पहेले 'मार' का पहेला गम!

'शाळा' नुकतंच वाचून संपवलं. तसंच त्यावरचा चित्रपटही नुकताच प्रदर्शीत झालाय. सगळीकडे चित्रपटाची आणि पुस्तकाची चर्चा चालू आहे. पेपरांमधे आणि आंजावर रिव्यू येत आहेत. एकूण सगळं वातावरण शाळामय झालंय. अशात कित्येकांना आपल्या शाळेची, शिक्षकांची, शाळेतल्या मित्रांची (काही भाग्यवंतांना मैत्रीणींची), खोड्यांची आणि विशेषतः शाळेत खाल्लेल्या माराची आठवण झाली नाही तरच नवल. तर या वाहत्या गंगेत हात धूउन घ्यावेत ह्याच एकमेव हेतुने हा धागा काढतोय.

जे सत्तर ऐंशीच्या दशकात शाळेत होते त्यांच्यासाठी शाळेत मार खाणं (शिक्षकांकडून.. इतर पोरांकडून नव्हे) हा अगदी सर्वसाधारण मामला होता. (नंतरचं मला माहित नाही. आमच्या चिरंजीवांवर हात उगारण्याची काहि सोय नाहीये). तर शाळेच्या आठवणीं उगाळताना, आपण शाळेत प्रथम कधी मार खाल्ला? हा विचार आला.. आणि तो दिवस डोळ्यांपुढे जसाच्या तसा उभाच राहिला.

स्थळ : इ. पहिली ब. कोनकर बाईंचा वर्ग
वेळः सकाळी सकाळी हजेरी घेण्याच्याही आगोदर.
मी कोनकर बाईंच्या पुढे डावा हात पुढे करून उजव्या हाताने डोळे पुसत होतो.
मारकुटेपणाच्या बाबतीत कोनकर बाई आमच्या शाळेत नंबर दोनवर होत्या. (पहिल्या नंबरवर मोडकबाई.. त्या अगदी नावाप्रमाणे हात मोडायच्या त्वेषानेच मारायच्या.. असो)
"एकट्यानं जायचंय घरी? जायचंय आत्ता? आण रे त्याचं दप्तर"
हे ऐकल्यावर वर्गातला योगेश सोमण टुण्णकन उठला आणि माझं दप्तर घेऊन आला. त्याचा अशा वेळचा चपळपणा वाखाणण्यासारखा असतो.

तर झालं काय होतं, तर आदल्या दिवशी मला शाळेतून घेण्यासाठी बाबांना थोडा उशीर झाला होता. नेहमी आई यायची पण तिला बरं नव्हतं. मी बाबांची थोडा वेळ वाट बघितली आणि सरळ रस्त्याला लागलो. तशी आमची शाळा घरापासून फार लांब नाही पण मधे एक मेन रोड ओलांडावा लागतो. एवढाच काय तो धोका. अर्थात त्यावेळी आमच्या ठाण्यात इतकी रहदारी नव्हती म्हणा.

मी आरामात घरी पोहोचलो. काका, काकू, नाना, आजी आम्ही सगळे एकत्रच राहात असल्याने मी आल्यावर दप्तर टाकून खेळायला गेलो तरी आईला पत्ता नव्हता. थोड्या वेळाने बाबा घरी आले आणि मग त्यांनी मला बोलावलं. सर्वांदेखत माझी साग्रसंगीत पूजा झाली. त्या दिवशी बाबांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी प्रथम पाहिलं. सगळा प्रकार झाल्यावर प्रत्येकाने माझ्यावर येथेच्छ तोंडसुख घेतलं. मारण्याचा कोटा बाबांनीच संपवला होता.

दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर कोनकरबाईंसमोर रिपीट टेलिकास्ट झालं. बाबांनी बहुतेक बाईंनापण चांगलं झाडलं असणार. सटासट पाच पट्ट्या हातावर बसल्या. मुसमुसत मी पट्ट्या खाल्या पण भोकाड पसरलं नाही. (तसा मी पहिल्यापासूनच सोशिक हो!). दप्तर उचलून जागेवर जाऊन बसलो.

त्यादिवशी शाळेतल्या प्रदीर्घ कारकिर्दीतल्या पहिल्या गुन्ह्याची पहिली शिक्षा मी भोगली होती. पहिल्या प्रेमासारखी पहिल्या माराची आठवणसुध्दा जन्मभर राहाते. अर्थात उर्वरीत आयुष्यात असे प्रसंग चिक्कार आले (प्रेमाचे नव्हे... मार खाण्याचे). पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.

तुम्ही शाळेत कधी ना कधी मार खाल्ला असेलच. कधी सामुदायिक धुलाई तरी कधी कधी स्पेशल वॉश?

(काल्पनिक? मुळीच नाही)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्राथमिक शाळेत मी तशी गुणी बाळ होते. अर्थात परमेश्वराला बहुदा आईचं आणि शिक्षकांचं सुख बघवलं नसावं. (तेव्हा मी नास्तिक नव्हते! गणपतीमुळेच मोदक मिळतात यावर माझी नितांत श्रद्धा होती.) पाचवीत शिंग फुटली. मराठीचा गृहपाठ केला नाही अशी माझी चुगली झाली. सरस्वतीत शिक्षापण अशा मंद प्रकारच्या असायच्या. एकदा केला नाही तर दोनदा करा, दोनदा केला नाही तर चारदा करा वगैरे. आता मला सांगा, जी मुलगी एकदा गृहपाठ करत नाहीये, ती दोनदा करेल का? पण नाही. पण त्या दिवशी मराठे* बाईंचा मूड भलताच होता. आधी सवाल-जवाब झाले.
बाई: गृहपाठ का नाही केला?
मी: विसरले.
बाई: अशी कशी विसरलीस?
मी: (स्वगतः आता गोष्टी कशा विसरल्या जातात याचं उत्तर तुम्हाला तरी माहित आहे का?) विसरले ... बाकीचे लोकं इतर अनेक गोष्टी विसरतात तशीच!
बाई: जेवायला नाही का विसरलीस?
मी: जमत नाही. आई आठवण करते. उरलेलं शिळं जेवण मलाच संपवायला लागेल म्हणूनही विसरत नाही.
बाई: मग गृहपाठाची आठवण नाही का आई करत?
मी: नाही हो. तिला कामं असतात. तिला आख्खी शाळा सांभाळायची असते.
... मग आई कशी शिक्षिका असूनही मी गृहपाठ करत नाही वगैरे वगैरे उद्धार होऊन शेवटी हिंसा झाली. हातावर एक पट्टी मारली गेली. तेव्हापासूनच कानाला खडा ... नाही, नाही, गृहपाठ करायचाच असा नाही... आई-बाबा शिकले आहेत ते विषय दहावीनंतर सोडून द्यायचे आणि काय वाट्टेल ते झालं तर सायन्सलाच जायचं!

*त्या तुझ्या कोणी लागतात का रे? तुम्हालाही होत्या का त्या शिकवायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मराठे बाई माझ्या कोणी लागत नाहीत. आम्हाला त्या सहावीत वर्गशिक्षिका होत्या.
बाय द वे, आपल्या शाळेत 'प्राथमिक' शाळेत जितकी हिंसा व्हायची त्याच्या एक दशांश सुद्धा माध्यमिक वर्गात होत नसे. त्यामुळे तुला कदाचीत कोनकर, परब, राणे, मोडक बाई वगैरे माहित नसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

आपल्या माध्यमिक शाळेत मानसिक हिंसेवर जास्त भर होता. विशेषतः मी चौथीपर्यंत वेगळ्या शाळेतून आल्यामुळे मला ते फार जाणवायचं. अर्थात आधीच्या शाळेचा बाकी दर्जा यथातथाच होता.
पण आठवीत कधीतरी सामुदायिक कवायतीची शाळा सुरू होता होता ठरवलेली जागा पावसानंतर विसरल्यामुळे बाडीवाले बाईंनीही मारलं होतं. दोन पट्ट्यांमधे त्यांचाच हात चेमटल्यामुळे मला हसायलाच येत होतं... आणि मी ते हसू अजिब्बात लपवलं नाही.

मराठे बाई माझ्या कोणी लागत नाहीत.

अरेरे, हा उद्बोधक संवाद लिहीण्याआधीच विचारायला हवं होतं! Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुळीच नाही

शाळेत मार काय ओरडासुध्दा खाल्ला नाही

सगळ्या शिक्षकांशी तसे बरे वागून होते
स्काँलर वर्गात गणले जाण्याचा फायदा असेल कदाचित म्हणा

पण एकदा नववीत असताना भौतिकशास्र शिकवण्याऱ्‍या शिक्षिकेबरोबर थोडा वाद झाला
तशा त्या मला मुळीच आवडयाच्या नाहीत
त्यादिवशी क्षुल्लक कारणावरुन वाजलं आणि त्याच्या विषयाचा अभ्यास करणारच नाही अस ठरलं
मग एकेकाळी भौतिकशास्राची आवड असूनही दहावीनंतर विज्ञानशाखेत प्रवेश घेतला नाही

काँलेजात मात्र उलट घडलं
शाळेत इकोनामिक्सच्या तासाला टीपी करायचे
वैताग यायचा
पण शिरोडकरमँममुळे अर्थशास्राची गोडी लागली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आठवण छान खमंगपणे लिहिली आहे. एवढ्याशा छोट्या कथेतदेखील फ्लॅशबॅक टेक्निक वगैरे म्हणजे लय भारी.

बाकी मला कधी मार बसला नाही. मी लहानपणी अत्यंत गुणी बाळ होतो. अजूनही आहे. त्यामुळे मोठेपणीही अजूनपर्यंत शिक्षकांचा मार खाल्लेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे तुम्ही मोठे झाला आहात का? Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हायला

सिक्सरच मारला

गुणी बाळाची व्याख्या गुर्जीनी कृपया स्पष्ट करावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

अनेकदा. मात्र प्रकरण घरी क्वचित कळत असे (तेही आई त्याच शाळेत असुनही.. तसा मी हुशारच नाहि का? Wink ). मार वगैरे काय एक गमतीदार किस्सा सांगतो. तिसरीतली गोष्ट आहे. मला कोणीतरी सांगितलं होतं की निबंधाची सुरवात ही चांगली असलीच पाहिजे तरच बाई पुढचा निबंध वाचतात.

काय विषय होता माहित नाही. मी निबंधाची सुरवात केली 'आमच्या बाई शहाण्या आहे की त्यांनी असा विषय दिला"
या 'च' मुळे मला आधी शाळेत हशा+मस्करी+गर्भित दम आणि मग (आई त्याच शाळेत असल्याने टिचर्स रूममधे यावरून इतर बाईंनी आईची खेचल्यावर) घरी भरपूर मारही बसला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी शाळेत तसा साधासुधा सरळ मुलगा होतो (अजूनही आहे ;)). पण काही शिक्षक मारकुटे होते. विशेषतः आमचे मुख्याध्यापक ऑफ तासाला वर्गात दंगा असला की सगळ्यांना बडवायचे. अभ्यास न झाल्याने पण छड्या खाल्ल्या होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0