फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६

फुसके बार – १४ फेब्रुवारी २०१६
.

१) एबीपीमाझावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणा-या मिसळीचे प्रकार दाखवत होते. नाशिकच्या एका ठिकाणच्या मिसळीमध्ये चिवडा, पोहे वगैरे काहीच नसते. मोड आलेली वेगवेगळी कडधान्ये, वेगवेगळ्या प्रकारची शेव, तर्री. मोड आलेल्या कडधान्यांवर एक निखारा ठेवलेली पणती, त्यापासून येणारा धूर आत कोंडावा म्हणून वरून झाकण. त्याचा वेगळाच स्वाद येतो. अशा प्रकारे आपल्याला हवे तसे कमी-अधिक तिखट करून घेता येते

मग ते झाल्यावर ठाणे, पुणे वगैरे टिकाणच्या.

इंग्रजी किंवा इतर कोणत्याही चॅनलवर अशा कार्यक्रमांमध्ये दाखवले जाणारे टीव्हीवाल्यांचे चवीचे रसिक सहसा सडपातळ नसतात; किंबहुना सडपातळ म्हणता येईल याच्या जवळपासही नसतात, यामागचे रहस्य काय असावे?

दुसरी गोष्ट म्हणजे हे खवैय्ये विविध पदार्थ चाखताना उऽऽऽम, वगैरे प्रशंसादर्शक, मादक आवाज काढत असतात, त्यावेळी त्यांच्या कॅमेरामनच्या तोंडाला किती पाणी सुटत असेल. की आधी कॅमेरामनचा पोटोबा शांत करून हे शुटिंग केले जाते? मला विमानतल्या हवाईसुंद-या, रेस्टॉरंटमधले वेटर्स यांच्याबाबतही नेहमी हाच प्रश्न पडतो. त्यांच्यापैकी कोणी पदार्थ वाढताना सारखे आवंढे गिळताना दिसत नाही.

यातला सर्वात मोठा व क्रूर विरोधाभास म्हणजे इकडे हे लोक मिटक्या मारत मिसळ खाण्याचे आधीच रेकॉर्ड केलेले चित्रीकरण दाखवले जात असताना खालच्या पट्टीत काश्मीरमधील कुपवाडात झालेल्ता चकमकीत एक चांदवडचा तर दुसरा विजापूरचा असे दोन जवान मृत झाल्याची व एक मेजर पदाचा अधिकारी गंभीर जखमी झाल्याची बातमी दाखवली जात होती.

यावेळी मात्र सांगलीकडचे कुपवाड आणि काश्मिरातले कुपवाडा यांच्यात गल्लत न करण्याइतके टीव्हीवाले शहाणे झालेले दिसत होते.

२) देशद्रोह म्हणजे नक्की काय ते एकदा ठरवण्याची वेळ आली आहे. देशद्रोह म्हणजे देशाबाहेरच्या शक्तींशी संधान साधून त्यांना संवेदनशील माहिती पुरवणे एवढाच आहे का?

‘कोणी पादले तरी तो देशद्रोह समजला जाईल’ अशी पोस्टही या निमित्ताने पाहण्यात आली. त्यांना हा प्रश्न खडसावून विचारला पाहिजे. केवळ इतरांचा द्वेष करायचा या एकमेव भुमिकेतून विविध पक्षात विभागलेले दलित एकत्र येऊन इतरांचा द्वेष पसरवण्याच्या स्वत:च्या अजेंड्यात साथ देत नाहीत म्हणून थयथयाट करणारे हे महाभाग कळतनकळत या देशद्रोह्यांनाच साथ देत आहेत. त्यामुळे ख-या देशद्रोह्यांवर टीका केली तरी यांच्या पोटात दुखताना दिसते. त्यातूनच कोणी पादले तरी त्याला हे सरकार देशद्रोह समजेल काय अशा हास्यास्पद फुसकुल्या हे महाशय फोडताना दिसतात.

या महाशयांच्या वॉलवर त्यांचे समविचारी मित्र इतर जातीयांचा द्वेष करणा-या कमेंट्स सर्रास महात्मा फुले इत्यादींच्या नावावर नियमितपणे खपवताना दिसतात आणि त्याला यांची अजिबात हरकत नसते. मी कुठल्याही जातीच्या आधारावरील संघटनाविरूद्ध आहे, कारण ते एकूण समाजाच्या हिताचे नाहीच. पण हे महाशय ब्राह्मणांच्या एकत्र येण्याच्या आवाहनांच्या पोस्ट्स वेचून वेचून एकत्र करतात व त्यावर त्यांचे समविचारी मित्र वर उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मणविरोधी कमेंट्स करतात. याला अर्थातच यांची हरकत नसते. मात्र इतरत्र ब्राह्मणांवर जहरी टीका करणा-या पोस्ट्सही इतरत्र सर्रास दिसत असताना त्यात मात्र यांना काही वावगे दिसत नाही. यांच्या स्वत:च्या वॉलवर हा एकांगी प्रकार नेहमीच जळत असताना यांची देशद्रोहाबद्दलची किंवा देशविरोधाची संवेदनाच बधीर झालेली दिसते यात काय आश्चर्य?

जेएनयुमधील विद्यार्थ्यांचे वर्तन देशविरोधी घोषणा वा दहशतवादावरून फाशी झालेल्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणे हे देशद्रोही वर्तनच समजले पाहिजे. या पार्श्वभुमीवर जेएनयुमध्ये देशविरोधी स्वरूपाच्या घोषणा देणा-यांवर कारवाई करण्याची केन्द्र सरकारच्या भुमिकेचे स्वागतच करायला हवे. त्याचबरोबर या देशद्रोह्यांच्या समर्थनासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून कोण पुढे येते यावरदेखील लक्ष ठेवले पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येमुळे हैद्राबाद विद्यापीठातील त्याच्या संघटनेने याकूब मेमनच्या फाशीला मानवतेच्या आधारावर समर्थन करण्याच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले गेले किंबहुना पाठीशी घातले गेले. असे समर्थन करण्याच्या उद्योगांमुळे तोही देशद्रोही होता का असा प्रश्न विचारला गेला. डॉ. आंबेडकरांचे नाव तुमच्या संघटनेला देता, त्यांचे कार्य जरूर पुढे न्या, मात्र त्यांच्या नावाची ढाल पुढे करून तुमचे सगळेच उद्योग पवित्र करून घेतले जातील या भ्रमात राहू नका हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे.

अभाविपचे कोठे चुकत असेल, तर ते जरूर दाखवून द्या, त्यांच्या हातून काही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत असेल, तर ते करणा-या त्यांच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर जरूर कारवाई करा. मात्र ते करतात ते सगळेच चूक आणि आम्ही राजकीय चळवळीत असूनही वेळ आली की सोयीप्रमाणे दलित, कम्युनिस्ट वगैरे चेहरे मिरवणार आणि स्वत:ला सरसकट निर्दोष, अभागी म्हणवून घेणार. हे यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही.

मुळात या मुलांना या वाटेने जाण्यास प्रोत्साहन देणारे कोण आहे हे शोधायला पाहिजे.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे निमित्त झाल्यामुळे हैद्राबाद विद्यापीठात दिवसभर ‘उपोषण’ करणारा नाटकी पप्पू काल जेएनयुमध्येही आला, कारण येथेही भाजपचा निषेध करण्याची संधी त्याला दवडायची नव्हती. मात्र ज्या विद्यार्थानी तेथे देशविरोधी घोषणा दिल्या त्याबद्दल तो काही बोलला नाही.

या लोकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नेहमी देशद्रोह्यांच्या किंवा दहशतवाद्यांची भलावण करण्यातच कसे खर्ची होते, हा प्रश्न कोणालाच कसा पडत नाही?

जेएनयुसारखी विद्यापीठे ही डावे विचार असलेल्यांचा बालेकिल्ला मानली जातात, त्यामुळे डी. राजा, सीताराम येचुरी हे तेथील कारवाईवरून चिडणे साहनिकच आहे. पण कुठली कृत्ये देशहिताची नाहीत हे समजण्याइतकी समज कॉंग्रेसकडे; जो राष्ट्रीय पक्ष म्हणवतो; नसावी? पप्पूच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष म्हणून किती दिशाहीन झाला आहे याचेच हे लक्षण आहे.

जेएनयुमधून पास झालेल्या आर्मीतल्या बुजुर्ग निवृत्त अधिका-यांनीही तेथे चाचलेल्या देशविरोधी उद्योगांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे व असेच प्रकार चालू राहिले तर आम्हाला या विद्यापीठाकडून मिळालेल्या पदव्या परत कराव्या लागतील असे त्यांनी सांगितले आहे.

३) द्रमुक – कॉंग्रेसची हातमिळवणी देशाला लुटणारे पुन्हा एकत्र

तामिळनाडुतल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीची आज घोषणा झाली. याच दुकलीने मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या आड देशाला लुटले होते. लुटले होते हा शब्दही तोकडा ठरावा इतके लुटले होते.

२जी घोटाळे उघड झाल्यावर द्रमुकचे तोन मंत्री थोडाकाळ गजाआड गेल्यामुळे या दोन पक्षांमध्ये वितुष्ट असल्याचे चित्र होते. मात्र आता निवडणुका जवळ आल्या की हे दोन्ही लुटारू पुन्हा एकत्र आलेले आहेत.

या मैत्रीवरून पप्पूला कोणी विचारल्याचे ऐकिवात नाही. त्याच्या पक्षाने च द्रमुकने केलेल्या लुटालुटीची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे काही बोलणे योग्य नसल्याचे कारण पप्पू देईल.

इकडे अशा अभद्र युत्या, तिकडे पंजाबात भाजपही अकाली दलाशी असलेली युती सोडेल अशी चिन्हे नाहीत. अकाली दलानेही पंजाबला व पंजाबातील तरूणांना देशोधडीला लावण्यात कसलीच कसर सोडलेली नाही. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप शिवसेनेच्या भ्रष्टपणाच्या व गुंडगिरीच्या दावणीला बांधलेला होता, तोच प्रकार त्यांच्याबाबतीत पंजाबमध्ये झाला आहे. पंजाबात अमरिंदरसिंग यांच्या नेतृवाखाली कॉंग्रेसचे सरकार येऊन त्यांनी तरी तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी इच्छा आहे.

४) थॅचर यांच्या ख्रिसमसचे जबरदस्तीचे पाहुणे

टिम बेल हे ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे मित्र व सल्लागारही. त्यामुळे सलग जवळजवळ १२ वर्षे त्यांना थॅचर यांच्या निवासस्थानी ख्रिसमस साजरा करावा लागला.

पहिल्या वर्षी त्यांना जेव्हा यासाठीचे निमंत्रण मिळाले तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. पंतप्रधानांच्या घरचा ख्रिसमस. परंतु त्यानंतर सलग एवढी वर्षे त्यांच्याकडेच ख्रिसमस साजरा करावा लागल्यामुळे व त्यात अगदी तोचतोचपणा असल्यामुळे व एकूणच रडाळपणा असल्यामुळे ते इतके कंटाळले होते की आता थॅचर पंतप्रधानपदी न राहतील तर बरे असे त्यांना झाले होते.

५) व्हॅलेंटाइन डे आपल्याकडे का साजरा करावा? अगदी कोणी पती पत्नी नसले तरी एकमेकांचे वाढदिवस असतात. त्याव्यतिरिक्त साजरे करायला सतत काही ना काही निमित्त लागते हेच त्यामागचे कारण असते. पतीपत्नींना एकमेकांच्या वाढदिवसाशिवाय लग्नाचा वर्धापनदिन तरी असतो, आमचे काय ही प्रेमींची अडचण असावी.

पण एखाद्या दिवशी ठरवून आपले प्रेम व्यक्त करायचे यातच कृत्रिमपणा येत नाही का? की तो कृत्रिमपणाही आजकाल आवश्यक झाला आहे?

प्रतिक्रिया

वर सातीजींनी जे म्हटलंय ते बरोबर आहे. (खालील अधोरेखित भाग)

अंदमानात एका विशिष्ट आदिवासी जमातीला प्रयत्नपूर्वक सेग्रिगेट ठेवलं जातं, त्यांचा जीन पूल प्रिझर्व करायला.
एका अर्थाने हे त्या जमातीचे संरक्षण, तर दुसर्‍या अर्थाने हे त्यांच्या बाकीच्या समाजात मिसळून जाण्यास अडथळा, त्यांना मुख्य समाजधारेपासून बाजूला ठेवल्यासारखं वाटतं.

त्यांना इतरांशी मिळूमिसळू न देणं म्हणजे संस्कृतीचं संरक्षण ? जीनपूल प्रिझर्व करणं जर कायदेशीर आहे तर मग आंतरजातीय विवाहाला विरोध का नाही ? की रेअर जमात असली तरच प्रिझर्व करणं गरजेचं आहे? मनुष्य हा एकच मानायचा असेल तर एखाद्या जमातीचे केवळ कमी लोक शिल्लक आहेत म्हणून त्याचे जीन्स वेगळे (भेसळविरहीत?!) समजून त्यांचं (इतर मानवांच्या भेसळीपासून) रक्षण करणं हा विचार कुठून उद्भवला असेल?

मोठी जटिल डिबेट आहे. आता घाईत.
फक्त पटकन मिळालेलं राईट टु फ्रीडम या फंडामेंटल राईट संबंधित एक पॅरा विकीमधून देतोयः

Freedom to reside and settle in any part of the territory of India, subject to reasonable restrictions by the State in the interest of the general public or for the protection of the scheduled tribes because certain safeguards as are envisaged here seem to be justified to protect indigenous and tribal peoples from exploitation and coercion

बाकी हे बरंच संदिग्ध आहे. मला आजवर एक ठाम बाजू घ्यायला जमलेलं नाही.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

or for the protection of the scheduled tribes because certain safeguards as are envisaged here seem to be justified to protect indigenous and tribal peoples from exploitation and coercion

ही लबाडीस प्रोत्साहन देणारी बाब आहे.

म्हंजे आधी त्यांना (शोषणापासून व बलप्रयोगापासून) संरक्षण मिळावं म्हणून वेगळं काढायचं/ठेवायचं. नंतर ते सेक्लुड झाले की लगेच "राष्ट्रीय मुख्य प्रवाहात" आणण्यासाठी निधी मंजूर करायचा. नंतर राष्ट्रीय मुख्य प्रवाहात आले (?) म्हंजे मग ते स्पेशल इंट्रेष्ट ग्रुप बनतात. मग त्यांच्यासाठी अल्पसंख्यांक सेल मधे वेगळी प्रावधानं ठेवायची. आम्ही त्यांच्यासाठी यंव केलं अन तुम्ही त्यंव केलं नाही म्हणून आरडाओरडा करायचा.

फुसके बार – १८ फेब्रुवारी २०१६ सहा मिनिटांमध्ये तीनदा, जेएनयुप्रकरणी निषेधार्ह मारहाण, योगेश्वरचे फुटीरतावाद्यांना प्रत्युत्तर
.

१) सहा मिनिटांमध्ये तीनदा

बोगद्यात फोनसाठीची रेंज न आल्याने त्याचे इंटरनेटचे कनेक्शन भंगले. तो बँकेचे ऑनलाईन ट्रांजॅक्शन करत असल्याने काही न करताही तुम्ही 'रिफ्रेश बटन दाबल्यामुळे किंवा एकच बटन दोन वेळा दाबल्याने एरर' असा मेसेज येऊन तो त्या वेबसाईट मधून बाहेर फेकला गेला.

आधीच बोगद्यात सिग्नल कसा येत नाही या विचाराने तो वैतागला होता. २०१६ सालातही इंडिया इतका मागासलेता कसा या भावनेने आपण वेळेतच योग्य तो निर्णय घेतल्याचे त्याला खूप समाधान वाटले.

पण त्याहीपेक्षा आपली काहीही चूक नसतानाही खोट्या आरोपावरून बॅंकेच्या वेबसाईटवरून बाहेर फेकले गेल्याचा अपमान त्याला जिव्हारी लागला. गांधीजींना प्रिटोरियात ट्रेनमधून बाहेर फेकले गेल्यावर काय वाटले असेल याची त्याला अनुभूती मिळाली. त्या निमित्ताने त्याला प्रथमच गांधीजींबद्दल आपुलकी वाटली.

पण या बोगद्याच्या समस्येबदल काही तरी करायला हवे असे त्याला मनापासून वाटले. बोगद्याऐवजी ट्रेन वळणे घेत डोंगर ओलांडू शकेल असा मार्ग तयार करण्याचा खर्च आणि बोगद्यातून जाताना इंटरनेट बंद झाल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीची किंमत यांची तुलना करत, बोगद्याऐवजी डोंगराला वळसा घालणारा मार्ग तयार केला तर काही तासांमध्येच त्याचा पे बॅक म्हणजे ब्रेक इव्हन होईल याबद्दल त्याची खात्री पटली. एवढी साधी गोष्ट सरकारच्या लक्षात कशी येत नाही असे वाटून आपण अगदी वेळेत योग्य तो निर्णय घेतला याचे त्याला दोन मिनिटांत दुसऱ्यांदा समाधान वाटले. शिवाय एवढ्या मोठ्या समस्या असूनही आपल्या काही समविचारी मित्रांप्रमाणे आपण मात्र इंडियाला ब्लडी इंडिया म्हणत नाही याचे आंतरिक समाधान होतेच.

अडचण आली की गप्प बसणे त्याच्या स्वभावात नव्हतेच. आताच एका मिनिटात केलेले ब्रेक इव्हन अॅनॅलिसिस रेल्वेमंत्री प्रभूंपर्यंत पोहोचवायचा निश्चय त्याने केलाच होता व त्यातून सरकारने पीआयओंना रेल्वे मित्र हा पुरस्कार देण्याची सुरुवात केली तर तो हमखास आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री पटली.

शिवाय गरज ही शोधाची जननी असते यावरून इंग्लिशमध्येही अशीच एक सेईंग आहे हे त्याला आठवले व त्याने लगेच ही सेईंग अंमलात आणण्यासाठी मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर बँक असते, तशी जेथे रेंज नसते तेथे वापरण्यासाठी इंटरनेट बँक का असू नये असा प्रश्न त्याच्या इन्नोव्हेशन सर्कलमध्ये विचारायचे ठरवले. एखाद्या कल्पनेचेही पेटंट घेता येते हे माहित असल्याने त्याने मायदेशीपरत गेल्या गेल्या एखाद्या आयपी अॅटर्नीला गाठायचे ठरवले. आपल्यालाच ही कल्पना आधी सुचली हे सिद्ध करावे लागले तर काय या कल्पनेने तो पुन्हा एकदा अस्वस्थ झाला व त्याने काही तासांचाही उशीर व्हायला नको म्हणून त्या कल्पनेची इमेल तयार करून स्वतःच्याच दुसऱ्या इ मेल आयडीवर पाठवती आणि मगच त्याने मान वर केली.

त्याचा शेजारचा माणूस चक्क खिडकीतून बाहेरच्या घाटातून दिसणारे सौंदर्य पहात होता. अशा पद्धतीने वेळ वाया घालवणाऱ्यांमुळेच इंडिया मागे आहे याची त्याची पुन्हा एकदा खात्री पटली आणि आपण अगदी वेळेत योग्य तो निर्णय घेतल्याची त्याची खात्री पटली. मागच्या सहा मिनिटांमध्ये तिसऱ्यांदा.

२) जेएनयुमधील विद्यार्थी कन्हैया कुमार याला कोर्टात सादर केले जात असताना त्याला काही वकिलांकडून मारहाण केली गेली. याचा धिक्कारच केला पाहिजे. दिल्ली पोलिस अजूनही कन्हैयाविरूद्ध सबळ पुरावे आहेत असे म्हणत असले, तरी ते पुरावे काय आहेत हे जोपर्यंत पुढे येत नाही, तोपर्यंत त्याला केवळ संशयितच समजले पाहिजे. आतापर्यंत पुढे आलेल्या पुराव्यांवरून हा नेता देशविरोधी घोषणा दिल्या जात होत्या तेथे उपस्थित होता, मात्र त्याचा प्रत्यक्ष घोषणा देण्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता असे दिसते. तरीही आज न्यायालयाने त्याला तब्बल पंधरा दिवसांची कोठडी का दिली हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

यापूर्वीही जेएनयुमधील विद्यार्थ्यांना, पत्रकारांना मारहाण केली गेली, पत्रकारांचे फोन हिसकावून घेतले गेले, त्यांना धमक्या दिल्या गेल्या, हे प्रकारही तसेच अगदी निषेधार्ह आहेत.

हे उद्योग करणारे इतर कोणी नसून स्वत: वकीलच आहेत हे तर आणखी धक्कादायक आहे. या वकिलांची वैयक्तिक मते काहीही असोत, पण ते जे करत आहे त्याला गुंडगिरीशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही. आज मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये मोबाइल फोनचोरीच्या संशयावरून दोन मुलांना अक्षरश: निर्वस्त्र करून काही प्रवाशांनी पट्ट्याने बेदम मारहाण करण्याचा भयंकर प्रकार झाला. वकिलांचे हे वागणेही असेच रानटीपणाचे आहे. दिल्लीत भाजपचे जे हातावर मोजण्याएवढे आमदार आहेत त्यांच्यातल्या एकाने एका डाव्या विचारसरणीच्या माणसाला बदडले व तो त्याच्या वागण्याचे निर्लज्जपणे समर्थन करत आहे.

या सर्व घडामोडींमध्ये जेएनयुमधील अभाविपच्या तीन पदाधिका-यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे आताच कळते आहे. त्यात त्यांनी ज्या पद्धतीने वकिलांकडून कन्हैया कुमारसह इतरांना मारहाण झाली, त्याचे कारण दिले आहे. शिवाय ब-याच काळापासून मनुस्मृतीवरून व रोहित वेमुला या दोन मुद्द्यांवरून असलेले मतभेद या कारणाचादेखील उल्लेख त्यात आहे.

कारणे काहीही असली तरी कोणतीही धडक कारवाई करण्यापूर्वी त्यासाठी सबळ कारणे आहेत का याची खात्री करून घेतली नाही, तरी लोक पुरेसे जागरूक आहेत. यातला दोन्ही बाजूंकडून केला जाणारा राजकारणाचा भाग सोडला तरी सर्वोच्च न्यायालयात याबद्दल मूलभूत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पुरेशी कारणे नसतील तर न्यायालयाकडून कानउघाडणी झाल्यावर होणारी पंचाईत वेगळीच. त्यासाठी आणखी काळजी घ्यायला हवी.

३) योगेश्वर दत्तचे फुटीरतावाद्यांच्या घोषणांना प्रत्युत्तर

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला जेएनयुमध्ये फुटीरतावाद्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने याबाबतीत एक कविताच सादर केली.

गज़नी का है तुम में खून भरा जो तुम अफज़ल का गुण गाते हो,
जिस देश में तुमने जनम लिया उसको दुश्मन बतलाते हो!
भाषा की कैसी आज़ादी जो तुम भारत माँ का अपमान करो,
अभिव्यक्ति का ये कैसा रूप जो तुम देश की इज़्ज़त नीलाम करो!
अफज़ल को अगर शहीद कहते हो तो हनुमनथप्पा क्या कहलायेगा,
कोई इनके रहनुमाओं का मज़हब मुझको बतलायेगा!
अपनी माँ से जंग करके ये कैसी सत्ता पाओगे,
जिस देश के तुम गुण गाते हो, वहाँ बस काफिर कहलाओगे!
हम तो अफज़ल मारेंगे तुम अफज़ल फिर से पैदा कर लेना,
तुम जैसे नपुंसको पे भारी पड़ेगी ये भारत सेना!
तुम ललकारो और हम न आये ऐसे बुरे हालात नहीं
भारत को बर्बाद करो इतनी भी तुम्हारी औकात नहीं!
कलम पकड़ने वाले हाथों को बंदूक उठाना ना पड़ जाए,
अफज़ल के लिए लड़ने वाले कहीं हमारे हाथों न मर जाये!
भगत सिंह और आज़ाद की इस देश में कमी नहीं,
बस इक इंक़लाब होना चाहिए,
इस देश को बर्बाद करने वाली हर आवाज दबनी चाहिए!

तो शेवटी म्हणतो,

ये देश तुम्हारा है ये देश हमारा है, हम सब इसका सम्मान करें,
जिस मिट्टी पे हैं जनम लिया उसपे हम अभिमान करें! जय हिंद।

४) समज – गैरसमज

होस्टेलवर असताना पुण्याच्या मित्राने हापूसचे आंबे आणले. त्यातले बहुतेक आंबे थोडेफार लागलेले होते. त्याने ते जेव्हा मित्रांबरोबर शेअर केले, तेव्हा अर्थातच त्याच्या लक्षात आले नाही. पण त्याला जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्याने आंबा खाण्याचे थांबवले. त्याने एवढ्य हौसेने आणले होते, थोडेच तर लागले होते, तेव्हा त्याला कोठे नाराज करा असे वाटून आम्ही मात्र खात राहिलो.

पण हे कुठल्या दुष्काळातून आलेत, आंबे खराब आहेत तरी खात आहेत, असा त्याचा समज झाला असेल का? त्या नजरेने तो आमच्याकडे पहात राहिला असेल काय?

अशा प्रकारे अगदी सहजपणे सासू-सुनांमध्ये गैरसमज निर्माण करू शकणारे प्रसंगही सांगितले जातात. उदाहरणार्थ रात्रीच्या जेवणानंतर स्वयंपाकघर आवरून झाल्यावर निजानीज झाल्यावर सुनेला स्वयंपाकघरात दररोज कसला तरी आवाज ऐकू येई. तिच्या लक्षात आले की तिच्या सासूबाई तेथे जातात. हे रोजच झाल्यावर तिला वाटू लागते की तिने सारे काही नीट आवरून ठेवले आहे की नाही याची नंतर पाहणी करण्यासाठीच सासूबाई मुद्दाम सगळे झोपी गेल्यावर तेथे जाऊन पाहतात. अर्थात सासूबाई त्यांची कवळी काढून ठेवण्यासाठी तशी चक्कर मारत असतात. कारण नव्या सुनेसमोर तसे करणे त्यांना प्रशस्त वाटत नसते.

कधीकधी नको तेवढा भिडस्थपणा तर कधी दुसरे स्पष्टवक्तेपणाचे किंवा फटकळपणाचे टोक. एकामध्ये न बोलल्यामुळे गैरसमज निर्माण होणार आणि नको तेवढे वाढणार. दुस-यामध्ये किरकोळ गोष्टींमधूनही नाते तुटायचीच शक्यता.

मध्यममार्ग हाच उत्तममार्ग हे त्यांना कोण सांगणार!

५) खाली फोटो असलेले 'दि स्वदेशी मालाचा व्यापार करणारी कंपनी लि.' या नावाचे १८७३मध्ये स्थापना झालेले कपड्यांचे दुकान कोठे आहे हे कोण सांगू शकेल? अर्थात स्त्रीवर्गालाच याचे उत्तर माहित असण्याची शक्यता अधिक वाटते.
20160217101256.jpg

अशा प्रकारे अगदी सहजपणे सासू-सुनांमध्ये गैरसमज निर्माण करू शकणारे प्रसंगही सांगितले जातात. उदाहरणार्थ रात्रीच्या जेवणानंतर स्वयंपाकघर आवरून झाल्यावर निजानीज झाल्यावर सुनेला स्वयंपाकघरात दररोज कसला तरी आवाज ऐकू येई. तिच्या लक्षात आले की तिच्या सासूबाई तेथे जातात. हे रोजच झाल्यावर तिला वाटू लागते की तिने सारे काही नीट आवरून ठेवले आहे की नाही याची नंतर पाहणी करण्यासाठीच सासूबाई मुद्दाम सगळे झोपी गेल्यावर तेथे जाऊन पाहतात. अर्थात सासूबाई त्यांची कवळी काढून ठेवण्यासाठी तशी चक्कर मारत असतात. कारण नव्या सुनेसमोर तसे करणे त्यांना प्रशस्त वाटत नसते.

होतात होतात असे गैरसमज होतात. माझाही असाच एक गैरसमज झाला होता. जेव्हा जेव्हा काही कारणांनी सासूबाईंच्या पाया पडले तेव्हा कधीही आशीर्वादाचा ब्र ही ऐकला नाहीये. मला ते खटकायचं वाटायचं - सूनेला आशीर्वाद देण्यातही कंजूषी दुसरं काय!
पण एकदा नणंद पाया पडलेली तेव्हाही काही बोलल्या नाहीत.
मला माझ्याच विचारांची इतकी लाज वाटली.
नंतर नंतर तर हे लक्षात आलं की (कोणी बोललं नाहीये. हा ही गैरसमज असूही शकतो) की त्यांना असं वाटतं की त्यांची बत्तीशी खोटी ठरते म्हणून काही चांगलं बोलत नाहीत. अर्थात वाईट तर कोणीच बोलत नाही म्हणा. पण बहुतेक त्या चांगलं बोलायचं टाळत असाव्यात.
खखोदेजा.
पण माझ्या येडपट विचारांची मात्र अजुनही लाज वाटते.

स्वदेशी मालाचा व्यापार करणाऱ्या कपड्यांचे दुकान हा फोटो दिसत नाही.

रेल्वेत इंटरनेट न मिळण्याबद्दल वाचताना एकदम ऐसीवर नसलेल्या सुविधांची आठवण झाली.

पहिल्या फुसक्या बाराची शैली खूपच आवडली. त्यातही

हीपेक्षा आपली काहीही चूक नसतानाही खोट्या आरोपावरून बॅंकेच्या वेबसाईटवरून बाहेर फेकले गेल्याचा अपमान त्याला जिव्हारी लागला. गांधीजींना प्रिटोरियात ट्रेनमधून बाहेर फेकले गेल्यावर काय वाटले असेल याची त्याला अनुभूती मिळाली. त्या निमित्ताने त्याला प्रथमच गांधीजींबद्दल आपुलकी वाटली.

अशा कोपरखळ्या मस्तच!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फुसके बार – १९ फेब्रुवारी २०१६ रविशकुमार महात्म्य, धन्य हरीश व नेहमीचे बघे, खैय्याम यांची समाजऋणाची परतफेड
.

१) रविशकुमारसारखे खोडसाळ पत्रकार आणि आपले दुर्दैव

एनडीटीव्ही – हिन्दीचा मुख्य अँकर रविशकुमार याचा अलीकडे अनेकांना पुळका आलेला दिसतो. युट्युबवरील त्याचा एक प्रातिनिधिक व्हिडियो खाली दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=lnfRMfk4Eac

अलीकडे सियाचेनमध्ये मृत्युमुखी पडलेले जवान आणि ‘वन रॅंक, वन पेंशन’ वरून केलेल्या आंदोलन व त्यावरून आताच्या सरकारला सैनिकांच्या प्रश्नाबद्दल खरोखर वाटणारी काळजी यांचा संबंध लावणे म्हणजे तर अकलेची दिवाळखोरी आहे.

तीच गोष्ट पीडीपीबरोबरच्या काश्मिरमधल्या युतीची. काश्मीरमधली राजकीय कम्पल्शन्स, मग ती कॉंग्रेस वा भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची असोत, त्याचे विश्लेषण करण्याची या रवीशकुमारची योग्यता नाही व त्यावरून जादवपूर विद्यापीठातली अफजल गुरूचे समर्थन करणा-या घोषणा देणा-या मुलीच्या या प्रतिवादावरून येथे आताच्या सरकारला झोडपण्याचीच त्याची वृत्ती येथे दिसते. तेव्हा पीडीपीशी असलेली युती व इतरत्र अफझलच्या समर्थनार्थ केलेल्या घोषणांवरुन आताच्या सरकारला दुटप्पी म्हणणा-यांना खरे तर रवीशसारख्या निष्पक्ष म्हणवणा-या पत्रकाराकडूनच परस्पर उत्तर दिले जायला हवे. त्याऐवजी तो याचे भांडवल त्याचा मुद्दा एकांगीपणे रेटण्यासाठी करत आहे.

तेथे जर पीडीपीशी आजच्या भाजपऐवजी कॉंग्रेसची युती असती व केन्द्रातही कॉंग्रेसचे सरकार असते व अशी देशविरोधी घोषणाबाजी झाली असती व केन्द्रातील कॉंग्रेस सरकारने त्याविरूद्ध काही कारवाई केली नसती तर याच रवीशकुमारने त्याविरुद्ध आवाज उठवला नसता का? तर मग याची नक्की अडचण काय आहे? राष्ट्रवादाच्या नावावरून आताच्या सरकारच्या विरूद्ध लोकांच्या मनात गोंधळ उडवून देण्याचा त्याचा उद्योग यातून स्पष्ट दिसतो. जगभरच्या अन्यायांची यादी त्याला दिसते, पण कन्नूरमधल्या हत्येसारख्या एखाद्या उदाहरणाचा उल्लेख केला की आपण कसे निष्पक्ष हे दाखवायला तो मोकळा. त्याला बिहार, बंगाल, उ.प्र.मधल्या राजकारण्यांनी घातलेला नंगा नाच दिसत नाही. ना त्याला मालदामध्ये काय झाले त्याचा उल्लेख गुंडगिरीच्या वा देशद्रोहाच्या घटनांच्या संदर्भात करावेसे वाटते.

स्कॉटलंड ब्रिटनपासून वेगळा होऊ पाहतोय, त्यांच्या नेत्यांना तेथे देशद्रोही समजले जात नाही असे रवीशकुमार म्हणतो. हाच न्याय लावायचा तर मग आपल्याकडे अगदी उद्या देशाचे किती तुकडे होतील याची गणती करता येईल काय? तेव्हा तो अतिशय धोकादायक पद्धतीने त्यांचा निष्पक्षपणाचा अजेंडा राबवत आहेत. तो धोकादायक आहे.

राष्ट्रवादाच्या संदर्भात केवळ हिटलरसारख्याची उदाहरणे दिली जातात. भारताच्याच संदर्भात राष्ट्रवाद जागवणारे टिळक, गांधी व स्वातंत्र्यानंतरचे शास्त्री, जेपी, अगदी अलीकडचे अण्णा हजारे यांची उदाहरणे त्यांना दिसत नाहीत काय? तेव्हा राष्ट्रवादाच्या नावाखाली जगभरात काय झाले याची उदाहरणे देताना भारतातही तसेच करण्याचा उद्योग चालू आहे हे दाखवताना केवळ लोकांच्या मनात भयगंड निर्माण करणे हाच याचा प्रयत्न दिसतो.

हे अर्ध्या हळकुंडाने पवित्र झालेले पत्रकार की यांना सगळे माहित असूनही ठरवून खोडसाळपणा करण्याचे ठरवलेल्या पत्रकार परदेशातल्या घटनांचा जसाच्या तसा संदर्भ येथे देतात आणि आपल्या डोक्यातले विष येथे ओकतात. शिवाय यांची पद्धतही आरडाओरडा न करता शांतपणे हे सगळे करण्याची.

जेठमलानींसारखे विविध प्रकारच्या गुन्ह्याचे आरोप असलेल्यांचे वकीलपत्र घेणारेही कधी आताच्या सरकारचा हिस्सा होते हे दाखवणारे हे रवीशमहाशय सिब्बल, चिदंबरम यांच्यासारख्यांनीही वेळोवेळी कोणाची वकीलपत्रे घेतली याचा उल्लेख करत नाहीत, तेव्हा हे धुरळा उठवणा-या पत्रकारांपेक्षा वेगळे नाहीत हेदेखील स्पष्ट होते.

त्याच्या म्हणण्यामध्ये एकच मुद्दा योग्य वाटतो, तो म्हणजे आता जेएनयुमधल्या या घटनांविरूद्ध हे वकील ज्या पद्धतीने हाणामारीवर आले आहेत, ते भ्रष्टाचाराच्या किंवा एरवी होणा-या अन्यायाच्या मुद्द्यांवरून आक्रमक होताना कधी दिसतात का? पण मग ही सिलेक्टिव्ह मुद्द्यांवरून आंदोलने करण्याची वृत्ती सगळीकडेच आहे व केवळ त्याचा उल्लेख केवळ आताच्या संदर्भात करणे हे यांच्या निष्पक्षपणाचे उदाहरण समजायचे का? शिवाय ते या वकिलांनी केलेल्या मारहाणीचा उल्लेख करतात, पण आजवर जे भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आले त्यांच्याविरूद्ध कन्हैयाकुमारसारख्यांनी तेवढ्याच तीव्रतेने आंदोलने केली का हो? त्यावरून विद्यापीठ बंद ठेवले का हो? तेथे सीताराम येचुरी उघडपणे सांगत आहेत की जेएनयुमध्ये सर्व विरोधांना डावलून त्यांच्या पक्षाचा विजय झाला आहे. हे विधान या रवीशकुमारांच्या डोळ्यात भरले का?

जेएनयुमध्ये ८५० प्राध्यापक आहेत. काहींच्या मते त्यातले केवळ ५० प्राध्यापक आताच्या आंदोलनावरून विद्यापीठात संप करण्याच्या मताचे आहेत. हा आकडा थोडाफार बदलूही शकेल, पण बहुतेकांना क्लासेस घ्यायचे आहेत, अभ्यासक्रम पूर्ण करायचे आहेत, असे ते सांगत आहेत. हा कन्हैयाकुमारही स्वत: अतिशय गरीब पार्श्वभूमीतून आलेला आहे. तरीही त्याला काय करायचे ते करू दे, पण तिथल्या बहुसंख्य अशा गरीब विद्यार्थ्यांना ही विद्यापीठात संप करण्याची ‘चैन’ परवडण्यासारखी नाही. त्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून रोजीरोटी कमवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येपूर्वी त्याच्या संघटनेने केलेले उद्योग पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे होते. हा कन्हैयाकुमारही जे करतो आहे, आताच्या देशविरोधी घोषणाप्रकरणात त्याचा हात असो किंवा नसो, ते पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे आहे. आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याचा सविस्तार लेख प्रसिद्ध झाला आहे, त्यात त्याने व्यक्त केलेल्या मतांवरून हे लक्षात यावे. असेच करायचे तर मग अशा आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही गरीबीतून आलेलो आहोत, आम्ही दलित आहोत याचे भांडवल करता कामा नये. असे म्हटले तर मात्र अशी आंदोलने करणे हा आमचा हक्कच आहे, असा यांचा आग्रह दिसतो. शिवाय अशी आंदोलने करायची तरी हे सारे विद्यापीठाच्या आवारात नको, कारण त्याने इतरांचे नुकसान होते, हेही यांना मान्य होत नाही. त्यामुळे यांच्या आंदोलनाच्या नावाखाली विद्यापीठ बंद राहिले, त्यातून इतर विद्यार्थ्यांचे ज्यांचा या आंदोलनांशी काही संबंध नसतो नुकसान होते, याचेही अशा गोष्टींचे समर्थन करणा-यांना घेणेदेणे नसते.

तेव्हा रवीशकुमार हे महाशय हे जगभरची उदाहरणे देऊन त्याच्या नावाखाली येथे भयगंड निर्माण करण्याचा उद्योग करत आहेत. ज्या प्रकरणात वकिलांनी किंवा लोकांनी प्रकारांना व जेएनयुमधील विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा उद्योग केला त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच, पण राष्ट्रवाद हा त्यांना अभिप्रेत असलेल्या अर्थाने वाईटच असतो अशी पट्टी पढवणा-या व आपल्या निवडक व हेतुने प्रेरित उदाहरणांवरून लोकांमध्ये भयगंड निर्माण करणा-या रवीशकुमारसारख्या पत्रकारांपासून सावध रहायला पाहिजे. भारताचे नागरिक म्हणून आपण सर्वसाधारणपणे पुचाट आहोतच, रवीशकुमारसारखे खोडसाळपणा करणारे पत्रकार त्या पुचाटपणात भर घालण्याचे काम करत आहेत. एरवी जे काही चालले आहे ते जणू सारे आलबेल आहे आणि सरकारच ते सगळे विसकटून सर्वांवर अत्याचार करण्यात अग्रेसर आहे असा आभास निर्माण करण्याचे काम करत आहेत.

टाइम्सनाऊचा अर्णब त्याच्या आक्रस्ताळेपणाबद्दल प्रसिद्ध आहे. मात्र आपल्याकडच्या देशविरोधी घोषणांच्या संदर्भात स्कॉटलंडमध्ये काय चालले आहे याची मुर्खासारखी उदाहरणे देत न बसता तो अशा देशविरोधी प्रवृत्तींविरूद्ध रोखठोक भूमिका घेतो आणि दुसरीकडे तो पत्रकार, जेएनयुचे विद्यार्थी यांच्यावर झालेल्या हल्ल्यांबद्दलही त्याविरूद्ध रोखठोकपणाची भूमिका घेतो, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. जसे अर्णवही प्रत्येकवेळी ज्या भूमिका घेतो त्या सगळ्या बरोबर असतातच असे समजण्याची गरज नाही, तीच गोष्ट या रवीशकुमार महाशयांचीही आहे. दूध का दूध करण्याइतपत आपली समज आहे का की आपण वाहवत जातो ते हे पाहण्याची गरज आहे, मग तो अर्णब असो की रवीश कुमार असो. त्यामुळे या निमित्ताने रवीश कुमारने जे केले आहे ते डोळ्यात अंजन घालण्याचे नव्हे आपल्याला आंधळे करण्याचे उद्योग आहेत हे वेगळ्या सांगायची गरज नसावी.

२) एक भला माणूस आणि सगळीकडेच दिसणारे किडे-मकौडे

नुकतीच बंगळुरूमध्ये काळजाला पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडली.
बंगळुरुत २३ वर्षीय हरीश नंजाप्पा हा त्याच्या बाइकवरून जात असताना एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यामुळे हरीशचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि तो ट्रकच्या खाली आला. हा अपघात एवढा भयंकर होता की या अपघातात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. कमरेच्या खालचा भाग भागापासून जवळजवळ आठ-दहा फूट अंतरावर पडला.

पण

पुढची १५-२० मिनिटे हरीश रस्त्यावर नुसता तडफडत होता आणि या वर्दळीच्या रस्त्यावरून जाणारे लोक केवळ त्याला बघत राहिले. अलीकडे जवलजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन असल्यामुळे अनेकांनी त्याचे फोटो काढले, परंतु याला मदत केली नाही. अखेर इतक्या वेळानंतर अॅम्ब्युलन्स आली, तेव्हाही हरीश जिवंत होता. कदाचित झालेल्या प्रचंड रक्तस्त्रावामुळे तो जगणे अशक्यही आहे. पण अॅब्युलन्समधल्या लोकांना त्याने सांगितले की त्याचा मृत्यु आता अटळ आहे, पण त्याची अवयवदान करण्याची इच्छा आहे. अखेर त्याला जिवंत ठेवणे शक्य न झाल्यामुळे त्याचे इतर अवयव वापरता आले नाहीत. त्यामुळे केवळ त्याचे दोन डोळेच उपयोगात आणता येणार आहेत.

हरीशने हेल्मेट घातल्याने त्याच्या डोक्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. मृत्यु समोर दिसत असतानाही आपल्यामुळे कोणाचे तरी भले व्हावे अशी इच्छा बाळगणारा हा धन्य हरीश. बाकी बघ्यांच्या स्वरूपातले किडे आपल्या सभोवताली दिसतातच.

३) हिंसाचार आणि आत्महत्या

मुंबईतील लोकलमध्ये मोबाईल फोन चोरल्याच्या आरोपावरून काही जणांनी दोघांना आधी लोकलच्या डब्यात व नंतर प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे निर्वस्त्र करून मारहाण केली गेली. टीव्हीवरील आजच्या चर्चेत मुळात ही घटना कशामुळे घडली हे कळत नसल्यापासून ते रेल्वेशी संबंधित सुरक्षिततेपर्यंत विविध मुद्दे मांडले गेले. मात्र सर्वात चित्तवेधक मुद्दा मांडला तो डॉ. हरीश शेट्टी या मानसोपचारतज्ज्ञांनी.

एकाच वेळी देशात आत्महत्या आणि हिंसाचार या दोन्ही प्रकारांनी थेमान घातले आहे. जेव्हा एखादा विचार मनात फार प्रबळ होतो त्यावेळी सारासार विचार करण्याची आपली शक्तीच संपते. त्यातूनच मग लातुरमध्ये झालेल्या भुकंपानंतरही जवळ मृतदेह पडलेले असताना पडक्या घरांमध्ये चोरी करण्याची इच्छा होणे, गुजरात दंगलींच्यावेळी झालेल्या दुकानफोडीतून भल्याभल्यांनाही टीव्ही वगैरे वस्तु चोरून नेण्याची इच्छा होणे य गोष्टी कारणमीमांसेच्या पलीकडच्या असतात. परिस्थिती इतकी वेगळी असते की एकीकडे सामान्य माणूसही आजुबाजुच्या व रोजच्या कटकटींमुळे हिंसाचाराला प्रवृत्त होतो, तर दुसरीकडे कित्येक शेतकरीही टोकापर्यंत खेचले गेल्यामुळे आत्महत्या करताना दिसतात.

त्यांच्या मते प्रत्येक राज्यामध्ये मानसोपचाराची बाजू सांभाळण्यासाठी वेगळे मंत्रालय हवे. परिस्थिती आताच गंभीर आहे. हे केले गेले नाही, तर आणखी गंभीर होणार आहे. आताच त्याबद्दल काहीतरी केले पाहिजे.

आपल्याकडे नैसर्गिकदृष्ट्याच एकाच वेळी कोठे तरी कोरडा दुष्काळ असतो, त्याचवेळी दुसरीकडे नद्या दुथडी भरून वाहत असतात आणि यामुळे कित्येक भागांमध्ये पुराचे थैमान असते. आपलीही वृत्तीही अशीच रामभरोसे चालणारी आहे. जोपर्यंत आपल्याला त्यामुळे जोपर्यंत काही बाधा पोहोचत नाही, तोपर्यंत आपला कशाशीच संबंध नसतो.

४) प्रसिद्ध चित्रपट संगीतकार खैय्याम यांनी त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जवळजवळ दहा कोटी रूपयांची रक्कम एका ट्रस्टद्वारे चित्रपटक्षेत्रातील गरजूंसाठी वापरण्यासाठी दान केली.

त्यांचे हे दातृत्व वाखाणण्यासारखे अहेच, पण नव्वदाव्या वर्षातही त्यांची तब्येत अगदी ठणठणीत दिसली. त्याचे रहस्यही खय्याम यांनी इतरांच्या फायद्यासाठी शेअर करावे.

५) एबीपीमाझावरील माझा कट्टा या कार्यक्रमात आज महेश काळे व राहूल देशपांडे या दोघांची मुलाखत घेतली गेली.

शास्त्रीय संगीताशिवाय त्यांनी नवी हिन्दी चित्रपट गीते व त्याचबरोबर पाश्चिमात्य गाणीही लीलया सादर केली. अर्थात हे केवळ शब्दात सांगून भागणारे नाही. तुम्ही हा कार्यक्रम पाहिला नसेल तर जरूर पहा. असेच दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याचा विचार असेल तर एबीपीमाझाने ‘कला कट्टा’ हा वेगळा कट्टा निर्माण करावा. अर्थात त्यावर बहुतेक भुक्कड मराठी चित्रपटांचे प्रमोशन करण्याचा हेतु नसावा.

या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडियो आतातरी उपलब्ध नाही. परंतु एबीपीमाझाच्या वेबसाइटवर या कार्यक्रमात गायलेली गाणी उपलब्ध अहेत.
वेबसाइटची लिंक: http://abpmajha.abplive.in/videos

#फुसके_बार

#Phusake_Bar

#फुबा_सर्व्हे

1) जचूआ
2) जचुआ
3) जचूआ
4) कौवा
5) कौवा

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पाने