सारे काही कठीण आहे

मी आपले पिकले पान
बाळा मला सांगशील का?
Smartphone नक्की आहे काय?
Internet ही भानगड काय?
App ही बला भारी
सगळयांना का वेड लावी?

चार मित्र जमले की
खर्च सगळा झाला की
हिशेब सारा ही करते;
मला मात्र लहानपणी
शिकलेले अंकगणित,
पाढे सारे काही आठवते.

तहान लागो न लागो
पाणी प्या सुचवते;
वजन आपले सांगा
प्रमाण सुद्धा ही सांगते;
मला मात्र न सांगताच
पाणी प्यावे वाटते.

थोड्यांची हुशारी,
बाकीच्यांचे लोटांगण.
हळुहळु कळते आहे...
Smartphone साठी
Internet हा श्वास आहे;
नवी पीढी गुलाम आहे.

आत्मतल्लिन बनताना
आत्मनिरिक्षण करा रे!
शरीर हे Smartphone
अक्कल ही App रे
मनाला करा Internet
जरा नव्याने घडा रे!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कठीण आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0