नॉईज हा शब्द कामामुळेच वापरायला शिकले.

अवांतरः हे काय ग्रहयोगच म्हणावेत का, ज्यामुळे ऋसुद्धा खोड्याळ लोकांच्या खोड्या काढायला शिकला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल गुरु, चंद्र आणि शुक्राची विलोभनीय युती पाहिली.
दोन्ही अतिशय ठळक ग्रह असल्याने आकाशात अत्यंत रमणीय दृश्य दिसत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

मस्त चित्रे

अमोल केळकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला इथे भेटा

कालही शुक्र आणि चंद्राची युती पाहिली. फोटो काही खास बरे आलेले नाहीत, त्यातल्या त्यात हा एक दाखवण्याजोगा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.