माझी भटकयात्रा - १ (ठेंगोडे चा जागृत सिद्धीविनायक)

भटकयात्रा दिनांक - ३० डिसेंबर २०१५
गाव - ठेंगोडे
ठिकाण - जागृत सिद्धिविनायक मंदिर व इतर छोटी मंदिरे

कसे जायचे ?

महाराष्ट्रातले नाशिक जिल्ह्यातील मालेगांव शहर अनेकांना माहीत असेलच. मालेगाव च्या जुन्या बस स्थानकावर गेल्यास तेथून सटाणा जाणारी बस पकडावी. सटाणा या गावाचे दुसरे नाव बागळण असेही आहे. मालेगाव सटाणा ३३ किलोमीटर आहे. सटाणा येथे उतरून नासिक किंवा देवळा बस पकडावी. त्या बसला या मंदिराचा थांबा आहे. बसेस कमी आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत चालत जाऊन तेथून काळी पिळी रिक्षा पकडावी. तेथून मंदिर ७ किलोमीटर आहे.

सिद्धिविनायक मंदिराबद्दल -

अनायासे मी आणि कुटुंब मुलाच्या ख्रिसमस च्या सुटीत मालेगावला (सासुरवाडीला) आलेलो असल्याने तेथे जायचा योग आला. आमच्या सासूबाई गणपतीच्या उपासक आहेत. आम्ही तेथे साधारण दुपारी एक वाजता पोहोचलो. मंदिर छान आहे. मूर्ती सुखद आणि प्रभावी आहे. आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या मागची मोठी गिरणा नदी पूर्ण आटलेली होती. एरवी पावसाळ्यात येथे यायला वेगळीच मजा येईल असे सासरेबुवांनी सांगितले. मंदिर प्रशस्त आहे. मी आणि सौ ने दर्शन घेतले. तसेच सगळ्यांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तेथे आम्ही सगळ्यांनी आणलेला डबा खाल्ला. अशा हवेशीर ठिकाणी आम्ही सोबत आणलेली चटणी, कोबीची भाजी, भाकरी, पोळी, कांदा, मुळा, गाजर या सगळ्यांची चव नेहमीपेक्षा छान लागली. माझी ७ महिन्यांची मुलगी सोबत होती. तिला सुद्धा हा मंदिराचा हवेशीर परिसर आवडल्याचे जाणवले. मंदिर परिसरात छोटे आसरा देवी आणि खंडेराव मंदिर आहे.

इतर मंदिरांकडे पायपीट -

मी माझ्या मुलाला घेऊन (सध्या सहावीत आहे) सहजच जवळपास फेरफटका मारायला निघालो. ठेंगोडे गाव एकदम लहान खेडेगाव आहे. तेथे थोडे पुढे जाऊन उजवीकडे वळल्यावर हनुमान आणि शनी यांची एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असलेली मंदिरे आम्हाला दिसली. (पाठोपाठ विरुद्ध भिंत). दोन्ही मंदिरात दर्शन घेतले आणि परत आलो. त्यातील शनी मूर्ती मला वेगळीच वाटली आणि या आधी मी कुठेही न पाहिलेली अशी ती मूर्ती होती. शनी देव रथात बसलेले होते.

एकूणच मला एक छान मंदिर पाहिल्याचा आनंद झाला.

http://3.bp.blogspot.com/-XlkK5e46szE/VpznWohPHcI/AAAAAAAAG1w/WtzCmUHuds...
http://2.bp.blogspot.com/-qMJ7c1K-aag/VpznWfu4WEI/AAAAAAAAG1o/YZYcx_fiNn...
http://2.bp.blogspot.com/-caQT-OGcXKY/VpznYTSAb6I/AAAAAAAAG2A/WmZHKtD_ME...
http://2.bp.blogspot.com/-0jMJa5Fc1qY/VpzncSefm6I/AAAAAAAAG2I/ofCQbpTS_i...
http://4.bp.blogspot.com/-sUAyozvtYxc/VpzndwvEyMI/AAAAAAAAG2Y/8lzZHvKMVZ...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाजूला २ स्त्रिया असलेली ती मूर्ती कोणत्या देवाची आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

धन्यवाद निमिष जी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हा लेख वाचुन एक नेहमीचाच जुना प्रश्न परत पडलाय, हे जागृत देवस्थान म्हणजे नक्की काय प्रकार असतो ?
एखाद विशिष्ट देवस्थान जागृत आहे म्हणजे तेथील देव इतर देवळांतील देवांपेक्षा भक्तांना अधिक संवेदनशीलतेने अधिक वेगाने प्रतिसाद प्रचीती देतो असा याचा अर्थ आहे की.
इतर देवतांच्या तुलनेत हा देव अधिक सचेत आहे. की ज्या मुर्तिची प्राणपतिष्ठा झालेली आहे त्या मंदिरातील मुर्तिला जागृत असे म्हणतात व ज्यांची झालेली नाही ते जागृत नाहीत असे काही असते का ? की सरळ आपला जाहीरातीचा भाग असतो. मी अस ऐकलय की अष्टविनायक यात्रा ही अगोदर अस्तित्वात नव्हती हा रीसेट फिनोमेना आहे व यात अधिक वाटा ट्रॅव्हल्स एजंट ट्रॅव्हल्स कंपन्या आदींचा आहे.
काय आहे खर कारण जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीप्रमाणे जागृत देव म्हणजे "नवसाला पावणारा". इतकाच लिमिटेड अर्थ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मारवा: एखाद विशिष्ट देवस्थान जागृत आहे म्हणजे तेथील देव इतर देवळांतील देवांपेक्षा भक्तांना अधिक संवेदनशीलतेने अधिक वेगाने प्रतिसाद प्रचीती देतो.>>> बरोबर आहे.
आदूबाळ: माझ्या माहितीप्रमाणे जागृत देव म्हणजे "नवसाला पावणारा". इतकाच लिमिटेड अर्थ आहे.>>> बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/

देवस्थान

2)

3)

4)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0