भ्रष्टाचा-यांना थप्पड माराः अण्णा हजारे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11624875.cms
आधुनिक गांधीजी बनणं जमलं नाही म्हणून आता कायदा हातात घेऊन नथुराम होण्याचा प्रयत्न आहे का? या गटात नाही तर त्या गटात, कुठूनतरी प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार वाटतो का?
रुचले नाही
"थप्पड मारा" फारसे रुचले नाही.
झापड मारा, मुस्काटा/डात मारा, कानाखाली मारा हे जास्त छान वाटते.
Archy: Danny, slap him.
[Danny slaps Bandy]
Archy: With the right, Danny, properly.
[Danny slaps Bandy]
Archy: No, no, no, no. Come on, do it properly, with the back of the right hand.
कुठूनतरी प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार
"कुठूनतरी प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार" असलाच तरी असू देत की.
लाखो करोडो, अरबो रुपयांच्या घोटाळ्यांच्या तुलनेत तो किती घातक ठरेल किम्वा ठरतो?
एनीवेज त्या प्रसिद्धीलोलुप माणसाला मुंबैच्या म्याचमध्ये जनतेने योग्य त्या ठिकाणी मारले आहेच.
तशाच तडफेने आम्हाला लुटणार्यांनाही त्याच ठिकाणी मारले असते तर बरे झाले असते.
हा प्रतिसाद उपहासात्मक असावा
हा प्रतिसाद उपहासात्मक असावा अशी शंका येते आहे.
कालकालपर्यंत मौन, उपोषण वगैरे करणार्या माणसाने अचानक थपडा मारा वगैरे भाषा करून नक्की काय मिळवले आहे? आपल्याला जे करायचं आहे ते करत आहेत, निदान लोकांना काही भलत्या गोष्टी करायला सांगत नाहीत तोपर्यंत ठीक आहे असं म्हणून दुर्लक्ष करता येत होतं. ही भाषा कायदेशीर तरी आहे का? बनायला गेले राष्ट्रीय हीरो आणि खितपत पडले चोरा-दरोडेखोरांसोबत असं काही होणार का?
सहमत
सहमत आहे. पण आता वैचारिक स्पष्टता यायला लागलीय असे या हताश उद्गारांवरून वाटते.
वैचारिक स्पष्टता आधीच आली असती तर भ्रष्टाचाराचे खरे सर्वव्यापी स्वरूप त्यांना आधीच कळले असते आणि आंदोलनाची व्यर्थ उठाठेव करायला त्यांनी नकार दिला असता. दुर्दैवाने त्यांनी सोयीस्कर असा शत्रू निवडला नाही आणि प्रामाणिक मतांपुढे स्वप्रतिमेची काळजी घेतली नाही.
त्यांची हताशावस्था ही भारताच्या संसदीय लोकशाहीचा आणखी एक विजय आहे.
प्रजासत्ताक अमर रहे!
@अदिती
अण्णा हजारेंना फेसबुकावर मिळालेली उदंड लोकप्रियता पाहून काळजी वाटली खरी! अण्णांच्या पाठी जाणार्या या लोकांनी खरोखर थप्पडा मारणं मनावर घेतलं तर काय होईल याचा विचारही करण्याची इच्छा माझ्याकडे नाही
नाय हो. फेसबुकावर अजून 'डिस-लाईक' चे बटण नाहीये ना.
हां कुठल्या तरी अपरिचित सायटीवर तथाकथित पेटिशन लिहून त्यावर सह्या करा अशी चेन-मेल पाठवणे मात्र शक्य आहे.
अण्णा हजारेंना नथुराम बनवले.
अण्णा हजारेंना नथुराम बनवले. आता शरद पवारांना गांधीजी करु नका म्हणजे झालं.
परस्पर विरोधी विधाने केली जाणे, जसे बोलतो तसे न वागणे/जसे वागतो तसे न बोलणे हे राजकारणाचे व्यवच्छेदक आणि सनातन लक्षण होय.
बाकी गांधीजींनी स्वतःदेखील अहिंसा हे तत्व म्हणून स्वीकारले होते की धोरण म्हणून हे कळायला मार्ग नाही.
एकंदरीत...
याआधी शरद पवार यांना थप्पड मारण्याची घटना घडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अण्णांनी ‘ बस एक ही थप्पड मारा ’ असे वक्तव्य केले होते. अण्णांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज झाला होता. त्यावेळी बोलताना अण्णांनी, थप्पड प्रकरणावरुन बोललो तर ती हिंसा आणि मावळ प्रांतात पोलिस शेतक-यांवर गोळीबार करतात ती अहिंसा आहे का ? , असा प्रश्न उपस्थित केला होता.
आर्ग्युमेंटाचा एकंदर दर्जा लक्षात घेता, पुढेमागे अण्णा मआंजावर दाखल झाल्यास कोणास आश्चर्य वाटू नये.
पुढेमागे अण्णा मआंजावर दाखल
पुढेमागे अण्णा मआंजावर दाखल झाल्यास कोणास आश्चर्य वाटू नये
:-) तसे झाल्यास भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार नसून तो देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेला विनिमय आहे हे त्यांना कोणीतरी पराक्रमी उपक्रमी आयडी पटवून देईलच आणि मग त्यांचे विचार अतिसुस्पष्ट होऊन त्यांचा आणि पवारांचा एक कंपू होईल.
अण्णा आणि पवारांचा एक कंपू
अण्णा आणि पवारांचा एक कंपू .... =)) =))
तसे झाल्यास भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार नसून तो देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेला विनिमय आहे हे त्यांना कोणीतरी पराक्रमी उपक्रमी आयडी पटवून देईलच
बौद्धीक कसरत म्हणून तुम्ही आणि मी पण हे करू शकतोच हो! काही फार कठीण नसणार. पण आपण हे का करावं?
एक कल्पनाविलास लिहा की! तुम्हाला जमतं ते.
कसरत
ही घ्या वैचारिक कसरत.
१०० रुपयांतले ८५ रुपये खायला मिळतात म्हणून १०० रुपयांची लोकोपयोगी कामे/योजना निघतात आणि १५ रु तरी खालपर्यंत पोचतात. भ्रष्टाचार संपला (पक्षी- ८५ रु खायला मिळणार नसतील) तर ही १०० रुपयांची कामं निघणारच नाहीत. म्हणून लोकोपयोगी कामे निघावीत म्हणून भ्रष्टाचार आवश्यकच आहे.
कडवट सत्य
लोकोपयोगी कामे निघावीत म्हणून भ्रष्टाचार आवश्यकच आहे
हे तिरकसपणे लिहिलेले असावे. तरीही ते खरेच आहे. एन आर इ जी एस ही योजना कसोशीने सर्व नियम सांभाळून राबवली तर तिथे काम करण्यासाठी यंत्रणेतील मंडळी उत्सुक नसतात, कारण अधिक कष्ट आणि नगण्य मलई. ढिलेपणाने राबवली तर शेकडो कोटींची कामे या योजनेत हा हा म्हणता पार पडतात असे एक निरीक्षण आहे.
व्हिजिलंस ढिला ठेवला - कॉमनवेल्थ गेम्स मधली कामे फटाफट होण्यासाठी, आणि लोकांनी ओरबाडून ओरबाडून खाल्ले. असल्या आपल्या सवयींमुळे एकूणच सरकारी खरेद्यांमध्ये व्हिजिलंस अँगल महत्वाचा ठरतो, आणि पुन्हा सर्व योजना गतिमंद होतात.
(डिस्क्लेमर - भ्रष्टाचार व्हावा असे यातून सुचवले जात असल्यास मी तसे सुचवत नाही.)
आ.रा., तुम्ही वरच्या
आ.रा., तुम्ही वरच्या प्रतिसादातलं पहिलंच वाक्य वाचलेलं दिसत नाही. वैचारिक कसरत करण्यासाठीच तो प्रतिसाद होता. थोडा प्रयत्न केल्यास कोणालाही जमतं.
असो.
व्हिजिलंस ढिला ठेवला - कॉमनवेल्थ गेम्स मधली कामे फटाफट होण्यासाठी, आणि लोकांनी ओरबाडून ओरबाडून खाल्ले. असल्या आपल्या सवयींमुळे एकूणच सरकारी खरेद्यांमध्ये व्हिजिलंस अँगल महत्वाचा ठरतो, आणि पुन्हा सर्व योजना गतिमंद होतात.
:-(
माझे मत
"भ्रष्टाचा-यांना थप्पड मारा.." यात चुकीचे काय म्हटले त्यांनी. आता तशी वेळ आलीच आहे.
तसेच त्यांनी स्वतःला कधी गांधी म्हणुन घेतले नाही. मी तरी त्यांना "गांधीजींच्या पायांशी बसायची माझी लायकी नाही" असेच म्हणताना ऐकले आहे. त्यामुळे आता त्यांना नथुराम बनायचे आहे असे मी म्हणणार नाही.
तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध ज्यांना आंदोलन करावयाचे आहे (फक्त टीम अण्णाच नव्हे, तर सगळेच) त्यांच्याकडुन फक्त गांधीवादाचीच अपेक्षा का ठेवायची हे मला समजत नाही. म्हणजे लगेच बंदुका उचला असे मला म्हणायचे नाही, पण थप्पड मारा म्हटले की लगेच खुप मोठे पाप झाले या थाटात मिडीया मधे चर्चा चालु होते.
सगळे पक्ष (कधी ना कधी तरी) बंद वगैरे पाळताना, दगडफेक वगैरे करतात, तेंव्हा ते गांधीवादी आहेत की नथुरामवादी की अजुन कोणी, याची चर्चा करताना कोणी दिसत नाही. (बिच्चारे) अण्णा, त्यांनी "भ्रष्टाचा-यांना थप्पड मारा.." असे फक्त वक्तव्य जरी केले तरी गदारोळ होतो.
- सूर्य.
अवांतर : स्कोअर म्हणजे काय बॉ?
सूर्य, भ्रष्टाचाराचा निषेध
सूर्य, भ्रष्टाचाराचा निषेध करण्यात काहीही गैर नाही. अडचण आहे ती 'भ्रष्टाचार्यांना थप्पड मारा' या विधानात. भ्रष्टाचाराला थप्पड मारा, भ्रष्टाचार करू नका हे ठीक आहे, पण कायदा हातात घेऊन भ्रष्टाचार करणार्यांना थप्पड मारा असं सांगणारे अण्णा कोण?
उदाहरणार्थ ही बातमी पहा. मटाने कदाचित चुकीची बातमी छापली असेल. हा भ्रष्टाचार आहे असं सांगत ही तोडफोड अण्णांच्या सांगण्यावरून केली असं म्हणावं का?
लिंक ..
लिंक (दुवा) बरोबर आहे ना ? असल्यास, चुकीचा संदर्भ दिला जातो आहे का ? बातमी शिवसेनेने केलेल्या तोडफोडीची आहे. अण्णांनी असे वक्तव्य केले नसते तरी ही तोडफोड झालीच असती. तसेच या तोडफोडीचा व भ्रष्टाचाराचा संबंध कळला नाही.
(बाय द वे, अण्णांनी फक्त थप्पड मारायला सांगितली आहे, तोडफोड करा असे सांगितले नाहीये. ;) )
माझा मुद्दा थोडा अजुन स्पष्ट करायचा प्रयत्न करतो. थप्पड मारा असे विधान चुकीचे आहे असे दिसते. त्यात ज्या माणसाला गांधीवादी वगैरे म्हटले गेले आहे त्यांच्याकडुन आले तर ते अधिकच चुकीचे वाटते. ठीक परंतु, अपहाराचा आकडा दिवसे दिवस वाढत चालला आहे. भ्रष्टाचाराचे मामले दिवसे दिवस वाढत चालले आहेत. या व्यक्तींना शिक्षा होते की नाही हे तर दिसतेच आहे. जेंव्हा आंदोलन चालु होते, तेंव्हा, भ्रष्टाचारी व्यक्ती आमच्यामुळेच गजाआड आहेत असे सरकार म्हणत होते. त्या सगळ्या गजाआडच्या व्यक्ती एकापाठोपाठ एक सुटत चालल्या आहेत. असे असताना आता भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तीला (फक्त) एक थप्पड मारा, (फक्त थप्पड, तोडफोड व मालमत्तेचे नुकसान नव्हे) असे जर कोणी म्हणत असेल तर त्यात काय चुकले हा माझा मुद्दा आहे.
राजकीय पक्षांकडुन भ्रष्टाचार तर होतोच, तसेच उठ्सुट, रास्ता रोको, संप, दगडफेक वगैरे करुन जनतेचे नुकसानच केले जाते. तेंव्हा आपण सर्व फक्त मतदान करुन या माणसांना हरवा असे म्हणतो. पण भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणारे जर फक्त काही (वरीलप्रमाणे) वक्तव्य करत असतील तर लगेच आपण त्यांना नथुराम ठरवुन मोकळे व्हायचे? हे मला पटत नाही. तसेच आंदोलन करणार्यांकडुन जरा जास्तच पेशन्स ची अपेक्षा केली जात आहे का?
- सूर्य.
मार्मिक प्रश्न
आधुनिक गांधीजी बनणं जमलं नाही म्हणून आता कायदा हातात घेऊन नथुराम होण्याचा प्रयत्न आहे का?
अहो - आधुनिक काळातच काय, प्राचीन काळात नि भविष्यकाळातही - गांधी होणं फारच अवघड हो त्यामानाने नथुराम होणं फार म्हणजे फारच सोपं आहे. आणि हल्ली प्रत्यक्ष हत्या न करताही टोपणनावाने जालावर गांधीची काल्पनिक हत्या केल्याचे समाधानही सहज मिळवता येते. (दोनचार पेग झाल्यावर तर हे अधिक सहज जमते.) बूड न हलवता नथुराम होता येते, आणखी काय पाहिजे?
ऐअ वर बोलवा त्यांना, गावगांधी नाही निदान वर्चुअल गांधी व्हायला जमतंय का बघा म्हणाव, नाहीतरी त्यांच्या आंदोलनाच्यावेळी फेसबुक-गांधी बरेच पाहिले आम्ही. :) खुद्द अण्णांनाच जमतंय का पहा म्हणावं.
रच्याकने, '...पुरूषो प्रसिद्धी भवेत्' असे काहीसे वचन आहे. (आमचे संस्कृत कच्चे आहे नि स्मरणशक्ती क्षीण, त्यामुळे पुरे आठवत नाही. :) )
असू शकेल
अण्णांना प्रसिद्धीच्या झोताने बिथरवलं आहे की काँग्रेसवाल्यांशी उपोषणाच्या वेळी झालेले डील फिस्कटले म्हणून बिथरले आहेत हा शोध घ्यायचा मुद्दा होऊ शकतो.
स्वतःच्या भूमिकेवर ठाम असलेल्या व्यक्तीच्या मागे जनमत देखील ठामपणे उभे राहते.
पण वेळोवेळी कोलांटीउड्या मारल्यावर जनआंदोलनातली धार कमी होते हे अण्णांनी लक्षात घेतले पाहिजे.
भ्रष्टाचाराच्या विरोधात केवळ बोलून दाखवणार्या लोकांपेक्षा प्रत्यक्ष आंदोलन छेडणे ही काही कमी धाडसाची गोष्ट नाहिये. खूप मोठी हिम्मत लागते त्यासाठी.
अण्णांचे त्याबद्दल कौतुकच करायला पाहिजे.
पण त्यांनी भूमिकेत हेकेखोरपणा आणण्यापेक्षा मतांमधे, आचारांत आणि विचारांतही ठामपणा आणला पाहिजे.
भ्रष्टाचार्यांना ठोका हा संदेश देशाला हिंसेकडे घेऊन जाईल. हिंसक क्रांती ही नेहमी रक्त मागते आणि त्या क्रांतिला रक्ताची भूक किती आहे याचा अंदाज क्रांती सुरु करणार्यांनाही नसतो आणि त्याचे नियंत्रणदेखील नसते. एका हिंसक क्रांतीची लाट देशात कोणते उग्र रुप धारण करु शकेल हे सांगता येत नाही.
एका क्रांतीतून अनेक उपक्रांत्या जन्माला घालून जात-पात-धर्म यांचे तथाकथित संरक्षक देशात एक अंतर्गत युद्ध सुरु करुन देऊ शकतील.
इजिप्त, लिबिया या देशांतील रक्तरंजित क्रांत्यांनी आज काय रुप धारण केले आहे हे सांगायची गरज नाही.
विविधतेतून एकता साधणार्या भारताचे सगळे जग तोंडात बोट घालून कौतुक करते आहे, आणि आपण कोणत्या वाटेकडे चाललो आहोत याचे जनमानसाने विचार करणे फार गरजेचे आहे.
अण्णांनी परिणामांचा विचार करुन मगच कोणतेही वक्तव्य करावे असे मला वाटते.