फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

प्रतिक्रिया

... जाहिराती बघून त्या व्यक्तींनी नक्की चॉकलेटच खाल्ल की अजून काही केलं असे वाटते.

फूड पॉर्न या शब्दाचा उगम असाच झाला असेल काय?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा प्रश्न मला पूर्वी पडे.
पॉर्न चित्रपटांत क्यामेरामनचा जॉब करणे म्हणजे अवगह्दाच काम.
अत्यंत आकर्षक व्यक्ती उत्तेजक हावभाव वगैरे करत असणार; कित्येक कामुक क्रिडा करत असणार; पण आपण आपलं नेटाने (क्यामेरा) धरुन
रहायचा.

फुसके बार – १६ फेब्रुवारी २०१६ - फिल्मफेअर, भाजप-पीडीपी युती, साध्वी-मौलाना-महाराज, बाकरवडी - पुण्याचे चलन
.

१) काल फिल्मफेअर पुरस्कारावरून एक स्फुट लिहिले होते.

हे फिल्मफेअर पुरस्कार कोणाला मिळणार याची बहुधा पुरस्कारार्थ्यांना आधीच कल्पना देत असावेत. यावेळी दीपिका पदुकोणेची दसों उंगलियॉं घी में थी. कारण तिला पिकू व बाजीराव-मस्तानी या दोन्ही सिनेमांसाठी नामाकन होते. अखेर पिकू सिनेमासाठी तिला ते पारितोषिक मिळाले.

हे आधीच कळते का ही शंका येण्याचे कारण म्हणजे तिने दोन पानांचे भाषण लिहून आणले होते. नंतर कळले की ते भाषण नव्हते, तर तिच्या वडलांनी तिला लिहिलेले पत्र होते ते. ती स्वत: उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असूनही वयाच्या केवळ अठराव्या वर्षी तिची मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तिने आईवडलांना सांगितले. हे ऐकून ते दोघेही खरे तर स्तंभितच झाले असणार. पण त्यांनी संमती दिली. कारणे दोन, एक की तिला हवे त्यात तिला यश मिळाले तर आनंदच आहे, दुसरे, नाही झाले तर प्रयत्नही न केल्याचा पश्चाताप तिला कधी होणार नाही. हे एवढेच नव्हे. त्या पत्रात खूप स्फूर्तीदायक गोष्टी आहेत. लिंकनने आपल्या मुलासाठी त्याच्या शिक्षकांना लिहिलेल्या पत्राची आठवण व्हावी असे ते पत्र आहे. अगदी जरूर मिळवून वाचावे असे.

या बापलेकीची जोडी पाहून हे जाणवते की एवढे स्वातंत्र्य मिळत असेल ते उपभोगायला तेवढीच जबाबदार संततीदेखील हवी.

प्रकाश पदुकोणे, तुम्ही सर्वार्थाने चांगले खेळाडू आहात याची खात्री पुन्हा एकदा पटली.

२) देशद्रोही किंवा देशहितविरोधी घोषणा केल्यामुळे सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला हे चांगले झाले असे परवा म्हटले तर भाजपच्या या साक्षी महाराज या मूर्ख खासदाराने त्या विद्यार्थ्यांना फाशी द्या किंवा गोळ्या मारून ठार करा असे विधान केले. या मूर्खांमुळे सरकार काही चांगले करायला जाते त्याला वेगळेच वळण लागते.

या साक्षी महाराजचे तोंड ब्रश करण्यापुरते व काही खाण्या-पिण्यापुरतेच उघडे रहावे अशी काही व्यवस्था करायला हवी.

समाजात फुट पाडणा-यांची खरी नावे का प्रचलित नसतात? नावे तर ही साध्वी, ती साध्वी, हा महाराज अशी. मात्र कामे एकापाठोपाठ एक बदमाशपणाची. या लोकांचा या नावाने उल्लेख करणेही लज्जास्पद वाटते.

तिकडे तो दहशतवादी मौलाना मसुद अझर. त्याच्या नावाचा उल्लेख करताना त्याला मौलाना म्हणणे कम्पल्सरी असल्यासारखे का वागतात?

३) जेएनयुमधील देशविरोधी निदर्शने आणि काश्मिर सरकारातली मधली पीडीपी-भाजप युती

जेएनयुमधील देशविरोधी निदर्शनांच्या प्रकरणी आज नवीन व्हिडियो दाखवण्यात आले. त्यात अटक झालेला तेथील विद्यार्थी संघटनांचा नेता कन्हैयाकुमार हाही तेथे हजर असल्याचे स्पष्ट झाले. त्याव्यतिरिक्त या निदर्शनांमध्ये सहभागी असल्यावरून दिल्ली युनिव्हर्सिटीतील माजी प्राध्यापक गिलानी यांनाही अटक होणार असल्याचे कळते.

हे नवीन व्हिडियो दाखवले गेल्यावर आज टीव्हीवरील चर्चांमध्ये अनेक वक्त्यांनी आपली ट्युन बदललेली दिसली.

याशिवाय एक मुद्दा वारंवार विचारला जाऊ लागला आहे. देशविरोधी निदर्शनांबद्दल विद्यार्थीनेत्यांवर देशद्रोहाचा आरोप करणारे केंद्रातील भाजपच्या सरकारला काश्मीरमध्ये पीडीपीची साथ कशी चालते? ती पीडीपी, ज्यांनी उघडपणे अफझलगुरूची फाशीची शिक्षा रद्द करावी अशी मागणी केली होती.

याबाबत एक लक्षात घेतले पाहिजे, की काश्मीरमध्ये सरकारमध्ये एकतरी राष्ट्रीय पक्ष असायला हवा की नाही? पीडीपी हा सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष आहे. त्यांना वगळून काश्मिरमध्ये सरकार स्थापन करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. ते करायचे झालेच, तर भाजप-नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स, किंवा कॉंग्रेस-पीडीपी हे विविध पर्याय होते. कॉंग्रेसने सरकारस्थापनेत सहभागी होण्यास नकार दिला होता. नॅशनल कॉन्फरन्सने भाजपबरोबर सरकार स्थापण्यास नकार दिला होता. तेव्हा भाजप-पीडीपी हा एकच पर्याय होता की नाही? आज भाजपच्या ऐवजी पीडीपीबरोबर कॉंग्रेस असती तर आज भाजपवर होणा-या टीकेचे धनी ते झाले असते की नाही? की पीडीपी व कॉंग्रेस यांच्यात सरकार स्थापन झाले नाही त्याचे कारण पीडीपीने मकबूल भट व अफझल गुरू यांचे समर्थन करण्याला कॉंग्रेसचा विरोध आहे, असे भाजपविरोधकांना वाटते की काय? अजूनही ज्यांचे असे मत असेल त्यांच्यासाठी खाली काही तथ्ये दिली आहेत.

याच भाजपने पंजाबात अकाली दलाबरोबर केलेली युती देशहिताची नाही, कारण अकाली दलाच्या पदाधिका-यांच्या उघडउघड सहभागामुळे तेथील तरूण पिढी ड्रग्जच्या विळख्यात सापडलेली आहे आणि तेथे भाजप अकाली दलाच्या दावणीला बांधल्यासारखा ओढला जात आहे. या युतीवर जरूर टीका झाली पाहिजे. म्हणून एकदोन दिवसांपूर्वीच मी पुढील निवडणुकांमध्ये भाजप अकाली दलाबरोबरच निवडणुका लढवणार असेल ही युती पराभूत झालेलीच बरी असे म्हणले अाहे.

काश्मीरच्या बाबतीत मात्र पीडीपीशी युती करण्यावरून भाजपच्या विरोधकांनी विवेक बाळगला पाहिजे. भाजप सत्तालोलूप आहे हा आरोप काश्मीरपुरता तरी बाजुला ठेवला पाहिजे. मागे कॉंग्रेसदेखील पीडीपीबरोबर सत्तेत होती. संसदेवरील हल्ला झाला २००१मध्ये. त्याच गुन्ह्यात अफझल गुरू याला फाशीची शिक्षा झाली. २००५मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याचे या शिक्षेविरूद्धचे अपील फेटाळले, त्याआधी कॉंग्रेस याच पीडीपीबरोबर सत्तेत होती. त्यानंतरही जवळजवळ अडीच वर्षे कॉंग्रेसचे गुलाब नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली याच पीडीपीबरोबर सत्तेत होती. अफझल गुरूच्या बाबतीत पीडीपीची भूमिका त्यावेळीही तीच होती. आज पीडीपीबरोबर सत्तेत असण्यावरून भाजपवर टीका करणारे हे अगदी सोयीस्करपणे विसरलेले आहेत. या दोन राष्ट्रीय पक्षांशिवाय इतरांचा काश्मीरमध्ये काहीही सहभाग नाही. त्यावेळी ज्यांनी कॉंग्रेसवर या मुद्द्यावरून कॉंग्रेसवर टीका केली नाही, तेदेखील कॉंग्रेसच्या बरोबरीने भाजपवर या मुद्द्यावरून टीका करण्यात अग्रभागी अाहेत. अशी स्थिती आहे.

४) विन्स्टन चर्चिल यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ब्रिटनच्या दोन्ही सभागृहांनी मिळून १९५४मध्ये त्यांचे पूर्णाकार पोर्ट्रेट काढून घेण्याचे ठरवले. परंतु ग्रॅहॅम सदरलंड यांनी काढलेल्या या चित्राचा चर्चिल पतीपत्नींना एवढा तिटकारा होता की तो त्यांनी तेथेच बोलण्यातून दाखवला. त्यांनी ते त्यांच्या गावाकडच्या घरी नेले. तेथे त्या चित्राला कधीही भिंतीवर लटकण्याचे भाग्य तर मिळाले नाहीच, उलट ते नष्ट करण्याचा आदेश चर्चिल यांच्या पत्नीने दिला. अखेर ते जाळून टाकले गेले.

५) पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये दोन रेस्टॉरंट्स आहेत. शेजारी शेजारी. दोन्ही ठिकाणी घरगुती वाटावेत से पदार्थ मिळतात. भाजीपोळीसह सर्व प्रकारचे स्नॅक्स. येथे बटाटाट्याचे उत्तम पराठे जेवढ्या किफायतशीर दरात मिळतात तेवढे पुण्यात कोठेही मिळत नसावेत.
या भागातील आजी-आजोबा व अनेक कामाला जाणारे जोडपी कधीच घरी स्वयंपाक करत नसतील असे वाटावे अशी परिस्थिती आहे. आणि काही घरांच्याबाबतीत हे अगदी खरे आहे. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचे पदार्थ येथूनच मागवले जातात. याला कारण अगदी घरगुती वाटावे असे पदार्थ, कृत्रिम रंग वगैरे नसलेले. शिवाय अगदी किफायतशीर दर.
सिंहगड रस्ता परिसरात राहणारेही अनेकजण संध्याकाळी घरी परत जाताना वाट वाकडी करून या भागातून जातात.
माझी एक मैत्रिण त्यातल्या एकाला बाजीराव म्हणते. म्हणजे पराक्रमी या अर्थाने नव्हे. उलट्या अर्थाने. बसल्या जागी होईल तेवढा धंदा. पदार्थ संपले की तशी पाटी लावून मोकळे. शिवाय गि-हाइकाकडे सुटे पैसे नसतील तर लहरीप्रमाणे मग “घेऊ नका” असे म्हणण्याचा सोपा उपाय.
शेजारी चितळेंचे पदार्थ मिळणारेही दुकान आहे. त्यांच्याकडे तर लिहूनच ठेवलेले आहे की पाच रूपयांच्या खालची सुटी रक्कम तुम्ही द्यायची, वरची असेल तर आम्ही देऊ. म्हणजे ५३ रूपये झाले तर वरचे तीन रूपये गि-हाइकाने द्यायचे, ५७ रूपये झाले तर तीन रूपये चितळे देणार.
आता तर आणखी नामी शक्कल लढवलेली आहे. पाच रूपये सुट्टे नसतील तर त्यांच्या दोन बाकरवड्यांचे छोटे पॅक तयारच असतात. किराणा मालाच्या दुकानदारांनी त्यांची अशी वेगली सोय आधीच करून ठेवलेली आहे.

भविष्यात चितळेंची बाकरवडी ही पुणेकरांची नाशवंत का होईना पण करन्सी होऊ शकेल अशी क्षमता तीत दिसते आहे.

(धागा हलवला आहे. वाचक-सदस्यांना आवाहन. - ऐसी अक्षरे व्यवस्थापन)

काहीही पोस्ट/कमेंट करणे फार अवघड झाले अाहे. अनेकदा 'प्रवेश प्रतिबंधित' असे पेज येते व पुन्हापुन्हा आपोआप लॉगआउट होते.
फुसके बारच्या पुढील पोस्ट्स येथे टाकण्याबद्दलची कमेंत पाहिली. ती येथे सर्वात खाली जी प्रतिसादाची विंडो दिसते, त्यातच सारी पोस्ट टाकायची आहे का? तसे सांगा, उद्यापासून तसे करेन.

काहीही पोस्ट/कमेंट करणे फार अवघड झाले अाहे. अनेकदा 'प्रवेश प्रतिबंधित' असे पेज येते व पुन्हापुन्हा आपोआप लॉगआउट होते.
फुसके बारच्या पुढील पोस्ट्स येथे टाकण्याबद्दलची कमेंत पाहिली. ती येथे सर्वात खाली जी प्रतिसादाची विंडो दिसते, त्यातच सारी पोस्ट टाकायची आहे का? तसे सांगा, उद्यापासून तसे करेन.

ती येथे सर्वात खाली जी प्रतिसादाची विंडो दिसते, त्यातच सारी पोस्ट टाकायची आहे का? तसे सांगा, उद्यापासून तसे करेन.

हो. सहकार्याबद्दल धन्यवाद.

प्रकाश पदुकोणे, तुम्ही सर्वार्थाने चांगले खेळाडू आहात याची खात्री पुन्हा एकदा पटली.

हा हा. ह्या वाक्याचा अर्थ काय आहे बॉ.

भाजप पीडीपी युतीबाबतची टीका कशामुळे? युती केल्याबद्दलची ती टीका नाही.

अफजल गुरूला समर्थन देणे म्हणजे देशद्रोह अशी "भाजपची" व्याख्या आहे. पीडीपीबरोबर युती केलेल्या इतर पक्षांची नाही. म्हणून भाजपने त्यांच्याशी युती केल्याबद्दल स्पेशल टीका. भाजपच्या भूमिकेत कन्सिस्टन्सी नाही हा आक्षेप आहे.

सिक्युलर लोक अफझल गुरूवर अन्याय झाला असे मानतात. त्यांनी पीडीपीशी युती केली तरी त्यात भूमिकेतली कन्सिस्टन्सी जात नाही.

काल मोदी आणि मुफ्ती महम्मद सैद यांचा चर्चेचा फोटो पाहिला. सहसा दोन देशाचे प्रमुख चर्चा करतात तेव्हा दोन्ही देशांचे ध्वज समोर ठेवलेले दिसतात. तसे ते ध्वज ठेवलेले होते. तसे ध्वज मोदी फडणवीस यांच्याशी चर्चा करतात तेव्हा ठेवले जातात का? नसतील तर याचा अर्थ काश्मीर स्वतंत्र देश असल्याचे मोदी मानतात असा अर्थ होतो का?

flag

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तसे ध्वज मोदी फडणवीस यांच्याशी चर्चा करतात तेव्हा ठेवले जातात का? नसतील तर याचा अर्थ काश्मीर स्वतंत्र देश असल्याचे मोदी मानतात असा अर्थ होतो का?

हा प्रश्न थत्तेचाचांनी विचारावा याचे आश्चर्य वाटले.
काश्मिर स्वतंत्र देश नाही मात्र स्वायत्त राज्य आहे. त्याला विशेष स्टेटस आहे. काश्मिरला स्वतःचा स्वतंत्र ध्वज, घटना वगैरे असणे भारतीय घटनेशी सुसंगत आहे.
महाराष्ट्राला काश्मिर सारखे विशेष स्टेटस नाही त्यामुळे फडणवीसांशी चर्चेच्यावेळी अशा ध्वजाचा संबंध येत नाही.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला ठाऊक + मान्य आहे.

फोटोमध्ये मोदींच्या जागेवर दुसरा कोणी असता तर ह्याच झेंड्यावरून.....

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पाने