प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

सर्व वाचकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

२६ जानेवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी ब्रिटीशांकडे केली होती. त्या दिवसाचे प्रतिकात्मक महत्त्व म्हणून स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेचा २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकार करण्यात आला. भावनिकदृष्ट्या १५ ऑगस्टला जास्त महत्त्व आहेच पण व्यवहारात २६ जानेवारीचं महत्त्व, आपल्या कायद्यांप्रमाणे आपलं राज्य चालवण्याचं महत्त्व, अधिक आहे. १५ ऑगस्ट १९४७ ते २५ जानेवारी १९५० या काळात १९३५ साली केलेल्या Government of India Act वापरून राज्यशकट हाकला जात होता.

भारतीय लोकांच्या मताप्रमाणे राज्यकारभार चालेल या हेतूने भारतात संसदीय अथवा प्रातिनिधिक लोकशाही अस्तित्त्वात आली. प्रजेची सत्ता भारत या देशावर असावी असा सर्व स्वातंत्र्यसैनिक आणि पुढे राजकीय नेत्यांचा आग्रह होता, त्यातून भारतीय प्रजासत्ताक, Republic of India असं नाव स्वीकारण्यात आलं. या प्रजासत्ताकाची निर्मिती होण्याआधीच देशभर प्रौढ मतदान स्वीकारलेलं होतंच. हा आणि अधिक इतिहास आपण शाळेमधे शिकलेलो आहोत.

अलिकडच्या काळात अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, लोकपाल-जनलोकपाल विधेयक यांमुळे जनतेची सत्ता हा विषय हॉट आहे. एकीकडे फेसबुकावर काय प्रकाशित करावं याबद्दल सध्याचं काँग्रेस सरकारची अचानक जागृत झालेली संवेदनशीलता, सोपा-पिपामुळे जगभरच्या इंटरनेट यूजर्सनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि कायदे यांच्याबद्दल चर्चा घडतच आहेत. भारताच्या प्रजासत्ताकाबद्दल, एकेकाळी असणार्‍या स्वातंत्र्याच्या कल्पना आणि आजची वस्तुस्थिती याबद्दल वाचकांचं काय मत आहे? इंटरनेटवर मिळणार्‍या किंवा न मिळणार्‍या अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल वाचकांच्या काय कल्पना आहेत?

जाता जाता: थोडा उशीराच का होईना, पण बदललेला लोगो आवडला.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अरेच्या ही चर्चा कधी सुरू झाली ते कळलंच नाही.. आज बघितला चर्चा विषय! असो. आता प्रजासत्ताक दिन झाला असला तरी त्यात असलेल्या विषयावर चर्चा व्हायला हरकत नाही.

सिंहावलोकन करताना चांगले वाईट दोन्ही बघायला हवे.
काहि विषयात माझे प्रगतीबद्दलचे मत देतो:
शिक्षणः
चांगले: प्राथमिक शिक्षणात नक्कीच प्रगती झालीये. शिकण्याचे महत्त्व बहुजनांपर्यंत पोहोचले आहे. स्त्रीशिक्षण, प्रौढशिक्षण वगैरे मधेही लक्षणीय प्रगती आहे
सुधारायला हवे: उच्चशिक्षणाचा दर्जा/पद्धत, शाळांच्या इमारती, शिक्षकांचा दर्जा, विद्यार्थ्यांचे केवळ परिक्षार्थी न बनविणे वगैरे वगैरे

औदोगिकीकरण
चांगले: अनेक प्रकारचे उद्योग सुरू झाल्याने भारतातल्या भारतात विविध वस्तुंचे उत्पादन, विनाकारण आयातीत घट, ग्रामिण भागात येणारी सुबत्ता - स्थैर्य वगैरे
सुधारायला हवे: सर्वसमावेशक औधोगिकीकरण, पर्यावरणाकडे लक्ष, उघड-पारदर्शक आर्थिक व्यवहार, संशोधनावर अधिक भर हवा

शेती
चांगले: नवनवे प्रयोग, ठिबकसिंचन, तुषारसिंचनाचा यथायोग्य वापर, हरीतक्रांती
सुधारणा हवी: भुजलपातळी वाढायसाट्।ई प्रयत्न हवेत, खतावरील सबसिडीमुळे खतांचा अतिरिक्त वापर, मालाला योग्य भाव मिळणे, पिकाचा क्वालिटी कंट्रोल

दळणवळण
चांगले: गाव तिथे रस्ता, सुवर्ण चतुष्कोण, सागरी दळणवळणात प्रगती, रेल्वेची प्रचंड वाढ, रस्त्यांचा दर्जा (गेल्या ५० वर्षात) नक्की सुधारला (पुरेसा नाही), मोटार उद्योगात वृद्धी
सुधारणा हवी: सार्वजनिक वाहतूक सेवा, पेट्रोलला पर्याय शोधण्यासाठी गुंतवणूक, अ-पारंपारीक उर्जेवर चालणारी वाहने बनविणे,

चर्चा सुरू झाल्यावर अजून भर घालेनच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!