स्त्री - काल आणि आज

पूर्वी चार भिंतींमध्ये
जखडलेली स्त्री होती.
रांधा वाढा उष्टे काढा
आयुष्य ती जगत होती.

कावळा तिला शिवत होता
चार दिवसाची हक्काची
सुट्टी तिला मिळत होती.

स्त्री आज स्वतंत्र आहे
घरा बाहेर पडली आहे.
ऑफिसात जात आहे
धंधा हि पाहत आहे.

मुलांना शिकवत आहे
स्वैपाक हि करीत आहे.
थकलेल्या शरीराने
अहोरात्र खटत आहे.

कावळा आज शिवत नाही
हक्काची चार दिवसाची
सुट्टी हि मिळत नाही.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नोकरीमध्ये पेड रजा असतात की. टाकायची सुट्टी एखाद्या पावसाळी दिवशी अन मुला-नवर्‍याला हाकलून द्यायचं शाळा-हापीसात, लोळत पडायचं, चा प्यायचा, गाणी ऐकायची - हाकानाका.
त्याकरता पाळी यायची वाट पहायची गरजच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या शाळेत पेड रजाच नसते. आजारी पडल्यास एखादा दिवस पेड रजा मिळते पण त्यासाठी सर्व तासांचे काम सेट करावे लागते आणि बरेच इ-मेल पाठवायला लागतात. त्यापेक्षा आहे त्या अवस्थेत शाळेत गेलेले परवडते. एकदा कामाला लागल्यावर तक्रारी आपोआप गायब होतात. गेल्या पंधरा वर्षात रजेचा अर्ज टाकल्याचं आठवत नाही. अर्थात शाळेला हिवाळ्याची अन उन्हाळ्याची सुट्टी मिळते म्हणून मी टिकले आहे.

कविता आवडली...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-गौरी

माझ्या शाळेत पेड रजाच नसते. आजारी पडल्यास एखादा दिवस पेड रजा मिळते पण त्यासाठी सर्व तासांचे काम सेट करावे लागते आणि बरेच इ-मेल पाठवायला लागतात. त्यापेक्षा आहे त्या अवस्थेत शाळेत गेलेले परवडते.

बाप रे! दॅट सक्स Sad
आमच्याकडे घरुन एक इमेल पाठवावी लागते पण त्याकरता सकाळी लवकर ऊठून , रिमोट अ‍ॅक्सेस करुन पाठवण्यात झोपच जाते आणि लोळायला मिळालेनाही तर सुट्टीची मजा अर्धी झाली असे मी मानते त्यामुळे मी देखील झक्कत जातेच.
.
पण पाळीचे ४ दिवस सुट्टी नको ब्वॉ. गरज तर नाहीच पण इच्छाही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कावळ्याभोवती एवढं का फिरताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हक्काची चार दिवसाची
सुट्टी हि मिळत नाही.

तसे बरे असतात हो पुरुष. एकदा स्वयंपाक आणि भांडी घासणं शिकवून दिलं की चार दिवस काय, तीस दिवस सुट्टी मिळते. मग इंटरनेटवर उनाडत राहायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कावळा तिला शिवत होता
विटाळ तिला होत होता
देवघरात, स्वैपाकघरात
प्रवेश तिला मिळत नव्हता

कावळा शिवला तरी तिला
बाकी कोणी शिवत नव्हते
हक्काची सुट्टी, आराम कसला
चार दिवस अस्पृश्यतेचे होते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला एक कळत नाही, की या स्त्रिया एवढ्या यडपट कशा असतात? पटाइतकाकांना जे उघड उघड कळतं आहे, ते त्यांना का कळत नाही? च्यायला कावळा शिवायच्या वेळी नोकरी वगैरे जाऊदेत, मॅरेथॉन धावण्याचा अट्टाहास का? आणि पूर्वीच्या स्त्रियांना महिन्यातून सव्वीस दिवस घरात मान मोडून काम करायला लागायचं. ते सोडून दर महिन्यात चार वीकेंडच्या आठ सुट्ट्या घ्यायला सांगितल्यात कोणी? हे सगळं कशासाठी तर पैसे मिळवायचे. ते कशासाठी तर स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणे. आणि ते कशासाठी, तर नवऱ्यावर अवलंबून न राहिल्यामुळे त्याची मनमानी चालवून घेत त्याचे अत्याचार सहन करण्याची पाळी येऊ नये म्हणून. आता ही पाळी महत्त्वाची की ती? ते स्वतःच ठरवायचं? त्यापेक्षा पटाइतकाकांना का नाही विचारत त्या? म्हणूनच म्हटलं ना, यडपटच आहेत त्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घासकडवी गुरुजी, हि कविता आजच्या मध्यमवर्गीय स्त्री ची व्यथा आहे. उच्चभ्रू वर्गातील स्त्री (अर्थात जिच्या पाशी अंतर्जालावर मनसोक्त फिरण्यासाठी वेळ आहे). आपले मध्यमवर्गीय status टिकवण्यासाठी ती नवर्या बरोबर घराच्या बाहेर पडली आहे. काहीना आठवड्यातून २ सुट्या हि मिळत असतील. (अधिकांश सहा दिवस काम करतात). दिल्ली मुंबईत बहुतेक कामकाजी स्त्रिया शनिवार- रविवार हि घरातील सर्व कामे कपडे धुणे, घरातील स्वच्छता इत्यादीत निघून जातो. शिवाय मुलांचा अभ्यास हि. त्याना नवर्याची क्वचितच मदत होते. अश्या स्त्रीला काय वाटत असेल- बहुतेक फक्त घरातच काम करणारी त्यांची आई आणि आजी जास्त सुखी असेल. हि व्यथा व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

जर स्त्रिया बाहेर काम करतात तर नवरा त्यांची मदत का करत नाही. कुणी हि असे म्हंटले नाही/ आम्ही स्त्रियांना घरातल्या कामात हि मदत करू.

कधी कधी मला वाटते मुद्दा न समजताच मनात एक विशिष्ट ग्रह करून, उपरोधिक स्वरूपात प्रतिक्रिया देणे म्हणजेच .....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी उपरोधिक प्रतिक्रिया दिली खरी, पण माझं म्हणणंही तितकंच गंभीर होतं. साने गुरुजींच्या आईविषयी त्यांनी जे सांगितलं आहे ते वाचून मला खूप वाईट वाटलं होतं. त्यांचं घर तसं खाऊनपिऊन सुखी, थोडीफार जमीन असलेलं. पण घरातला धबडगा इतका असायचा की त्या बाईला आपल्या गावातून बाहेर जायची वेळ येणं हे कित्येक वर्षांनी जमलं होतं. जयवंत दळवींनीही आपल्या घरातल्या एकत्र कुटुंबातल्या चार बायकांच्या आयुष्याचं वर्णन जे केलं आहे ते वाचून अंगावर काटा येतो. स्वातंत्र्य नाही, अधिकार नाहीत, घरातून बाहेर पडण्याची सोय नाही, आणि कामं प्रचंड.

आजच्या मध्यमवर्गीय स्त्रीला जबाबदाऱ्या आहेतच, त्याबद्दल वादच नाही. पण क्षितिजं प्रचंड प्रमाणावर विस्तारलेली आहेत. त्यामुळेच त्या स्वतः निर्णय घेऊन मुलं, घरकाम ही जबाबदारी असतानाही नोकरी स्वीकारतात. या विस्तृत क्षितिजांसाठी त्या चार दिवसांची अस्पृश्यता/आराम सोडून देतात. पण घराच्या घाण्याला बांधलं जाण्याची जबरदस्ती आणि मग त्यात चार दिवसांचा आराम यापेक्षा नोकरी, पगार, स्वतःच्या पायावर उभं राहाणं, स्वतःला महत्त्व असणं आणि नवरा अचानक गेला तरीही घर सांभाळण्याची क्षमता मिळवणं हे महत्त्वाचं असावं.

पण आपण फक्त दोन पुरुष यावर बोलतो आहोत. त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत? भारतात गेली दहाएक वर्ष नोकरी करत संसार सांभाळणाऱ्या स्त्रियांना तुम्ही विचारून पाहा, तुमच्या आईचं आयुष्य जास्त सुखकर होतं असं वाटतं का? त्यासाठी नोकरी सोडायला तुम्ही तयार आहात का? त्यांची उत्तरं इथे शेअर करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या स्त्रिया चार दिवसाची सुटी नको म्हणतील बहुधा. पण "हितकर काय हेच या स्त्रियांना कळत नाही" असे पटाइत काकांचे म्हणाणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे म्हणणं जुनंच नाही का? "मी तुझ्या भल्यासाठीच तर सांगतोय" असं पुरुषांनी बायकांना म्हणायचं आणि बायकांना ते मान्य नसणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझी आई नेहमीच म्हणायची 'नागपूरला ' गेल्यावर कमीत कमी चार दिवस तरी आराम मिळतो. पण इथे दिल्लीत..... शिवाय कार्यालयात काम करणाऱ्या स्त्री वर्गाची तक्रारच आहे, घरातले कार्य त्यांना एकटीनेच करावे लागतात, पुरुषवर्गाची मदत होत नाही. बरोबरी दोन्ही तर्फे पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पुरुषवर्गाची मदत होत नाही.

तुम्ही तसा लेख का लिहीत नाही? पुरुषवर्गाने मदत करावी असा ?

खरंतर मदत करणे हा शब्दप्रयोग चुकीचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरंतर मदत करणे हा शब्दप्रयोग चुकीचा आहे.

थत्तेचिच्चांशी स्त्रीवादासंदर्भात सहमती व्यक्त करण्याची वेळ येईल असं स्वप्नातसुद्धा आलं नव्हतं. पण झालं बै खरंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरुषांना बगळा शिवल्यागणिक पूर्वी हक्काच्या सुट्या मिळत असाव्यात.. वय वर्षे बारा-चौदा ते अठरा-एकोणीस प्रत्येक दिवशी सुटी! त्यानंतरही वारंवार!

पण मग ब्रह्मचर्य हेच जीवन असल्याचा शोध लागला आणि मुले पुन्हा अभ्यासाला लागू लागली, तरुण कामकाजाला. हुश्श.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0