मासे कसे करावेत?

मासे कसे करावेत?

मांसाहारी मध्ये चिकन मटण अंडी हे आम्ही नेहमीच घरी बनवून खातो. पण मासे वगैरे बनविने आमच्या 'हिस' जमत नाही. तेव्हा काही बेसिक प्रश्न विचारावे म्हणतो.

१. बाजारातून मासे कोणत्या प्रकारचे आणावेत ? ( शक्यतो बिगर काटेवालेच खाईन म्हणतो) चांगले मासे कसे ओळखावेत?

२. मासे विकत आणल्यापासून ते स्वयंपाक करेपर्यंत येणाऱ्या स्टेप्स कोणत्या?

३. चांगली भाजी कशी करावी? ( हे बेसिक असलं तरी सविस्तर लिहा. याआधी आमच्या हिने कधीच केले नाहीत म्हणून)

४. मासे कसे खावेत? ( म्हणजे कशाबरोबर खावेत, काय काळची घ्यावी वगैरे)

कृपया मदत करा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा प्रश्न विचारुन शुक्रवारचा छळ मांडलात सुरवंट जी. आता उद्या मासे करणेआले
____

सोलकढी+माशाची तुकडी+माशाचे बगड, शेपटीकडील भागाचा रस्सा + भात खावा ......... आणि शनिवारी * दुपारी ताणून द्यावे .......... इंद्रही झक मारेल या सुखापुढे.
*शनिवारीच रवीवारी नाही कारण रवीवारी, सोमवारचं टेन्शन असतं Sad
___
माशाचा रस्सा-
(१) बगड, लहान तुकडे व शेपटी साफ करुन घेणे (खवले वगैरे काढून)
(२) सर्व तुकड्यांना हळद+तिखट्+मीठ्+हिरवा मसाला (मिर्ची+कोथिंबीर्+आले+लसूण) + हाताशी असेल तर मालवणी वगैरे जो काही आहे तो मसालाही + चिंंचेचा कोळ(असल्यास) लावणे,नसल्यास लिंबू पिळणे (पण त्यात चिंचेची मजा नाही). अर्धा तास लावून ठेऊन देणे.
(३) खूप तापलेल्या तेलावर ठेचलेल्या लसूण पाकळ्या** + आमसुले टाकून मग वरुन हे मिश्रण घालणे. होय तापलेल्या तेलातच आमसुल टाकायचे धुरकट आंबट चव येते जी फक्त वरुन आमसूल घातल्याने येत नाही.
(४) आवडेल त्या प्रमाणात नारळदूध घालणे.
____
माशाते तळलेले तुकडे-
(१) पोट बिट साफ करुन, खवले काढून टाकून मध्यम जाडीचे मोठे मोठे तुकडे घेणे
(२) हळद्+तिखट्+हिरवा मसाला (मिर्ची+कोथिंबीर्+आले+लसूण)+ मीठ+ मालवणी वगैरे मसाला + चिंंचेचा कोळ लावून अर्धा तास ठेवणे
(३) रवा+तांदूळाच्या पीठीत बुडवुन मासे तेलावरती ललसर + खमंग + कुरकुरीत भाजणे
___
मटणात आले जास्त लागते (लसूण एकवेळ नसला तरी चालतो)
माशाला लसूण जास्त लागतो.(आलं एकवेळ कमी पडले तरी चालते)
**- खरी सुग्रण स्त्री लसूण लाटण्याने ठेचते. नवखी स्त्री (/पुरुष व्हॉटेव्हर ) लसूण कापून टाकतात.
असे मी करते. आई जास्त मस्त करतात. पण त्यांचं सिक्रेट माहीत नाही. सोलकढी मी कधी केलेली नाही अजुन Sad

__________

मासे कसे खावेत?

न घाबरता. मांजरीसारखे. लख्ख-स्वच्छ. ताटात फक्त काटे दिसले पाहीजेत. लहान काटे अडकत नाहीत घाबरु नये. मोठे व मध्यम काटे दिसतात. हाकानाका.
___________

चिंबोरी रस्सा -
साहीत्य-
३ डझन खेकडे ................. ही पाकृ मिपावर टाकली आहे. असो. जेव्हा केली तेव्हा पार्टी होती व ३ डझन खेकडेच आणले होते कारण डेलावेअरमध्ये खेकडे टोपल्यांनी मिळतात. जर कमी खेकडे लागत असतील तर प्रमाण अ‍ॅडजस्ट करुन घ्यावे.
५ टे. स्पून तेल
३ मोठे कांदे
१ इंच आल्याचा तुकडा
४ मोठ्या पाकळ्या लसूण
१० लहान तिखट मिरच्या
१ घट्ट वाटी कोथींबीर
२ घट्ट वाट्या ओलं खोबरं
२ टी स्पून चिंचेचा घट्ट कोळ
१ टी स्पून आलं-लसूण पेस्ट
१ टी स्पून हळद
१/२ टी स्पून हिंग
४ टी स्पून लाल तिखट
४ टी स्पून माशाच्या कालवणाचा मसाला
४ टी स्पून धणे-जीरे पावडर
चवीप्रमाणे नारळाचं दूध
चवीप्रमाणे मीठ
.
हिरवं वाटण अर्थात कोथिंबीर, मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या वाटून तयार ठेवणे.
खोबरं तेलावर लालसर परतून तयार ठेवणे आणि नंतर मिक्सरमधून काढणे.
कांदा गुलाबी परतून तयार ठेवणे.
.
चिंबोर्‍या स्वच्छ करून धुवून, नांग्या तोडून घेणे. मोठ्या नांग्या व मधला भाग वेगळा ठेवणे. लहान पाय वेगळे करणे. लहान पाय सगळे भरपूर पाणी घालून मिक्सरमधून काढणे व नंतर गाळून त्याचं पाणी घेणे. ह्याच पाण्याचा रस्सा होणार आहे.
.
आता एका मोठ्या कढल्यात थोडसं तेल तापवा, त्यावर आपला परतलेला गुलाबी कांदा घाला. थोड्या वेळातच चिंबोर्‍यांच्या मोठ्या नांग्या, मधले भाग ,लाल तिखट, माशाच्या कालवणाचा मसाला, हळद, हिंग, धण्याजीर्‍याची पूड, चिंचेचा कोळ व आलं-लसूण पेस्ट घाला. मध्यम आचेवर हे सर्व १० ते १५ मिनीटं मस्त उकळू द्यां. नंतर लालसर परतलेलं आणि मिक्सरमधून काढलेलं खोबरं घाला, मीठ, आणि जरा मेलो करायला नारळाचं दूध घालून, लहान नांग्यांचं आपण काढलेलं पाणी घालून परत मस्त उकळी येऊ द्या.

___________
चिंबोरी रस्सा आई इतका सुंदर करतात की बस्स्स्स!!! मी एकदाच केलेला आहे.

प्रिंट आऊट काढून घेण्यात येईल या प्रतिसादाची. खेकड्याचा बोनस दिल्याबद्दर तर .... जियो..

तोंडाला पाणी सुटलं आहे.

पुण्यात खेकडे मिळतील काय.

पुण्यात एकदाच खरेदी केलेले कँपात. अनुभव वाईट आहे. मुंबईसारखे ताजे फडफडीत नव्हते. देवच जाणे किती दिवसांचे होते. विरस झाला.

१. बाजारातून मासे कोणत्या प्रकारचे आणावेत ? ( शक्यतो बिगर काटेवालेच खाईन म्हणतो) चांगले मासे कसे ओळखावेत?

याविषयीपण मार्गदर्शन करा मंडळी .. Smile

मटण पहाताना गुलाबी घ्यायचं. लाल नाही.
पण मासा मात्र डोळ्याचा खवला म्हणजे सांगता येत नाही पण डोळा असा चकतीवर असतो ती चकती उचलून पहायचा. लाल असेल तर उत्तम. गुलाबी घ्यायचा नाही. हां अजुन एक आठवलं ती चकती दाबली असता थोडं रक्त आलं तर फारच फ्रेश आहे असे समजायचे.
.
इतकं ऐकून्/अनुभवुन आहे. अजुन काही असेल तर अन्य जणांनी सांगावे.

सुपेकर इज युवर म्यान.

(मी खात नाही, पण हे एक जनरल कनौलेडगे.)

*********
आलं का आलं आलं?

राजू फिश मर्चंट - गावडे कॉलनी, टेल्को गेट समोर. बहुतांश वेळा ताजे मासे मिळतात. आकुर्डी चौकातही रस्त्यावर बसलेले मासेवाले आहेत पण त्यांच्यापेक्षा राजूकडे थोडे पैसे जास्त लागले तरी दर्जाची खात्री.

हा प्रतिसाद खेकड्यांसाठीही लागू आहे.

एम. एल. तारू - फिश मर्चंट...डेंगळे पुलाजवळ, तोफखाना/कोर्टाच्या मागच्या बाजूला...

कोणी सीकेपी मित्र असला तर त्याला सरंगा निवडण्याची 'पांढरं पाणी तांबडं पाणी' टेस्ट काय असते ते विचारा.

काटयांबद्दल - सुरमईसारखे (किंग फिश) मासे खातांना मधल्या जाड काटयांपासून सावध राहा. (१९६० साली तेव्हाचे हवाई दल प्रमुख एअर मार्शल मुखर्जी हे टोकियोमध्ये घसामध्ये माशाचे हाड अडकल्यामुळे मृत्युमुखी पदले ह्या प्रसंगाची आठवण येते.)

पोटखळ खातांना काटयांची भीति जादा असते.
मांदेळीसारखे छोटे मासे सगळे तळून संपूर्ण खाता येतात. त्याच्या काटयांची भीति नसते.
कोळंबी (श्रिम्प/प्रॉन) हे खरे मासेच नाहीत पण खायला पूर्ण सेफ. तेच कर्ल्या (खेकडे) तिसर्‍या (क्लॅम) इत्यादींबाबत. शेवंड (लॉब्स्टर) आता हिंदुस्थानात जवळजवळ दिसतच नाही पण तो जिवंत दुकानातून आणून उकळत्या पाण्यात टाकून शिजवायची पद्धत आहे. शिजल्यानंतर साफ करून पाश्चिमात्य पद्धतीने वितळलेल्या लोण्यात बुडवून वा भारतीय पद्धतीने मसाला घालून शिजवून खाता येतो.
बाकी मोरी (शार्क), रावस (सामन), घोळ वगैरे मोठे मासे असतात. सुरमाई, सरंग्याचा कॉम्फिडन्स आल्यानंतर तिकडे वळा...

मोरी म्हणजे बेबी शार्क मिळाले आतापर्यंत. त्यांना कणा असतो बाकी मला तरी काटे अजिबात आठवत नाहीत.
--------
पांढर्‍या पाण्याची माहीती इथे मिळाली - http://maharashtratimes.indiatimes.com/edit/samwad/book-review/articlesh...

एम. एल. तारू - फिश मर्चंट...डेंगळे पुलाजवळ, तोफखाना/कोर्टाच्या मागच्या बाजूला...

मासळी बाजार, तोफखाना आणि कोर्ट यांचं सान्निध्य पाहून पुण्याच्या नगररचनेबद्दलचा आदर दुणावला आहे Wink

आज केलेत मासे. जमल्यास फोटो टाकेन.
आज धण्या-जीर्‍याची पूडही टाकलेय रश्शात व तुकड्यात. जास्त चांगले झालेत.

फोटो दिसत नाहीत. :~

फार उत्तम उपयोगी प्रतिसाद आले मंडळी.
एकंदरीत धन्यवाद Smile

नाही टाकला Smile नेक्स्ट टाइम.

समुद्री मासे चांगले की गोड्या पाण्यातील?

त्याचप्रमाणे कोणते प्रकार अधिक चविष्ट व आरोग्यदायी आहेत?

जालावर एक लिंक मिळाली.

mr.vikaspedia.in/agriculture/fisheries/92e93e93693e90291a947-90992a92f94b917

परवा भारतीय वाणीसामान दुकानातून बांग्लादेशी "हिलसा" आणला होता. अरारारा! किती काटे असावेत त्या माशाला Sad त्याला मर्यादाच नाही.

बोरकरांची कविता आठवली.

मासळीचा सेवित स्वाद दुणा

इतुक्या लवकर येई न मरणा

***ला हिलशाची चव काय Wink
ह घेणे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हिलश्याची निंदा करताय? कुठे फेडाल हे पाप?

@राही & ऋ
तो हिलसा नसेलही कारण माशात काटे होते की काट्यात मासा होता तेच कळत नव्हतं.

अ‍ॅक्चुअली मीही हिलसा प्रत्यक्ष पाहिलेला नव्हता. लहानपणी आम्हांला तारापोरवालामध्ये घेऊन जात असत तेव्हा तिथे एक रोहू नावाचा मासा असे आणि हमखास त्याची ओळख 'हा मासा बंगाली लोक खातात बरं का' अशी करून दिली जायची. पण तेव्हाही हिलसा कोणी दाखवला नव्हता. खूप वर्षांनंतर काही बंगाली लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आणि विशेषतः अलीकडे विकीने अवतार घेतल्यानंतर हिलसा कसा असतो ते साङ्गोपाङ्ग कळले. आपल्याकडे याला पाला म्हणतात आणि तो गोड्या पाण्यातला मासा आहे इतपत प्रगती झाली. नंतर कळले की तो झूलेलाल या सिंधी जलदेवतेचे (किंवा तदृश) वाहन आहे आणि पश्चिम पाकिस्तानातही त्याला मान आहे. इतकेच नव्हे तर तो सर्व भारतभर सापडतो. वरच्या लिंकमध्ये याविषयीच अधिक माहिती आहे.

होय मी लेख वाचला नाही अजुन पण झुलेलाल कळले फोटोत मला.

खरडवहीत लिहीले आहे की तुमच्याकडे मासे छान बनविले जातात. मग हा धाग्याचा उपद्व्याप काय लोकांना फक्त कामाला लावण्याकरता केला होतात काय?

राजू फिश मर्चंट वजनात बरेचदा मारतात असा अनुभव आहे पण पिंपरी भाजी मार्केट मध्ये देखील फिश मार्केट मोठे आहे. सकाळी नऊ आणि दुपारी चार ते पाच च्या दरम्यान ताजी मासळी येते, ती काढताना हजर असल्यास हमखास ताजे मिळतात, शिवाय राफिमं पेक्षा जरा स्वस्त.