गाजराचा शिरा

http://www.aisiakshare.com/node/4750
कीस बाप्या कीस, गाजर कीस

साहित्य: गाजर ४ किलो, साखर ३-४ वाटी, दूध १ किलो (अमूल गोल्ड), खोवा (२५० ग्राम), तूप एक वाटी, छोटी इलायची (वेलची) १०-१२, जायफळ १/२. व बदाम १५-२०.

प्रारंभिक तैयारी: सौ. ने आधी बादाम बारीक लांब कापून घेतले. २ चमचे साखर आणि छोटी इलायची सोलून व जायफळ मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घेतले.

संध्याकाळी स्वैपाक व जेवण झाल्यावर सुमार रात्री ८.४५ झाल्यावर पितळेच्या एका जाड भांड्यात गाजराचा कीस दूध घालून उकळायला ठेवले. (जाड बुडाचे भांडे असेल तर शिरा खाली लागणार नाही, जळण्याची संभावना कमी). रात्री ९.३० ला सौ. गाजराचे दूध (गाजरात जेंव्हा थोडे बहुत दूध राहते, ते पळीने काढून त्यात साखर, छोटी इलायची आणि जायफळ यांच्या मिश्रणाची पूड टाकून) गरमागरम एक कप दूध माझ्या पुढ्यात ठेवले. नंतर सौ. ने ४ वाटी साखर भांड्यात घातली.

जेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा बनविते, असे दूध माझ्या साठी काढून ठेवते. अत्यंत स्वादिष्ट लाल रंगाचे दूध पिताना अमृत पिण्याचा आनंद मिळतोच. माझे दूध पिणे संपल्यावर सौ. ने प्रेमाने हाक मारली. इकडे थोडे गाजराच्या शिर्या कडे पाहता का? ताजातवाना बंदा कामावर हजर झाला. मी शिरा परतू लागलो.

सौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो. नंतर एक वाटी तूप हि त्यात टाकले. या तुपाची विशेषता अशी कि मध्यप्रदेशवाल्या आमच्या मेहुणीने पाठविले होते. जंगलात चरणार्या म्हशींचे (शुद्ध ओर्गानिक तूप). तूप टाकल्यावर मस्त वास येऊ लागला. रात्रीचे १० वाजले होते. गॅस मध्यम करून जवळपास पाऊण तास शिरा परतला. तूप सुटू लागल्यावर गॅस बंद करून बदाम काप त्यात टाकले.

दुसर्या दिवशी सकाळी, सौ. ने पुन्हा अर्धा तास मंद आचेवर शिरा पुन्हा भाजला. जेंव्हा शिरा परतताना झारी चालवायला जड वाटू लागेल तेंव्हा समजा शिरा तैयार झाला.

गाजराचा शिरा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

पाककृती उत्तम.

खोवा खोवा हलवा
शिरा भासमान !

आता जरा गम्मत,

जेंव्हा हि सौ. गाजराचा शिरा बनविते,

जेंव्हाही, सौ. गाजराचा शिरा बनवते

जेंव्हा, ही सौ. गाजराचा शिरा बनवते...

कुठला अर्थ घ्यायचा ? (हलके घ्या)

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

आमची मराठी आणखी काय. ...

गाजर ,दुध, साखर, खोवा, तूप हा क्रम घेतला आहे या क्रमात फरक केल्यास दुसरे दिवशी पुन्हा परतावे लागत नाही.

आमची पद्धत वेगळी आहे. आम्ही आधी नुसते किसलेले गाजर तुपावर भरपूर परततो. मग साखर घालून परततो, मग दूध घालून शिजवतो, शेवटी खवा!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्त!
___

सौ. ने खोवा किसून गाजरात मिसळला (काही लोक शिरा तैयार झाल्यावर खोवा टाकतात. पण त्यात मजा नाही, खायला स्वाद येत नाही, आधी टाकल्याने खोवा व्यवस्थित भाजल्या जातो आणि गाजरात एकजीव होतो. शिर्याला स्वाद मस्त येतो.

हे खरे असावे.
कारण चहातही वरुन साखर घालणे व आधीच चहापूडीबरोबर साखर घालून उकळी येऊन मग मुरायला ठेवणे. या दोन्ही मध्ये चवीत फरक पडतो.
तेच साबुदाणा खिचडीचे, वरुन शेवटी घालण्यापेक्षा..... भिजववून फुगलेल्या साबुदाण्यात साखर+मीठ्+दाणेकूट्_मिर्चि चे काप्+कोथिंबिर्+नारळाचा चव घालून नीट मिसळून थोडा वेळ ठेवली अन मग परतली की खिचडी काय सुपर्ब होते Smile .............. हे लिहीत असताना तिरडी उचलायची
वेळ आलेली आहे Wink
____
मागे दिसणारे हारीने लावलेले स्टील चे डबे अतिशय आवडले.

'गाजराचा शिरा' हे 'गाजर का हलवा'चे उलटभाषांतर असावे काय?

(उद्या कोणी 'दुधीच्या शिऱ्या'ची रेसिपी दिल्यास त्याचीही मानसिक तयारी ठेवलेली आहे.)

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

ऋ मला हेच सांगायचे आहे.क्रम बदलला की चवीत फरक पडतो कारण त्यामागे केमिस्ट्री/फिजिक्स आहे.

सहमती आहेच!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(रव्याच्या) शिर्‍याला उत्तरेत 'सुजी'का हलवा म्हटले जातेच. तेव्हा मराठीकरण करताना 'गाजराचा हलवा'पेक्षा 'गाजराचा शिरा' अधिक मराठी आहे! Tongue

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकदा मी केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीला, "साबुदाण्याची उसळ चांगली झालीय" म्हणून अभिप्राय देणारा (वैदर्भिय) रूममेट आठवला!

साधारण दुधी/गाजर हलव्याला मी गोड दुधी/गाजर म्हणतो.