Skip to main content

अपेक्षा आणि फक्त अपेक्षा...

आई कडून मायेची अपेक्षा
पत्नी कडून प्रेमाची अपेक्षा
बहिणी कडून मैत्रीची अपेक्षा
नात्यात खऱ्या प्रेमाची अपेक्षा

शिक्षेत सूट मिळण्याची अपेक्षा
दुःखात सुख असण्याची अपेक्षा
सुखात जास्त पैसाची अपेक्षा
जास्त पैशात मानाची अपेक्षा

शाळेत सुट्टी मिळण्याची अपेक्षा
सुट्टीत मस्त करमणुकीची अपेक्षा
मौजमस्ती म्हणजे उत्साहाची अपेक्षा
उत्साहात वर्गशिक्षा विसरण्याची अपेक्षा

भूतकाळात दुःख विसरण्याची अपेक्षा
भविष्यात उज्ज्वल प्रगतीची अपेक्षा
वर्तमान कडून अतिआनंदाची अपेक्षा
स्वतःसाठी चांगल्या भविष्याची अपेक्षा

मरताना सुद्धा जगण्याची अपेक्षा
जगताना आयते मिळण्याची अपेक्षा
मागताना जास्त स्वीकारण्याची अपेक्षा
देताना मानापमान परतपेढीची अपेक्षा

नव्या वर्षात संकल्पाची अपेक्षा
संकल्पात कष्ट करण्याची अपेक्षा
कष्टाचा दिखावा दाखवण्याची अपेक्षा
आराम करून सुख मिळण्याची अपेक्षा

.शुचि. Wed, 20/01/2016 - 20:39

ठीक वाटली..... किंबहुना सो सो च वाटली.
पण हे लिहीताना लेखणी कचरली कारण "भागवत" हा आय डी.
.
काही आय डी भारदस्त असतात, त्यांच्या लिखाणावरती पट्टदिशी शेरा मारता येत नाही. :)
आता बघा ना हाच आय डी चोच्या किंवा गावठी पोपट असता तर .... ताबडतोब शेरा आला असता. ;)