स्त्री

स्त्री
----
भलत्या वेळी दरवाजावर थाप पडली ..
तिने धावत येवून दरवाजा उघडला
बाहेर पाहते तो दारात यम उभा दिसला ..
त्याला पाहून ती गोड हसते ...
असा अचानक मध्येच कसा आलास ..
असे यमालाच विचारते
तो म्हणतो मी तुला न्यायला आलोय
चाल लवकर आवर .....
ती म्हणते ...हो जावू आपण पण
जरा आत ये बघ तर माझे घर
आता थोड्याच वेळात बाळाचे बाबा येतील
आले कि कुठे आहेस ग तू म्हणत
घरभर फिरतील ...
त्यांचे मुळी माझ्याशिवाय पान हलत नाही
त्यांचेच काय सारे घरच माझ्याशिवाय
अजिबात चालत नाही ....
तिथे पलीकडे बघ ...तिथे
माझे सासू सासरे असतात ..
दोघेही थकलेत आता सारखे
आजारी पडतात ......
त्या दोघांचे सगळे मीच करते
त्या दोघांमध्ये मी माझे आई बाबा पाहते ..
आता माझी चिमणी बाहेरून
खेळून दमून घरी येईल
आई ,आई भूक लागली म्हणत
घर डोक्यावर घेईल ..
हल्ली न इकडून तिकडून आली कि
मला घट्ट मिठी मारते ...
आई मी मोठी झाली न
कि अगदी तुझ्यासारखी होईन म्हणते ..
ते पाळण्यातले बाल आत्ता उठेल ..
चिमण्या मुठी हलवीत ...
भुकेने रडून गोंधळ करेल ..
बाळ नुसते मी समोर गेले तरी लगेच शांत होतो .
गुलाम फार लबाड झालाय हल्ली
सारखा घेवून बस म्हणतो ...
तूच सांग मी गेल्यावर
या सगळ्यांचे कसे होईल
माझ्या वाचून पोरक्या झालेल्या
माझ्या पिलांना कोण माया देईल ..
अरे बस कर यमा किती रडशील ..
माझ्या ऐवजी तूच इथे हाय खावून मरशील ..
म्हणुनच जे सांगते ते नीट ऐक
पुन्हा अशी चूक करू नकोस
कोणत्याच आईला
अशी अवेळी नेवू नकोस ....
अवेळी नेवू नकोस ...

अनामिक

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली. Sad
__
डोळ्यात पाणी आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनामिक?

कोणाची ढापलीय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहुलजी, नवनिर्मीतीचे डोहाळे लागलेले ऐसीकर फक्त स्वतःचे लेख/कविता/चर्चा इथे टाकतात. अन्य कोणाचे लेख्/कविता वगैरे देण्यास बंदी आहे. हवा तर दुवा देऊ शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

अशा कविता आणि गद्य बरेच ठिकाणी फिरत असतं. एवढे पिळून, पिळून अश्रू काढण्याचे दमदार प्रयत्न बघून आता खऱ्या दुःखाबद्दल असंवेदनशीलता येईल का काय अशी भीती वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रुदाली मध्ये असच दाखवलेल आहे.
सतत रडणारी रुदाली
शेवटी जेव्हा तिचा नवरा/ की मुलगा कोणीतरी मरतो तेव्हा
तिच्या डोळ्यातले अश्रु पुर्णपणे आटुन गेलेले असतात
एकही थेंब....
महाश्वेतादेवींची कथा आहे बहुधा मुळ
तुमची भीती निराधार नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. ढापायची असती तर अनामिक लिहीले नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील कवितेसाठी निरनिराळे शेवट सुचत आहेत अशीही कविता तुमची स्वतःची नाहीच तर तुमची हरकत नसावी. जो कोण अनामिक असेल त्याला अशीही नावाची गरज नाहीच.


म्हणुनच जे सांगते ते नीट ऐक
पुन्हा अशी चूक करू नकोस
कोणत्याच आईला
अशी अवेळी नेवू नकोस ....
अवेळी नेवू नकोस ...

उदास झालास ?
एक कर ही डीव्हीडी बघत बस
डबडबलेल्या डोळ्यांनी त्याने बघितले
अस्पष्ट अक्षरांचा झाला भास
हम दिल दे चुके सनम
हम दिल दे चुके सनम
अन तो म्हणाला बास बास बास


म्हणुनच जे सांगते ते नीट ऐक
पुन्हा अशी चूक करू नकोस
कोणत्याच आईला
अशी अवेळी नेवू नकोस ....
अवेळी नेवू नकोस ...

उमजले त्याला झाला आपला खेळ खल्लास
आत्ता भविष्यात आपल्या फक्त व्हीस्कीचा ग्लास
संतापुन त्यावर तो वदला तिला फर्मास
चलायच तर चल नाही तर कुरवाळत बस तुझ्या पिल्लांस
सोवळी करु नको भंकस
सोवळी करु नको भंकस


म्हणुनच जे सांगते ते नीट ऐक
पुन्हा अशी चूक करू नकोस
कोणत्याच आईला
अशी अवेळी नेवू नकोस ....
अवेळी नेवू नकोस ...

कळला त्याला इशारा केलेला खास
कळला त्याला इशारा केलेला खास
तो म्हणला मनात
(थोड अश्लील होतय जाउ ड्या )
एक ललित लेख होता ग्रेस चा त्यांना भेटायला एक स्त्री येते....... फार काय काय आस्था प्रेम दाखवत........ ते तिला सरळ विचारतात..... ती नंतर वरीलप्रमाणे......
मग ते दोन ओळी टाकतात अचुक आठवत नाही पण
ढळतांना जे अडखळले
ते फुलच असते सडले
अस काहीतरी आहे बघाव लागेल एकदा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळला त्याला इशारा खास!
म्हणाला 'जरा चहा टाक फर्मास
बरं तुझी बक्षतो जान
पण एक से भले दोन घास
अजून एका रेडा बोलावून घेतो
सासू - सासरे दोघांना नेतो
रडू नको हळूच जरा हास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे काही आहे ते भीषण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0