कृष्ण-राधा

खुळीबावळी राधा भोळी तिला कसे कळावे, कपटी श्रीरंगाच्या मनीची कुटील कारस्थाने.
संधीसाधू तो नसता कोणी,अवचित येऊनी मागे, करकमलांचा पाश घालुनी कानी गोड कुजबुजतसे.
.
सांग राधीके एकांती या भलत्या वेळी, आलीस ना तू भेटाया मज भीडभाड सोडोनी
का मग हा खोटा दुरावा,लटके दूर लोटणे,वाटे का मी देऊन टाकीन फुका तुझी वसने
.
कोणीही ना येथे केवळ आपण एकांती, आतातरी विसरशील का खोटी जगरीती
क्षणभर डोळे भरुनी मजला तुला पाहू दे ना, देतो मग मी तुझी वसने हे माझे वचन तुला
.
जो पुरुषोत्तम वसे जनी, मनी, कायी अंतर्यामी, त्या कृष्णाने राधेला का केली ही विनवणी,
काय असे तिजपाशी असे जे श्रीरंगाला हवे, काय असे ते तिने लपविले जे त्याला मोह पडे
.
षटऐश्वर्ये युक्त असे जरी कमलेचा कांत, गुपीत त्याचे सापडेल राधेच्या भक्तीत
ना राधा ना कृष्ण अनन्य नाते हे जाणा, भक्तावाचून जगी ना ऊरे विश्वाचा राणा
_____________
अजुनी नाही फुटली
पूर्वेला लाली,
राधा गोरी चंचल,
यमुना स्नानास्तव आली
.
स्वप्न रात्रीचे आठवुनी
मोहरली काया,
कवेत घेई श्रीरंग
पुरते रंगुनी टाकाया
.
सूर वेणूचे उमटले
तिच्या पुनःपुनः हृदयी,
ऊर धपापत होता
कोमल, मधुर आवेगी
.
असह्य होई राधेला
मग मदनाचा दाह,
जपू लागली मनात
ती श्रीरंगाचे नाव
.
यमुनाजळ काळे तिजला
कृष्णासम भासे,
काळ्यायमुने स्पर्शालागी
मन वेडे आसुसे
.
अंगावरची वस्त्रे सुटली,
अंबाडा सुटला,
कंचुकीचे उरलासुरला
बंधही मग तुटला
.
.......... पुढचे सुचत नाय!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या वरून खूप पूर्वी (बहुधा)रोचनाने (चुभेदेघे) एक बंगाली कवितेचा अनुवाद इथे केला होता. त्याची आठवण झाली. शोधून दुवा देतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कृष्ण कळी का? तो दिलतितली यांनी केला होता. पण नक्की या संदर्भात होता का आठवत नाही. कदाचित तुम्ही म्हणता तो वेगळा असेल.

___
http://aisiakshare.com/node/97
नाही नाही हा धागा वेगळा दिसतो आहे.
___
जरुर द्या वाट पहाते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय तोच तोच..ओके दिलतितली!
याच संदर्भात नाही पण तुम्ही दिलेल्या कवितेच्या पहिल्या दोन ओळी वाचून आपोआप तेच आठवले. का कोण जाणे!
बहुदा ळ च्या प्रासामुळे असेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

षटऐश्वर्ये युक्त असे जरी कमलेचा कांत, गुपीत त्याचे सापडेल राधेच्या भक्तीत
ना राधा ना कृष्ण अनन्य नाते हे जाणा, भक्तावाचून जगी ना ऊरे विश्वाचा राणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन एक अर्धवट कविता जोडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0