ड्वोरॅक आराखडा

टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते.

या वर उपाय म्हणून क्वर्टी आराखडा प्रचलीत झाला. यात सर्वात वरच्या ओळीत सुरुवातीचे ईंग्रजी अक्षरं Q,W,E,R,T,Y असे येतात म्हणून याचे नाव QWERTY KEYBOARD. यात पट्ट्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण त्यामानाने बरेच कमी‌ झाले. संगणक आल्यानंतर सर्वात प्रचलीत आराखडा म्हणून संगणकाच्या कळफलकावही तोच वापरला गेला आणि आजही हाच आराखडा सर्वात जास्त प्रचलीत आहे.

परंतु, या क्वर्टी आराखड्यामधे ईंग्रजी भाषा टंकताना एकाच पंजावर जास्त ताण येणे ई. तोटे आहेत. यावर डॉ. ऒगस्ट ड्वोरॅक आणि त्यांचे मेहुणे डॉ. विलियम डेलेय यांनी संशोधन केले आणि कळफलकावरील अक्षरांच्या स्थानाची अदलाबदल करुन एक नवा कळफलक आराखडा तयार केला. यात ईंग्रजी भाषा टंकताना दोन्ही मनगटांच्या स्नायुंचा समान उपयोग केला जातो त्यामुळे एकाच पंजावर जास्त ताण येत नाही.

यालाच ड्वोरॅक लेआऊट असे म्हणतात आणि सिंपलीफाईड ड्वोरॅक लेआऊट खालीलप्रमाणे दिसतो:
Dvorak Keyboard

विकीपिडीया वरुन साभार.

यातही काही किरकोळ बदल करुन वेगवेग़ळ्या उगयोगासाठी वेगवेगळे ड्वोरॅक आराखडॆ बनवले गेलेले आहेत. तसेच अमेरीकन व ब्रिटीश ईंग्रजीतील फरकाप्रमाणेही वेगळे ड्वोरॅक आराखडॆ आहेत.

मला या बद्दल सर्वात आधी २00९ च्या आसपास समजले. त्यानंतर या आराखड्याबद्दल अजुन वाचले असता असे लक्षात आले की, काही चर्चांमधे याचा प्रचार करताना टंकन वेग वाढतो असा फायदा सांगत आहेत. जे पुर्ण सत्य नाही. त्यामुळे अनेक जन निराश होऊन याच्या विरुद्ध मत प्रदर्शन करताना दिसतात.

याचा मुख्य उपयोग संगणकाची आज्ञावली लिहिणे आणि या सारख्या ईतर भरपुर वेळ सलग टंकन करण्याची आवश्यकता असण्या-या व्यक्तींना आहे. आणि हाच मुख्य मुद्दा लक्षात घेऊन अतिंमत: मी हा आराखडा शिकण्याचा निर्णय घेतला. आधीचा क्वर्टी आराखडा मी थेट टंकनयंत्रावरच शिकलो असल्यामुळॆ आधीच मला खाली न बघता वेगात इंग्रजी टंकन करता येत होते. त्यामुळे नवीन आराखडा आत्मसात करणे सोपे गेले.

आंतरजालावर उपलब्ध असलेल्या कोणत्यातरी ड्वोरॅक आराखड्याचा सराव करण्याच्या संकेतस्थळावरुन मी सलग ३ दिवस बसुन हा आराखडा आत्मसात केला आणि मला तो लगेच जमला हे मला अजुनही आठवते आहे.

आपल्याला जर हा आराखडा वापरायचा असेल तर संगणकाच्या स्थापत्य मधे जाऊन कीबोर्ट सेटींग किंवा कीबोर्ड लेआऊट अशी‌ सेटींग शोधा आणि तिथुन तुम्ही हा आराखडा तुमच्या कळफलकाच्या यादीत समाविष्ट करुन शकता. एका वेळी एकापेक्षा जास्त आराखडे ठेवण्याची सोय आहे पण कोणत्याही एका वेळेला एकच वापरता येतो. क्वर्टी मधुन ड्वोरॅक आणि परत बदल करण्यासाठी तुमच्या ओपरेटींग सिस्टीम नुसार एक कीबोर्ड शॉर्टकड असेल तो वापरु शकता.

ड्वोरॅक का वापरावा याबद्दल समर्थन करणार्या काही चर्चांमधे कार्पेल टनल सिन्ड्रोम याबद्दल माहिती मिळाली. पण क्वर्टीच्या सलग खुप वापरण्याने याचा किती टक्के लोकांना अनुभव येतो अशी काही आकडेवारी वाचायला मिळाली नाही.

तुम्ही पण हा आराखडा वापरुन बघा आणि सलग खुप वेळ टंकताना मनगटांना जास्त आराम वाटतो का ते बघा. मी जेव्हापासुन हा आराखडा वापरायला सुरुवात केली तेव्हापासुन् क्वर्टी पेक्षा मला हाच जास्त चांगला आणि वेगवान वाटला म्हणुन मी हाच वापरत आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

http://aisiakshare.com/node/4020
या धाग्यात मी थोडी माहीती दिलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख.
माझा लेख प्रकाशीत झाल्यानंतर गुगलमधुन तुमचा लेख सापडला.

मला केव्हा पासुन लिहायचे होते आणि सुरुवात या विषयापासुन केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद स्पॉक. जरुर लिहा. स्वागत आहे.
____
लेख आवडला आहे.

त्यामुळे नवीन आराखडा आत्मसात करणे सोपे गेले.

हे मात्र कळले नाही. मला तर इन्ट्युइटिव्हली असे वाटेल की जुना कळफलक वापरण्याचे तंत्र "अनलर्न करणे" हे अवघड गेले असेल. पण तुम्ही तर म्हणता ते सोप्पे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ड्वॉरॅक साठी ३ दिवसांपेक्षा जास्त नाही लागले हे माझ्या नक्की लक्षात आहे.

क्वर्टी अनलर्न वर मेहनत घ्यावी लागली नाही. ऊलट जसजसा ड्वॉरॅकचा एकंदरीत वापरातील टक्का वाढतगेला तसे मला क्वर्टी विसरायला झाले आणि क्वर्टी री-लर्न करायलाच खुप प्रयत्न पडले. परत काही क्वर्टी पहिल्यासारखे सुरेख जमेना मग नंतर मी क्वर्टी चा नादच सोडला. आता जेव्हा काही कारणासाठी इतरांच्या संगणकावर टंकन करण्याची वेळ येते तेव्हा मी संगणकाचा नवीनच वापरकर्ता असल्यासारखा प्रत्येक अक्षर खाली बघुन हळुहळु टंकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान माहिती दिली आहे.

'तेव्हा मी संगणकाचा नवीनच वापरकर्ता असल्यासारखा प्रत्येक अक्षर खाली बघुन हळुहळु टंकतो.' असे लिहिले आहे. आम्ही त्या स्थितीमधून बाहेरच पडलेलो नाही. आम्ही बाबा आदमच्या काळातील one-finger typist आहोत.

आमची मुख्य अडचण म्हणजे देवनागरी टंकतांना Baraha, ITRANCE मधल्या कळा लक्षात ठेवून वापरणे ही आहे. 'ऐसी'चे लेखन ह्या दोन्हींहून थोडे वेगळेच आहे.

अवान्तर - हे सर्व वाचून आयकर कायद्यात सतत होणार्‍या बदलांबद्दल पालखीवालांनी लिहिलेले वाक्य 'Learn, Unlearn and Relearn' आठवले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तेव्हा मी संगणकाचा नवीनच वापरकर्ता असल्यासारखा प्रत्येक अक्षर खाली बघुन हळुहळु टंकतो.' असे लिहिले आहे. आम्ही त्या स्थितीमधून बाहेरच पडलेलो नाही.

सेम हीयर Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

one-finger typist

एकबोटे!

अवांतरः तरबेज फायनान्शियल मॉडेलर लोक असतात ते एक्सेल वापरताना माऊसला हात लावणं अपमानास्पद समजतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मी तरबेज वगैरे नाही मात्र मलाही माउसचा वापर कमीत कमी करायला आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चांगली माहिती आहे.

आमची मुख्य अडचण म्हणजे देवनागरी टंकतांना Baraha, ITRANCE मधल्या कळा लक्षात ठेवून वापरणे ही आहे. 'ऐसी'चे लेखन ह्या दोन्हींहून थोडे वेगळेच आहे.

तुम्ही बरहा किंवा आयट्रान्समध्ये लिहून इथे चिकटवत नाही का? मी हल्ली बोलनागरी वापरून टंकते; ते सुरू केल्यापासून ऐसीचा गमभन कीबोर्ड मलाही झेपत नाही. त्यामुळे विंडोजमधून किंवा इतरांचे संगणक वापरून लिहिताना फार त्रास होतो; विशेषतः मी टंकत सुटले की हार्डरॉकला गंड येईल अशा वेगात टंकत सुटते, त्यामुळे इतर कंप्यूटर्सवर टंकताना आणखी मानसिक त्रास होतो.

मराठीसाठी असे काही आराखडे बनवून कळफलक बनवले, निदान सुचवले गेले आहेत का? विंडोजवर येणारा इनस्क्रिप्ट कीबोर्ड असा काही विचार करून बनवला गेला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी टंकनयंत्रावर टंकन करणे कधी शिकलोच नाही. मलापण "शिकलेले" टायपिंग येत नाही, पण त्यामुळे काही अडले नाही. मला कार्पेल टनल आहे, पण ते दोन्ही हातांना आहे, त्यामुळे ड्वोरॅक किबोर्ड वापरूनही कितपत फायदा होईल याबद्दल शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला लॉगइन करण्यात, पोस्ट-कमेंट टाकण्यात दोन दिवसांपासून फार अडचणी येताहेत. त्यामुळे ही कमेंट दोनदा टाकली गेली होती. ती काढात आहे. ती काढतानाही त्रास होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या अंदाजाने जे प्रचलित आहे त्याची सवय झाली की त्याबाहेर पडणे जड जाते. शिवाय बंहुतेक संगणकांच्या कीबोर्डवर, लॅपटॉपवर क्वर्टी पद्धतच दिसते. साहजिक तीच चालू राहते. शिवाय बहुतेकांनाआपला टायपिंगचा वेग कुठल्या स्पर्धेसाठी नाही, तर आपापल्या सोयीप्रमाणे पुरेसा असतो, त्यामुळे पंजावर ताण येण्याचा प्रकार होतच असेल असे नाही. जे ढूंढो-ढूंढो प्रकाराने टाइप करतात, त्यांचा तर पंजावर ताण कशामुळे येतो असाच प्रश्न पडेल.
मराठी किंवा देवनागरी टायपिंगबद्दल, स्पेलचेक, युनिकोड, व्हॉइस टायपिंग याबाबतीत फार प्रमाणीकरण झालेले दिसत नाही. तो मुद्दा आणखी वेगळा.
यापुढे व्हॉइस टायपिंगचे प्रमाण फार वाढेल. गुगलचे हिंदीचे व्हॉइस टायपिंग फार छान चालते. त्यामुळे कीबोर्डचा मुद्दा भविष्यात बराच मागे पडेल असे वाटते व तो टायपिंगपेक्षा एडिटींगसाठी लागणा-या टायपिंगपुरता राहील असा माझा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा आराखडा शिकु इच्छिणा-यांनी इथे एकदा बघावे http://www.dvorak.nl/
यात मॉनीटरवर ड्वॉरॅक आराखडा दिसत राहिल्यामुळे आपल्या बोटांना अक्षरांच्या नविन जागांची सवय करणे सोपे जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संगणकावर काम करतान बसण्याच्या आणि टंकन्याच्या योग्य पद्धती बाबत या काही लिंक्स आहेत. यातील सर्व छायाचित्रांमधे हाताचा किबोर्ड ठेवलेल्या फळीशी असलेला कोन ई. महत्वाच्या गोष्टी बघा:

http://www.wbmerriman.net/intro/pages/type/posture.php

http://www.wikihow.com/Sit-at-a-Computer

http://www.ergonomics.com.au/how-to-sit-at-a-computer/

http://ririanproject.com/2006/10/30/how-to-keep-good-posture-when-in-fro...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ड्वोरॅक कीबोर्डबद्दलचा हा धागा आणि या निमित्ताने वाचलेला शुचिंचा धागा. दोन्ही माहितीपूर्ण आहेत. शुचिंनी निर्देशित केलेलं पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मराठी टंकलेखनाबाबत मी बरहा आणि गमभनला कंटाळून इनस्क्रिप्ट टंकलेखन शिकलो होतो. इनस्क्रिप्ट कळफलक फारच सोयीचा आहे. मात्र इंग्रजी टंकलेखनात क्वेर्टीमुळे हातावर ताण आल्याचे कधी जाणवले नाही. क्वेर्टी खूपच सोयीस्कर आहे. अनेक वर्षांच्या सरावामुळे आता न बघता टंकलेखन करता येते. क्वेर्टी विसरून ड्वोरॅक शिकण्यास काही सबळ कारण दिसत नाही. मात्र लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0