संत्री (व्हॅलेन्टाईन्स डे साठी कथा)

एक आटापाट शहर होते. आटपाट शहरातील एका भरपूर रहदारीच्या आटपाट रस्त्यावर एक आटपाट चौक होता, त्या आटपाट चौकातले फुटपाथ संध्याकाळच्या वेळी भाजीवाले आणि फळवाल्यांनी आणि खाण्या पिण्याच्या गाड्यांनी अडवलेले असत, ऑफीसहून घरी परतताना स्त्री-पुरुष त्या चौकातल्या रहदारीतच बाजूला आपापल्या दुचाकी, कार दाटीवाटीने उभ्याकरून भाजीपाला फळे घेत. पण त्याच ग्राहक लोकांना ज्यावेळी खरेदी झालेली असे तेच भाजीफळवाले फुटपाथवर नको असतं, खासकरून फुटपाथच्या मागची जी दुकाने असत त्यांचा व्ह्यू जात असे आणि धंदा मार खात असे म्हणुन तेच लोक आपल्या दुकानातल्या कामगारा करवी फुटपाथावरील बेकायदेशीर विक्रेत्यांवर कारवाईची कॉर्पोरेशनला विनंती करत, ज्या विक्रेत्यांना कॉर्पोरेशनच्या गाडीची आधी माहिती मिळे ते येत नसत ज्या विक्रेत्यांना आधी माहिती मिळत नसे त्यांच्या विक्रीचे सामान आधून मधूनच्या धाडीत कॉर्पोरेशनकडे जप्त केले जाई.

एक दिवस काय झाल अशीच जप्तिची गाडी जप्तिसाठी आली होती त्या मागे एक लाल दिव्याची गाडी होती. चौकातल्या सार्‍या विक्रेत्यांना आणि दुकानदारांना बडे आधिकारी जप्तिसाठी स्वतः आले असे वाटले, गंमत म्हणजे जप्तिच्या गाडीला हि लाल दिव्याची गाडी कॉर्पोरेशन कमिशनरची नाही दुसर्‍या मोठ्या साहेबांची आहे माहित होते पण साहेब साहेब असतात मागे गाडी पाहून त्यांनी यावेळी जप्तिची वर्दी काही दिली नव्हती, त्यामुळे ज्यांना आधीच माहिती मिळे आणि पळून जात त्यांना या वेळी काही संधी मिळाली नाही सारी ची सारी फुटपथय्या दुकाने उचलली गेली. पुढे जप्तिची व्हॅन मागे लाल दिव्याची गाडी अशी वरात कॉर्पोरेशनच्या नेहमीच्या हापिसात पोहोचली, कलेक्टरांच्या गाडीने पुरताच पाठलाग केल्यामुळे कार्पोरेशनच्या बाबूंची दातखिळच बसायची राहिली होती. जशी हापिसात जप्तिची गाडी पोचली मागो माग कलेक्टर साहेबांची गाडी थांबली त्यातला ड्रायवर उतरला आणि जप्तिच्या गाडी पाशी उभ्या आधिकार्‍यापाशी पोचला. काय चुकलं का ? साहेबांना येऊन भेटू का ?, 'नाय, नाय, त्याची काही आवश्यकता नाही तुम्ही तुमचं काम चालू ठेवा फकस्त हि समदी पकडलेल्या मालाला सोडवायला कितीची पावती फाडाया लागेल ते सांगा' आणि विक्रेते रात्री वापस वस्ती वर पोचतात तो दुसर्‍या प्रायव्हेट गाडीने येऊन वस्तीवर विक्रेत्यांच्या सगळा माल परत केलेलां. विक्रेत्यांना आज हे जगा वेगळं आक्रीत काय घडल कळेनां.

त्या दिवसापासून रोज सकाळी ऑफीसला जाण्यापुर्वी ती लाल दिव्याची गाडी रोज त्या आटपाट चौकात थांबू लागली, साहेब स्वतः गाडीतून उतरत फळवाल्यांच्या भाऊगर्दीत बसलेल्या एका म्हातारीकडून रोज चार किलो संत्री घेत त्यातील दोन संत्री उघडून दोन्हीतील एक एक फोड खात संत्री आंबट आहेत म्हणून त्या म्हातारीला परत करत, ती म्हातारी ती संत्रे खाउन हि संत्री गोड आहेत असे सांगे. हे आता रोजचेच झाले होते.

एक दिवस साहेबांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या बायकोने साहेबांना विचारले 'असे रोज काय करता हो ?' ' संत्रि तर गोड असतात ना ती तरीही का आंबट म्हणून परत करता ?' 'अगं, काही नाही ती म्हातारी संत्रि विकते खात नाही आणि तिने ती स्वतः खावीत आणि तेही माझ्या पैशांनी म्हणून मी आंबट आहे असे सांगून तीला देत असतो त्या निमीत्ताने ती मी दिलेली संत्रि खाते'. इकडे संत्रि वाल्या आज्जीच्या बाजूचा फळवालाही कातावला होता, 'काय हो आजी बाई, साहेब झाला म्हणून काय झाले ? रोज रोज गोड संत्र्यांना आंबट म्हणतो तरी दोन-चार संत्रि तुम्ही त्यांना फुकटात जास्तीची का टाकता ती, त्यांच्याकडे पैशाला कमी हाय का काही ?' म्हातारीने त्याला हसून उत्तर दिले 'अरे बाबा मी संत्री खावी म्हणून तो तसे करत असणार म्हणून मी पण दोन-चार जास्तीची टाकते की त्यात काय एवढं.'

पण कार मध्ये बसलेल्या साहेबांच्या बायकोचे नवर्‍याकडून मिळालेल्या उत्तरावर समाधान झाले नव्हते. तिने नवर्‍याला अजून खोदले, 'तुम्हाला त्याच म्हातारीचाच का एवढा पुळका ?' ' अगं, काही विशेष नाही, त्या चौकाच्या बाजूच्या गल्लीतच माझीही शाळा होती, माझे मित्र 'हिच्याकडून संत्री विकत घेऊन खात, माझ्याकडे तेव्हा पैसे नसत, ते तिला कळे ती तिच्याकडचे माझ्यासाठी वेगळीकडे काढून ठेवलेले चांगलेच संत्रे पण मला पैसे देणे शक्य नाही हे पाहून आंबट आहे असे सांगून पैसे न घेता देत असे, हे असे आमचे प्रेमाच जुन नातं आहे.'
***

*मी कथा लेखन प्रकार स्वैर विस्तार आणि अ‍ॅडाप्टेशन करत प्रथमच हाताळला आहे, कथालेखनात कुठे कमी पडल्यास सुचवावे -प्रमाणभाषा लेखनाचे आग्रह टाळावेत. मूळ कथा प्रेरणा -नेमक्या मूळ पोस्टीचा दुवा देणे तांत्रिक दृष्ट्या जमले नाही - परंतु या फेबु धाग्यावरून.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फेसबुकमधून! उजेड पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0