भटकंती ४

भटकंती ४

द वॉल

द वॉल , द्रविड ? नै हो अजून भेटला .
चीनची भिंत? हो त्यावर पण एकदा लिहीन. पण आजची भिंत बर्लिनची आहे.

ही पहिल्यांदा ऐकली /वाचली इतिहासाच्या पुस्तकात. दुसर्‍या महायुद्धानंतर चक्क एका मोठ्या शहराचे २ तुकडे करणारी भिंत. मग रिडर्स डायजेस्ट मधे १,२ कथा वाचल्या ग्रेट एस्केप नावाच्या. पुर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत केलेली पलायनं . तेव्हा फार उत्सुकता वाटाली होती या भिंतीबद्दल , इतकी की माझी एक पेन फ्रेंड होती जर्मनीची ,अर्थात पश्चिम जर्मनीची! पण ह्या माझ्या पत्रमैत्रीणीला ती अगदी स्विस बॉर्डर वर असल्यानी भिंतीबद्दल आस्था नव्हती ना खेद.

पुढे १९८९ मधे भिंत पाडली. वर्तमान्पत्रातून जर्मन एकीकरणाबद्दल बरच छापून आल. काही तरी ऐतिहासिक मोठ घडल ह्यापलिकडे फार काही कळाल नाही त्यावयात . माझ्या पुरता फरक पडला तो एवढाच की पुर्व जर्मनीच्या स्टँप्सच्या बदल्यात एका ऐवजी ३ एलिझाबेथ राण्या मिळायला लागल्या Smile

पुढे शिकुन सवरून होइतोवर भिंत मनात मागे पडाली होती. कामानिमित्ताने काही जर्मन कंपन्यां शी संबंध आला. सगळ्या 'नाक वर ' जर्मन लोकांमधे एखाद दुसरा जरा मवाळ भेटला की माझा मित्र पैज लावायचा हा नक्की इस्टजर्मन असणार. भिंतबाई आल्या सरसावून पुढे! संधी मिळाली की एकदा पाहयचीच भिंत अस ठरवून टाकल. लिस्टीत तिच नाव नोंदवून टाकल.

संधी मिळायला पुढे बराच काळ गेला. २ वर्षा पुर्वी बर्लीन चा दौरा ठरला तेव्हा माझ्या जर्मन मैत्रीणीला सांगून ठेवल की मला भिंत पहायचीये ! त्या आठवड्यात खरी भिंत तर पाहिलीच, पण पुर्व जर्मन नजरेतून पाहिली , पश्चिम्जर्मन नजरेतून पाहिली, कलाकाराच्या , वास्तुविशारदाच्या, नव्या पिढिच्या ही नजरेतून पाहिली.

खर सांगू का कोणास ठाउक ,माझ्या कल्पनेत ही भिंत म्हणजे आपल्या भुइकोट किल्ल्यांच्या तटबंदी सारखी होती. जाड , दगडी , बुरूज वाली, बर्लीनमधली २ उपनगरांची वाटावाटी केलेली. पण तिथे भेटलेली भिंत आणि तिची विविध रूपं वेगळीच होती. सगळ्यात महत्वाच म्हणजे चक्क गजबजलेल्या शहराचे दोन तुकडे करणारी. ह्या खालच्या चित्रात दिसतेय ते जुन घर, अन त्याची भिंत . भिंतीच्या आत इस्ट अन बाहेर वेस्ट. ह्याच घराच्या खिडकीतून बाहेर उडी मारून सुरवातीला लोकांनी पलायन केलय.

1

मग तयार झाला हा १०० मि चा पट्टा ! दोन्ही बाजूला काँक्रीट्च्या भिंती , मधल्या मैदानात पेरलेले सुरुंग, अन पहारा देणार्‍या चौक्या.

2

रस्त्याच्या पलिकडे एक वॉल म्युझियम आहे. तिच्या कथा वाचून ,पाहून , ऐकून काटा येतो अंगावर. ह्या कथा न भिंतीत चिणलेल्या वेदना अगदी वॉच टॉवरच्या कठड्यावर पण भेटत रहातात.

3

पायर्‍या उतरताना, समोरच्या इमारतीच्या खिडकीतून उडी मारणारा तरूण दिसतो, पुढे चौकात पुर्वेकडे अडकलेल्या आई वडिलांना भिंती पलीकडून जोडीदाराची ओळख करून देणारी नववधू दिसते , बेकरीच्या भट्टी खालून भुयार खणणारे बेकर काका दिसतात , डाव्या उजव्यांमधे भरडले गेलेले सामान्य जर्मन नागरीक दिसतात. सुन्न होउन आपण जमिनीवर पोचतो तेव्हा दिसते जतन केलेली भिंत. हे लोखंडी गज आता भिंतीच्या ठीकाणी उभे आहेत. त्या कटू इतिहासाची जाणिव , आठवण पुसली जाउ नये म्हणून ओळीत उभे हे गज! मज्जाव करणारी भिंत नाही , तर स्वतंत्र विचारांच आदान प्रदान ,अन लोकशाहीच वार खेळत ठेवणारी लोखंडी गजांची रांग.

4

पुढे शहरभर भेटत राहते ही भिंत! कलाकाराच्या नजरेतून .

5

येणारी अन जाणारी पावल रेखलेली.
6

नाहीतर अगदी फोटो अपॉर्च्युनीटी म्हणून राखलेला खर्‍या भिंतीचा तुकडा. ह्या फोटोतल्या पिढीला त्याभिंतीमागचे आक्रोश अन वेदना नसतील ऐकू येत कदाचित.

7

मला मात्र राहून राहून , बंदिस्त पुर्वेतून पलिकडे दिसणारं स्वातंत्र्य च दिसत राहिल.

end

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

बर्लिन हे जगातील काही मोजक्या शहरांपैकी एक जिथे आधुनिक इतिहासातील प्रत्येक कालखंडात महत्त्वाचं काही घडत गेलं. रेनेसान्सपासून शीतयुद्धापर्यंत अनेक खुणा, मुकुट नि जखमा वागवत पुढे वाहत रहाणारे हे खरे स्थितप्रज्ञ शहर! एकदा नक्की बघायचे आहे. काही दिवस राहून चवीचवीने!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही अशी प्रवासवर्णनं वाचायला मजा येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.